दैनिक बातम्या व विश्लेषण - दि. ३० & ३१ ऑगस्ट २०१४राष्ट्रीय


भारतीय संरक्षण क्षेत्राची स्वयंपूर्णतेकडे वाटचाल - हेलीकॉप्टर खरेदी निविदा रद्द

केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने हेलीकॉप्टर खरेदी निविदा रद्द केल्या आहेत.
घटनाक्रम :-
• भारत अतिउंचावर कार्य करू शकणाऱ्या ‘चित्ता’ आणि ‘चेतक’ ह्या हेलीकॉप्टरना पर्याय असणारी १९७ हेलीकॉप्टर खरेदी करू इच्छित होता. (लष्कर व हवाई दलासाठी)
• त्यासाठी निविदा मागवण्यात आल्या.
• अनेक निविदांपैकी ३ निविदा भारताने निवडल्या.
• त्यातील ऑगस्टा वेस्टलंड ची निविदा रद्द झाली. (कारण – एका ब्रिगेडियरला या प्रकरणात मोठी लाच दिल्याचे उघडकीस आले होते.)
• त्यानंतर केवळ दोन निविदा उरल्या होत्या. :- युरोपियन युरोकॉप्टर आणि रशियन कामोव.
• मात्र भारताने आज ह्या दोन्ही निविदा रद्द केल्या.
• कारण - आता आपल्याला ही हेलीकॉप्टर भारतातच तयार करायची आहेत. तीही १९७ नव्हे तर ४००!!!

मोदींची इच्छा :- सगळी संरक्षण सामग्री भारतातच तयार करण्यात यावी. भारताने संरक्षण सामग्रीचे निर्यातक बनावे. तशी तयारी भारतीय उद्योगजगत करेल, अशी घोषणा मोदींनी स्वातंत्र्यदिनी केली होती.

अजून एक व्यवहार लांबणीवर :- अमेरिकेच्या जॅव्ह्लीन या क्षेपनास्त्रांप्रमाणेच क्षमता असणाऱ्या इस्त्राइलच्या स्पाईक या क्षेपणास्त्रांची भारत खरेदी करणार होता. मात्र हा व्यवहारही लांबणीवर टाकण्यात आला आहे.

केवळ एकास मान्यता :- अमेरिकेकडून आपण १५ चीणूक आणि २२ अपाची हेलीकॉप्टर खरेदी करणार आहोत. ही प्रगत साधने आहेत, जी निर्माण करणे आपल्याला तत्काळ शक्य नाही. ते तंत्रज्ञान आपल्याकडे नाही.


राजकीय पक्षांनो बँकेत खाती उघडा – निवडणूक आयोग

निवडणूक खर्चात पारदर्शकता आणि उत्तरदायीत्वाचे पालन व्हावे यासाठी निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना काही निर्देश जारी केले आहेत :-
• राजकीय पक्षांनी खाते उघडावे.
• आपला निधी बँकेतच भरावा.
• उमेदवाराला निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त पैसे देऊ नयेत. • खाते ICAI च्या नियमानुसारच ठेवले जावे.
• त्याची वार्षिक लेखातपासणी केली जावी.
• खाते सनदी लेखापालाकडून प्रमाणित करून घ्यावे.
• २० हजारांपुढील व्यवहार चेकनेच करावेत.
संदर्भ :- घटनेचा अनुच्छेद क्र. ३२४ (मार्गदर्शक तत्वे)


पोलीस दलात लवकर सुधारणा करा – SC

• स. न्यायालयाने ८ वर्षांपूर्वी सर्व राज्य सरकारांना पोलीस दलात सुधारणा घडवून आणण्याचे निर्देश दिले होते. मात्र रीतीरिवाजानुसार राज्य सरकारांनी याकडे सरळसरळ दुर्लक्ष केले.
• त्यामुळे स. न्यायालयाने आता या सुधारणातील एक महत्वाची सुधारणा ताबडतोब राबवण्याचे निर्देश दिले आहेत.
निर्देश :- तपासकाम आणि कायदा-सुव्यवस्था या बाबी अलग करा. त्यासाठी पोलीस दलाचे दोन स्वतंत्र भाग बनवा. (तपासकाम करणाऱ्यांना कायदा-सुव्यवथा राखण्याकामी राबवू नका.)
इतर बाबी :- नियुक्त्या, बदल्या इ प्रशासकीय बाबींकरिता ‘पोलीस आस्थापना मंडळ’ स्थापन करा.


