राष्ट्रीय

१)भारतीय मालवाहू विमानाला अपघात

• “सुपर हर्क्युलस सी१३०-जे” हे मालवाहू विमान अमेरिकेकडून खरेदी करण्यात आले आहे.
• या विमानाची प्राथमिक चाचणी सुरू असताना हा अपघात झाला आहे.
• या विमानाच्या खरेदीसाठी भारताने २००८ मध्ये अमेरिकेसोबत ६००० कोटीचा करार केला होता.
• आणखी सहा विमाने खरेदी करण्याचा भारताचा मानस होता.

२) सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय दक्षता आयोगाकडे सहकार्य मागितले.

• कोळसा खाण घोटाळ्यातील सर्व प्रकरणाची तपासणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय दक्षता आयोगाकडे सहकार्य मागितले आहे.
• या प्रकरणी तपास अधिकारी आणि सी.बी.आय. मुख्यालय यांच्यामध्ये आरोपत्र दाखल करण्यावरून मतभिन्नता निर्माण झाली आहे.
• सदर कोळसा खाण वाटपाची प्रकरणे बंद करावी की, सी.बी आय. ने आरोपत्र दाखल करावे यासंबंधी मुख्य दक्षता आयुक्त आणि दोन दक्षता आयुक्त यांनी आपले म्हणणे मांडावे असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

३) वीरभूम बलात्कार प्रकरण

• सदर बलात्कार झालेल्या मुलींच्या मुलभूत हक्कांचे रक्षण करण्यास राज्य सरकार असमर्थ ठरले, त्यामुळे या मुलीला नुकसानभरपाई म्हणून पाच लाख रुपये देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने पश्चिम बंगाल सरकारला दिले आहेत.
• महिलांना विवाह करताना आपला जोडीदार निवडण्याचा पूर्णपणे अधिकार असून त्यांच्या अधिकारांचे रक्षण करणे हे राज्य सरकारचे कर्तव्य असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
• या बलात्कार पिडीत महिलेने जातीबाहेरील व्यक्तीबरोबर विवाह करण्याचा निर्णय घेतल्यामुळे “कांगारू न्यायालया”ने तिच्यावर बलात्कार करण्याचा आदेश दिला होता.

ज्ञान- विज्ञान

१) उपग्रह प्रेक्षपणासाठी जैवइंधन तयार होणार

• जॉर्जिया इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॅालॅाजीच्या वैज्ञानिकांनी हा प्रयोग केला असून, त्यांनी झाडामध्ये तयार होणाऱ्या पायनाईन या हायड्रोकार्बनचे संश्लेषण करून क्षेपणास्त्रांसाठी लागणाऱ्या जेपी १० या इंधनाला पर्याय उपलब्ध होणार.
• या झाडातील वितंचकाचा वापर जीवाणूमध्ये करून त्यात काही अपेक्षित बदल घडवत गेले, त्यामुळे पायनाईटचे उत्पादन जैव तंत्रज्ञानाच्या साह्याने सहा पटीने वाढले.
• हे उत्पादन २६ पट वाढवता आले तरच हा शोध स्पर्धात्मक पातळीवर उपयोगी ठरणार आहे.
• पायनाईन डायमर्सचे उत्पादन पायनाईन डायमेरायझेशन केल्यानंतर होते व त्याची ऊर्जा घनता जेपी-१० या इंधनाइतकीच असते.
• इंधनाचे वजन कमी आणि उर्जा जास्त मिळवण्यासाठी जेपी-१० हे इंधन वापरले जाते.
• त्याच्यापेक्षा पेट्रोल आणि गॅसोलीन यांच्यामध्ये लिटरमागे फारच कमी ऊर्जा असते.
• जेपी-१० या इंधनातील रेण्वीय रचना जास्त ऊर्जा निर्माण करण्यास कारणीभूत असते.
• या प्रयोगामध्ये इ-कोलाय जीवाणूत पायनाईन सिंथेज व ग्रेनल डायाफॅास्फेट सिंथेज यांचे प्रत्येकी तीन असे सहा प्रकार वापरून सक्षम इंधन मिळवण्याचा प्रयत्न केला आहे.

