दैनिक बातम्या व विश्लेषण : दिनांक – ३० मार्च २०१४

प्रिय मित्रहो, मासिकाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. मार्च महिन्याचे मासिक Download करण्यासाठी लवकरच लिंक दिली जाईल. ही लिंक पहिल्या पानावर ('दैनिक बातम्या व विश्लेषण' हे शीर्षक असणाऱ्या पानावर) उपलब्ध असेल.राष्ट्रीय

१) C-१३०J विमान कोसळले – ५ अधिकारी ठार

• प्रशिक्षणावेळी ग्वाल्हेरजवळ कोसळले.
• C-१३०J = अमेरिकेकडून आयात केलेले विमान
• २० टन वजन वाहून नेण्याची क्षमता
• युद्धप्रसंगी तातडीने सामग्री आणि सैन्य सीमेवर पाठवावे लागते. त्यासाठी हे विमान भारताने खरेदी केले होते.
• मिग-२१ प्रकारची विमानांचा वारंवार अपघात होत असल्याने ती बदलून त्याजागी ही नवीन विमाने आयात केली होती
.

२) कोळसा घोटाळा : SC ने मागितली CVC कडे मदत

• CBI ने कोळसा घोटाळ्याशी संबंधित दोन प्रकरणांच्या फायली बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
• मात्र CBI मधीलच काही अधिकारी ह्या दोन प्रकरणात नव्याने आरोपपत्र दाखल करावे, असे म्हणत आहेत.
• यावर तोडगा म्हणून स. न्यायालयाने केंद्रीय दक्षता आयोगाची (CVC) मदत मागितली आहे.

३) इटालियन नौसैनिक प्रकरण : NIA ला तपास करण्याचा अधिकार नाही?

• इटलीच्या नौसैनिकांनी केरळच्या दोन मच्छीमारांची सागरी लुटेरे समजून हत्या केली होती. त्याबाबत त्यांच्यावर केस चालू आहे.
• राष्ट्रीय तपास संस्था (NIA) ही केस हाताळत आहे.
• इटलीच्या मच्छीमारांनी NIA च्या या अधिकारक्षेत्राबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलेय. (नौसैनिक – “NIA ला हा तपास करण्याचा अधिकार नाही.”)

४) श्रीलंकेने भारतीय मच्छीमारांची सुटका केली : संयुक्त राष्ट्रातील श्रीलंका विरोधी ठरावावर भारताने तटस्थ भूमिका घेतल्याचा परिणाम

• केवळ सदिच्छा म्हणून ही सुटका केली गेली.
• आता केवळ १०० कैदी श्रीलंकेच्या ताब्यात आहेत.@ दिनांक २८ मार्च २०१४ ची बातमी

श्रीलंकाविरोधी ठराव UN मध्ये पास

• श्रीलंकेने लिट्टे विरोधी कारवाई करताना मानवी हक्कांचे उल्लंघन केले, असा आरोप करणारा ठराव आज २३ X १२ मतांनी पास झाला.
• एकूण ४७ सदस्य या समिती आहेत.
• अमेरिकेने हा ठराव मांडला होता.
• या ठरावानुसार श्रीलंकन सैन्याने केलेल्या मानवी हक्क उल्लंघनाची आंतरराष्ट्रीय चौकशी व्हावी अशी अमेरिकेची इच्छा आहे. महिंदा राजपक्षे (श्रीलंकेचे अध्यक्ष) यांनी मात्र यास ठाम नकार दिलाय.
• भारत मात्र यावेळी तटस्थ राहिला. (एकूण १२ देश तटस्थ राहिले.)
• भारत – “आयोगाची भूमिका घुसखोरीची आहे.”

• UN मधील भारताचे कायमस्वरूपी प्रतिनिधी – दिलीप सिन्हा

५) गोवा खाण घोटाळा – गोव्याच्या खाण आणि भूरचना विभागाच्या माजी संचालकास अटक

• गोव्यात मोठ्या प्रमाणावर अवैध खनन चालू होते. त्यासंबंधी न्या.M B शाह समिती नेमली गेली होती. तिच्या अहवालावरून १० प्रकरणांचा तपास चालू आहे.
• याच समितीने तत्कालीन खाण आणि भूरचना विभागाच्या संचालकाला खाण घोटाळ्यात जबाबदार धरले होते.
• त्यानुसार आज CBI ने त्यास अटक केली आहे.

६) अमरनाथ यात्रेसाठी लागणार शासकीय वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र

• अमरनाथ यात्रा ही शारीरिक कसोटी पाहणारी यात्रा आहे. या यात्रेच्या प्रवासादरम्यान विरळ हवा, अत्यल्प ऑक्सिजन, हवेचा कमी दाब इ समस्या येतात.
• यात्रेकरूंनी कोणत्याही मान्यताप्राप्त डॉक्टरकडून वैद्यकीय प्रमाणपत्र मिळवले की त्यांना अमरनाथ यात्रेला परवानगी मिळत होती.
• मात्र तरीही २०१२ साली या यात्रेदरम्यान ९३ भाविकांचा वैद्यकीय कारणांमुळे मृत्यू झाला. त्यामुळे स. न्यायालयाच्या एका उच्चस्तरीय समितीने शिफारस केली की हे प्रमाणपत्र केवळ शासकीय रुग्णालयाकडूनच मिळालेले असावे.
• जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालय यांपैकी कोणत्याही ठिकाणचे प्रमाणपत्र चालेल.

