जाहिराती ... JOBS

हॉल तिकीट -- प्रवेशपत्र


निकाल - RESULT
चालू घडामोडी

This is latest news . . . This is latest news . . . This is latest news . . . This is latest news . . . This is latest news . . . This is latest news . . . This is latest news . . . This is latest news . . . This is latest news . . . This is latest news . . . This is latest news . . .

STI पूर्व - ९०% प्रश्न Anushri.org मधून !!!
 • प्रकाशित – फेब्रुवारी २०१५ .......
 • images
 • विद्यार्थी मित्रांनो,
 • नुकतीच १ फेब्रुवारी २०१५ रोजी विक्रीकर निरीक्षक (STI) पूर्वपरीक्षा पार पडली.
 • या परीक्षेत ‘चालू घडामोडीं’वर एकूण ११ प्रश्न विचारले गेले.
 • आनंदाची गोष्ट म्हणजे या ११ प्रश्नांपैकी तब्बल ९ प्रश्न हे थेट आपल्या वेबसाइटवर दिलेल्या नोट्स मधील आणि मासिकातील आहेत.

 • म्हणजेच www.Anushri.org चा नियमित वाचक विद्यार्थी या परीक्षेत हमखास पास झालेला आहे.
 • आणि भविष्यात येणाऱ्या परीक्षांना सामोरे जाताना www.Anushri.org च्या नोटस् वाचणे म्हणजे यशाची हमी असणार आहे!

 • आपणास जर या नोटस् हव्या असतील तर कृपया तुमचे ‘paid खाते’ उघडा.
 • एका महिन्यासाठी वर्गणी आहे केवळ रु.५०/- अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा >> paid खाते वर्गणी
 • एप्रिल, मे आणि जून महिन्याची मासिके FREE आहेत. जुलै महिन्याचे मासिक फक्त रु.१०० मध्ये उपलब्ध आहे. खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा >> जुलै-२०१४ मासिक • चला तर या प्रश्नपत्रिकेतील ‘चालू घडामोडी’ प्रश्नांचे विश्लेषण करूया :- -


  प्र.१. भारतीय नागरी हवाई क्षेत्रात नवीनच आगमन केलेल्या ‘एअर एशिया इंडिया’ या कंपनीत कोणत्या भारतीय उद्योगसमूहाची गुंतवणूक आहे?:-

 • १. अदानी
 • २. टाटा सन्स
 • ३. सहारा इंडिया
 • ४. किंगफिशर उद्योगसमूह

 • उत्तर : २. टाटा सन्स
 • या प्रश्नाचे उत्तर www.Anushri.org च्या जुलै मासिक – २०१४ मध्ये तुम्हाला सापडेल.....

 • जुलै मासिक – २०१४ मधील नोटस् वाचा :- -

 • एअर एशिया इंडियाचा १२ जूनला श्रीगणेशा

 • स्वस्त विमान प्रवासाचे स्वप्न दाखवणाऱ्या ‘एअर एशिया इंडिया’चे उड्डाण १२ जूनला होणार आहे. एअरबस सारखी विशाल विमाने ही कंपनी वापरणार आहे. विमान प्रवासातील श्रीमंतांची मक्तेदारी मोडून काढण्याचे कंपनीने ठरवले आहे. इतर कंपन्यांपेक्षा एअर एशियाचे दर ३५%नी कमी असतील.
 • ही कंपनी टोनी फर्नांडीस आणि अरुण भाटीया यांची संयुक्त कंपनी आहे. टोनी हा मुळचा भारतीय. पण मलेशियात स्थायिक झालेला आहे. एअर एशिया ही टोनीची विमानकंपनी मलेशियात स्वस्तात विमानप्रवास पुरवते. अरुण हा भारतातलाच! टाटा सन्स & टेलीस्ट्र ट्रेडप्लेस या कंपनीचा मालक. टाटांनी या सेवेद्वारे विमानप्रवासात पुनरागमन केले आहे.