आंतरराष्ट्रीय


शरीफ आणि इम्रान यांच्यात अखेर लष्कराची मध्यस्थी

• पाकिस्तानातील सध्या चालू असलेल्या अस्थैर्याबाबत तोडगा काढण्यासाठी लष्करप्रमुख राहील शरीफ हे मध्यस्थी करणार आहेत.
• पाकिस्तानातील तिढा काय आहे याबाबत मागील काही लेखात सविस्तर चर्चा केलेली आहे.
त्याबाबत जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
 • भारत-पाकिस्तान संबंध


 • ग्रीसमध्ये ५.७ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप

  • या भूकंपात कोणतीही जीवित किंवा वित्त हानी झाल्याचे वृत्त नाही.
  • ग्रीस हा एक भूकंपप्रवण देश आहे. = येथे वारंवार भूकंप होत असतात.
  • राजधानी – अथेन्स


  इसिसने पातळी ओलांडली – २५० सैनिकांना गोळ्या घालून ठार केले

  • सिरियातील संघर्षाने आज एक नवीन वळण घेतले. इसीस या बशर अल असद सरकारविरोधी संघटनेने २५० सैनिकांना रांगेत उभे करून ठार केले. याबरोबरच तबका हा हवाई तळ इसिसच्या ताब्यात आला आहे. त्यामुळे त्यांची उत्तरेकडील पकड अजून मजबूत बनली आहे.
  • इसीस = ISIS = इस्लामिक स्टेट ऑफ इराक & सिरीया
  • इसीस ही अल- कायदा या आंतरराष्टीय दहशतवादी संघटनेशी संबंधित सिरीयामधील संघटना आहे.


  इबोला बळी – १५००

  सर्वाधिक बळी लायबेरिया या देशातील आहेत. = ६९४


  अर्थव्यवस्था


  आर्थिक विकासदर सुधारणेच्या मार्गावर

  • देशाचे आर्थिक क्षेत्र कोणत्या दिशेने जात आहे, हे दाखवण्याचे काम ‘आर्थिक विकासदर’ करीत असते.
  • दर तिमाहीला हा दर प्रकाशित करण्याचे काम ‘केंद्रीय सांख्यिकी संस्था’ करीत असते.
  • तिमाही = आर्थिक वर्ष १ एप्रिल रोजी सुरु होते. त्यामुळे एप्रिल, मे, जून या तीन महिन्यांची पहिली तिमाही धरतात.
  • एप्रिल, मे, जून = १ ली तिमाही
  • जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर = २ री तिमाही
  • ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर = ३ री तिमाही
  • जानेवारी, फेब्रुवारी, मार्च = ४ थी तिमाही
  • तर, २०१४-१५ च्या पहिल्या तिमाहीत विकासदर ५.७% राहिला आहे. हा दर अडीच वर्षातील सर्वोच दर आहे.
  • मागील वर्षी याच तिमाहीत हा दर केवळ ३.५% इतकाच होता.
  • या तिमाहीत सर्वच क्षेत्रांनी चांगली कामगिरी केली आहे. उदा. सेवा क्षेत्र, उत्पादन क्षेत्र, खाणकाम क्षेत्र इ.
  • देश पुन्हा एकदा आर्थिक प्रगतीकडे वाटचाल करीत आहे, याचेच हे निदर्शक आहे.


  राज्य


  महाराष्ट्र पोलिसांना मिळणार वाढदिवशी आणि विवाहदिनी विशेष रजा

  हा निर्णय राज्याचे गृहमंत्री R R पाटील (आबा) यांनी घेतला आहे. यामुळे पोलिसांवर कामाचा जो अतिरिक्त ताण पडत आहे त्यात काही अंशी कमतरता येईल, असे मत आबांनी मांडले.


  पर्यावरण


  गाडगीळ अहवाल बासनात

  • डॉ. माधव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली ३१ ऑगस्ट २०११ रोजी एक समिती नेमली होती.
  • या समितीने पश्चिम घाट हा पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील असल्याचे जाहीर केले होते. तसेच गोव्यात पश्चिम घाट परिसरात खाणकाम करू नये, असेही म्हटले होते.
  • सरकारने मात्र याला वाटण्याच्या अक्षता लावल्या आहेत.
  • सरकारने गाडगीळ अह्वालाऐवजी के. कस्तुरीरंगन समितीच्या शिफारशी स्वीकारल्या आहेत. (ज्या गाडगीळ यांच्यापेक्षा कितीतरी सोप्या आहेत! थोडक्यात येनकेनप्रकारेण.........)


