गर्भलिंग निदानाच्या नवीन पद्धतींना आळा घालण्यासाठी तज्ञ गट स्थापन

 • जनगणनेची ही आकडेवारी पहा : -
 • १९९१ = ९७२ स्त्रिया / १००० पुरुष
 • २००१ = ९३३ स्त्रिया / १००० पुरुष

 • याचा अर्थ काय होतो?
 • स्त्रियांची संख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे.
 • कारण??? = तुम्हाला सर्वांना माहितच आहे. कोणतेही MPSC चे पुस्तक चाळा त्यात ही कारणे दिलेली आहेत.
 • त्यातील काही कारणे अशी = वंशाचा दिवा, समाजातील हुंडा पद्धती, स्त्रियांना असलेली दुय्यम वागणूक, स्त्रियांना वाटणारी असुरक्षितता इ.

  स्त्रियांची संख्या दिवसेंदिवस घटत जाण्याचे महत्वाचे कारण : - लोक गर्भलिंग निदान करतात.
 • गर्भलिंग निदान म्हणजे काय? = गर्भारपणाच्या विशिष्ट मुदतीनंतर गर्भाचे लिंग जाणून घेणे (मुलगा आहे कि मुलगी?) म्हणजे गर्भलिंग निदान!
 • भृणहत्या = गर्भारपणाच्या विशिष्ट मुदतीनंतर केला जाणारा गर्भपात म्हणजेच भृणहत्या!
 • स्त्री भृणहत्या = गर्भलिंग निदानात गर्भ स्त्रीलिंगी असल्याचे आढळल्यानंतर (मुलगी होणार हे कळल्यानंतर) केला जाणारा गर्भपात म्हणजे स्त्री भृणहत्या!

  उपाय : - शासनाने एक कायदा आणला.
 • Pre-Conception & Pre-Natal Diagnostic Techniques Act, 1994 (PC & PNDT Act)
 • गर्भधारणापूर्व आणि जन्मपूर्व निदान तंत्र कायदा, १९९४

 • या कायद्याने गर्भलिंग निदानावर बंदी घातली.
 • सोनोग्राफी यंत्रे वापरून डॉक्टर पेशंटला मुलगा कि मुलगी ते सांगायचे.
 • PC & PNDT Act ने या सोनोग्राफी यंत्रावर नजर ठेवणारे एक यंत्र या सोनोग्राफी यंत्रावर बसवले.
 • त्या यंत्राला म्हणतात – सायलेंट ऑबझर्व्हर मशीन
 • हे मशीन सोनोग्राफीवर काय-काय घडले हे सरकारला कळवते. त्यामुळे गर्भलिंग निदान करणे कमी झाले. =>> स्त्री भ्रूणहत्या कमी झाल्या. = सरकार खुश!!!

  मग आता प्रॉब्लेम काय? : -
 • मित्रांनो काळ वेगाने बदलतोय. तसे तंत्रही बदलतेय. सोनोग्राफी यंत्रांसारखे काम करणारी अनेक उपकरणे बाजारात दाखल झाली आहेत.
 • सध्याचा कायदा PC & PNDT Act या उपकरणांना प्रतिबंध करीत नाही.
 • गर्भलिंग निदान तंत्रासारखी अनेक नवीन तंत्रे विकसित झाली आहेत, जी PC & PNDT Act मध्ये येत नाहीत. =>> परिणामी लोक मोठ्या प्रमाणावर ही तंत्रे वापरून लिंग निदान करून घेत आहेत. =>> परिस्थिती जैसे थे!!!

  IVF/ART (In-Vitro Fertilization/Artificial Reproductive Technology) : - ज्यांना मुलबाळ होत नाही, ते लोक या पद्धती वापरून गर्भाशयाबाहेर भ्रूण निर्माण करतात. साहजिकच या पद्धतीत त्यांना मुलगा किंवा मुलगी निवडण्याचा अधिकार मिळतो. =>> हे तर गर्भलिंग निदानासारखेच झाले. (+ह्या पद्धतींना शासनमान्यता आहे. = शासनमान्य भृणहत्या)

 • वरील समस्यांवर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय पर्यवेक्षक मंडळाने Central Supervisory Board (CSB) एक तज्ञ गट (expert group) स्थापन केला आहे.
 • हा गट वरील समस्यांवर उपाय सुचवेल.
 • PC & PNDT Act मध्ये कोणते बदल करायला हवेत, ते सांगेल.
 • कोणत्या गोष्टी नव्याने समाविष्ट (add) करायला हव्यात, हे सांगेल.


  केंद्रीय पर्यवेक्षक मंडळ /Central Supervisory Board (CSB): -
 • PC & PNDT Act ची अंमलबजावणी होतेय कि नाही हे पाहण्याचे काम हे मंडळ करते.
 • अध्यक्ष – केंद्रीय आरोग्य मंत्री – हर्षवर्धन
 • सहअध्यक्ष – महिला व बालविकास मंत्री
 • tags : Current Affairs for Examination Current Affairs for Examination in Marathi General Knowledge for Examination General Knowledge for Examination in Marathi General Knowledge सामान्य ज्ञान भारतीय राज्यशास्त्र भारतीय राज्यघटना Indian Polity Indian Constitution  RECENT POSTS

  Quiz - प्रश्नमंजुषा

 • Quiz - प्रश्नमंजुषा - दि. २१ सप्टेंबर २०१४ New...
 • Quiz - प्रश्नमंजुषा - दि. १७ सप्टेंबर २०१४
 • Quiz - प्रश्नमंजुषा - दि. १५ सप्टेंबर २०१४
 • चालू घडामोडी नोटस् : Current Affairs Notes

 • फैय्याज ९५ व्या नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षा
 • डॉ. जब्बार पटेल यांना विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर
 • पाकच्या उलट्या बोंबा
 • भारतीय राज्यघटना

 • भारतीय राज्यघटना : भाग ३
 • भारतीय राज्यघटना : भाग २
 • भारतीय राज्यघटना : भाग १

 • Comments ( अभिप्राय )

  krushna pawar     2016-09-16
  आवडला
  CesFriesse     2017-04-24
  Come Assumere Levitra traitement cialis 5mg cpr 28 Where Can I Buy Discount Progesterone Medication Shop
  Cialis Tadalafil 20 Mg buy cialis Buy Proscar Generic Propecia Kamagra Edinburgh n.com>viagra prescription Does Amoxicillin Ever Expire Essais Cliniques Priligy cheap cialis Cialis
  Modo D Uso India Drugs Vpxl Cheap Viagra Discount Viagra 100mg Sulfasalazine >overdose fluoxetine Canadian Family Pharmacy Online


  Add Your Comment :
  • Name :
  • Email :

  • Add Comment :

  CONTACT US AT :


  इ-मेल : bhushankale2010@gmail.com
  mob. 9421990878 (फक्त SMS )

  आपणास ही वेबसाईट कशी वाटतेय, कोणत्या बाबी अजून add कराव्या, कोणत्या गोष्टींमध्ये बदल करावासा वाटतोय या बद्दलची आपली मत जरूर कळवा.

  कृपया CONTACT US या सदरात जाऊन स्वतःचे REGISTRATION (नोंदणी) करा. मासिक आणि इतर सुविधा केवळ नोंदणी केलेल्या सदस्यांनाच मिळतील.