राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय

१. मलेशियन एअरलाईन्सचे विमान समुद्रात कोसळले

- बोईंग श्रेणीतील या प्रवासी विमानाने २३९ प्रवाशांना घेऊन क्वाललांपूर येथून उड्डाण केले होते.
- काही भारतीय प्रवासीही असल्याचे सांगण्यात येत आहे.

२. युक्रेन तिढा

- रशियामध्ये पुन्हा एकदा विलीन होण्याचा ठराव क्रिमियाच्या संसदेने संमत केला असला तरीही तो वैध मानणार नाही, असे सांगत युक्रेनच्या काळजीवाहू पंतप्रधानांनी सदर ठराव फेटाळला. - -- तसेच पदभ्रष्ट अध्यक्ष यानुकोविच यांच्याविरोधात अटक वॉरंट बजावण्यात यावे, अशी विनंती युक्रेन सरकारच्या वतीने इंटरपोलला करण्यात आली आहे.

३. पाकिस्तानी क्रिकेट संघाला पाठींबा देणाऱ्या ६० काश्मिरी विद्यार्थ्यांवरील देशद्रोहाचा गुन्हा मागे

- जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अबुल्ला यांनी उ.प्र. चे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याशी चर्चा केल्यानंतर हे घडले.
- स्वामी विवेकानंद सुभारती विद्यापीठातील हे काश्मिरी विद्यार्थी होत.

४. गुगलची सामाजिक बांधिलकी – फोरवर्ड – ४०

- महिला तंत्रज्ञान क्षेत्रात याव्यात यासाठी गुगलने जगभरातील ४० संस्थांना ६ कोटींची मदत केलीय.
- या अभियानाचे नाव – फोरवर्ड – ४०
- भारतातील मदतप्राप्त संस्था – १. जागृती यात्रा २. नासकॉम १०००० स्टार्टअप्स

५. दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करण्याबाबत भूमिका स्पष्ट करा - सर्वोच्च न्यायालयाचे भाजप व कॉंग्रेसला आदेश

घटनाक्रम:
- आम आदमी पक्षाने दिल्लीतील सत्तापदाचा राजीनामा दिला.
- नंतर दिल्ली विधानसभा वर्षभर निलंबनावस्थेत ठेवण्याचा राष्ट्रपतींचा आदेश
- याला ‘आप’ने न्यायालयात विरोध दर्शविलाय.
केंद्र शासनाचे न्यायालयाला उत्तर = ‘आप’मधील आमदार फुटून येण्याची शक्यता आह़े त्यामुळे एका पक्षाचे बहुमत होऊन पुन्हा विधानसभा स्थापन करता येऊ शकेल.

६. मध्य प्रदेशात वृक्षलागवडीचा जागतिक विक्रम

मध्य प्रदेशातील शहाडोल वन विभाग परिक्षेत्राने जंगल वाचवा मोहिमेत एका दिवसात केवळ दहा तासांत १७,०८,१८१ वृक्षांची लागवड करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डची नोंद केली आहे.

७. 'आयएनएस कोलकाता' युद्धनौकेवर अपघात - माझगाव गोदीत युद्धनौकेवर वायुगळती

माझगाव गोदीत 'आयएनएस कोलकाता' युद्धनौकेवर विषारी वायुगळतीचा प्रकार घडलाय.
कोलकाता वर्गातील ‘यार्ड ७०१’ या युद्धनौकेचे बांधकाम सुरू आहे.
या युद्धनौकेवर शुक्रवारी यांत्रिक चाचण्या सुरू होत्या. अग्निशमन यंत्रणेची चाचणी सुरू असतानाच कार्बन डायऑक्साइडच्या कंटेनरचे झाकण अचानकपणे उघडले. त्यामुळे त्यातून वायुगळती सुरू झाली.
नौदल अधिकारी कमांडर कुंतल वाधवा (४२) अत्यवस्थ.
नौदलात गेल्या ११ महिन्यांत १२ अपघात झालेत.
गेल्याच आठवडय़ात मुंबईनजीकच्या समुद्रात आयएनएस सिंधुरत्न या पाणबुडीला आग लागली होती.

राज्य

१. ३३ विनाअनुदानित माध्यमिक शाळा आता अनुदानित

घटनाक्रम:
- राज्य सरकारने सन २००१ पासून कायम विनाअनुदानित तत्त्व शाळांसाठी सुरू केले.
- वारंवार मागणी झाल्यानंतर सन २००९ मध्ये सरकारने कायम शब्द वगळला. त्यांना अनुदान देण्यासाठी सन २०१२-१३ पासून मूल्यांकन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
- मूल्यांकनानुसार तपासणी करण्यासाठी तीनदा संधी देण्यात आल्या आहेत.

