राष्ट्रीय

१) उमेदवारी नाकारल्यास पक्षाने कारण देणे आवश्यक

• माहिती अधिकार कायदा २००५ - सर्वच राजकीय पक्षांना हा कायदा लागू होतो.
• सध्या देशातील सर्वच राजकीय पक्षांना कलम ४ (१) (ड) अनुसार एखाद्या निर्णयामुळे कोणाला बाधा पोहचत असेल तर तो निर्णय घेण्यामागील कारणे संबंधितांना स्वतःहून देणे बंधनकारक आहे.
• पण राजकीय पक्ष अशी माहिती / कारणे कोणत्याही उमेदवाराला देत नाहीत.

२) मुझफ्फरनगर दंगल- उत्तर प्रदेश सरकार जबाबदार

• प्रथमदर्शनी सरकारच्या निष्काळजीपणामुळे दंगल नियंत्रणात आणता आली नसल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे.
• स. न्यायालयाने दंगलीची चौकशी CBI(केंद्रीय अन्वेषण विभाग) , SIT(विशेष तपास पथक) यांच्याकडून करण्यास नकार दिला आहे.
• स. न्यायालयाने पीडितांच्या पुनर्वसनासाठी काही मार्गदर्शनपर सूचना दिलेल्या आहेत.

३) पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारा अटक

• फरीदकोट जिल्ह्यातील लवदीप सिंग या व्यक्तीने पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप ठेऊन त्याला अटक करण्यात आली.
• हा फरीदकोटमध्ये लष्करी कॅन्टोनमेन्टमध्ये कारकून म्हणून काम करत होता.
• त्याच्याकडून परिसराची छायाचित्र, लष्करी तळाची हस्तरेखाचित्रे, लष्कराची माहितीपत्रके इ. साहित्य जप्त करण्यात आले.

४) हज यात्रेचे खाजगीकरण

• हज कमिटी ऑफ इंडियाच्या कोट्यातील २०% जागा खाजगी प्रवास कंपन्याकडे वर्ग करण्यात आले.
• हा निर्णय भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून घेण्यात आला.
• सौदी अरेबियातील जुन्या इमारती पाडून नवीन इमारतीचे बांधकाम करण्यात येत आहे.
• त्यामुळे भारतासह जगभरातील हज यात्रेकरूंच्या संख्येमध्ये २०% कपात करण्यात आली.
• यापूर्वी महाराष्ट्राच्या वाटयाला १० हजार जागा होत्या, या निर्णयामुळे दोन ते अडीच हजार होणार आहेत.

५) सैनिकाचे मतदान नियुक्तीच्या ठिकाणीच

• सीमावर्ती भाग वगळता देशाच्या इतर भागात नियुक्तीवर असलेल्या तिन्ही सेनादलांमधील कर्मचाऱ्यांना निवडणूक आयोगाने त्यांच्या नेमणुकीच्या ठिकाणीच मतदान करू द्यावे असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
• यासाठी टपाली मतदान किंवा प्रतिनिधीमार्फत मतदान करण्याचा पर्याय निवडलेला नाही.
• सेनादल कर्मचारी १ जानेवारी २०१४ पासून ज्या ठिकाणी नेमणुकीवर असतील तेथील मतदार याद्यांमध्ये त्यांची नावे समाविष्ट केली जावीत असे आदेश न्यायालयाने दिले.
• हा नियम सेनादलातील कर्मचाऱ्यांच्या सोबत असलेल्या कुटुंबीयांनाही लागू असणार आहे.

आंतरराष्ट्रीय

१) ट्विटरवरील बंदी मागे

• तुर्कस्तानमधील सरकारने ट्विटरवर बंदी घातली होती.
• अवघ्या पाच दिवसात न्यायालयाने ती अवैध ठरवत मागे घेतली आहे.
• कारण हि बंदी म्हणजे जनतेच्या स्वातंत्र्यावर बंधन असून, ट्विटरवर जो आक्षेपार्ह मजकूर असेल तो काढून टाकण्यात यावा अशी सूचना न्यायालयाने दिली.

