विशेष लेख : के. शंकरनारायणन यांच्या राजीनाम्याच्या निमित्ताने ........केंद सरकारने महाराष्ट्राचे राज्यपाल के. शंकरनारायणन यांची बदली मिझोरम राज्यात केल्याने नाराज झालेल्या शंकरनारायणन यांनी राज्यपाल पदाचा राजीनामा राष्ट्रपतींना सादर केला आहे.
राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच मोदी सरकार सत्तेत आल्यापासून कॉंग्रेसनियुक्त राज्यपालांना हटवणे सुरु आहे.
• उदा. यांनी राजीनामा दिला = पश्चिम बंगालचे एम. के. नारायणन, नागालंडचे अश्विनी कुमार, उत्तर प्रदेशचे बी. एल. जोशी, छत्तीसगडचे शेखर दत्त
कमला बेनिवाल – गुजरातच्या राज्यपाल होत्या. त्यांची प्रथम मिझोरमला बदली केली व नंतर पदाचा दुरुपयोग केल्याचा ठपका ठेऊन हटवण्यात आले.
वीरेंद्र कटारिया - पुदुच्चेरीचे राज्यपाल. यांची उचलबांगडी करण्यात आली.राज्यपालांना केंद्रात सत्ताबदल झाल्यानंतर हटवणे योग्य आहे का?

१. होय
२. नाही
३. सांगता येत नाही

नाही. कारण –

• राज्यपाल हे एक घटनादत्त पद आहे. त्यात राजकारण आणणे बरोबर नाही.

होय. कारण –

राजकीय परंपरा :- राज्यपालांना हटवण्याची परंपरा आपल्याकडे पूर्वीपासून चालत आलेली आहे. १९७७ साली जनता पक्ष सत्तेवर आला. त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांनीही हाच कित्ता गिरवला. २००४ साली कॉंग्रेसने अटलबिहारी सरकारने नेमलेल्या काही राज्यपालांना हटवले होते.
राज्यपालांचा क्षुद्र राजकीय स्वार्थ :- राज्यपाल हे खरे तर घटनादत्त पद. त्याचा मान त्या पदावरील व्यक्तीने राखला पाहिजे. मात्र अनेक राज्यपालांनी या पदावर राहून क्षुद्र फायद्यासाठी या पदाची प्रतिष्ठा पार धुळीला मिळवली आहे.
काही उदा. पाहा.
के. शंकरनारायणन - यांनी प्रादेशिक महामंडळांचा निधी अन्यत्र वळवण्यास आक्षेप घेतला. हा निधी संबंधित भागाच्या विकासासाठीच खर्च झाला पाहिजे, असा आग्रह त्यांनी धरला. याबद्दल त्यांचे खरोखर कौतुक केले पाहिजे. मात्र ‘आदर्श’ प्रकरणात अशोक चव्हाण यांची चौकशी करण्यास मात्र त्यांनी परवानगी नाकारली.
एस. एम. कृष्णा – महाराष्ट्राचे माजी राज्यपाल. यांनी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव चव्हाण यांना कह्यात ठेवण्याचे काम केले. त्यासाठीच कॉंग्रेस हाय कमांडने त्यांची नियुक्ती केली होती. या कामगिरीचे फळ पाहा - निवृत्त होताच केंद्रात मंत्रिपद!
पी. सी. अलेक्झांडर – १० वर्षे महाराष्ट्राचे राज्यपाल होते. राष्ट्रवादीच्या मदतीने राज्यसभेत किरकोळ खासदार बनले.

सांगता येत नाही. कारण –

केंद्र सरकार वि. बी. पी. सिंघल यांच्यातील खटला, २०१०, सर्वोच्च न्यायालय :-
सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात दोन विरोधाभासी विधाने केली.
१. राज्यपालांना केवळ ते केंद्र सरकारशी राजकीय मतैक्य असलेले नाहीत म्हणून हटवता येणार नाही.
२. राज्यपालांच्या बदलीसाठी कोणतेही कारण देणे केंद्रावर बधानकारक नाही.


