दैनिक बातम्या व विश्लेषण

राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय

१. चीनमधील हुरून या कंपनीने जगातील श्रींमंत व्यक्तींची यादी बनवलीय

- ६८ अब्ज डॉलरचे मालक असलेले बिल गेट्स हे पुन्हा एकदा पहिल्या स्थानी
भारतात नंबर १ = मुकेश अंबानी
२. लक्ष्मी मित्तल - १७ अब्ज डॉलर्ससह
३. सन फार्माचे दिलीप सांघवी आणि विप्रो अजीम प्रेमजी - प्रत्येकी १३.५ अब्ज डॉलर्स
-न्यूयॉर्क अब्जाधिशांची राजधानी ठरली आहे.

२. चीनमधील रेल्वे स्टेशवरील हल्ल्यात ३३ ठार, १३० जखमी

-स्थळ = युनान भागातील कुनामिंग या रेल्वे स्थानक
हल्ला कोणी केला = पूर्व तुर्कस्तान इस्लामिक मूव्हमेंट ("अल्‌ कायदा'शी निगडित )
हल्ल्याचे कारण = वायव्यवेकडील झिनजियांग प्रांतात उघीर मुस्लिम आणि हान वंशीय चिनी नागरिक यांच्यात अनेक वर्षे संघर्ष सुरू आहे.
गेल्या वर्षी तियानमेन चौकात पूर्व तुर्कस्तान इस्लामिक मूव्हमेंट या संघटनेने केलेल्या हल्ल्यात ३ जण ठार झाले होते.

३. फाशीची शिक्षा रद्द करण्याच्या निकालाविरोधात केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली फेरविचार याचिका

केंद्र सरकारचे म्हणणे = हे प्रकरण तीन न्यायाधीशांच्या पीठाच्या न्यायकक्षेबाहेर होते. म्हणून हा महत्वाचा विषय घटनापीठापुढे मांडणे आवश्यक होते
कलम १४५ = घटनेचा अर्थ लावण्याचा हा मुद्दा पाच न्यायाधीशांच्या पीठापुढे मांडणे आवश्यक

४. युक्रेनमध्ये रशियाच्या फौजा?

- ३० सशस्त्र युद्धनौका तसेच सहा हजारांचे अतिरिक्त सैन्यबळ क्रिमियाच्या दिशेने धाडले असल्याची माहिती मिळतेय.
-सिमफ्रोपोल ही क्रिमियाची राजधानी असून त्या शहराच्या बाहेर सशस्त्र रशियावादी रक्षकांनी गस्त घालण्यास प्रारंभ केला असून त्याआधी या प्रांतातील सरकारी इमारती आणि विमानतळांवर त्यांनी ताबा मिळविल्याचे समजतेय.
-रशियाचे म्हणणे = युक्रेनमधील असाधारण परिस्थिती आणि तेथे वास्तव्यास असलेल्या रशियन नागरिकांचे रक्षण व्हावे म्हणून फौजा पाठवल्यात.

4.पाकिस्तान पोलिओ मुक्त कसा होणार?

-वायव्य पाकिस्तानात पोलिओ लसीकरण करणाऱ्या पथकांवर बॉम्बहल्ला झालाय.
-त्यात एका मुलासह बारा जण ठार झाले.
- इतर ठिकाणीही हल्ले झाले.
-तालिबानची अंधश्रद्धा – पोलिओ लसीकरण म्हणजे मुस्लीमांना संपवण्याचा पाश्चीमात्त्यांचा डाव.

चर्चित व्यक्ती

१.बंगारू लक्ष्मण – निधन

-भाजपचे माजी अध्यक्ष
-२००१मध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारच्या काळात शस्त्रास्त्रे करार करताना लक्ष्मण यांनी एक लाख रुपयांची लाच घेतली होती.
-‘तेहेलका’ने हे प्रकरण उघडकीस आणल्यानंतर त्यांना भाजपच्या अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागले होते.

२. निमिष छेडा यांचे निधन

- साऊंड डिझायनर (ध्वनी रचनाकार)
-‘नमस्ते लंडन’‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई दोबारा’ ‘फँड्री’ ‘आजोबा’

३.डॉ. त्र्यंबक कृष्णा टोपे

- जन्मशताब्दी वर्ष
- कार्य – राज्यघटनेचा आणि हिंदू कोड बिलाचा मसुदा तयार करण्याच्या कामात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मोलाची मदत.

