जाहिराती ... JOBS

हॉल तिकीट -- प्रवेशपत्र


निकाल - RESULT




चालू घडामोडी

This is latest news . . . This is latest news . . . This is latest news . . . This is latest news . . . This is latest news . . . This is latest news . . . This is latest news . . . This is latest news . . . This is latest news . . . This is latest news . . . This is latest news . . .

'इनसायडर ट्रेडिंग'च्या नवीन नियमांना सेबीने दिली मान्यता
  • उद्योग जगतात 'इनसायडर ट्रेडिंग' हा प्रकार सर्रास चालतो.

  • 'इनसायडर ट्रेडिंग' म्हणजे काय रे भाऊ?

  • आपण एक उदाहरण घेऊ ..........
  • समजा एखादी कंपनी आपला विस्तार करण्यासाठी शेअर बाजारात नोंदणी करते.
  • तेथे लोकांकडून पैसा गोळा करते. यालाच IPO म्हणतात.
  • IPO = initial public offer
  • ज्या लोकांनी कंपनीत पैसा गुंतवलेला असतो ते या कंपनीचे भागीदार म्हणजेच सहमालक बनतात.
  • ज्याचे जेवढे पैसे तेवढा तो त्या कंपनीचा मालक!

  • ठीक आहे. आता ही कंपनी चांगली सुरु आहे.
  • या कंपनीचे निर्णय घेणारा एक गट असतो त्याला म्हणतात – संचालक मंडळ
  • हे संचालक मंडळ कंपनीचा पैसा कुठे गुंतवायचा आणि इतर असे अनेक महत्वाचे निर्णय घेत असते.
  • या निर्णयांवरच कंपनीचा शेअर बाजारातील भाव एकतर वाढत असतो किंवा कमी होत असतो.

  • ही भावातील वाढ किंवा घट होण्यामागे संचालक मंडळाचे निर्णय कारणीभूत असतात.
  • समजा तुम्हाला हे माहित झाले की पुढील आठवड्यात एखाद्या कंपनीचे संचालक मंडळ अमुक एक निर्णय घेणार आहे आणि त्यामुळे त्या कंपनीचे शेअर बाजारातील मूल्य अनेक पटींनी वाढणार आहे, तर?
  • तुम्ही मागचा पुढचा विचार न करता या कंपनीचे शक्य होईल तेवढे शेअर विकत घ्याल!
  • कारण आज तुम्ही विकत घेतलेला शेअर जर १०० रु. किमतीचा असेल, तर पुढील आठवड्यात ह्या शेअर ची किंमत ५०० रु. सुद्धा होईल.
  • एका आठवड्यात तब्बल ५ पट पैसा!!!

  • मित्रांनो नेमकी हीच गोष्ट करतात स्वतः त्या कंपनीच्या संचालक मंडळातील काही ‘पांढरपेशे चोर’ = शासकीय भाषेत ‘अंतस्थ’!!!
  • का? = सोप आहे! प्रचंड पैसा कमावण्यासाठी. पण कंपनीसाठी नाही तर केवळ स्वतः साठी!

  • या प्रकाराने काय होते कि कंपनीत पैसा गुंतवलेल्या लोकांचा तोटा होतो.
  • (याबाबत सविस्तर लेख मी लवकरच लिहीन. – फक्त वेळ पाहिजे. :-) ;-)

  • आता आपल्या आजच्या बातमीकडे वळूया.
  • सेबीने या 'इनसायडर ट्रेडिंग' बाबत काही नवीन नियम आणले आहेत. आणि त्यांना मान्यताही दिली आहे.


  • नवीन नियम कोणते ते पाहूया :- -

  • १. नियमांचे आंतरराष्ट्रीयीकरण :- सेबीने 'इनसायडर ट्रेडिंग'चे नियम हे आंतरराष्ट्रीय प्रमानकानुसार बनवले आहेत.

  • २.पुराव्याची जबाबदारी बदलली :- 'इनसायडर ट्रेडिंग' केल्याचे पुरावे आत्तापर्यंत सेबिलाच द्यावे लागत होते. आता ते अंतस्थाला द्यावे लागतील.
  • = म्हणजे मी 'इनसायडर ट्रेडिंग' केले असेल तर आत्तापर्यंत मी असे काही केले आहे, हे न्यायालयात सिध्द करण्याची जबाबदारी सेबीची होती. सेबीला हे फारच कठीण जायचे आणि मी निवांतपणे सुटायचो.
  • आता मात्र परिस्थिती बदलली आहे.
  • मी 'इनसायडर ट्रेडिंग' केलेले नाही हे मलाच सिध्द करावे लागेल. गम्मत पाहण्याचे भाग्य आता सेबीचे :-)!

