प्रश्नमंजुषा

ज्ञानार्जन केल्यानंतर ते कितपत ग्रहण झाले आहे, याची चाचपणी करायला हवी. तरच ज्ञानप्राप्तीची पातळी समजते. जो भाग समजलेला नाही, तो पुन्हा एकवार समजावून घ्यायला हवा हे कळते. त्यासाठीच हे सदर! या सदरात दररोज आपणास काही प्रश्न सोडवावयास मिळतील. त्यांची उत्तरेही उपलब्ध असतील. या प्रश्नमंजुषेचा अधिक चांगला उपयोग करून घ्यायचा असेल तर, आपण ' दैनिक बातम्या व विश्लेषण ' आणि ' विशेष लेख ' ही सदरे अवश्य अभ्यासावयास हवीत.