Goto Back  (मागील पानावर)

दैनिक बातम्या व विश्लेषण

राष्ट्रीय

१.ओडिशाला विशेष राज्याचा दर्जा द्या – बिजद

-बिजू जनता दलाने (बिजद) सिमान्ध्राला मिळाला तसा विशेष दर्जा ओदिशालाही मिळावा म्हणून आज आंदोलन केले.
-केंद्राने रघुराम राजन समितीच्या अहवालावरून ओडिशाला विशेष राज्याचा दर्जा देण्यास नकार दिला होता.मात्र नुकतेच सिमान्ध्रावासियांना दिलासा म्हणून केंद्राने सिमान्ध्रास विशेष राज्याचा दर्जा दिला.

२.इटलीच्या नौसैनिकांविरोधात चाचेगिरी प्रतिबंधक कायद्यानुसार खटला चालवला जाणार नाही

-कारण – या कायद्यात आरोपीला जास्तीत जास्त मृत्यूदंडापर्यंत शिक्षा करण्याची तरतूद होती आणि भारताने इटलीला वचन दिलेय कि या नौसैनिकाना मृत्युदंड दिला जाणार नाही.

३. संजय दत्तला वारंवार parol का? –केंद्राचा राज्य शासनाला जाब

-पहिल्यांदा कारागृह प्रशासनाकडून आणि नंतर विभागीय आयुक्तांकडून संजयला पुन्हा पुन्हा parol का दिला जातोय?

आंतरराष्ट्रीय

१.तालिबानचा कमांडर भित्तानी ठार

-उत्तर वझिरीस्तानात अज्ञात बंदुकधारयांनी भित्तानीला ठार केले.
-भित्तानी = असमातुल्ला शाहीन भित्तानी
तालिबानचा वरिष्ठ कमांडर
यापूर्वी जम्मू काश्मीर मध्ये हरकत उल मुजाहिद्दीन तर्फे लढला.
तेहरिक ए तालिबान पाकिस्तानचा हंगामी प्रमुख होता.
तालिबानच्या ‘शूरा कौन्सिलचा’ प्रमुख.

राज्य

१.प्राचार्य पी बी पाटील यांचे निधन

महात्मा गांधी व विनोबा भावे यांच्या स्वप्नातील ग्रामस्वराज्याची कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी ‘नवेगाव चळवळ’ सुरु करणारे पी बी पाटील यांचे निधन झाले.
शै कार्य= नवभारत शिक्षण मंडळाची स्थापना (शांतीनिकेतनच्या धर्तीवर)
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे संस्थापक सदस्य
राजकीय कार्य = १९७२ ला सांगलीतून आमदार
पंचायत राज्य मूल्यमापन समितीचे अध्यक्ष
ग्रंथसंपदा = कालप्रदक्षिणा (काव्यसंग्रह)
क्रांतीसागर (कादंबरी)
समाजपरिवर्तन (वैचारिक लेखसंग्रह )
विचारधन: जन-गण-मन (३ खंड)
सेवादलात त्यांचा सक्रीय सहभाग होता.

विक्रम सावरकरांचे निधन

्वातंत्र्यवीर वि दा सावरकरांचे पुतणे आणि त्यांचे कनिष्ठ बंधू नारायणराव सावरकरांचे सुपुत्र विक्रम सावरकर यांचे निधन झाले.
हिंदू महासभेत उत्तम संघटकाचे कार्य त्यांनी पार पडले.

दलित अस्मिता पुरस्कार

अप्पासाहेब विश्वासराव भालेराव प्रतिष्ठान तर्फे हे पुरस्कार दिले जातात.
@डॉ बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार- गीतकार विष्णू शिंदे
ज्योतिबा फुले पुरस्कार- उर्मिला पवार (स्री चळवळ)
राजर्षी शाहू पुरस्कार –चंद्रकांत वानखेडे (महिलांना प्रोत्साहन)