  क्रीडा


  राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचे वितरण

  • राष्ट्रीय क्रीडादिनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचे वितरण केले.
  • वितरीत केलेले पुरस्कार : अर्जुन, द्रोणाचार्य, ध्यानचंद, राष्ट्रीय खेळ प्रोत्साहन
  • यावर्षी राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मात्र वितरीत करण्यात आला नाही. २० वर्षांत हे पहिल्यांदाच घडले आहे. यापूर्वी १९९४ साली हा पुरस्कार दिला गेला नव्हता.
  • imp : राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार समजला जातो.


  देशातील पहिला आंतरराष्ट्रीय दर्जाचा मातीचा ट्रॅक औरंगाबादमध्ये

  • देशातील पहिला आंतरराष्ट्रीय दर्जाचा मातीचा ट्रक औरंगाबादमध्ये बनवण्यात आला आहे.
  • येथे उंच उडी, भालाफेक, थाळीफेक, लांब उडी, गोळाफेक, हॉकी, स्टीपलचेस, फुटबॉल इ. खेळांचा सराव करता येईल.


  जागतिक बॅडमिन्टन स्पर्धा – कोपनहेगन

  • साईना नेहवालचे आव्हान संपुष्टात!
  • पी. व्ही. सिंधूचे पदक निश्चित! बघूया सिंधू काय कमाल करते ते!!!


  प्रो-कबड्डी लीग फायनल : जयपूर पिंक पॅन्थर्स X यु मुंबा


  आरोग्य


  टक्कल आता पडणार नाही!

  • टक्कल पडण्याला कारणीभूत ठरणारे घटक सापडले आहेत. आपल्या प्रतिकारकशक्तीतील ‘T’ नावाच्या पेशी याच टक्कल पडण्याला कारणीभूत आहेत.
  • या T पेशींना विशिष्ट आदेश मिळाल्यानंतर त्या केसांच्या फॉलीकल्सवर हल्ला करतात. परिणामी केस गळती होते.
  • हा आदेश त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही अशी व्यवस्था आता केली जाईल.


  बिनमहत्वाची चर्चेतली माणसं


  रेल्वेमंत्री सदानंद गौडा

  • यांच्या पुत्राविरुध्द एका मॉडेल कम अभिनेत्रीने बलात्कार आणि फसवणुकीचा आरोप केला आहे.
  • पुत्राचे नाव – कार्तिक

  RECENT POSTS

 • २९ ऑगस्ट २०१४ - दैनिक बातम्या व विश्लेषण New...
 • २८ ऑगस्ट २०१४ - दैनिक बातम्या व विश्लेषण New...
 • २७ ऑगस्ट २०१४ - दैनिक बातम्या व विश्लेषण : भाग १ New...
 • १९ ते २४ ऑगस्ट २०१४ - दैनिक बातम्या व विश्लेषण : भाग १
 • यापूर्वीच्या पोस्ट
 • विशेष लेख

 • विशेष लेख भारत-पाक संबंध New...
 • विशेष लेख १. महाराष्ट्राचे नूतन राज्यपाल २. कच्चथिवू New...
 • विशेष लेख : केरळमधील दारूबंदी योग्य कि अयोग्य New...
 • विशेष लेख : के. शंकरनारायणन यांच्या राजीनाम्याच्या निमित्ताने ........ New...
 • यापूर्वीचे विशेष लेख
 • Comments ( अभिप्राय )