 • भारतीय हवाई क्षेत्रात स्वस्त विमान प्रवास पुरवणाऱ्या कंपन्या :- -
 • गोएअर, इंडिगो, स्पाईसजेट इ. • प्र.२. खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत?:-


 • a. ३० जून २०१४ रोजी भारताच्या पी.एस.एल.व्ही. –सी २३ ने चार देशांचे ५ उपग्रह प्रक्षेपित केले.
 • b. पी.एस.एल.व्ही. –सी २३ चे वजन २३० टन असून, उंची ४४.४ मीटर आहे.
 • c. पी.एस.एल.व्ही. –सी २३ चा खर्च रु.१०० कोटी इतका आहे.
 • d. प्रक्षेपकाने आजपर्यंत परदेशांचे ३० व भारताचे ३५ उपग्रह प्रक्षेपित केले आहेत.


 • पर्यायी उत्तरे :- -
 • १. a आणि b
 • २. b केवळ
 • ३. a, b आणि c
 • ४. वरील सर्व

 • उत्तर : ३. a, b आणि c
 • या प्रश्नाचे उत्तर www.Anushri.org च्या http://anushri.org/15b08.html या नोटस् मध्ये तुम्हाला सापडेल.....

 • 'पीएसएलव्ही सी-२३' ने ५ परदेशी उपग्रह अवकाशात धाडले


 • फेब्रुवारी २०१३ साली इस्रोने पीएसएलव्ही सी-२० च्या माध्यमातून यशस्वीरित्या सहा परदेशी कमी वजनाचे उपग्रह अवकाशात पाठवल्यानंतर आता भारताच्या इस्त्रोने अजून एक विक्रम केला आहे.
 • 'पीएसएलव्ही सी-२३'च्या माध्यामातून इस्त्रोने आणखी पाच परदेशी उपग्रहांचे यशस्वीरित्या प्रक्षेपण केले आहे.

 • पाच परदेशी उपग्रह असलेल्या भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो)च्या पीएसएलव्ही सी २३ या प्रक्षेपकाने सोमवारी सकाळी यशस्वीपणे ३० जून २०१४ मध्ये उड्डाण केले. हा उड्डाण कार्यक्रम बघण्यासाठी नरेंद्र मोदी स्वतः हजर होते.
 • स्थळ – सतीश धवन अंतराळ केंद्र, श्रीहरीकोटा

 • 'पीएसएलव्ही सी-२३' ने खालील ५ उपग्रह प्रक्षेपित केले :- -
 • १. फ्रान्सचा पृथ्वी निरीक्षण उपग्रह स्पॉट ७ (वजन ७१४ किलो)
 • २. जर्मनीचा आयसॅट (१४ किलो),
 • ३.४. कॅनडाचे १५ किलो वजनाचे दोन उपग्रह आणि
 • ५. सिंगापूरचा व्हेलॉक्स-१ (वजन ७ किलो)

 • कॅनडाचे एनएलएस ७.१ व एनएलएस ७.२ हे उपग्रह टोरांटो विद्यापीठाने तयार केले आहेत.=
 • व्हेलॉक्स हा सिंगापूरच्या न्यानयांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीने तयार केलेला उपग्रह आहे.

 • हे उड्डाण करण्यास या प्रक्षेपकाला केवळ १०० कोटी रू. खर्च आला.

 • 'पीएसएलव्ही' आत्तापर्यंत तब्बल ३५ परदेशी उपग्रह अवकाशात यशस्वीरित्या पाठविले आहेत.


 • 'पीएसएलव्ही सी-२३' :- -
 • वजन – २२९ टन
 • उंची – ४४.५ मीटर
 • व्यास – २.८ मीटर


 • प्र.४. पुढील विधानांपैकी योग्य विधान कोणते?:-

 • a. मतदारांना नोटा (NOTA) पर्याय देणारे महाराष्ट्र हे दुसरे राज्य आहे.
 • b. नुकत्याच झालेल्या २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील ‘गडचिरोली’ मतदारसंघात सर्वात जास्त संख्येने ‘नोटा’ हा पर्याय नोंदविण्यात आला.