२. महाराष्ट्रावर गेल्या काही दिवसांपासून गारपिटीचे संकट ओढवलेय. त्याची कारणमीमांसा

: 1. भारतात हिमालयाच्या परिसरात पश्चिमेकडून येणारे वारे (वेस्टर्न डिस्टर्बन्सेस) वाहत असतात. त्यांच्यासोबत बाष्प आले की तिथे हिमवृष्टी होते.
- या वाऱ्यांचा प्रभाव मुख्यत: हिमालयाच्या पट्टय़ात किंवा फारतर उत्तर भारतापर्यंत असतो. गेल्या काही दिवसांपासून त्यांचा प्रभाव दक्षिणेपर्यंत पोहोचला आहे.
- याशिवाय अतिशय उंचीवरून वाहणाऱ्या वाऱ्यांचे प्रवाह अर्थात जेट प्रवाह सध्या अतिउत्तरेत असायला हवेत. तेसुद्धा आता दक्षिणेकडे सरकले आहेत. हे वारे कोरडे असतात.
- त्याच वेळी सध्या महाराष्ट्रात बंगालच्या उपसागराकडून वारे येत आहेत. ते बाष्प घेऊन येत आहेत. हे बाष्प आणणारे वारे जमिनीजवळ आहेत.
- याचा परिणाम म्हणून सध्या कोरडे वारे हवेच्या वरच्या थरात आहेत, तर बाष्प असलेले वारे खालच्या थरात आहेत. अशी स्थिती अस्थिर हवामानाला जन्म देते.
- असे हवामान सध्या महाराष्ट्रावर व आसपासच्या परिसरात आहे. या स्थितीत बाष्पयुक्त वारे खूप उंचीपर्यंत जातात. ते वर गेले की बाष्प गोठते व त्याचे रूपांतर गारांमध्ये होते.
हवामानाची ही स्थिती बरेच दिवस कायम आहे. त्यामुळे महाराष्ट्राला भयंकर गारपीट सहन करावी लागत आहे.

2. पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे (वेस्टर्न डिस्टर्बन्सेस) हिमालयाच्या पट्टय़ात हिमवृष्टी होते. - - मात्र, गेल्या काही दिवसांपासून या वाऱ्यांचा प्रभाव दक्षिणेपर्यंत पोहोचला आहे.
- याशिवाय अतिशय उंचीवरून वाहणाऱ्या कोरडय़ा वाऱ्यांचे प्रवाह (जेट प्रवाह) दक्षिणेकडे सरकले आहेत.
- त्याच वेळी बंगालच्या उपसागराकडून महाराष्ट्राकडे येणारे वारे बाष्प घेऊन येत आहेत.
- सध्या कोरडे वारे हवेच्या वरच्या थरात, तर बाष्पयुक्त वारे खालच्या थरात आहेत.
- या स्थितीत बाष्पयुक्त वारे खूप उंचीपर्यंत जातात. ते वर गेले की बाष्प गोठते व त्याचे रूपांतर गारांमध्ये होते.
- हवामानाची ही स्थिती बरेच दिवस कायम आहे. त्यामुळे महाराष्ट्राला भयंकर गारपीट सहन करावी लागत आहे.

३. वृद्ध कलावंत मानधनामध्ये आता महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण!

- महिला सक्षमीकरणाच्या धोरणाला गती देण्याच्या उद्देशातून राज्य सरकारने ज्येष्ठ कलावंत मानधन योजनेमध्ये एकतृतीयांश म्हणजेच ३३ टक्के महिला आरक्षण ठेवण्याचे धोरण स्वीकारले आहे.
- जिल्हा निवड समितीने शिफारस केल्यानंतर सांस्कृतिक विभागाने मान्यता दिलेल्या वृद्ध कलाकाराला श्रेणीनुसार १२०० रुपये आणि १६०० रुपये मिळतील.
- अट – वार्षिक उत्पन्न ४५ हजारपेक्षा कमी हवे.

विज्ञान तंत्रज्ञान

१. ‘अपने एरिया में प्लस’- महिलांच्या सुरक्षिततेसाठी नवीन अॅप

फायदे:
- असुरक्षित वाटल्यास मदत हवी असल्याचा संदेश त्वरित पाठवते.
- आपण सुरक्षित आहोत हे घरच्यांना थोडय़ा-थोडय़ा वेळाने सांगते.
- आपण ज्या वाहनाने प्रवास करत असू त्या वाहनाचा क्रमांकही पाठवते.
- एखाद्या वाहनचालकाकडून घरी परतण्यासाठी लिफ्ट घेतली असेल, तर तसेही संदेशात त्वरित नमूद करता येते.
- आपण ज्या ठिकाणी असू ते ठिकाण संदेशात आपोआप नमूद होऊन तो संदेश पोहोचवला जातो.
- असुरक्षित वाटल्यास संदेश पाठवून मदत मागण्याचा पर्यायही अॅपमध्ये आहे.
- तसेच अडचणीच्या वेळी पोलिस आणि अग्निशामक दलाला त्वरित फोन लावण्याची सोयही आहे.
- आरोपींची छायाचित्रे व व्हिडिओ अपलोड करण्याचीही सोय.