अर्थव्यवस्था

१) बेसल-३ ला मुदतवाढ

• बेसल = ही जागतिक मार्गदर्शक तत्वे आहेत. यामध्ये बँकांनी विशिष्ट बाबींचे पालन करावे लागते. हे पालन करणाऱ्या बँका सक्षम आहेत, असे समजले जाते. बेसल-३ ही त्यांपैकीच एक आहेत.
• बेसल-३ ही मार्गदर्शक तत्वे आहेत ज्यानुसार भारतातील सर्व बँकांना २०१५ मधील हायब्रीड श्रेणी-१ भांडवल म्हणून २६००० कोटी रु. उभे करणे अनिवार्य होते. (म्हणजेच २०१८ पर्यंत या बँकांजवळ भांडवल म्हणून ५ लाख कोटी रु. हवे होते.)
• मात्र RBI ने ही कालमर्यादा मार्च २०१८ वरून मार्च २०१९ केली आहे.
• कारण = सध्या देशातील सार्वजनिक बँकांना मोठ्या प्रमाणावर अनुत्पादक मालमत्तेचा सामना करावा लागतोय. थकबाकीदार कर्ज फेडत नाहीयेत. परिणामी २०१८ पर्यंत इतक्या मोठ्या प्रमाणावर भांडवल उभारणे बँकांना जड गेले असते.
• या निर्णयाचे आर्थिक क्षेत्रातील सर्व घटकांनी स्वागत केले आहे.

राज्य

१) स्वीप – मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाचा उपक्रम

• स्वीप = SVIP = Systematic Voter Education & Electrols participation (पद्धतशीर मतदार शिक्षण आणि इलेक्ट्रोल्स सहभाग)
• गत निवडणुकीत मतदान कमी झाले होते. ते यावेळी वाढावे यासाठी हा उपक्रम!
• काय केले जाईल? = अंगणवाडी सेविका आणि बचत गटातील महिला घरोघर जाऊन मतदारांना जागरूक करतील. १७ एप्रिल रोजी मतदान आहे याची आठवण करून देतील. त्यासाठी काही पोस्टर्स घराच्या दारावर आणि gas च्या टाकीवर लावतील.
• याबरोबरच इतरही अनेक समाजघटकांचा सहभाग घेतलेला आहे.

२) अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या कन्येच्या गुणांत झाली वाढ

• संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मोहन खेडकर यांची कन्या मृणाल खेडकर ही पदव्युत्तर इंजिनीअरिंग (अभियांत्रिकी) ला होती. तिने गुणांची फेरतपासणी व्हावी म्हणून अर्ज केला होता. मात्र फेरतपासणीमध्ये केवळ मृनालचेच गुण वाढले, इतरांचे नाही. त्यावरून संशयाचे ढग जमले.
• राज्यपालांनी या प्रकरणी कुलगुरूंना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. तसेच या प्रकरणाच्या तपासासाठी २ समित्या नेमण्यात आल्या आहेत.

विज्ञान – तंत्रज्ञान – आरोग्य - पर्यावरण

१) उच्च दर्जाची जैव इंधने बनवण्यात यश

• उपग्रह आणि क्षेपणास्त्रे प्रक्षेपित करण्यासाठी उच्च दर्जाची इंधने आवश्यक असतात.
• उच्च दर्जाची इंधने = वजनाने कमी मात्र जास्त उर्जा देणारी इंधने
• उदा. JP १० इंधन
• झाडांमध्ये तयार होणाऱ्या पायनायइन या घटकाचे हायड्रोकार्बन संश्लेषण करून JP १० प्रकारचे इंधन तयार करण्यात यश मिळालेय.
• पायनाइन सिंथेज आणि ग्रेनल डायफॉस्फेट सिंथेज यांच्या ३-३ प्रकारांचा वापर यासाठी केला गेलाय.
• पायनाइनला इ-कोलाय या जीवाणूच्या शरीरात सोडून त्याच्या शरीररचनेत काही जैवअभियांत्रिकी बदल केला गेला त्यानंतर जैवइंधनाचे उत्पादन ६ पटींनी वाढले. मात्र अजूनही ते २६ पटींनी वाढण्याची गरज आहे.
आजच्या घडामोडींवर आधारित प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

  • प्रश्नमंजुषा - दि. ३० मार्च २०१४ - by BK Core Group New...

  • विशेष लेख वाचण्यासाठी खालील लिंक वर click करा किंवा या पानावरील 'विशेष लेख' या लिंकवर click करा.

  • 'डेंग्यूविरोधात तू आणि मी' - राष्ट्रीय अभियानास सुरुवात ..........-by BK Core Group New...
  • CPSE-ETF च्या स्थापनेची तयारी पूर्ण ..........-by BK Core Group New...

  • प्रिय मित्रहो, आपणास काही शंका किंवा प्रश्न असतील तर आम्हांस जरूर कळवा. आपल्या चांगल्या आणि वाईट सर्व प्रकारच्या सूचना नेहमीच स्वागतार्ह आहेत. इ-मेल : bhushan@anushri.org
    किंवा SMS करा या नंबरवर 9404640322 (फक्त SMS )    कृपया CONTACT US या सदरात जाऊन स्वतःचे REGISTRATION (नोंदणी) करा. मार्च महिन्याचे मासिक केवळ नोंदणी केलेल्या सदस्यांनाच मोफत मिळेल.