 • पर्यायी उत्तरे :
 • १. केवळ a
 • २. केवळ b
 • ३. a व b दोन्ही
 • ४. a व b दोन्ही नाहीत

 • उत्तर : २. केवळ b

 • या प्रश्नाचे उत्तर www.Anushri.org च्या http://anushri.org/news_in_short_23octo.php या नोटस् मध्ये तुम्हाला सापडेल.....


 • महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ६० हजार मतदारांनी 'नोटा'ला पसंती दिली.

 • नोटा = NOTA – None Of The Above – वरीलपैकी कोणीही नाही.
 • जेंव्हा मतदाराला वाटते की निवडणुकीत उभ्या असलेल्या उमेदवारांपैकी कोणताही उमेदवार मत देण्याच्या लायकीचा नाही, तेंव्हा तो या NOTA बटनावर मतदान करू शकतो.

 • IMP :- लोकसभा निवडणुक २०१४ मध्ये भारतात महाराष्ट्रातील गडचिरोली मतदार संघात सर्वात जास्त NOTA हा पर्याय वापरला गेला होता.
 • म्हणजे येथील उमेदवार सर्वाधिक नापसंतीचे ठरले होते.
 • प्र.५. खालील विधाने लक्षात घ्या -

 • (a) उबेर चषक बॅडमिन्टन खेळाशी संबंधित आहे.
 • (b) यात पुरुष व महिला सहभागी होऊ शकतात.
 • (c) या वर्षाचे सुवर्णपदक चीनने पटकावले.
 • वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?

 • १. फक्त a आणि c
 • २. फक्त c
 • ३. फक्त a आणि b
 • ४. वरील सर्व

 • उत्तर : १. फक्त a आणि c
 • या प्रश्नाचे उत्तर www.Anushri.org च्या जुलै-२०१४ मासिकात सापडेल......


 • जुलै मासिक – २०१४ मधील नोटस् वाचा :- -
 • उबेर कप – २०१४ चीनकडे

 • या वर्षीच्या उबेर कप बॅडमिन्टन स्पर्धेचे आयोजन दिल्लीतील सिरी कॉम्प्लेक्स येथेकरण्यात आले होते. त्यात चीनच्या संघाने जपानला हरवत उबेर कपवर आपले नाव कोरले. चीनने आतापर्यंत १३ वेळा उबेर कप जिंकला आहे.
 • उबेर कप :
 • या महिलांच्या बॅडमिन्टन स्पर्धा असून माजी ब्रिटीश बॅडमिन्टनपटू बेत्ती उबेर यांच्या नावावरून या स्पर्धेला उबेर कप असे नाव देण्यात आले. बेत्ती उबेर या खेळाडूने पुरुषाच्या चॅम्पियनशिप स्पर्धेवरून महिलांच्या बॅडमिन्टन चॅम्पियनशिप स्पर्धा भरवण्याची कल्पना मांडली होती.
 • या स्पर्धा पहिल्यांदा १९५६-५७ मध्ये भरवण्यात आल्या. ह्या स्पर्धेचे आयोजन दर तीन वर्षांनी करण्यात येत होते. मात्र, १९८४ पासून या स्पर्धेचे आयोजन दर दोन वर्षांनी करण्यात येत आहे.


 • प्र.६. आंध्रप्रदेश पुनर्रचना विधेयकाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?:-

 • १. तेलंगण हे भारताचे २९ वे राज्य बनेल.
 • २. तेलंगणमध्ये हैदराबादसह १० जिल्ह्यांचा समावेश असेल.
 • ३. हैदराबाद ही दोन्ही राज्यांची पुढील १५ वर्षे संयुक्त राजधानी राहील.
 • ४. वरीलपैकी एकही नाही.

 • उत्तर : ३. हैदराबाद ही दोन्ही राज्यांची पुढील १५ वर्षे संयुक्त राजधानी राहील.