नियुक्ती – राकेश मारिया

मुंबईचे पोलिस आयुक्त

मावळ गोळीबार प्रकरणाचा अहवाल मंत्रीमंडळाला सादर- पोलिसावर ठपका

घटना – पवना धरणातून पिंपरी चिंचवड महापालिकेस पाणी पुरवठा करण्यास मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी विरोध केला होता.
त्यावेळी काढण्यात आलेल्या मोर्च्यावर पोलिसांनी गोळीबार केला. त्यात तीन शेतकरी मारले गेले.
आयोग- २०११ ला चौकशी आयोग स्थापन केला गेला.
अध्यक्ष- HC चे माजी न्या. एम जी गायकवाड
समिती- २०१२ ला गायकवाड आयोगाने सादर केलेल्या तथ्यांवर कृती अहवाल बनवण्यासाठी अमिताभ राजन (गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव) यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली गेली.
आज या आयोग व समितीच्या शिफारशी मंत्रिमंडळासमोर मांडल्या गेल्या. त्यात गोळीबार करणाऱ्या पोलिसावर ठपका ठेवला गेला.

शासकीय योजनांची जत्रा

मानव विकास निर्देशांकानुसार महाराष्ट्रातील सर्वात मागास तालुका असलेला मुरबाड (जिल्हा ठाणे) येथे अनोखी यात्रा भरवण्यात आली.
३ दिवसांच्या या यात्रेत केंद्र, राज्य व महामंडळांच्या विविध योजनांचा लाभ तालुकावासीयांना करून देण्यात आला.
उदा मानव विकास योजनेतून ७५० शालेय विद्यार्थिनींना सायकली दिल्या गेल्या.
१०००० शेतकऱ्यांचा आम आदमी विमा काढला गेला.
२५०० शेतकऱ्यांच्या जमिनीचे माती परीक्षण केले गेले.

सरतेशेवटी शासनाची गतिमानता – अनेक निर्णय घेतले

मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वपूर्ण निर्णय
@OBC (इतर मागास वर्गात ) नामदेव शिंपी , वैश्य वाणी , तेलगु मडेलावर (परीट) यांचा समावेश
@वस्ती शाळा शिक्षकांना कायम करणे
@मानधन वाढ- अंगणवाडी सेविका=९५० रु. आणि मदतनीस= ५०० रु.

अर्थव्यवस्था

आळशी NTPC ला केंद्राचा धक्का – खाणी रद्द केल्या

NTPC= National Thermal Power Corporation (राष्ट्रीय औष्णिक वीज प्राधिकरण)
NTPC ला केंद्राने २००६ साली ओदिशातिल दुलंगा खाणी विकसित करण्यास दिल्या होत्या.
खाणीच्या परिसरातील लोकांचे विस्थापन व पुनर्वसन आणि सामाजिक दायीत्वापोटी पहिले ५ वर्ष ३० ते ४० कोटी रु खर्च करण्याच्या अटी केंद्राकडून घातल्या गेल्या होत्या.
-मात्र NTPC ने कोळसा खाणी सुरु केल्या नाहीत. तसेच वरील अटीही पाळल्या नाहीत.
-म्हणून NTPC ह्या खाणी काढून घेतल्या आहेत. आता NTPC ला नव्याने अर्ज करावा लागेल.

कृषी-

सोयाबीन

-भारतात १.८ दशलक्ष टन सोयाबीन तेलाची निर्मिती होते. तर १.२ दशलक्ष टनाची आयात करावी लागते.
-सोयाबीन उत्पादनात भारताचा जगात ५ वा क्रमांक.
-प्रती हेक्टरी उत्पादकता मात्र केवळ १.०१७ मेट्रिक टन. (जगाची २.५ मे टन )
-सोयाबीनमध्ये तेलाचे प्रमाण जास्त असते. तसेच पोषणमुल्येहि ज्यादा असतात.

