दैनिक बातम्या व विश्लेषण - ६ मार्च २०१४

राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय

####१६ व्या लोकसभा निवडणुका होणार ९ टप्प्यात

- ७ एप्रिल ते १२ मी २०१४ दरम्यान होणार
- निकाल १६ मे २०१४ ला
-१५ व्या लोकसभेची मुदत ३१ मे २०१४ ला संपतेय.
- केंद्रीय निवडणूक आयोगाने ही घोषणा करताच देशभरात संचारबंदी लागू झाली आहे.
- वैशिष्ट्ये=
* यावेळी पहिल्यांदाच केंद्रीय जागृती निरीक्षकांची नेमणूक केली गेलीय.
-काम – मतदारांमध्ये जागृती निर्माण करणे. सोयीसुविधा पुरवणे. निवडणूक प्रक्रिया व्यवस्थित पार पडेल हे पाहणे.
* NOTA – none of the above – वरीलपैकी कोणीही नाही
२०१३ च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला अनुसरून निवडणूक आयोगाने सर्व मतदारसंघात ही सुविधा उपलब्ध केलीय.
EVM इलेक्ट्रोनिक वोटिंग मशीन वर तसेच मतपत्रिकेवर सर्व उमेदवारांच्या खाली NOTA चा पर्याय असेल.
मतदारसंघात उभ्या असलेल्या उमेदवारांपैकी एकही योग्य नाही असे वाटल्यास आपण NOTA हा पर्याय वापरू शकतो.
*VVPAT –voter verifiable paper audit trail
काही निवडक मतदारसंघात याचा वापर केला जाणार आहे.
* मतदार = ८१.४५ कोटी (२००९ ला = ७१.३ कोटी )
* OTHER – तृतीय पंथीयांसाठी २०१२ पासूनच पुरुष व स्त्री या पर्यायान्खाली ‘इतर’ असा पर्याय दिलाय.
संख्या = २८३१४

१. चीनच्या संरक्षण खर्चात १२.२ % वाढ

खर्च = १३२ अब्ज अमेरिकी डॉलर
भारतापेक्षा ३६ अब्ज डॉलरनी अधिक
भारताने संरक्षण खर्च केवळ १० टक्के वाढवला आहे.
पंतप्रधान ली केकियांग यांनी चीनच्या नॅशनल पीपल्स काँग्रेसमध्ये सादर केला अर्थसंकल्प
चीन – “आमचा इतिहास पाहता आम्हाला असे वाटते की, शांतता ही केवळ शक्तीच्या जोरावर राखता येते.”
गुगल मॅप भारतातसुद्धा ‘इनडोअर मॅप’ प्रणाली सुरू करणार
गुगल मॅप = रस्ता चुकलात किंवा एखादा पत्ता शोधायचा असेल, गुगल मॅपचा उपयोग करता येतो.
‘इनडोअर मॅप’? = प्रसिद्ध वास्तूंमधील अंतर्गत ठिकाणे ‘इनडोअर मॅप’मुळे इंटरनेट वापरकर्त्यांना दिसणार
अमेरिका, जपान, सिंगापूर, हाँगकाँग आणि हॉलंड या देशांमध्ये गुगलने ‘इनडोअर मॅप’ प्रणाली आधीच सुरू केली आहे.
सुरुवातीला भारतातील ७५ ठिकाणे पाहता येणार.

२. लक्ष्मीला आंतरराष्ट्रीय धैर्य पुरस्कार

लक्ष्मी हिचा अमेरिकेच्या प्रथम नागरिक मिशेल ओबामा यांनी आंतरराष्ट्रीय धैर्य पुरस्कार देऊन गौरव केला.
गेल्या वेळी दिल्लीत सामूहिक बलात्कार झालेल्या निर्भयाचा याच पुरस्काराने मरणोत्तर सन्मान केला होता.
लक्ष्मीचे कार्य - लक्ष्मीवर हल्ला झाल्यानंतर तिने अविश्रांत परिश्रम करून अशा महिलांची चळवळ उभी केली.
सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून सरकारला अॅसिडच्या विक्रीवर नियंत्रण आणायला लावले.
अॅसिड हल्ल्यातील मुलींसाठी तिने नवी आशा निर्माण केली.