 • या प्रश्नाचे उत्तर www.Anushri.org च्या एप्रिल-२०१४ मासिकात सापडेल.....


 • एप्रिल मासिक – २०१४ मधील नोटस् वाचा :- -
 • तेलंगण - भारताचे २९ वे घटक राज्य

 • आंध्रप्रदेश पुनर्निर्मिती विधेयक २०१४ संसदेने पास केले आणि आंध्रप्रदेशातून तेलंगण हे राज्य जन्मले. (१८ फेब्रुवारी २०१४)
 • तेलंगणात भारतातील ५ व्या क्रमांकाचे कोळसा साठे आहेत.

 • वैशिष्ट्ये:- -
 • पुढील १० वर्षांसाठी हैदराबाद तेलंगण आणि सिमान्ध्राची सामायिक राजधानी असेल.

 • १० वर्षांनंतर हैदराबाद तेलंगणाची राजधानी असेल. या मधील १० वर्षाच्या काळात सिमान्ध्र स्वतः साठी नवीन राजधानी निर्माण करेल. या नवीन राजधानीच्या विकासासाठी केंद्र सरकार वित्तीय मदत करेल.

 • सिमान्ध्राच्या विकासासाठी पंतप्रधानांनी ६ कलमी विकास पॅकेज जाहीर केलेय. या नुसार सिमान्ध्राला पुढील ५ वर्षांसाठी विशेष राज्याचा दर्जा मिळेल. सिमान्ध्रच्या औद्योगीकरण आणि आर्थिक विकासासाठी केंद्र मदत करेल. • प्र.७. ऑस्कर अवॉर्डस् २०१४ व प्राप्तकर्ते यांची जुळणी करा.:-

 • a. सर्वोत्कृष्ट चित्रपट
 • b. परकीय भाषेतील सर्वोत्कृष्ट चित्रपट
 • c. सात चषक जिंकणारा चित्रपट
 • d. १० नामांकने प्राप्त चित्रपट

 • i. अमेरिकन हसल
 • ii. १२ इअर्स अ स्लेव्ह
 • iii. द ग्रेट ब्युटी
 • iv. ग्रॅव्हीटी

 • १. a-ii b-iii c-iv d-i
 • २. a-i b-ii c-iii d-iv
 • ३. a-iii b-iv c-i d-ii
 • ४. a-iv b-i c-ii d-iii

 • उत्तर : १. a-ii b-iii c-iv d-i

 • या प्रश्नाचे उत्तर www.Anushri.org च्या एप्रिल-२०१४ मासिक मध्ये तुम्हाला सापडेल.....


 • एप्रिल मासिक – २०१४ मधील नोटस् वाचा :- -
 • ८६ वा ऑस्कर सोहळा

 • • या वर्षीचे वेगळेपण - यंदा पुरस्कारांची गुणवत्तेनुसार विभागणी झालीय.
 • • सर्वोत्तम चित्रपट = ‘ट्वेल्व्ह इयर्स ए स्लेव्ह’ = अमेरिकेच्या गुलामगिरीची कहाणी मांडलीय = स्टीव्ह मॅकक्वीन (कृष्णवंशीय दिग्दर्शक )ऑस्कर पटकावण्याचा मान पहिल्यांदाच एका कृष्णवंशीय दिग्दर्शकाला मिळालाय.
 • • सर्वोत्तम अभिनेत्री = केट ब्लँचेट ( ब्लू जस्मीन या चित्रपटासाठी )
 • • परभाषिक चित्रपट = द ग्रेट ब्युटी ( इटली )
 • • अॅनिमेशनपट = फ्रोझन
 • • अल्फान्सो क्वारोन - ग्रॅव्हिटीला दिग्दर्शनाचा (अल्फान्सो क्वारोन) पुरस्कार मिळाला. या चित्रपटाने एकूण सात पुरस्कार पटकावले. • प्र.११. खालील विधाने लक्षात घ्या : :-