२. अंतराळ कचरा नष्ट करणार लेसर किरणे

- ऑस्ट्रेलियाच्या उद्योग विभागातील ‘operative research center’ ने लेसरचा उपाय काढलाय.
- अंतराळात ३ लाखांपेक्षा जास्त कचऱ्याचे तुकडे फिरताहेत.
- धोका – ते अवकाशयानावर, प्रयोगशाळेवर, अवकाशस्थानकावर आदळून मोठी हानी होऊ शकते.
- पृथ्वीवरूनच ही लेसर किरणे सोडून हा कचरा जाळता येईल.

अर्थव्यवस्था

१. देशातील वस्त्रोद्योगाच्या विकासासाठी केंद्र शासनाने १० संस्थांची स्थापना केली

- यंत्रमागावरील उत्पादित कापडाच्या निर्यातीला चालना देण्याची जबाबदारी शासनाने पिडीक्सेलवर सोपविली आहे.
पिडीक्सेल = पॉवरलूम डेव्हलपमेंट अँड एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल (केंद्र शासनाच्या वस्त्रोद्योग विभागातील एक परिषद)
उद्दिष्ट = येत्या पाच वर्षांत देशात ५ लाख शटललेस लूम स्थापित करणे + सध्या साडेचार टक्के असलेला यंत्रमाग कापड निर्यातीचा कोटा दहा टक्क्यांवर नेणे.

२. वस्त्रनगरी इचलकरंजी येथे आंतरराष्ट्रीय वस्त्रोद्योग प्रदर्शनाला प्रारंभ

- २२ देशांतील ६० प्रतिनिधींची उपस्थिती

३. सहारा प्रकरण

गुंतवणूकदारांचे २० हजार कोटी रुपये परत करण्यासाठी सहाराकडे तगादा लावणाऱ्या सेबीने समूहाकडे नव्याने तब्बल ३७ हजार कोटी रुपयांची मागणी सर्वोच्च न्यायालयाच्या समोरच शुक्रवारी लावून धरली.
- “गुंतवणूकदारांची मूळ रक्कम २५,७८० कोटी रुपये, तर व्याज वगैरे धरून एकूण रक्कम ही ३७,००० कोटी रुपये होते” - भांडवली बाजार नियामक ‘सेबी’चे म्हणणे.

क्रीडा

१. ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे आव्हान संपुष्टात

- ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत भारताची अव्वल बॅडमिंटनपटू साईना नेहवाल हिचे उपांत्यपूर्व फेरीतच आव्हान संपुष्टात आले आहे.
- भारताच्या पी. व्ही. सिंधू हिलाही चीनच्या सन यू हिच्याकडून पराभव स्वीकारावा लागला.
(लंडन ऑलिम्पिक कांस्यपदकविजेती सायना नेहवाल!!!)

२. भारतात २०१५ मध्येही फॉम्र्युला-वनचा थरार नाही

कारण = सामानावर लावण्यात येणारा कर आणि फॉम्र्युला-वनसाठी भारतात येणाऱ्या पदाधिकाऱ्यांना व्हिसा मिळवण्यात येणाऱ्या अडचणी
- यामुळे २०१४च्या वेळापत्रकातून इंडियन ग्रां. प्रि. फॉम्र्युला-वन शर्यतीला डच्चू देण्यात आला होता.
- पार्श्वभूमी : नोएडातील बुद्ध इंटरनॅशनल सर्किटवर फॉम्र्युला-वन शर्यत आयोजित करण्यासाठी जेपीएसआयने फॉम्र्युला-वन व्यवस्थापनाशी पाच वर्षांचा करार केला आहे. गेल्या वर्षी शर्यतीचे तिसरे पर्व पार पडले.
भारतात फॉम्र्युला-वन शर्यतीचे संयोजक = जेपी स्पोर्ट्स इंटरनॅशनलने (जेपीएसआय)
फॉम्र्युला-वनचे सर्वेसर्वा = बर्नी एस्सेलस्टो

इतर संक्षिप्त माहिती

काव्यकन्या बहिणाबाई

कृपया CONTACT US या सदरात जाऊन स्वतःचे REGISTRATION (नोंदणी) करा. मार्च महिन्याचे मासिक केवळ नोंदणी केलेल्या सदस्यांनाच मोफत मिळेल.