३. चीनचे प्रदूषणाविरुद्ध युद्ध

चीनने आज पर्यावरण संरक्षणासाठी ३५ अब्ज डॉलरची तरतूद जाहीर केली आहे. चीनच्या शहरांमध्ये दरवर्षी थंडीच्या दिवसात काळे धुके असते
उपाय =
* सरकार पीएम १० व पीएम २.५ प्रदूषके पहिल्यांदा कमी करणार व नंतर औद्योगिक प्रदूषण कमी करण्यावर भर देणार.
* वाहनांचा धूर व वाऱ्यामुळे येणारी धूळ यावरही नियंत्रण मिळवले जाईल.
* या वर्षी एकूण ५० हजार कोळसा भट्टय़ा बंद करण्यात येणार
* डिसल्फरायझेशन व डिनायट्रिफिकेशन
* धूळ निवारण
* रस्त्यावर जास्त धूर ओकणारी ६० लाख वाहने काढून टाकण्यात येतील. त्यात पेट्रोल व डिझेल वाहनांचा समावेश
* देशात चौथ्या टप्प्याचे राष्ट्रीय मानक लागू केले जातील.
* पिण्याचे पाणी, नद्यांची खोरी स्वच्छ केली जातील.
- पंतप्रधान - ली केकियांग

४. अस्वस्थ नक्षलवादी

सातत्याने जनाधार घटत चालल्याने अस्वस्थ झालेल्या नक्षलवाद्यांनी आता पोलीस खबऱ्यांसोबतच चळवळीला विरोध करणाऱ्यांनासुद्धा ठार मारण्याचा निर्णय घेतलाय.
पोलिसांच्या सक्रीयतेमुळे अनेक गावात आता दलम सदस्यांना विरोध होऊ लागला असून, सामान्य नागरिक सदस्यांच्या तोंडावर बोलू लागले आहेत.
आजवर चळवळीला मदत करणारे गावकरी आता विरोधाची भाषा बोलू लागले आहेत. त्यामुळे भविष्यात स्थिती आणखी कठीण होईल, चळवळीला विरोध करणाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय पर्याय नाही, असे मत एका बैठकीत जहाल नक्षलवाद्यांनी व्यक्त केलेय.

राज्य

१. ‘संत तुकाराम’ नाटय़कृती सातासमुद्रापार जाणार

ज्येष्ठ दिग्दर्शक, राष्ट्रीय नाटय़ विद्यालयाचे संचालक वामन केंद्रे, तसेच शाहीर संभाजी भगत यांनी ‘संत तुकाराम’ ही नाटय़कृती तयार करण्याचे ठरविले आहे. या नाटय़कृतीला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्याचा चंग त्यांनी बांधला आहे.

२. डॉ. आंबेडकर यांच्या साहित्य प्रकाशनाचे हक्क राज्य शासनाकडे अबाधित

१९७८ साली आंबेडकरांच्या साहित्य प्रकाशनाचे हक्क राज्य सरकारने आंबेडकर कुटुंबियांकडून घेतले.
मात्र सरकारकडून आंबेडकरांचे साहित्य स्वत: प्रकाशित केले जात नाही किंवा कुणाला त्याचा हक्कही देण्यात येत नाही. त्यामुळे आंबेडकरांचे साहित्य प्रकाशित करण्याबाबत अनिवार्य परवाना देण्याचे आदेश देण्याची मागणी करीत हे साहित्य प्रकाशित करण्याची तयारीही संस्थेने दाखवत दिल्लीतील ‘नवयान’ प्रकाशन संस्थेने राज्य शासनाला न्यायालयात खेचले होते.
शासनाचा दावा – “शासनाने नियमितपणे बाबासाहेबांचे साहित्य प्रकाशित केलेले आहे. ‘अॅशनिहिलेशन ऑफ कास्ट’ पुस्तक शासनाने तोटा सहन करून १५ रुपयांत विक्रीसाठी उपलब्ध केले. औरंगाबाद येथे नुकताच या पुस्तकाच्या प्रकाशानाचा ७५वा वर्धापन सोहळा साजरा करण्यात आला. शासनाने नुकत्याच या पुस्तकाच्या ५० हजार प्रती छापल्या आहेत. उत्पादनखर्च वाढू नये म्हणून शासकीय डेपोमध्येच बाबासाहेबांचे अन्य साहित्य उपलब्ध असते. संस्थेचे सव्‍‌र्हेक्षण दिशाभूल करणारे आहे.”
त्यावर संस्थेने दावा मागे घेतला.