निष्कर्ष :-

राज्यपाल या राजमान्य पण निरुपयोगी आणि महागड्या परंपरेस आता येथेच थांबवणे योग्य ठरेल. ब्रिटीशकालीन या परंपरेला तिलांजली देणेच योग्य आहे.

RECENT POSTS

 • २७ ऑगस्ट २०१४ - दैनिक बातम्या व विश्लेषण New...
 • विशेष लेख : केरळमधील दारूबंदी योग्य कि अयोग्य New...
 • १९ ते २४ ऑगस्ट २०१४ - दैनिक बातम्या व विश्लेषण : भाग १ New...
 • १८ ऑगस्ट २०१४ - दैनिक बातम्या व विश्लेषण : भाग २
 • १८ ऑगस्ट २०१४ - दैनिक बातम्या व विश्लेषण
 • १५ ऑगस्ट २०१४ - दैनिक बातम्या व विश्लेषण
 • १३ ऑगस्ट २०१४ - दैनिक बातम्या व विश्लेषण
 • विशेष लेख

 • विशेष लेख : केरळमधील दारूबंदी योग्य कि अयोग्य New...
 • 'डेंग्यूविरोधात तू आणि मी' - राष्ट्रीय अभियानास सुरुवात ..........-by BK Core Group
 • CPSE-ETF च्या स्थापनेची तयारी पूर्ण ..........-by BK Core Group

 • Comments ( अभिप्राय )

  bhagwat     2014-08-26
  very nice sir.
  mohini rajput     2014-08-26
  तुम्ही खूप सोप्या शब्दात माहिती देता सर! काही लक्षात ठेवायची गरजच पडत नाही.
  mahesh     2014-09-04
  Why the updates are not regular?? I am following anusri.org regullarly,please do update it regularly.
      2014-09-15
  language is very simple to understand
      2014-10-23
  Thanks u sir
      2014-11-06
  Mast mahiti kale patil
  navnath gajarwad     2014-11-09
  Very very rasy notes sir.....
  D.M.Ingle     2014-12-17
  mast ahe.
  Rani Chopade     2014-12-24
  R     2014-12-24
  Very nice each and every member easily catch this notes ..... really great.
  puja bhivare     2015-01-03
  Vry vry nice sir
  subu     2015-01-09
  Mast sir thank u
  Nitesh Bangal     2015-01-24
  Apli Web khup Easy& smart
  Sumit khedgarkar     2015-02-28
  Easy notes
  manohar     2015-03-26
  very nice sir
  pralhad purane     2015-05-24
  Very informative notes sir thank you.
  Rupali     2015-06-16
  very nice notes
  swapnil     2015-06-22
  khup Chan mahiti dili aahe plzzz ashich mahiti update det rha all the best
      2015-07-03
  mahiti chan aahe pan cuka durust karavwat
  jadhav shridevi     2015-07-11
  Very good
  jadhav eknath dnyandev     2015-07-20
  Join
  parmanand katolkar     2015-08-27
  good notes but better
  parmanand katolkar     2015-08-27
  good notes but not better
  Nitin Bambal     2015-11-06
  Apli web far chan ahe
  hoverboard 7 inch     2016-03-27
  hoverboard 7 inch
  hoverboard rules nsw couple     2016-03-27
  hoverboard rules australia budget
  hoverboard onewheel     2016-03-27
  hoverboard safety
  hoverboard 360 walmart     2016-03-27
  hoverboard 360 wheel size
  hoverboard technologies website     2016-03-27
  hoverboard technologies website
  hoverboard reality quotes     2016-03-27
  hoverboard reality quotes  Add Your Comment :


  CONTACT US AT :
  इ-मेल : bhushankale2010@gmail.com
  mob. 9421990878 (फक्त SMS )

  आपणास ही वेबसाईट कशी वाटतेय, कोणत्या बाबी अजून add कराव्या, कोणत्या गोष्टींमध्ये बदल करावासा वाटतोय या बद्दलची आपली मत जरूर कळवा.

  कृपया CONTACT US या सदरात जाऊन स्वतःचे REGISTRATION (नोंदणी) करा. मासिक आणि इतर सुविधा केवळ नोंदणी केलेल्या सदस्यांनाच मिळतील.