राष्ट्रीय

१) निवडणूक कर्मचाऱ्यांना भरघोष भरपाई मिळणार

• निवडणुकीच्या कामामध्ये असताना दुर्देवी मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना किमान १० लाख रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे.
• निवडणूक अधिकाऱ्याचा मृत्यू अतिरेकी अथवा समाज कंटकांनी घडवून आणलेल्या भूसुरुंगाचा स्फोट, बॉम्बस्फोट व सशस्त्र हल्ला यासारख्या कृत्यामुळे झाल्यास मृताच्या वारसांना किमान २० लाख रुपये भरपाई.
• यापूर्वी अशा सानुग्राह अनुदानाविषयीचे निर्देश २००९ मध्ये आयोगाने दिले होते.

२ ) गुगलला दंड

• संकेतस्थळाच्या माध्यमातून भारतात होणाऱ्या अनुचित व्यापारासंबंधी सुरु असलेल्या चौकशीत योग्य ती माहिती देण्यात गुगलला अपयश आले. • त्यामुळे भारतीय स्पर्धा नियमन आयोगाने गुगल या प्रसिध्द कंपनीला एक कोटीचा दंड ठोठावला आहे.
• तसेच व्यापार निरीक्षकांनीदेखील कंपनीला तपासकार्यात सहकार्य करण्याची सूचना देण्यात आली आहे.
• “मॅट्रोमोनी डॉट कॉम” आणि “कन्झुमर युनिटी अँङ ट्रस्ट सोसायटी” यांनी गुगलविरोधात तक्रार केली होती.

३) “लूप टेलीकॅामची याचिका अमान्य

• ‘टू-जी’ घोटाळा प्रकरण तडजोडीसाठी लोक अदालतीकडे नेण्यासंबंधी “लूप टेलीकॉम”ने याचिका दाखल केली होती.
• ही याचिका केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (CBI) विशेष न्यायालयाने फेटाळली.
• या प्रकरणी “लूप लिमिटेड”सह एस्सार समूहाच्या प्रवर्तकाविरोधात CBI ने आरोपत्र दाखल केले होते.
• लोक अदालतीसमोर साधारण दयनीय स्वरुपाची प्रकरणे निकाली काढली जातात, याची न्यायालयाने आठवण करून दिली.

४) भारत पोलिओ मुक्त

• भारतात पोलिओ निर्मुलन कार्यक्रमाची सुरवात १९९५ मध्ये झाली होती.
• भारत संपूर्णपणे पोलिओ मुक्त झाल्याची घोषणा जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) नुकतीच केली आहे.
• दक्षिण पूर्व आशियातील ११ देशांच्या यादीत “ वाईल्ड पोलिओ व्हायरस” मुक्त देश म्हणून भारताची नोंद झाली आहे.
• भारताच्या या कामगिरीमुळे दक्षिण पूर्व आशिया विभागही पूर्णपणे पोलिओमुक्त झाला आहे.
• १९९४ मध्ये अमेरिका विभाग, २००० मध्ये पश्चिम प्रशांत, २००२ मध्ये युरोपियन विभाग पोलिओमुक्त झाला.
• एका कार्यक्रमात भारताचे केंद्रीय आरोग्य मंत्री गुलाम नबी आझाद यांना जागतिक आरोग्य संघटनेकडून “पोलिओ मुक्त” देशाचे प्रमाणपत्र देण्यात आले.

५) निवडणुकीमुळे खाजगी हवाई वाहतुकीवर नजर

• विमान, हेलीकॅाप्टरमधून अवैध वाहतूक होत नाही ना? याची खात्री करण्याचे आदेश नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने(DGCA) ने आपल्या वैमानिक आणि “क्रू” सदस्यांना दिले आहेत.
• त्याचबरोबर सुरक्षेविषयीही दक्षतेच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत.
• खबरदारीचा एक भाग म्हणून एक आठवड्याआधीच प्रवाशांची यादी उड्डाण नियंत्रकाकडे देणे बंधनकारक करण्यात आले आहेत.
• विमान कर्मचाऱ्याने GPS सेवेवरच अवलंबून न राहता त्या भागाचा नकाशा सोबत ठेवावा आणि गुगल हेलीपॅडचा वापर करावा अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय

१) निस्सान विकलेल्या मोटारी परत मागवणार

• जपानच्या निस्सान मोटर्सने जगभरात गेल्या दोन वर्षात विकल्या गेलेल्या १० लाख मोटारी परत मागवणार आहे.
• पुढच्या आसनावर बसणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बसवलेली एअर बॅग ही अपघात प्रसंगी काम करण्यायोग्य नसल्याचे आढळून आले आहे.

राज्य बातम्या

१) गंगाखेड पाणलोट प्रकल्पास नाबार्डकडून ५० कोटींचे कर्ज

• परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यात सात मेगा पाणलोट प्रकल्प बांधकामाच्या योजना पूर्ण करण्यासाठी नाबार्डने ५० कोटी ८६ लाख रुपयांचे कर्ज दिले.
• या प्रकल्पावर प्रत्यक्ष झालेल्या खर्चाच्या आधारे देय कर्जाची रक्कम नाबार्डकडून मंजूर केली जाईल.
• प्रत्येक वेळी काढण्यात येणारी कर्जाऊ रक्कम लाखाच्या पटीत असेल आणि प्रत्येक मागणी दहा लाखापेक्षा कमी असणार नाही, असे नाबार्डकडून काढण्यात आलेल्या आदेशात म्हटले आहे.
• या कर्ज योजनेसाठी सरकारचा वित्त विभाग समन्वयक म्हणून काम पाहणार आहे.
विशेष लेख वाचण्यासाठी खालील लिंक वर click करा किंवा या पानावरील 'विशेष लेख' या लिंकवर click करा.  • भारतीय औषध क्षेत्राचा दर्जा ........-by sk Core Group
  • 'डेंग्यूविरोधात तू आणि मी' - राष्ट्रीय अभियानास सुरुवात ..........-by BK Core Group New...
  • CPSE-ETF च्या स्थापनेची तयारी पूर्ण ..........-by BK Core Group New...
  • प्रिय मित्रहो, आपणास काही शंका किंवा प्रश्न असतील तर आम्हांस जरूर कळवा. आपल्या चांगल्या आणि वाईट सर्व प्रकारच्या सूचना नेहमीच स्वागतार्ह आहेत. इ-मेल : shivraj@anushri.org किंवा SMS करा 9404703270    कृपया CONTACT US या सदरात जाऊन स्वतःचे REGISTRATION (नोंदणी) करा. मार्च महिन्याचे मासिक केवळ नोंदणी केलेल्या सदस्यांनाच मोफत मिळेल.