 • a. पेड न्यूज हे निवडणूक प्रचारातील, निवडणूक लढवणाऱ्या उमेदारांचे भ्रष्ट कृत्य आहे.
 • b. पेड न्यूजची प्रकरणे हाताळण्यासाठी निवडणूक आयोगाने ‘प्रसारमाध्यम प्रमाणीकरण आणि निरीक्षण समिती स्थापन केली आहे.
 • c. लोकप्रतिनिधी कायद्यानुसार ‘पेड न्यूज’ हा निवडणूक गुन्हा आहे.
 • वरीलपैकी कोणते विधान /विधाने बरोबर आहे/आहेत?

 • १. वरील सर्व
 • २. फक्त a आणि b
 • ३. फक्त a
 • ४. फक्त a आणि c

 • उत्तर : २. फक्त a आणि b

 • या प्रश्नाचे उत्तर www.Anushri.org च्या जुलै-२०१४ मासिकात आणि इतर नोट्समध्ये सापडेल.....


 • जुलै मासिक – २०१४ मधील नोटस् वाचा :- -
 • पेड न्यूज हा कायदेशीर गुन्हा ठरवावा – व्ही. एस. संपत

 • पेड न्यूज म्हणजे काय? – विविध राजकीय पक्ष जनमत त्यांच्या बाजूने व्हावे म्हणून निवडणुकीपूर्वी चॅनेल आणि वर्तमानपत्रात पैसे देऊन स्वतःची वाहवा करून घेणाऱ्या बातम्या छापून आणतात. त्यासाठी अर्थातच माध्यमांना पैसे पुरवले जातात.
 • यंदाच्या लोकसभा निवडणुकीत तब्बल ३००० प्रकरणात पेड न्यूजच्या नोटीसा देण्यात आल्या. पेड न्यूज लोकशाहीच्या विकासासाठी घातक आहेत. कारण त्यांमुळे लोकांपर्यंत खरी माहिती पोहोचत नाही. चुकीची माहिती मिळून अयोग्य उमेदवार निवडले जाण्याची शक्यता असते. त्यासाठीच पेड न्यूज हा कायदेशीर गुन्हा ठरवावा, अशी सूचना मुख्य निवडणूक आयुक्त व्ही. एस. संपत यांनी केली आहे. सध्याच्या लोकप्रतिनिधित्व कायद्यात तशी दुरुस्ती करावी लागेल. सध्या कायद्याची चौकट नसल्याने केवळ खर्च याच मुद्द्यावर (खर्च मर्यादा ओलांडली की नाही हे पाहून) कारवाई करता येते.

 • + हे या नोटस् वाचा. http://anushri.org/28b2.html
 • २.‘पेड न्यूज’चा प्रकार चिंताजनक – राष्ट्रपती

 • इंडियन न्यूजपेपर सोसायटी’च्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात राष्ट्रपतींनी हे नमूद केले.
 • कालच पेड न्यूजच्या बंदोबस्तासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रत्येक जिल्हाधीकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली ‘ माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती ‘ स्थापन केलीय.


 • प्र.१२. पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे?:-

 • a. सब्स्टन्स ॲन्ड शॅडोज हे नसिरुद्दीन शहा यांचे चरित्र आहे.
 • b. सब्स्टन्स ॲन्ड शॅडोज हे पुस्तक तारा नायर यांनी लिहिले आहे.
 • पर्यायी उत्तरे :
 • १. केवळ a
 • २. केवळ b
 • ३. a व b दोन्ही
 • ४. a व b दोन्ही नाहीत

 • उत्तर : २. केवळ b

 • या प्रश्नाचे उत्तर www.Anushri.org च्या http://anushri.org/13b08.html या नोट्समध्ये सापडेल.....

 • नसिरुद्दीन शहा यांनी ‘अँड देन वन डे' या नावाने आपले आत्मचरित्र लिहिले आहे.
 • नसिरुद्दीन शहा हे हिंदी चित्रपटांत भूमिका करतात.