आंतरराष्ट्रीय

१) जपान देणार जम्बोजेट विमानाला निरोप

• जगातील विमान कंपन्यांना कमी इंधनामध्ये जास्त प्रवास करणारी विमाने हवी आहेत.
• त्यामुळे जपानमधील ऑल निप्पोन या कंपनीने आपल्या विमान ताफ्यातील बोईंग-७४७ ‘जम्बोजेट’ या विमानाला ताफातून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला.

२) ऑस्ट्रेलिया सरकारकडून मगरीची शिकार योजना रद्द

• प्राण्यांच्या शिकारीला ऑस्ट्रेलिया सरकार सहमत असून, हे सरकार क्रूर वागणुकीचा संदेश देणारे आहे, असा संदेश जगामध्ये जाईल त्यामुळे सरकारने मगरीच्या शिकारीला स्थगिती दिली आहे.
• ऑस्ट्रेलियाच्या उत्तर भागात मगरीच्या मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
• त्यामुळेच सरकारने मगरीच्या शिकारीची योजना आखली होती.
• दरवर्षी ५०० मगरीची शिकार करण्याची योजना आखण्यात आली होती, शिकार करणाऱ्यासाठी मोठी बक्षीस योजना जाहीर करण्यात आली होती.
• पण पर्यावरणवादी लोकांनी याला जोरदार विरोध केला होता.

अर्थविषयक बातम्या

१) बेसल-३ ला मुदतवाढ

• बेसल-३ ला मुदतवाढ दिल्याबद्दल बँकांना भांडवल जमा करण्यासाठी काही काळ मुदतवाढ मिळणार आहे.
• बँकिंग क्षेत्रावरील भांडवली ताणताणाव लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
• बेसल-३ मार्गदर्शक तत्वानुसार वाणिज्य बँकांना २०१५ मधील हायब्रीड श्रेणी-१ भांडवल म्हणून २६ हजार कोटी उभे करणे आवश्यक होते.
• मार्च २०१८ पर्यंत बँकांना ५ लाख कोटी रुपये भांडवलाची सज्जता करावी लागली असती.

क्रीडा बातम्या

१) गावस्कर बी.सी.सी.आय.चे हंगामी अध्यक्ष

• न्यायालयीन चौकशीसाठी एन.श्रीनिवासन यांना पदावरून दूर करून सुनील गावस्कर यांनी हंगामी अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
• आय.पी.एल. फिक्सिंग प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत गावस्कर हे या पदावर राहतील. • यापूर्वी गावस्कर समालोचक म्हणून बीसीसीआयशी करारबद्ध आहेत.
• अध्यक्षपदाचा धुरा सांभाळल्यामुळे त्यांना समालोचनाचे काम करता येणार नाही, त्यामुळे त्यांचे जे काही नुकसान होणार आहे, त्याची भरपाई बीसीसीआय ने द्यावी अशी सूचना न्यायालयाने दिली आहे.
विशेष लेख वाचण्यासाठी खालील लिंक वर click करा किंवा या पानावरील 'विशेष लेख' या लिंकवर click करा.  • भारतीय औषध क्षेत्राचा दर्जा ........-by sk Core Group
  • 'डेंग्यूविरोधात तू आणि मी' - राष्ट्रीय अभियानास सुरुवात ..........-by BK Core Group New...
  • CPSE-ETF च्या स्थापनेची तयारी पूर्ण ..........-by BK Core Group New...
  • प्रिय मित्रहो, आपणास काही शंका किंवा प्रश्न असतील तर आम्हांस जरूर कळवा. आपल्या चांगल्या आणि वाईट सर्व प्रकारच्या सूचना नेहमीच स्वागतार्ह आहेत. इ-मेल : shivraj@anushri.org किंवा SMS करा 9404703270    कृपया CONTACT US या सदरात जाऊन स्वतःचे REGISTRATION (नोंदणी) करा. मार्च महिन्याचे मासिक केवळ नोंदणी केलेल्या सदस्यांनाच मोफत मिळेल.