तेलक्षेत्रातील आर्थिक सुधारणांना चालना

 • नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने - तेलक्षेत्रातील आर्थिक सुधारणांना चालना देण्याचा - निर्णय घेतला आहे.
 • त्याचाच एक म्हणून डिझेलच्या किंमती सरकारी नियंत्रणातून मुक्त करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे.

  कारण काय?: - = आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या घसरत्या किमतींचा ग्राहकांना थेट फायदा मिळावा, यासाठी!

  मग काही परिणाम झाला का?: -
 • होय. = त्यामुळे शनिवारी मध्यरात्रीपासूनच डिझेलचे दर लिटरमागे ३ रुपये ३७ पैशांनी घटले आहेत.

  त्याचा आपल्याला काय फायदा? : -=>>
 • *डिझेल स्वस्त झाल्याचा थेट फायदा वाहनचालकांना होईल.
 • *रेल्वेतिकिटाचे दर घटू शकतात.
 • *एसटीप्रवासही स्वस्त होण्याची शक्यता.
 • *मालवाहतुकीचे दर घटून भाज्या व जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी होतील.


  दुसरी बाजू - नैसर्गिक वायू महाग : -
 • सरकारने नैसर्गिक वायूचे दर ४६% नी वाढवले आहेत.
 • रिलायन्सने तर हे दर दुपटीने वाढवण्याची मागणी केली होती.

 • सध्याचा दर = ४.२ डॉलर प्रति MMBTU
 • MMBTU - मिलियन मेट्रिक ब्रिटिश थर्मल युनिट
 • नवा दर = ६.१७ डॉलर प्रति MMBTU

  सरकारची अट : - गेल्या चार वर्षांतील वायूनिर्मितीचा अनुशेष भरून निघेपर्यंत रिलायन्सला नवे दर लागू करता येणार नाहीत.

  नैसर्गिक वायूच्या दरात वाढ झाल्याचा परिणाम काय होईल? : -
 • सीएनजीसह पाइपगॅस, खते आणि वीज महाग होणार आहे.


 • टीप – रिलायंसला अशी मागणी करण्याचा काय अधिकार? = कृष्णा गोदावरी खोऱ्यात नैसर्गिक वायूचे उत्पादन रिलायन्स कंपनी करते. तो वायू ती विकते. त्यामुळे तिला असा अधिकार मिळतो. • नोट - वरील नोटस् विषयी आपणास अजून काही माहिती हवी असल्यास किंवा काही प्रश्न असल्यास खालील comment मध्ये लिहा. तुमच्याकडे काही ज्यादा माहिती असल्यास ती येथे share करा. तुमच्या नावासह ती प्रसिध्द केली जाईल.

  Comments ( अभिप्राय )  Add Your Comment :
  • Name :
  • Email :

  • Add Comment :