३. ४ थे ई-साहित्य संमेलन

अध्यक्ष - ना. धों. महानोर (साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ कवी)
आयोजक – ‘युनिक फीचर्स’
स्थळ - नाशिक येथील कुसुमाग्रज स्मारक
वेळ - २४ मार्च
ई-साहित्य संमेलन म्हणजे नेमके काय? = या संमेलनाचा घरबसल्या आस्वाद घेता येतो, त्यात सहभागीही होता येते.
www.uniquefeatures.in या संकेतस्थळावर हे संमेलन वाचकांसाठी खुले आहे.
माजी अध्यक्ष = रत्नाकर मतकरी, ग्रेस आणि भालचंद्र नेमाडे

४. वडगाव येथील तेवीस गावांच्या टेकडय़ांवर चार टक्के बांधकामाची शिफारस करणारा अहवाल नगररचना विभागाने तयार केलाय.

गावांसाठी तयार करण्यात आलेल्या विकास आराखडय़ात समाविष्ट गावांतील टेकडय़ांवर जैववैविध्य उद्यानाचे (बायोडायव्हर्सिटी पार्क-बीडीपी) आरक्षण दर्शवण्यात आले होते.
-प्रो. जैन समिती = बीडीपी बाबत नेमका काय निर्णय घ्यावा यासाठी प्रो. जैन यांची समिती नियुक्त केली.
शिफारशी = बीडीपीमध्ये बांधकाम परवानगी देऊ नये.
जमीनमालकांना रोख नुकसानभरपाई द्यावी.
तसेच ग्रीन टीडीआर हा पर्याय देखील वापरता येईल.
-जैन समितीचा हा अहवाल शासनाने पूर्णत: स्वीकारला आणि बीडीपीचा निर्णय कायम ठेवत त्यावर हरकती-सूचना मागवल्या.
- नगररचना विभागाकडून सादर झालेला अहवाल = बीडीपीमध्ये चार टक्के बांधकाम परवानगी द्यावी.
- मुख्यमंत्र्यांनी भूमिका बदलल्यामुळे बीडीपीचे नक्की काय होणार अशी भीती पर्यावरणवाद्यांना आणि बीडीपी समर्थकांना तेव्हापासूनच वाटायला लागली होती.

क्रीडा

१. आजपासून पुण्यात राष्ट्रीय रोबोकॉन स्पर्धा

‘एशिया पॅसिफिक ब्रॉडकास्टिंग युनियन’ आणि दूरदर्शन तर्फे राष्ट्रीय स्तरावरील रोबोकॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.
स्पर्धेची संकल्पना = ‘पालकत्वाला अभिवादन’.
या स्पर्धेमध्ये अव्वल ठरलेले दोन संघ आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करतील.

२. ग्रॅमी स्मिथ होतोय निवृत्त

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीनंतर सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक क्रिकेटमधून निवृत्त होणार.
कामगिरी= १०८ कसोटी सामन्यांमध्ये नेतृत्व केले. त्यापैकी ५३ सामन्यांमध्ये आफ्रिकेला विजय मिळाला व कसोटीत सर्वाधिक यशस्वी कर्णधार होण्याची किमया केली.
१४९ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याने आफ्रिकेच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळली.

अर्थव्यवस्था

१. अत्याधुनिक नौदल यंत्रणांचे उत्पादन चाकणमध्ये

भारतीय नौदलासाठी लागणारी संरक्षक उपकरणे आता चाकणमध्ये बनणार आहेत.
कोण बनवणार? = ‘महिंद्रा डिफेन्स नेव्हल सिस्टिम्स’ – महिंद्राची उपकंपनी

२. युनायटेड बँक ऑफ इंडियाच्या वित्त स्थितीचा रिझव्र्ह बँक आढावा घेणार

देशाच्या बँकिंग इतिहासात सर्वोच्च बुडीत कर्जाचे प्रमाण राखणाऱ्या सार्वजनिक युनायटेड बँक ऑफ इंडियाच्या वित्त स्थितीबाबत रिझव्र्ह बँक शुक्रवारी स्वतंत्र आढावा घेणार आहे.
या बँकेने डिसेंबर २०१३ अखेरच्या तिमाहीत = १,२३८.१० कोटी रुपयांचा तोटा + ८,५४५ कोटी रुपयांचे ढोबळ अनुत्पादक मालमत्तेचे प्रमाण नोंदविले आहे.
अर्चना भार्गव = बँकेच्या अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालक
यांनी कारकिर्दीचे वर्ष होण्यापूर्वीच स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली.
बँकेचे लेखापरीक्षण सध्या रिझव्र्ह बँक तसेच खासगी कंपनीद्वारे सुरू आहे.
बँकांच्या वाढत्या बुडीत कर्जाचे कारण = छोटे उद्योग, बांधकाम क्षेत्र, कंपनी, उद्योगांना दिलेल्या कर्जामुळे
मुख्यालय = कोलकाता

