Click To Download Magazine[April 2014] मासिक Download करण्यासाठी क्लिक करा

दैनिक बातम्या व विश्लेषण : दिनांक – २७ एप्रिल २०१४

राष्ट्रीय

स्विस सरकारने दिले भारत सरकारला काळ्या पैशाबाबत उत्तर

भारतातील काही व्यक्तींचा काळा पैसा स्वित्झर्लंड मधील बँकात आहे. तो मिळावा यासाठी भारत सरकारने स्विस सरकारला पत्र लिहिले होते. त्याचे उत्तर आज स्विस सरकारने पत्र लिहून दिलेय. या पत्राचा तपशील लवकरच समजेल.
पार्श्वभूमी : २००९ साली झालेल्या जी-२० परिषदेच्या ठरावानुसार - बँक खात्यांची माहिती गुप्त न राखण्यावर सर्व देशांचे एकमत झाले होते. त्यामुळे स्विस सरकारचे काहीही म्हणणे असले तरी भारताची भूमिका कठोर असायला हवी.

किंगफिशरकडून थकबाकी वसूल करण्यात बँका अपयशी

दिवाळखोरीत गेलेल्या विजय मल्ल्या यांच्या किंगफिशर या विमान वाहतूक कंपनीकडे विविध बँकांचे कर्ज थकलेले आहे.
एकूण थकबाकी – ७५०० कोटी
स्टेट बँक ऑफ इंडिया (१६०० कोटी),
युनायटेड बँक ऑफ इंडिया (४३० कोटी रु.),
सेंट्रल बँक ऑफ इंडिया (४१० कोटी रु.),
युनायडेट कमर्शियल बँक (३२० कोटी रु.),
कॉर्पोरेशन बँक (३१० कोटी रु.),
स्टेट बँक ऑफ म्हैसूर (१५० कोटी रु.),
इंडियन ओव्हर्सीज बँक (१४० कोटी रु.),
फेडरल बँक (९० कोटी रु.),
पंजाब अॅण्ड सिंध बँक (६० कोटी रु.),
अॅक्सिस बँक (५० कोटी रु.).
याखेरीज, श्री इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स (४३० कोटी रु.), जम्मू अॅण्ड काश्मीर बँक (८० कोटी रु.), ओरिएण्टल बँक ऑफ कॉमर्स ५० कोटी रु.) या बँकांनाही किंगफिशर एअरलाइन्स देणे आहे.