विज्ञान तंत्रज्ञान

यकृताच्या पेशी बनवण्यात यश

-दरवर्षी यकृत निकामी होऊन हजारो लोक मरतात.
-यावर उपाय म्हणजे – यकृत प्रत्यारोपण (दुसरे यकृत बसवणे)
-पण त्यासाठी यकृत पेशी हव्यात.
-शास्त्रज्ञांनी मुलपेशी (स्कंदपेशी) तंत्रज्ञान वापरून त्वचेतील पेशींपासून यकृत पेशी निर्माण करण्यात यश मिळवले आहे.
-सध्या उंदरावर हे प्रयोग केले जाताहेत.
महत्त्वाचे वैज्ञानिक शोध प्रसिद्ध करणाऱ्या ‘जर्नल नेचर’ नियतकालिकाने हे संशोधन प्रसिद्ध केलेय.

BBM चा विस्तार होतोय झपाट्याने

-CANADA तील BLACKBERRY कंपनीच्या BBM (BLACKBERRY MESSAGING) या APP चा विस्तार झपाट्याने होतोय.
-BLACKBERRY मध्ये मोफत असलेली हि सेवा ऑक्टोबर २०१३ मध्ये ANDROID व OS handsets साठी उपलब्ध झाली होती.
-आता WINDOWS फोन व NOKIA-X साठी सुद्धा ती लवकरच उपलब्ध होईल.
- BBM= BLACKBERRY MESSAGING
-उपयोग - INSTANT MESSAGING, VOICE CHAT, FREE CHANNELS, GROUP CREATION ETC

अर्थसंकल्पीय अधिवेशन वृत्तांत

१.राज्यपालांचे अभिभाषण – काही ठळक मुद्दे

-२००९-१० सालापासून ५०० सिंचन प्रकल्प पूर्ण झालेत.
-२०१३-१४ साली ४९ नक्षलवाद्यांचे समर्पण
-कार्यान्वित झालेल्या योजना- राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना, मागणी आधारित रक्त पुरवठा, अन्न सुरक्षा, मनोधैर्य, सुकन्या, हवामान आधारित पिक विमा योजना, कोरडवाहू शेती अभियान (२५ जिल्ह्यात )

२. ‘वित्तीय विवरणपत्रावरून’ विधानसभा संस्थगित

-महाराष्ट्र विधानमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झालेय.
-वित्तराज्यमंत्र्यांनी पुरवणी मागण्या मांडताना त्यासोबत वित्तीय विवरणपत्र (ग्रीन बुक ) सादर न केल्याने विरोधकांनी गोंधळ घालून कामकाज बंद पाडले.
-टोलचा वाद, भ्रष्टाचारी मंत्र्यांना पुरवलेले संरक्षण व स्थानिक संस्था कर (LBT) या मुद्द्यांवरून विरोधकांनी राज्यपाल के शंकरनारायणन यांच्या अभिभाषनावेळी गोंधळ घातला व चले जाव च्या घोषणा दिल्या.
-पुरवणी मागण्या= महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पाचे आकारमान २.९४ लाख कोटी (२०१३-१४) होते.त्याव्यतिरिक्त जो ज्यादा खर्च होतो, त्याकरिता विधानमंडळात शासन पुरवणी मागण्या मांडत असते.
@२०१३-१४ या वर्षातील पुरवणी मागण्या =
पावसाळी अधिवेशन – ८००० कोटी
हिवाळी अधिवेशन -११००० कोटी
अर्थसंकल्पीय अधिवेशन -११०० कोटी
एकूण – २०००० कोटी

३. ‘सावकारी व्यवहाराचे नियमन’ करणारे विधेयक विधानसभेत मांडले गेले-

-या विधेयकानुसार सावकाराने अवैधरित्या एखाद्याची मालमत्ता हडपल्यास, ती जप्त करण्याचे तसेच मागील ५ वर्षातील प्रकरणांची चौकशी करण्याचे अधिकार उपनिबंधकास दिले गेलेत.

क्रीडा

१.आशिया चषकाला (१२ व्या ) सुरुवात

-ठिकाण – बांगलादेशातील ढाका व फातुल्लाह
-गतविजेता- पाकिस्तान
-सर्वाधिक विजेतेपद = भारत- ५ वेळा- शेवटचे २०१०

२.युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत गतविजेता भारत ५ व्या स्थानी राहिला.