३. देशाच्या बंदर क्षेत्र – आढावा

२०१३-१४ = ३० बंदर पूर्ण नेण्याचे उद्दिष्ट पूर्ण होत आलेय.
२१ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक
अतिरिक्त २१.७ कोटी टन वार्षिक माल हाताळणी
केंद्रीय जहाज मंत्री = जी. के. वासन
गेल्या चार वर्षांत = ८८ नवे प्रकल्प साकार
गुंतवणूक = ४२,९५३ कोटी रुपये
अतिरिक्त माल हाताळणी क्षमता = ५५८ दशलक्ष टन

४. ‘फोर्ब्स’ जागतिक क्रमवारीत भारतीयांची घसरण

बिल गेट्स = १
मुकेश अंबानी = सलग सातव्या वर्षी सर्वात श्रीमंत भारतीय
(जागतिक क्रमवारीत ते ४० वे )
२००६ = अंबानी बंधूंमधील फूट = ५६व्या स्थानावर
२००८ = ५ वे
लक्ष्मी मित्तल = पोलाद सम्राट = ५२ वे
२००५ = ३ रे
शशी आणि रवी रुईया = एस्सार एनर्जी लिमिटेडचे = ही दोन नावे यंदाच्या ५६ अब्जाधीशांमधून गायब आहेत.
तंत्रज्ञान क्षेत्रातील भारतीयांच्या मुसंडीपायी या सूचीत यंदा प्रथमच या क्षेत्रातील सहा भारतीयांनी स्थान मिळविले आहे.
विप्रोचे अझीम प्रेमजी (जागतिक क्रमवारी ६१वे) हे अग्रस्थानी, तर शिव नाडर (१०२), नारायण मूर्ती (१०४६), सेनापती गोपालकृष्णन (११५४), नंदन नीलेकणी (१२१०) आणि के. दिनेश (१५४०)

आरोग्य

१. ‘सिरम इन्स्टिटय़ूट’तर्फे युनिसेफला पोलिओ लसीचा स्वस्तात पुरवठा

पुण्याची ‘सिरम इन्स्टिटय़ूट’ आणि नेदरलँडची ‘बिल्टथॉवन बायोलॉजिकल्स बी. व्ही.’ या कंपन्यांतर्फे युनिसेफच्या पोलिओ निर्मूलन मोहिमेसाठी अल्प दरात पोलिओ प्रतिबंधक लस पुरवण्याचे मान्य केले आहे.
‘इनॅक्टिव्हेटेड पोलिओ लसी’च्या (आयपीव्ही) जागतिक स्तरावरील दरात युनिसेफच्या मोहिमेसाठी लक्षणीय कपात करून ती दिली जातेय.

२. माहेर योजना

कोण राबवते? = केंद्र सरकार
उद्देश = आदिवासी कुपोषित महिला व बालकांचे मृत्यू प्रमाण कमी करणे.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाच्या माध्यमातून या योजनेला विविध उपक्रमांची जोड दिली जात आहे.
काय केले जाते माहेर योजनेत? =
आशा-अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून आदिवासी भागातील प्रसुतीची तारीख जवळ येत असलेल्या महिलांना योजनेची माहिती दिली जाते.
त्यांना सरकारी वाहनाने दवाखान्यात आणले जाते.
योजनेत सहभागी झाल्यास सुरक्षित बाळंतपणासह जननी शिशु सुरक्षा योजनेंतर्गत ७०० रुपये, बुडित मजुरी म्हणून ८०० रुपये आणि नवसंजीवनी अंतर्गत ४०० असा एकुण १,९०० रुपयांचा लाभ मिळतो.
तसेच पाच दिवस अन्न, औषधोपचार, राहण्याची मोफत व्यवस्था केली जाते.
महिलेसोबत तिच्या एका नातेवाईकाची व मोठय़ा बाळाचीही सोय केली जाते.
बाळ व आई यांची तब्येत व्यवस्थित असल्यास त्यांना पाच ते सात दिवसाच्या कालावधीनंतर ‘साडीचोळी, बाळाला कपडे’ करून त्यांच्या घरी सरकारी वाहनाने सोडले जाते.

कृपया CONTACT US या सदरात जाऊन स्वतःचे REGISTRATION (नोंदणी) करा. मार्च महिन्याचे मासिक केवळ नोंदणी केलेल्या सदस्यांनाच मोफत मिळेल.