 • दिलीप कुमार यांचे आत्मचरित्र - ‘The Substance and the Shadow’

 • दिलीप कुमार यांचे आत्मचरित्र - ‘The Substance and the Shadow’ याचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले.
 • हे आत्मचरित्र प्रसिध्द लेखिका आणि माजी पत्रकार उदया तारा नायर यांनी लिहिले आहे.

 • दिलीप कुमार विषयी :- -
 • जन्म – पेशावर, पाकिस्तान
 • मुळ नाव – महम्मद युसुफ खान
 • कॅन्टीन सुरु करण्यासाठी त्यांनी घर सोडले आणि नंतर त्यांना चित्रपट सृष्टीत चान्स मिळाला.

 • चित्रपट करियर :- -
 • पहिला चित्रपट – ज्वार भाट (१९४४)
 • शेवटचा चित्रपट – किला (१९९८)
 • त्यांनी तब्बल ६ दशके भारतीय चित्रपट सृष्टीत काम केले.

 • पुरस्कार :- -
 • १९९१ – पद्मभूषण
 • १९९४ – दादासाहेब फाळके पुरस्कार
 • १९९८ – निशाण-ए-इम्तियाझ (पाकिस्तान सरकारचा सर्वोच्च नागरी पुरस्कार)
 • गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड – सर्वात जास्त पुरस्कार जिंकणारा भारतीय कलाकार म्हणून त्यांची नोंद गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये करण्यात आली आहे.

 • ते एकदा राज्यसभेवर सुद्धा निवडून गेले होते. • प्र.१४. ‘एफ.डी.ए.’ च्या आदेशानुसार डॉक्टरांनी द्यावयाच्या औषधचिट्ठी संबंधात खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?:-

 • a. औषधचिट्ठी A-५ आकाराच्या कागदावर द्यावी.
 • b. त्यावर डॉक्टरचे पूर्ण नाव, शैक्षणिक अर्हता व नोंदणी क्रमांक असावा.
 • c. डॉक्टरांनी जेनेरिक औषधांना प्राधान्य द्यावे.
 • d. औषधचिट्ठी मोठ्या अक्षरांतच (कॅपिटल लेटर्स) असावी.

 • पर्यायी उत्तरे :
 • a केवळ
 • a आणि b
 • a, b आणि d
 • वरील सर्व

 • उत्तर : ४. वरील सर्व

 • या प्रश्नाचे उत्तर www.Anushri.org च्या http://anushri.org/NEWS_CAT/MAHARASHTRA/doctor-prescription-rules.php
 • या नोट्समध्ये सापडेल.....

 • http://anushri.org/NEWS_CAT/MAHARASHTRA/doctor-prescription-rules.php
 • 'मॉडेल प्रिस्क्रिप्शन' सक्तीची
 • अन्न व औषधी प्रशासनाने (FDA) सर्वच पॅथींच्या डॉक्टiरांना आता 'मॉडेल प्रिस्क्रिप्शन (औषधचिट्ठी) लिहिणे सक्तीचे केले आहे.
 • तसेच जेनेरिक औषधे उपलब्ध असल्यास त्याच औषधांना प्राधान्य देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

 • 'मॉडेल प्रिस्क्रिप्शन' मध्ये खालील बाबी असतील :- -
 • १. डॉक्टिरचे पूर्ण नाव
 • २. डॉक्टिरचे वैद्यकीय शिक्षण
 • ३. नोंदणी व दूरध्वनी क्रमांक
 • ४. रुग्णालयाचा पत्ता
 • ५. प्रिस्क्रिप्शनचा नंबर
 • ६. रुग्णाचे पूर्ण नाव
 • ७. रुग्णाचा पत्ता आणि संपर्क क्रमांक
 • ८. रुग्णाचे लिंग, वय, वजन
 • ९. औषधचिट्ठी A-५ आकाराची असावी.
 • १०. ती मोठ्या आणि सुवाच्च अक्षरात लिहिलेली असावी.
 • ११. औषधांची नावे इंग्रजी मोठ्या लिपीत लिहावीत.
 • १२. औषधींची मात्रा, कालावधी आणि संख्या
 • १३. डॉक्टचरची स्वाक्षरी आणि रबरी स्टॅंप इ.
 • www.Anushri.org मधून विचारले न गेलेले २ प्रश्न खालीलप्रमाणे :- -
 • येथे केवळ त्यांचे संदर्भ देत आहोत.

