राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय

१. युक्रेनमध्ये रशियाने सैन्य पाठवल्यानंतर युक्रेनचीही सैन्य जमवाजमव

- रशियाच्या दलांनी क्रिमियन द्वीपकल्पाचा व तेथील सरकारी इमारती व विमानतळांचा ताबा घेतल्यानंतर युक्रेननेही सैन्य जमवाजमव केलीय.
- युद्धाचे ढग जमू लागलेत.
भूमिका : पाश्चिमात्य देश - पाश्चिमात्य देशांनी रशियाला धोक्याचा इशारा दिलाय.
अमेरिका व नाटो - अमेरिका व नाटोने रशियावर ताशेरे ओढलेत.
युक्रेन - युक्रेनने मात्र त्यांच्या सैन्याची जमवाजमव केलीय.
युक्रेनेचे पाश्चिमात्यवादी पंतप्रधान अरसेनि यात्सेनयुक

२. बांगलादेशात विद्यापीठाच्या कुलगुरुपदी प्रथमच महिला

- बांगलादेशात सरकारी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी प्रथमच एका महिलेची (प्रा. फरझाना इस्लाम) निवड करण्यात आली आहे.
- बांगलादेशात १९९१ पासून गेली २४ वर्षे सातत्याने देशाचे नेतृत्व (पंतप्रधानपद) तसेच विरोधी पक्षनेतेपद महिलेकडेच आहे.

३. इस्लामाबादमध्ये दहशदवादी हल्ला

इस्लामाबादमधील न्यायालयाच्या आवारात दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार आणि ग्रेनेड हल्ला केला.
यात अतिरिक्त सत्र न्यायाधीशांसह ११ जण मृत्युमुखी पडले व २५ हून अधिक नागरिक जखमी झालेत.

४. रोहित शेखर माझाच मुलगा- एन.डी.तिवारींची अखेर स्वीकृती

घटनाक्रम :
-गेल्या २००८ पासून रोहित शेखर हा युवक आपले जैविक पिता एन.डी.तिवारी ( काँग्रेसचे नेते )असल्याचे सांगत न्यायालयीन लढाई लढत होता.
- २०१२ मध्ये डीएनए चाचणीतून रोहित शेखर तिवारींचा मुलगा असल्याचे सिद्ध झाले.
- २०१४ एन.डी.तिवारींनी रोहित शेखरला मुलगा म्हणून स्विकारले.

अर्थव्यवस्था

१. भारत व इफ्टा मुक्त व्यापार करारासाठी प्रयत्नशील

- भारत व युरोप मुक्त व्यापार संघटना (इफ्टा) आता मुक्त व्यापार करारासाठी प्रयत्नशील आहेत.
- इफ्टामध्ये स्वित्र्झलड, आइसलँड, नॉर्वे व लिशेनस्टेन हे देश येतात.
- स्वित्र्झलडची चॉकलेट्स जगप्रसिद्ध आहेत.
- उच्च दर्जाच्या चॉकलेट्सवरील आयातशुल्क ३० टक्क्य़ांनी कमी करावे, अशी मागणी भारताने स्वित्र्झलडकडे केली आहे.

राज्य

१. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची वयोमर्यादा वाढवावी - विद्यार्थी कृती समितीचे निवेदन

- कारण - वयोमर्यादेच्या सीमारेषेवर असलेल्या विद्यार्थ्यांचे MPSC ने ऐनवेळी केलेल्या बदलांमुळे नुकसान झालेय. आधीच्या अभ्यासक्रमानुसार त्यांनी केलेली सर्व तयारी निष्फळ ठरलीय.
- केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षांसाठी वयोमर्यादा वाढविण्याचा निर्णय घेतलाय.
- तसेच केंद्रीय लोकसेवा आयोगाने वयोमर्यादेत वाढ करण्याआधीच मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार व झारखंड या राज्यांनी वयोमर्यादा वाढवलीय.

२. सरकारी नोकरभरतीत ‘अनुकंपा’साठी १० टक्के जागा

- राज्य शासनाच्या सेवेत या पुढे चतुर्थ व तृतीय श्रेणीतील कर्मचाऱ्यांची भरती करताना दहा टक्के जागा अनुकंपा प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांमधून भरण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
- या निर्णयाचा अनुकंपा यादीवरील सुमारे ३० हजार उमेदवारांना फायदा होणार आहे.
- अनुकंपा म्हणजे काय ? = शासकीय सेवेत असताना कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास किंवा कायमचे अपंगत्व आल्यास त्याच्या वारसाला नोकरी देण्याचे राज्य सरकारचे धोरण !

३. कोकणात नारळावर आधारित प्रक्रिया उद्योगांना संधी मात्र नारळाचे प्रक्षेत्र वाढवायला हवे - नारळ बोर्ड

- सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत प्रक्रिया उद्योगांना यशही मिळालेय.
- मात्र रायगड जिल्ह्य़ातील बागायतदार आणि कृषी विभागाने या प्रयत्नांना फारसा प्रतिसाद दिला नाहीय.
@ नारळ बोर्डाचे उपाय -
# रायगड जिल्ह्य़ातील रोहा येथे प्रादेशिक रोपवाटिकेची स्थापना करण्यात आलीय.
# अलिबाग तालुक्यातील चौलमध्ये नारळाचे मूलभूत बियाणे निर्मिती केंद्र विकसित केले जाणार आहे.
# ठाणे जिल्ह्य़ातील पालघर येथे प्रादेशिक बीजगुणन केंद्र विकसित केले जाणार आहे.