  • सेबी = SEBI - Securities and Exchange Board of India
  • भारतातील शेअर बाजार आणि इतर गुंतवणुकीवर नियंत्रण ठेवणारी संस्था.

  • प्रमोटर= कंपनी ज्याने सुरु केली आहे त्याला प्रमोटर म्हणतात.


  • ३. काही व्याख्या विस्तृत केल्या आहेत :- -

    अ. पांढरपेशे चोर :- -
  • अंतस्थ कुणाला म्हणायचे याबाबत आत्तापर्यंत संदिग्धता होती. ही संदिग्धता नवीन नियमांनी दूर झाली आहे.
  • जे लोक प्रमोटरशी या ना त्या कारणाने संबधित आहेत ते सर्व आता अंतस्थ या व्याख्येत येतील.
  • उदा. प्रमोटरशी करार केलेले, विश्वस्त, किंवा संचालक मंडळातील एखाद्याचे नातेवाईक, सहकारी, मित्र इ.


  • ब. मूल्य संवेदनशील माहिती :- -
  • मूल्य संवेदनशील माहिती = अशी माहिती जिचा गैरवापर केल्यास 'इनसायडर ट्रेडिंग' करता येऊ शकते.
  • याची सुद्धा व्याख्या विस्तृत केली आहे.
  • यात आतापर्यत केवळ कंपनीशी संबंधित माहितच येत असे.
  • आता यात रोख्यांशी संबंधित माहिती देखील येईल.


  • ४. प्रमोटर आणि संचालक यांचे फ्युचर प्लान्स समजणार :- -
  • प्रमोटर आणि संचालकास ते नजीकच्या भविष्यात कुठे पैसा गुंतवणार आहेत (कोणत्या शेअर मध्ये) हे स्पष्ट करावे लागेल. आणि त्याच ठिकाणी पैसा गुंतवावा लागेल.

  • पाहूया हे नवीन नियम इनसायडर ट्रेडिंगला कितपत आवर घालतात ते!



  • नोट - वरील नोटस् विषयी आपणास अजून काही माहिती हवी असल्यास किंवा काही प्रश्न असल्यास खालील comment मध्ये लिहा. तुमच्याकडे काही ज्यादा माहिती असल्यास ती येथे share करा. तुमच्या नावासह ती प्रसिध्द केली जाईल.

    Comments ( अभिप्राय ) 0 Comments



    Add Your Comment :
    • Name :
    • Email :

    • Add Comment :







  • Tags
  • C-SAT CSAT UPSC MPSC राज्यसेवा MPSC RAJYASEVA MPSC PSI STI ASST ASSISTANT SSC BANKING CLEARK BANKING PO RBI GRADE 'B' STAFF SELECTION COMISSION MAHARASHTRA PUBLIC SERVICE COMISSION UNION PUBLIC SERVICE COMISSION DTEd TET DTED CET BANKING IBPS Current Affairs for Examination Current Affairs for Examination in Marathi General Knowledge for Examination General Knowledge for Examination in Marathi General Knowledge सामान्य ज्ञान MPSC Mock test MPSC online test Maharashtra Maharashtra History Maharashtra Geography Geography Indian Geography Indian History World Geography World History भारतीय राज्यशास्त्र भारतीय राज्यघटना Indian Polity Indian Constitution Quiz प्रश्नमंजुषा prashnamanjusha Questionnaire Quiz for MPSC Quiz for UPSC Quiz for MPSC in Marathi प्रश्नोत्तरे Quiz for SSC Quiz for DTEd TET CET Engineering Services forest services direct recruitment IBPS Banking Examinations History Of India Geography Of India Nobel Personalities Important Days Awards Sports दैनिक बातम्या व विश्लेषण Daily News & Analysis Current Affairs Notes : FEBRUARY 2014 Current Affairs Notes : MARCH 2014 Current Affairs Notes : APRIL 2014 Current Affairs Notes : MAY 2014 Current Affairs Notes : JUNE 2014 Current Affairs Notes : JULY 2014 Current Affairs Notes : AUGUST 2014 Current Affairs Notes : September 2014 MPSC MAGAZINE FREE MPSC MAGAZINE UPSC MAGAZINE FREE MPSC MAGAZINE IN MARATHI मोफत MPSC मासिक मोफत UPSC मासिक FREE ONLINE UPSC MAGAZINE IN MARATHI विशेष लेख १ ली ते १० वी शालेय पाठ्यपुस्तके : मोफत डाऊनलोड free Maharashtra Board textbooks school