२) अमेरिकेकडून पाकिस्तानला मिळणारी मदत कमी करून युक्रेनला देण्यात येणार

• अमेरिका पाकिस्तानला दर वर्षी १.५ अब्ज डॉलर मदत म्हणून देत असते.
• युक्रेन संकटात असल्यामुळे त्यातील एक कोटी डॉलर वळवण्यात येण्याचा ठराव अमेरिकी काँग्रेसने पास केला आहे.
• अमेरिकी काँग्रेसने तयार केलेल्या मदतीच्या या कायद्याला “एच.आर.४२७८- युक्रेन पाठिंबा कायदा” असे नाव देण्यात आले.
• युक्रेनला देण्यात येणारी एक कोटी डॉलरची हि मदत रेडीओ फ्री युरोपच्या युक्रेनियन, बाल्कन, रशियन व ततार भाषेतील सेवेसाठी तसेच व्हाईस ऑफ अमेरिका व रेडियो लिबर्टी यांच्या या भाषेतील सेवांना मदत दिली जाणार आहे.

३) जपानमध्ये शाळकरी मुलांच्या मोबाईल वापरावर बंदी.

• सेलफोनची व्यसनाधीनता कमी करण्यासाठी जपानने हे उपाय केले आहेत.
• जपानमधील टोकियो शहरात रात्री नऊ नंतर मोबाईल वापरण्यावर बंदी.
• हि बंदी कायदेशीर नसली तरी, प्रत्येक कुटुंबाने त्याची अंमलबजावणी करावी अशी सरकारने इच्छा व्यक्त केली आहे.
• या नियमांचे पालन केले नाही तर शिक्षा केली जाणार नाही.

राज्य बातम्या

१) महाराष्ट्राला ६६० मेगावॅट वीज

• ‘अदानी पॉवर’ चा तिरोडा येथील ६६० मेगावॅटचा एक वीज संच सुरु झाला आहे.
• ती सर्व वीज महाराष्ट्राला मिळणार आहे.
• राज्यातील विजेची मागणी भागवण्यासाठी दीर्घकालीन नियोजन म्हणून “महावितरण”ने खाजगी कंपन्याबरोबर करार केले होते.
• त्यामुळे महाराष्ट्रातील वीजसंकट काही प्रमाणात कमी होणार आहे.

तंत्रज्ञान

१) अॅन्ड्रॅाईड फोनला डेंन्ड्रॅाईडचा धोका

• डेंन्ड्रॅाईड नावाचा नवा व्हायरस निर्माण झाला असून, त्यामुळे तो अॅन्ड्रॅाईड फोनला पार उद्ध्वस्त करून टाकत असतो.
• हा व्हायरस अतिशय घातक ठरणाऱ्या ट्रोजन फॅमिलीतील आहे.
• तो एकदा मोबाईलमध्ये सक्रीय झाला की, पूर्णपणे मोबाईलचा ताबा घेतो.
• या व्हायरसमध्ये मोबाईलची कमांड सेवा आणि कंट्रोल सर्व्हर बदलून टाकण्याची क्षमता आहे.
• ट्रोजन अॅप्लीकेशनसाठी ज्या किटचा वापर केला जातो त्याला डेंन्ड्रॅाईड म्हणतात. एकदा डेंन्ड्रॅाईडने स्मार्टफोनचा ताबा घेतला की, संपूर्ण व्यवस्थापन डेंन्ड्रॅाईडकडे जाते.
• इंटरनेटधारकासाठी हॅकिंग, फिशिंगला आळा घालण्यासाठी सुरक्षेचे काम करणारी अग्रणी संस्था म्हणून CERT (कॅाम्पुटर इमर्जन्सी रिस्पॅान्स टीम ) काम करते.
विशेष लेख वाचण्यासाठी खालील लिंक वर click करा किंवा या पानावरील 'विशेष लेख' या लिंकवर click करा.  • भारतीय औषध क्षेत्राचा दर्जा ........-by sk Core Group
  • 'डेंग्यूविरोधात तू आणि मी' - राष्ट्रीय अभियानास सुरुवात ..........-by BK Core Group New...
  • CPSE-ETF च्या स्थापनेची तयारी पूर्ण ..........-by BK Core Group New...
  • प्रिय मित्रहो, आपणास काही शंका किंवा प्रश्न असतील तर आम्हांस जरूर कळवा. आपल्या चांगल्या आणि वाईट सर्व प्रकारच्या सूचना नेहमीच स्वागतार्ह आहेत. इ-मेल : shivraj@anushri.org किंवा SMS करा 9404703270    कृपया CONTACT US या सदरात जाऊन स्वतःचे REGISTRATION (नोंदणी) करा. मार्च महिन्याचे मासिक केवळ नोंदणी केलेल्या सदस्यांनाच मोफत मिळेल.