४. ‘सुपरक्रिटिकल ‘ कोराडीच्या नवीन वीजप्रकल्पासमोर इंधनाचे आव्हान

सुपरक्रिटिकल तंत्रज्ञानावर आधारित ‘महानिर्मिती’चा कोराडी येथील १९८० मेगावॉटचा क्षमतेचा वीजप्रकल्प कोळसा उपलब्ध होऊ न शकल्याने अडचणीत येऊ शकतो.
-कोळसा पुरवणाऱ्या मच्छाकाटा कोळसा खाणीतून उत्पादनच सुरू झालेले नाही.

५. कॅग व राज्यपालांच्या आक्षेपांकडे राज्य सरकार करतेय नेहमीच दुर्लक्ष

- भारताचे नियंत्रक व महालेखापालांच्या (कॅग) १५ ते २० हजार आक्षेपांना राज्य सरकारने प्रतिसादच दिलेला नाहीय.
- राज्यपाल निर्देश धाब्यावर = मागास भागांच्या विकासासाठी वैधानिक मंडले स्थापन करण्यात आलीयेत.
- घटनेनुसार राज्यपालांना या वैधानिक मंडलांबाबत विशेषाधिकार प्राप्त झाले आहेत.
- यानुसारच विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र या तीन वैधानिक मंडळांसाठी निधीचे वाटप राज्यपालांच्या मान्यतेने करावे लागते.
- निधीचे वाटप कोठे आणि कसे करायचे याचे निर्देश अर्थसंकल्पाआधी राज्यपाल देतात. हे निर्देशच धाब्यावर बसविले जात आहेत.
- उदा. विदर्भ वा मराठवाडय़ात २०१३-१४ या वर्षांत १३ हजार पंपांना वीज देण्याचे ऊर्जा विभागाने मान्य केले होते. प्रत्यक्षात ३७४१ पंपांना वीज देण्यात आली.
- राज्यपाल - के. शंकरनारायण

६. चित्रपट निर्माते मुकेश भट्ट सोलापूरच्या न्यायालयात निर्दोष

काय होता खटला?
- मुकेश भट्ट निर्मित ‘फरेब’ या चित्रपटात सेन्सार बोर्डाने कात्री लावलेली आक्षेपार्ह दृश्ये दाखविली गेली होती.
- सोलापुरात भागवत चित्रमंदिरात २४ ऑगस्ट १९९६ रोजी ‘फरेब’ प्रदर्शित झाला होता.

पर्यावरण

१. ‘चिमणीदिन’

- २० मार्चला ‘चिमणीदिन’ आहे.
- २०१० पासून जागतिक चिमणीदिन एकूण ५० देशांत साजरा केला जातो.
- यावर्षी आपण www.worldsparow.org या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करू शकतो.
- जगभरातील चिमणीप्रेमींना विविध भागांत एकत्र जमवून चिमण्यांना परत आणण्यासाठी व जैवविविधता टिकवण्यासाठी याद्वारे काम करता येईल.
- पक्षिनिरीक्षण, स्पॅरो पार्टीज, स्पॅरो पिकनिक, स्पॅरो प्रोसेशन, बर्ड वॉक्स, स्पॅरो वॉक्स हे कार्यक्रम सोशल मीडियावर घेतले जातील. काही शैक्षणिक कार्यक्रमही केले जातील.
- चिमण्या कमी होण्याची काही प्रमुख कारणे = हवामानातील बदल, मोबाइल टॉवरची प्रारणे इ.

२. अत्यंत दुर्मीळ ‘ माळढोक ‘ ला वाचवण्याचे प्रयत्न

- इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर या संस्थेच्या यादीत माळढोकची नोंद ‘अतिशय संकटग्रस्त’ व दुर्मीळ म्हणून करण्यात आली आहे.
- म्हणून डेहराडूनच्या ‘ भारतीय वन्यजीव संस्थेने ‘ अमेरिकी सॅटेलाइट कंपनीच्या मदतीने माळढोक पक्ष्यावर प्लॅटफार्म टर्मिनल ट्रान्समिशन (पीटीटी) लावण्याचा प्रयोग केला होता.
- तो आता यशस्वी झालाय.
- PPT = माळढोकच्या पंखांवर लावलेले एक असे उपकरण ज्याद्वारे माळढोक सध्या कुठ आहे ते समजते व त्याचे संरक्षण करता येते.
अजून एक स्तुत्य उपक्रम- काही गावांत संयुक्त वनव्यवस्थापन समितीने सेंद्रीय शेतीचा प्रयोग सुरू केला आहे. जेणेकरून माळढोकची अंडी सहज व सुरक्षितरित्या उबवतील.

क्रीडा

१. पहिलीवहिली आंतरराष्ट्रीय टेनिस प्रीमियर लीग (ITPL)

- महेश भूपती यांच्या संकल्पनेतून साकार
संघ – ४ - मुंबई, सिंगापूर, दुबई आणि बँकॉक
- २८ नोव्हेंबरपासून सिंगापूरला प्रारंभ तर १४ डिसेंबरला दुबईमध्ये समारोप
- अनेक देशी व विदेशी खेळाडू यात भाग घेतील.

काही महत्वपूर्ण माहिती

दुधात भेसळ करण्यासाठी हे पदार्थ वापरले -

तेल , पामतेल , ‘टॉल’ नावाचे रसायन इ.

कृपया CONTACT US या सदरात जाऊन स्वतःचे REGISTRATION ( नोंदणी ) करा. मार्च महिन्याचे मासिक केवळ नोंदणी केलेल्या सदस्यांनाच मोफत मिळेल.