राज्य

१. महिला संरक्षणाबाबत सरकार बेपर्वा

- महिलांचे कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण व्हावे म्हणून कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा अस्तित्वात आहे.
- कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत तालुका पातळीवर एका संरक्षण अधिकाऱ्याची नियुक्ती बंधनकारक आहे.
- २१६४ अधिकाऱ्यांची नियुक्ती राज्य सरकारच्या प्रस्तावानुसार अपेक्षित आहे.
- हे संरक्षण अधिकारी कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत दाखल तक्रारींची चौकशी करतील आणि गरज असेल तेथे वादी-प्रतिवाद्यांची बैठक घेऊन त्या तक्रारी सोडविण्याचा प्रयत्न करतील.
- मात्र अद्याप कुठेही हे अधिकारी नियुक्त केले गेलेले नाहीत.
- त्याबाबत २०१० मध्ये उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अद्याप अंमलबजावणी राज्य सरकारला जमलेली नाही.
( महासंवेदनशील सरकार = महाराष्ट्र सरकार )

२. राज्यात कुष्ठरुग्णांच्या संख्येत वाढ

-‘राष्ट्रीय कुष्ठरोग निमूर्लन कार्यक्रमांतर्गत’ २०१२ पर्यंत कुष्ठरोग निर्मूलनाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते.
- प्रत्यक्षात महाराष्ट्रात २००५-०६ साली = ६८८८ कुष्ठरुग्ण
२०१२ मध्ये = १२,२५३ (दुप्पट !!!)
- दर लाख लोकसंख्येमागे नवीन कुष्ठरुग्णाच्या प्रमाणातही १२.९३ टक्क्यांवरून वाढ होऊन १५.९६ टक्के झाले आहे.
- लोकलेखा समितीची शिफारस - कुष्ठरुग्णांची सेवा करणाऱ्या सामाजिक संस्थांना शासनाकडून देण्यात येत असलेली अनुदानरूपी मदत कमी असल्यामुळे ही मदत वाढवून देण्यात यावी.

३. डॉक्टरांची अनाकलनीय चिठ्ठी ‘वाचनीय’ होणार - आदर्श प्रीस्क्रिप्शन प्रारूप तयार

- आदर्श प्रीस्क्रिप्शन प्रारूप कशासाठी? = रुग्णांना चुकीचे औषध दिले जाऊन त्याचा त्यांच्यावर विपरित परिणाम होणे आदी प्रकार टाळण्यासाठी
- औषधे व सौंदर्यप्रसाधने कायदा - औषधे व सौंदर्यप्रसाधने कायद्यातील तरतुदींनुसार औषधांच्या चिठ्ठीवर (प्रीस्क्रिप्शन) काय नमूद असावे याच्या स्पष्ट तरतुदी आहेत.
- डॉक्टरांचे औषधाच्या चिठ्ठीवर काय असणार? = डॉक्टरांचे पूर्ण नाव, वैद्यकीय पात्रता, नोंदणी क्रमांक, पूर्ण पत्ता, रुग्णाचे पूर्ण नाव व पत्ता, लिंग आणि वय, कॅपिटल अक्षरांमध्ये औषधाचे नाव (शक्यतो जेनरिक नाव), त्याची क्षमता (पॉवर), मात्रा (डोस) आणि एकूण प्रमाण नमूद करायचे असून त्याखाली डॉक्टरांची स्वाक्षरी व शिक्का राहील.
- औषध विकणाऱ्या दुकानदारांना = दुकानाचे नाव व पत्ता, औषध देण्याची तारीख, पूर्ण औषध न दिल्यास किती दिले त्याचे प्रमाण ही माहिती नमूद करावी लागणार आहे.

क्रीडा

१. आशिया चषक : अफगाणिस्तानचा बांगलादेशवर ऐतिहासिक विजय

आशिया चषकानिमित्ताने मुख्य प्रवाहात खेळण्याची संधी मिळालेल्या अफगाणिस्तानने बांगलादेशवर २२ धावांनी मात करत ऐतिहासिक विजयाची नोंद केली

२. दुबई टेनिस

@ एकेरी पुरुष विजेता - रॉजर फेडरर ( स्वित्झर्लंड )
- रॉजर फेडररने टॉमस बर्डीचवर ३-६, ६-४, ६-३ अशी मात करत दुबई टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावले.
@ दुहेरी पुरुष - रोहन बोपण्णा - एहसाम उल हक कुरेशी
- भारताच्या रोहन बोपण्णा याने पाकिस्तानच्या एहसाम उल हक कुरेशी याच्या साथीत दुबई खुली टेनिस स्पर्धेतील दुहेरीत विजेतेपद मिळविले.

कृपया CONTACT US या सदरात जाऊन स्वतःचे REGISTRATION ( नोंदणी ) करा. फेब्रुवारी महिन्याचे मासिक केवळ नोंदणी केलेल्या सदस्यांनाच मोफत मिळेल.