  satish     2014-09-01
  good information i get from here
  Balu Sonawale     2014-11-30
  Thank you
  Atul sambar     2015-01-11
  Thank You
  ashok kadnar     2015-01-15
  Plz provie pdf options for every current notes
  Nilam Lakade     2015-09-02
  Thank u so much. Very nice information
  sarita sajagane     2015-10-07
  nice work for student
  hoverboard banned from amazon     2016-03-27
  hoverboard banned from amazon
  hoverboard red blinking light fix     2016-03-27
  hoverboard red light
  http://www.iconicmobile.ru/wol.asp?louis-vuitton-b     2016-03-27
  http://www.cristinamele.it/wol.asp?christian-louboutin-womens-high-tops-uk/ http://www.iconicmobile.ru/wol.asp?louis-vuitton-bags-2005/ http://www.iconicmobile.ru/wol.asp?louis-vuitton-bags-2005/
  hoverboard banned australia     2016-03-27
  hoverboard banned australia
  hoverboard video fire     2016-03-27
  hoverboard video bieber
  hoverboard 9 year old 2016     2016-03-27
  hoverboard 9 year old 2016
  hoverboard 2016 one wheel     2016-03-27
  hoverboard 2016 one wheel
  hoverboard amazon china     2016-03-27
  hoverboard amazon china
  hoverboard new york 2016     2016-03-27
  hoverboard new york 2016
  hoverboard cost cheap     2016-03-27
  hoverboard cost cheap
  http://www.caafimeeting.com/forum/MTvn     2016-03-27
  I think the article is very helpful for people,it has solved our problem,thanks! http://www.caafimeeting.com/forum/MTvn http://www.caafimeeting.com/forum/MTvn
  hoverboard real one player     2016-03-27
  hoverboard real one player
  hoverboard reviews cnet best     2016-03-27
  hoverboard reviews cnet best
  hoverboard reviews 2016 outback     2016-03-27
  hoverboard reviews 2016 outback
  hoverboard ny state law library     2016-03-27
  hoverboard ny law
  hoverboard led bluetooth 4.0     2016-03-27
  hoverboard led lights price
  hoverboard now real tea     2016-03-27
  hoverboard now real tea
  http://www.sixtime.it/wol.asp?air-max-white-leopar     2016-03-27
  http://www.forpost-sb.com/wol.asp?louis-vuitton-online-store-singapore/ http://www.sixtime.it/wol.asp?air-max-white-leopard-moth/ http://www.sixtime.it/wol.asp?air-max-white-leopard-moth/
  hoverboard reviews 2016 forester     2016-03-27
  hoverboard reviews 2016 forester
  http://www.resinadecorativa.it/wol.asp?air-max-bla     2016-03-27
  http://www.thermoplasticmoulds.com/wol.asp?air-max-leather-2009-5p/ http://www.resinadecorativa.it/wol.asp?air-max-black-gum-kaskus/ http://www.resinadecorativa.it/wol.asp?air-max-black-gum-kaskus/
  hoverboard illegal in illinois     2016-03-27
  hoverboard illegal theverge
  hoverboard reviews comparison 2016     2016-03-27
  hoverboard reviews consumer reports cars
  http://www.curvaticompensati.it/wol.asp?sneaker-lo     2016-03-27
  http://www.easyroll-up.com/wol.asp?christian-louboutin-employee-discount/ http://www.curvaticompensati.it/wol.asp?sneaker-louboutin-preco-iphone-2/ http://www.curvaticompensati.it/wol.asp?sneaker-louboutin-preco-iphone-2/
  Cheap NFL Jerseys     2016-03-27
  Learning Science: For the purpose of ncing any study of science any bination of the Saraswati and the Vidya yoga prove to be the best. But he did point out, “Europe is a whole other story for us. You do not need so outstanding knowledge and skills to establi your own organization, providing goods and services. Students show their excellence in sports, cultural programs, dance programs, athletics and others.4.co. They are so ligheight and malleable that you may now and again be unable to rember that you are wearing them.The o types of Yogas and their bination which are indispensable for ncing education are as follows:Saraswati Yoga: The following binations produce the yoga:a. For new singer, only one ple has dance jobs: StageDoorAess. Through the late 1990′s, sixty percent of females had been having common mammograms, and also the common tumor size had shrunk to two centimeters, based on data from the Most cancers Culture and also the Nationwide Middle for Well being Stats. Cheap NFL Jerseys http://www.cheapnfljerseyssupplychina.us.com/


  Add Your Comment :

  CONTACT US AT :


  इ-मेल : bhushankale2010@gmail.com
  mob. 9421990878 (फक्त SMS )

  आपणास ही वेबसाईट कशी वाटतेय, कोणत्या बाबी अजून add कराव्या, कोणत्या गोष्टींमध्ये बदल करावासा वाटतोय या बद्दलची आपली मत जरूर कळवा.

  कृपया CONTACT US या सदरात जाऊन स्वतःचे REGISTRATION (नोंदणी) करा. मासिक आणि इतर सुविधा केवळ नोंदणी केलेल्या सदस्यांनाच मिळतील.