जाहिराती ... JOBS

हॉल तिकीट -- प्रवेशपत्र


निकाल - RESULT
चालू घडामोडी

This is latest news . . . This is latest news . . . This is latest news . . . This is latest news . . . This is latest news . . . This is latest news . . . This is latest news . . . This is latest news . . . This is latest news . . . This is latest news . . . This is latest news . . .

सर्व प्रकारच्या e-सिगारेट्स वर बंदी घालणारे पहिले राज्य – पंजाब
 • युवक व्यसनांपासून दूर राहावेत यासाठी शासनाने एक कायदा बनवला. – COTPA- २००३
 • COTPA – सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने कायदा २००३
 • या कायद्यानुसार सिगारेट, इ-सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादनांवर बंदी घातली गेली आहे.

 • पळवाट :- मात्र सिगारेट कंपन्यांनी यातून पळवाट शोधली आणि सुगंधी, फ्लेवर्ड इ-सिगारेट तयार केल्या.
 • COTPA सुगंधी उत्पादनांवर बंदी घालू शकत नाही.

 • या समस्येवर तोडगा म्हणून पंजाब सरकारने आता एका नवीन कायद्याचा आधार घेतला आहे. ‘औषधे आणि सौंदर्यप्रसाधने कायदा’
 • आणि त्यानुसार अधिसूचना काढली आहे.
 • सुगंधी निकोटीनयुक्त इ-सिगारेट्सवर या अधिसूचनेनुसार आता बंदी घालण्यात आली आहे.
 • ज्या पदार्थात ‘निकोटीन’ असेल, त्याच्यावर या कायद्यांतर्गत बंदी असेल.
 • अशा प्रकारे पंजाब हे सर्व प्रकारच्या e-सिगारेट्स वर बंदी घालणारे पहिले राज्य ठरले आहे.

 • टीप- ‘औषधे आणि सौंदर्यप्रसाधने कायदा’ = या कायद्यानुसार मान्यताप्राप्त नसलेली औषधे आणि सौंदर्यप्रसाधने विकता येत नाहीत. • संबंधित नोट्स :- -

  निकोटिनयुक्त ई-सिगारेट्सवर बंदी लागू; पण कारवाईचे काय?

 • नेमक्या निकोटिनयुक्त ई-सिगारेट ओळखणे व त्यांच्यावर कारवाई करणे अन्न व औषध प्रशासनाला कठीण आहे.
 • ‘औषधे व सौंदर्य प्रसाधने कायद्या’च्या नियम १२२ (ई) औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० नुसार निकोटिन हे घटकद्रव्य असलेली ई-सिगारेट ही नवीन औषध समजली जाते.
 • नवीन औषधाला औषध नियंत्रकांची परवानगी आवश्यक आहे.
 • उदा. निकोटिन पोलरक्रिलेक्स’ या घटकद्रव्यांचे २ एलजी आणि ४ एमजी असे प्रमाण असलेल्या स्वादिष्ट गोळ्या (लॉझेंज) किंवा च्युइंग गमला औषध नियंत्रकांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे या गोळ्या बाजारात विकता येतात.
 • अशाप्रकारे निकोटिनयुक्त ई-सिगारेट्स हे उत्पादन या कायद्याचे उल्लंघन करत असल्याचे स्पष्ट होत असून त्यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.


 • # ‘ई-सिगारेट’म्हणजे काय?

 • सिगारेटसारखा धूर न होणारी सिगारेट म्हणजे ‘ई-सिगारेट’ (इलेक्ट्रॉनिक सिगारेट).
 • या सिगारेटमध्ये तंबाखूऐवजी द्रवरूपातील निकोटिनचा समावेश असतो.
 • ही सिगारेट पेटवण्यासाठी लायटर किंवा काडेपेटी लागत नाही.
 • त्याच्याऐवजी सिगारेटमध्ये एक लहान बॅटरी असते. त्याच्या साहाय्याने द्रवरूप निकोटिनला उष्णता दिली जाते.
 • सिगारेट ओढताना तापलेल्या निकोटिनची वाफ ओढली जाते. या वाफेला वास नसतो.


 • ई-सिगारेट धोकादायकच

 • सामान्य सिगारेटपेक्षा ई-सिगारेट कमी धोकादायक असतात, असा सर्वसामान्य समज सिगारेट कंपन्यांकडून करून देण्यात आला होता.
 • जागतिक आरोग्य संघटनेने (WHO – World Health Organization) मात्र ई-सिगारेट ही धोकादायकच आहे, असे म्हटले आहे.
 • ती अल्पवयीनांना विकू नका, असे निर्देशही WHO ने दिले आहेत. • नोट - वरील नोटस् विषयी आपणास अजून काही माहिती हवी असल्यास किंवा काही प्रश्न असल्यास खालील comment मध्ये लिहा. तुमच्याकडे काही ज्यादा माहिती असल्यास ती येथे share करा. तुमच्या नावासह ती प्रसिध्द केली जाईल.

  Comments ( अभिप्राय ) 0 Comments  Add Your Comment :
  • Name :
  • Email :

  • Add Comment : • Tags
 • C-SAT CSAT UPSC MPSC राज्यसेवा MPSC RAJYASEVA MPSC PSI STI ASST ASSISTANT SSC BANKING CLEARK BANKING PO RBI GRADE 'B' STAFF SELECTION COMISSION MAHARASHTRA PUBLIC SERVICE COMISSION UNION PUBLIC SERVICE COMISSION DTEd TET DTED CET BANKING IBPS Current Affairs for Examination Current Affairs for Examination in Marathi General Knowledge for Examination General Knowledge for Examination in Marathi General Knowledge सामान्य ज्ञान MPSC Mock test MPSC online test Maharashtra Maharashtra History Maharashtra Geography Geography Indian Geography Indian History World Geography World History भारतीय राज्यशास्त्र भारतीय राज्यघटना Indian Polity Indian Constitution Quiz प्रश्नमंजुषा prashnamanjusha Questionnaire Quiz for MPSC Quiz for UPSC Quiz for MPSC in Marathi प्रश्नोत्तरे Quiz for SSC Quiz for DTEd TET CET Engineering Services forest services direct recruitment IBPS Banking Examinations History Of India Geography Of India Nobel Personalities Important Days Awards Sports दैनिक बातम्या व विश्लेषण Daily News & Analysis Current Affairs Notes : FEBRUARY 2014 Current Affairs Notes : MARCH 2014 Current Affairs Notes : APRIL 2014 Current Affairs Notes : MAY 2014 Current Affairs Notes : JUNE 2014 Current Affairs Notes : JULY 2014 Current Affairs Notes : AUGUST 2014 Current Affairs Notes : September 2014 MPSC MAGAZINE FREE MPSC MAGAZINE UPSC MAGAZINE FREE MPSC MAGAZINE IN MARATHI मोफत MPSC मासिक मोफत UPSC मासिक FREE ONLINE UPSC MAGAZINE IN MARATHI विशेष लेख १ ली ते १० वी शालेय पाठ्यपुस्तके : मोफत डाऊनलोड free Maharashtra Board textbooks school