३.टेनिस-स्पेनच्या राफेल नदालने ‘रिओ ओपन’ जिंकली

४.जागतिक टेनिस क्रमवारी-

एकेरी = पुरुष =
राफेल नदाल (स्पेन)=१
सोमदेव देववर्मन =७८
युकी भाम्बरी =१४६
एकेरी = महिला=
सेरेना विल्यम्स (अमेरिका) = १
दुहेरी पुरुष
लिएन्दर पेस = १०
रोहन बोपन्ना = १६
महेश भूपती = ४१ (निवृत्तीचे संकेत)
दिविज शरण =६५
दुहेरी महिला =
सानिया मिर्झा = ११

शैक्षणिक

.५ वे ‘INNOVATION HUB’ मुंबईत सुरु

-शालेय मुलांतील कल्पनाशक्तींना साधनांची व मार्गदर्शनाची जोड देऊन भावी सर्जनशील वैज्ञानिक तयार करण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात INNOVATION HUB म्हणजेच नवनिर्मिती केंद्रे स्थापन करायचे ठरवले आहे.
-त्यातीलच ५ वे हब आज मुंबईत सुरु झाले.
- या केंद्रात मुले विविध शाखांमध्ये मुलभूत व अत्याधुनिक संशोधन करू शकतात.
-केंद्रातील उपक्रम- @तोड-फोड-जोड=वस्तू तोडायच्या वव पुन्हा जोडायच्या
@कबाड से जुगाड = स्वस्त कच्च्या मालापासून वैज्ञानिक खेळणी व INTERACTIVE MODELS तयार करणे.
-अतिप्रतिभाशाली मुलांना ‘टाटा मुलभूत संशोधन संस्थेतही’ प्रयोग करता येतील.

पर्यावरण

१.लोहारा जंगल बचावले

-ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या राखीव क्षेत्रात (बफर झोन) कोळशाचे प्रचंड साठे आहेत.
-या भागातील २ खाणी अदानी समूहाला देण्यात आल्या होत्या.
-पर्यावरण मंत्रालयाच्या छाननी समितीने सुद्धा २००८ ला या खाणींना मंजुरीपत्र (TERMS OF REFERENCE) दिले होते.
-मात्र पर्यावरणवाद्यांना हे समजल्यावर देशभर मोठा जनक्षोभ उसळला. त्यावर पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी मंजुरीपत्र रद्द केले.
-अदानी चिडले व SC त गेले. SC ने केंद्राला खान वितरणाचा आढावा घेण्यास सांगितले.
-आढावा घेणाऱ्या मंत्रिगटाने अदानीला वेळेत मंजुरीपत्र मिळूनही खाण-विकास कामास सुरुवात न केल्याबद्दल फटकारले व आज खाणी रद्द करण्याची घोषणा केली.
-अशा प्रकारे लोहारा जंगल बचावले.

२.राज्यात ५५% वनगुन्हे प्रलंबित – वनरक्षण होणार तरी कसे?

-वनगुन्हे= वृक्षतोड, अवैध चराई, वन्यप्राण्यांची शिकार, आगी लावणे, वनजमिनीवर अतिक्रमण इ यांत वृक्षतोडीचे गुन्हे सर्वाधिक घडतात.
-वनगुन्हे प्रलंबित का राहतात?
@गुन्हा घडल्यानंतर त्याची माहिती वनरक्षकाकडून उपवनसंरक्षकापर्यंत पोचण्यास आठवडा लागतो.
उपाय- PDA (PERSONAL DIGITAL ASSISTANCE) वनरक्षकांना हे उपकरण दिले गेलेय. त्याद्वारे गुन्ह्याची माहिती तत्काळ वरिष्ठांपर्यंत पोचते आहे.
‘फोरेस्ट offence management’ द्वारे मुख्यालयी तात्काळ माहिती पोहोचणार.
@साक्षीदारापासून पुरावे गोळा करेपर्यंत बराच कालावधी जातो.
@अपुरे मनुष्यबळ
@राजकीय हस्तक्षेप
-मागील वर्षी सर्वाधिक वनगुन्ह्यांचा निपटारा मेळघाटात झाला होता.