भारतीय औषध क्षेत्राचा दर्जा

१) प्रस्तावना :

भारतीय औषध क्षेत्र हे एक सध्या जागतिक स्तरावर चर्चेचा विषय बनला आहे. त्याकारणाने आपण याविषयी सखोल जाणून घेणे आवश्यक आहे, त्यासाठीच आम्ही हा लेख देत आहोत.

२) DCGI : (ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया)

ज्या पद्धतीने विमा क्षेत्रात इर्डा, शेअर मार्केट व गुंतवणूक क्षेत्रात सेबी, त्यापद्धतीने आरोग्य क्षेत्रात औषधाची तपासणी करण्यासाठी DCGI हि संस्था नियमन करत असते.

३) भारतीय औषध क्षेत्र -हा विषय चर्चेत का आला?

DCGI ने नुकतेच भारतीय औषधाचे परीक्षण केले त्यातील काही औषधे हे दुय्यम दर्जाचे आढळून आले, त्यामुळे भारतीय औषध उद्योगाच्या विश्वासाला तडा जाण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात येऊन, औषधांची जागतिक पतही धोक्यात येईल.

४) भारतीय औषधाची सध्याची स्थिती

DCGI ने डिसेंबर २०१२ पासून भारतातील औषधांचा सर्वे केला तो अहवाल १९ मार्च २०१४ ला प्रसिध्द झाला आहे. या सर्वेक्षणात २.३% औषधे हे दुय्यम दर्जाचे आढळून आले आहेत.
या सर्वेक्षणाच्या काळात जवळपास ११२३ प्रकारचे औषधांचे नमुने गोळा करून त्याची चाचणी घेण्यात आली. हे औषधांचे नमुने सरकारी दवाखाने, होलसेल विक्रेते, किरकोळ विक्रेते यांच्याकडून जमा करण्यात आले होते. यासाठी राज्य व केंद्र सरकारचे ड्रग कंट्रोलर ऑफिसर यांनी एकत्रपणे औषधाचे नमुने गोळा करण्याचे काम डिसेंबर २०१३ दरम्यान केले होते. या चाचणीमध्ये ११२३ औषधातील २६ औषधे हे दुय्यम दर्जाचे आढळून आलेले आहेत. दुय्यम दर्जाचे औषधे आढळून येण्याचे प्रमाण जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये जास्त प्रमाणावर आढळून आले आहे.

५) दुय्यम दर्जाचे काही औषधे

DCGI ने केलेल्या चाचणीत पुढील काही औषधी हे दुय्यम दर्जाचे आढळून आले आहेत. त्यात.........
I. सेफ्डन (SEFDON-O)-cefixime &Ofloxacin)
II. फिक्झीन-आय आर Fixin IR-200 DT (cefixime tab)
III. राबेड Rabed
IV. किंडॅक Kindac-p (Aceclofenac & paracetamol Tab)
V. बायोडोक्स बोलूस Biodox bolus
VI. रॅंडम Random (Omeprazole magnesium &Domperidone Tab)
VII. डिक्लोगोल्ड-एम Diclogold-M (Paracetamol, Diclofenac sodium & mag. Trisilicate Tab)
VIII. कोल्डगार्ड Coldgard (paracetamol, Phenyephrine HCL, Chlorpheniramine maleate, caffeine Tab )
IX. प्री-एम आर Pre-MR (Diclofenacv Pot.,paracetamol & chlorzone Tab )

६) DCGI कडून हि चाचणी घेण्याचे काय ?

• अमेरिकेच्या औषध आणि अन्न प्रशासनाने(USFDA) काही भारतीय औषधांवर बंदी घातली आहे.
• अलीकडेच USFDA ने भारताची सर्वात मोठ्या औषध कंपन्या RANBAXY LABORATORIES आणि WOCKHARDT यांच्याकडून औषध आयात करण्यावर बंदी घातली आहे.
• या बंदीमुळे भारतीय औषध उद्योगाची आंतरराष्ट्रीय बाजारातील पत कमी झाली.
• त्याबरोबरच भारताला १४ अब्ज डॉलर परकीय चलनाला मुकावे लागले.
• कारण, अमेरिकेला औषध पुरवण्यामध्ये कॅनडानंतर भारताचा दुसरा क्रमांक लागतो.
• जवळपास अमेरीकेला लागणाऱ्या एकूण औषधाच्या ४०% औषधी भारताकडून पुरवल्या जातात. यामध्ये जेनेरिक व इतर तयार औषधे अमेरिकेला पुरवले जाते.

७) यापूर्वीचा सर्वे :

• DGCI ने यापूर्वी देशपातळीवर असा सर्वे २००९ मध्ये केलेला होता.
• २००३- २००८ या कालावधीमध्ये २४००० औषधांचे नमुने गोळा करण्यात आले होते.
• यामध्ये ०.०४६% खोटे औषधे आढळून आली. तर ६ ते ७.५% औषधे त्याच्या उच्च दर्जाची क्षमता दर्शवू शकले नाहीत.
विशेष लेख वाचण्यासाठी खालील लिंक वर click करा किंवा या पानावरील 'विशेष लेख' या लिंकवर click करा.  • 'डेंग्यूविरोधात तू आणि मी' - राष्ट्रीय अभियानास सुरुवात ..........-by BK Core Group New...
  • CPSE-ETF च्या स्थापनेची तयारी पूर्ण ..........-by BK Core Group New...
  • प्रिय मित्रहो, आपणास काही शंका किंवा प्रश्न असतील तर आम्हांस जरूर कळवा. आपल्या चांगल्या आणि वाईट सर्व प्रकारच्या सूचना नेहमीच स्वागतार्ह आहेत. इ-मेल : shivraj@anushri.org किंवा SMS करा 9404703270    कृपया CONTACT US या सदरात जाऊन स्वतःचे REGISTRATION (नोंदणी) करा. मार्च महिन्याचे मासिक केवळ नोंदणी केलेल्या सदस्यांनाच मोफत मिळेल.