 • प्र.१५. BICEP २ खगोलीय दुर्बिणीविषयीच्या प्रश्नाचे उत्तर .....

 • वैश्विक तेजी झाली तेव्हा प्रचंड वस्तुमान झपाट्याने हललं, त्यामुळे गुरूत्वीय लहरी तयार झाल्या पाहिजेत असा सिद्धांत होता. शास्त्रज्ञांच्या या गटाने, लहरी शोधण्यासाठी दक्षिण ध्रुवावर एक दुर्बिण उभारली. तिचं नाव BICEP-2. त्यांनी आकाशाच्या छोट्याशा भागाचं निरीक्षण करून, प्लँकने जसा विश्वाचा नकाशा बनवलेला आहे त्याच प्रकारचा दुसरा नकाशा बनवला. पण ते तिथेच थांबले नाहीत. त्यांनी या प्रारणाच्या पोलरायझेशन किंवा ध्रुवीयतेचंही निरीक्षण केलं.

 • अधिक माहितीसाठी पुढील लिंक वर क्लिक करा >> http://www.aisiakshare.com/node/2910

 • प्र.८. प्रतिभा किरण योजना – मध्यप्रदेश
 • कामधेनु योजना – दुध उत्पादकांना दुध देणारी जनावरे खरेदी करण्यासाठी मदत करणारी योजना
 • अधिक माहिती येथे उपलब्ध >> http://www.unionbankofindia.co.in/Hindi/MSME_Finance_Kamadhenu_Hindi.aspx


 • आम्ही आता मासिके बंद केली आहेत. त्याऐवजी मासिकातील सर्व माहिती नोट्सच्या स्वरुपात दररोज पुरवली जाते.
 • ह्या नोट्स हव्या आहेत? मग महिन्याला फक्त रु.५०/- भरा.....आणि परीक्षेत हमखास यश मिळवा.

 • आपणास जर या नोटस् हव्या असतील तर कृपया तुमचे ‘paid खाते’ उघडा.
 • एका महिन्यासाठी वर्गणी आहे केवळ रु.५०/- अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा >> paid खाते वर्गणी
 • नोट - वरील नोटस् विषयी आपणास अजून काही माहिती हवी असल्यास किंवा काही प्रश्न असल्यास खालील comment मध्ये लिहा. तुमच्याकडे काही ज्यादा माहिती असल्यास ती येथे share करा. तुमच्या नावासह ती प्रसिध्द केली जाईल.

 • © सर्व हक्क www.Anushri.org च्या अधीन. या वेबसाईटवरील कोणताही भाग प्रकाशकांच्या लेखी परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारे पुनर्मुद्रित किंवा पुनर्प्रकाशित करता येणार नाही. तसेच याचा व्यावसायिक स्तरावर वापर करता येणार नाही. कोणत्याही सोशल नेट्वर्किंग साईटवर यावरील माहिती वापरता येणार नाही. उदा. Whats app, Facebook, twitter etc. वरीलपैकी कोणताही गैरप्रकार आढळल्यास ‘कॉपीराईट & पायरसी’ कायद्यांतर्गत फौजदारी कारवाई करण्यात येईल.
 • The work of www.Anushri.org is under the CREATIVE COMMONS ATTRIBUTION-NON-COMMERCIAL-SHAREALIKE 4.0 LICENCE. And also under the ‘COPYRIGHTS ACT’. Permissions beyond the scope of this licence may be available at ANUSHRI.ORG You cannot reproduce the work of Anushri.org by ANY MEANS without written permission of Shri. Bharat Kale. Doing so will be taken as the infringement of COPYRIGHT & PIRACY ACT and the proper legal action will be taken.

