दैनिक बातम्या व विश्लेषण : दिनांक – ३१ मार्च २०१४

प्रिय मित्रहो, मासिकाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. मार्च महिन्याचे मासिक Download करण्यासाठी लवकरच लिंक दिली जाईल. ही लिंक पहिल्या पानावर ('दैनिक बातम्या व विश्लेषण' हे शीर्षक असणाऱ्या पानावर) उपलब्ध असेल.राष्ट्रीय

१) नक्षलवाद्यांचा ‘रेड कॉरिडॉर प्लॅन'

• लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीसह देशातील पाच लोकसभा मतदारसंघात हिंसाचार व घातपात घडवून आणण्याची योजना नक्षलवाद्यांनी आखली आहे. तिलाच ‘रेडकॉरिडॉर प्लॅन' असे नाव दिले आहे.
• पाच लोकसभा मतदारसंघ = महाराष्ट्रातील गडचिरोली, छत्तीसगडमधील बस्तर, ओरिसातील मलकानगिरी व नवरंगपूर आणि बिहारमधील गया-जमुई
• हिंसाचार घडवून आणण्यासाठी नक्षलवाद्यांनी त्यांचा सर्वाधिक प्रभाव असलेले मतदारसंघ निवडले आहेत.आंतरराष्ट्रीय

१) पाकिस्तानातील सिंध प्रांतात मंदिर जाळले

• पाकिस्तानात हिंदू अल्पसंख्यांक आहेत. पाकिस्तानची लोकसंख्या १८ कोटी आहे आणि त्यात हिंदू केवळ २% आहेत.
• सिंध प्रांतात हिंदूंची संख्या बऱ्यापैकी आहे. मात्र तिथे स्त्रियांचे अपहरण, धर्मांतर इ बाबी सर्रास घडतात.

२) अफगाणिस्तानच्या निवडणूक मुख्यालयावर तालिबान्यांचा हल्ला

• अफगाणिस्तानात ५ एप्रिलला अध्यक्ष पदासाठी निवडणूक होत आहे.
• तालिबान्यांचा या निवडणुकीस विरोध असल्याने त्यांनी हा हल्ला केला. मात्र यात कसलीही जीवितहानी झाली नाही.
• सध्याचे अध्यक्ष- हमीद करझाई.अर्थव्यवस्था

१) सेबीला राष्ट्रपतींकडून पुन्हा एकदा विशेष अधिकार प्रदान

• देशभरात पटकन पैसे अनेक पट करून देणाऱ्या योजनांचे पेव फुटले आहे. त्याला आला घालण्यासाठी या योजनांवर सेबीचे नियंत्रण आणण्याचा निर्णय सरकारने घेतला.
• त्यानुसार ‘रोखेबाजार-विषयक कायदे २०१३’ या कायद्यात दुरुस्ती करण्याचे ठरले. तसे विधेयक संसदेत ३ मांडण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र तिन्ही वेळा ते पास होऊ शकले नाही.
• म्हणून राष्ट्रपतींनी याबाबत सेबीला विशेष अधिकार देणारी अधिसूचना आज तिसऱ्यांदा काढली.
• सेबी आता १०० कोटींपेक्षा जास्त उलाढाल असणाऱ्या कंपन्यांवर नियंत्रण ठेऊ शकते.
• तसेच सेबीला झडती आणि जप्तीचे अधिकारही प्राप्त झाले आहेत.

विज्ञान- तंत्रज्ञान

१) ‘रोसेटा’ यानाची धुमकेतुशी भेट होणार

• युरोपीय अंतराळ संस्था धूमकेतूंचा अभ्यास करणार आहे. त्यासाठी त्यांनी ‘रोसेटा’ नावाचे अंतराळयान सोडले आहे.
• हे यान ‘६७ p चुरयूमोव गेरासिमेन्को’ या धूमकेतूवर उतरणार आहे. कदाचित मे २०१४ मध्ये ते या धूमकेतूवर उतरेल.
• या धूमकेतूचा अभ्यास करण्यासाठी ११ उपकरणे ‘रोसेटा’ वर बसवण्यात आली आहेत.
• त्यापैकी OSIRIS हा कॅमेरा अत्यंत महत्वाचा आहे.
• OSIRIS = ऑप्टिकल, स्पेक्ट्रोस्कोपिक अँड इन्फ्रारेड रिमोट इमेजिंग सिस्टीम

२) कार्बन पकडण्याच्या तंत्रज्ञानात अमेरिका सहकार्य करणार

• भारत कोळशापासून मोठ्या प्रमाणात ऊर्जानिर्मिती करतो.
• मात्र या प्रक्रियेत कार्बन डाय ऑक्साईड मोठ्या प्रमाणात बाहेर टाकला जातो. ग्लोबल वार्मिंग (जागतिक तापमानवाढ) होण्यास हा घटक मोठ्या प्रमाणावर कारणीभूत आहे.
• उपाय = यावर उपाय म्हणून भारतातील काही IIT च्या विद्यार्थ्यांनी कार्बन शोषून घेणारे तंत्रज्ञान विकसित करणारी कंपनी (कार्बन क्लीन सोल्युशन्स) स्थापन केली आहे.
• मात्र हे तंत्रज्ञान अगदी प्राथमिक अवस्थेत आहे.याउलट अमेरिकेत ५०० प्रकारची मॉडेल्स तयार आहेत.
• ‘स्वच्छ उर्जा पर्याय’ – ही अमेरिकेची योजना आहे. त्यांतर्गत त्यांनी ही मॉडेल्स तयार केली आहेत.
• हे लक्षात घेऊन भारताने अमेरिकेबरोबर सहकार्य करार केला आहे.क्रीडा

१) २००७ नंतर भारताला पुन्हा एकदा T-२० चे विजेतेपद

ऑस्ट्रेलियाला हरवले.
सामनावीर – रविचंद्रन अश्विन (फिरकी गोलंदाज)
यजमान – बांगलादेश
आजच्या घडामोडींवर आधारित प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

  • प्रश्नमंजुषा - दि. ३० मार्च २०१४ - by BK Core Group New...

  • विशेष लेख वाचण्यासाठी खालील लिंक वर click करा किंवा या पानावरील 'विशेष लेख' या लिंकवर click करा.

  • 'डेंग्यूविरोधात तू आणि मी' - राष्ट्रीय अभियानास सुरुवात ..........-by BK Core Group New...
  • CPSE-ETF च्या स्थापनेची तयारी पूर्ण ..........-by BK Core Group New...

  • प्रिय मित्रहो, आपणास काही शंका किंवा प्रश्न असतील तर आम्हांस जरूर कळवा. आपल्या चांगल्या आणि वाईट सर्व प्रकारच्या सूचना नेहमीच स्वागतार्ह आहेत. इ-मेल : bhushan@anushri.org
    किंवा SMS करा या नंबरवर 9404640322 (फक्त SMS )    कृपया CONTACT US या सदरात जाऊन स्वतःचे REGISTRATION (नोंदणी) करा. मार्च महिन्याचे मासिक केवळ नोंदणी केलेल्या सदस्यांनाच मोफत मिळेल.