 • Comments ( अभिप्राय ) 15 Comments

  gaikwad pradeep     2015-10-03
      Sir me s ragistretion kel she pan jevha me web site var ye to techs mala old undated mil tat me Kay Kari sajeskara
  Kamble Ganesh Maruti     2015-09-06
      Pls.tell me how I will send you rupees..? My cell no .just msg me on that .I will become your member.(Kolhapur)
  G. Amol     2015-08-29
      sir tax asst exam result kevha lagel
  Nilesh     2015-08-27
      Mpmc is good
  Nilesh     2015-08-27
      Mpmc is good
  Ganesh Hanumant Taware     2015-06-25
      Sir STI Pre examcha result kevha lagnar? merit kiti lagel?
  ranjana gole     2015-06-11
      JK IS SO GOOD
  ashok     2015-05-08
      what is the next we should be prepare by changing syllabus
  asmita     2015-05-06
      sir. mi rejistation kel pan sir mazya kade computer nahi ahe. mi masike kivha notes mobile made pdf nahi open karu shakat.. mazi ichha a
  sunhi mi hi masike vachu shakat nahi.........
  prafull     2015-04-30
      sir sti pre kiti ynar me st categiricha ahe
  Nitin Shinde     2015-02-11
      Please share the expected cut off for STI Pre.
  SHITAL K     2015-02-10
      whats expecxted cutoff of sti 2014-15 reply?
  gopal     2015-02-08
      amhi tumche books/notes pustak vikretyankdun vikt gheu shkto ka?
  shrikant t     2015-02-06
      Thanks,After sti whats about tax assistant questions sir
  shrikant t     2015-02-06
      Thanks,After sti whats about tax assistant questions sir


  Add Your Comment :
  • Name :
  • Email :

  • Add Comment : • Tags
 • C-SAT CSAT UPSC MPSC राज्यसेवा MPSC RAJYASEVA MPSC PSI STI ASST ASSISTANT SSC BANKING CLEARK BANKING PO RBI GRADE 'B' STAFF SELECTION COMISSION MAHARASHTRA PUBLIC SERVICE COMISSION UNION PUBLIC SERVICE COMISSION DTEd TET DTED CET BANKING IBPS Current Affairs for Examination Current Affairs for Examination in Marathi General Knowledge for Examination General Knowledge for Examination in Marathi General Knowledge सामान्य ज्ञान MPSC Mock test MPSC online test Maharashtra Maharashtra History Maharashtra Geography Geography Indian Geography Indian History World Geography World History भारतीय राज्यशास्त्र भारतीय राज्यघटना Indian Polity Indian Constitution Quiz प्रश्नमंजुषा prashnamanjusha Questionnaire Quiz for MPSC Quiz for UPSC Quiz for MPSC in Marathi प्रश्नोत्तरे Quiz for SSC Quiz for DTEd TET CET Engineering Services forest services direct recruitment IBPS Banking Examinations History Of India Geography Of India Nobel Personalities Important Days Awards Sports दैनिक बातम्या व विश्लेषण Daily News & Analysis Current Affairs Notes : FEBRUARY 2014 Current Affairs Notes : MARCH 2014 Current Affairs Notes : APRIL 2014 Current Affairs Notes : MAY 2014 Current Affairs Notes : JUNE 2014 Current Affairs Notes : JULY 2014 Current Affairs Notes : AUGUST 2014 Current Affairs Notes : September 2014 MPSC MAGAZINE FREE MPSC MAGAZINE UPSC MAGAZINE FREE MPSC MAGAZINE IN MARATHI मोफत MPSC मासिक मोफत UPSC मासिक FREE ONLINE UPSC MAGAZINE IN MARATHI विशेष लेख १ ली ते १० वी शालेय पाठ्यपुस्तके : मोफत डाऊनलोड free Maharashtra Board textbooks school