पद्म पुरस्कारांचे वितरण

एकूण ५६ पद्म पुरस्कार वितरीत केले गेले.
१ पद्म विभूषण, ११ पद्मभूषण व ४४ पद्मश्री.
पद्म विभूषण = योग गुरू बेल्लूर कृष्णम्माचातर सुंदरराजा अय्यंगार यांना = योगाचा जागतिक पातळीवर प्रसार केल्याबद्दल
पद्मभूषण = लिएंडर पेस, वैज्ञानिक पी. बलराम, न्या. दलवीर भंडारी, लेखक रस्किन बाँड, विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे टी. रामस्वामी, व्यवस्थापन गुरू मृत्युंजय अत्रेय, कृषी वैज्ञानिक मदाप्पा महादेवप्पा, अंतराळ आयोगाचे अध्यक्ष के. राधाकृष्णन, मलेरिया संशोधन संस्थेचे संस्थापक संचालक विनोद प्रकाश शर्मा, शिक्षण तज्ज्ञ गुलाममहंमद शेख, शिक्षणतज्ज्ञ व गुजराती विश्वकोषाचे संस्थापक धीरूभाई प्रेमशंकर ठाकर (‘मरणोत्तर पद्मभूषण’)
पद्मश्री = नाटककार महंमद अली बेग, लोककलाकार मुसाफिर राम भारद्वाज, सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ इंदिरा चक्रवर्ती, अंतराळ वैज्ञानिक एम. चंद्रनाथन व माजी महिला क्रिकेट कर्णधार अंजुम चोप्रा, विवेकवादी सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र दाभोलकर (मरणोत्तर), कवी केकी दारूवाला, बंगाली अभिनेत्री सुप्रिया देवी, गिर्यारोहक लवराज धरमशक्तू, तबलावादक विजय घाटे, सांख्यिकी संस्थेचे प्राध्यापक जयंतकुमार घोष, सामाजिक कार्यकर्ते मुकुल चंद्रा गोस्वामी, दिल्लीच्या कर्करोग संस्थेचे राजेश कुमार ग्रोव्हर, नेत्रतज्ज्ञ आमोद गुप्ता, रसायनशास्त्रज्ञ रामकृष्ण होसूर, शल्यविशारद टी.पी.जेकब, सामाजिक कार्यकर्ते मनोरमा जाफा, युनानी औषध तज्ज्ञ हकीम सय्यद खलीफतुल्ला , कर्करोगतज्ज्ञ ललितकुमार, अॅनिमेशन तज्ज्ञ राम मोहन, ह्रदयविकार तज्ज्ञ नितीश नायक, टोकियो विद्यापीठाचे भारतीय तत्त्वज्ञान विद्वान सेंगाकू मायेदा, द एम्परर ऑफ मेलडिज- ‘अ बायोग्राफी ऑफ कॅन्सर’ या पुस्तकाचे लेखक सिद्धार्थ मुखर्जी, स्त्रीरोगतज्ज्ञ सुभद्रा नायर, कथक नृत्यांगना राणी नायक, वनस्पती जीवशास्त्रज्ञ अजयकुमार परिदा.

स्वदेशी आकाश क्षेपणास्त्राच्या दोन चाचण्या यशस्वी

ठीकाण - ओडिशातील बालासोर येथील चंडीपूर
आकाश विषयी –
संरक्षण संशोधन व विकास संस्थेने ते एकात्मिक क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमात तयार केले आहे.
जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र
मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्र
पल्ला - २५ कि.मी
वहन क्षमता- ६० किलो
मारा क्षमता- ३० कि.मी अंतरावरचे विमान
एकाचवेळी अनेक लक्ष्यांचा भेद करण्याची क्षमता

आंतरराष्ट्रीय

रशियाची लढाऊ विमाने युक्रेनच्या हद्दीत

५० दिवसांनंतरही मलेशियन विमानाचा शोध नाही

माओवादी हिंसाचार : नेपाळमध्ये चौकशीसाठी स्वतंत्र न्यायालये

गेल्या दशकभरात नेपाळमध्ये माओवादी हिंसाचारात १६ हजार लोक मारले गेले आहेत.
या प्रकरणी मानवी हक्क उल्लंघनाबाबत वेगवेगळे आयोग स्थापन करण्याचे विधेयक आज नेपाली कॉंग्रेसने मंजूर केले.
विधेयकाचे नाव - द बिल ऑन ट्रथ अँड रिकन्सिलिएशन कमिशन अँड कमिशन ऑफ इन्क्वायरी ऑन डिस्क्रीपन्सीज
या विधेयकानुसार माओवादी हिंसाचारात झालेल्या मानवी हक्क उल्लंघनाचा तपास करण्यासाठी खास न्यायालये स्थापन केली जातील.

अर्थव्यवस्था

राजीव सुरी नोकियाच्या सीईओपदी विराजमान होणार

भारतीय वंशाचे आहेत राजीव सुरी.
नोकिया :– सध्या वाईट अवस्थेतून जात आहे. कारण- samsung कंपनीने android ही operating system बाजारात आणल्याने नोकियाचे ग्राहक कित्येक पटींनी samsung कडे वळले.
आता नोकियाने तिची मोबाईलची बाजारपेठ Microsoft या कंपनीस विकली आहे.
Microsoft चे अध्यक्ष – सत्या नाडेला (भारतीय वंशाचे)
CEO- chief executive officer (मुख्य कार्यकारी अधिकारी)
नोकियाचे मोबाईलच्या बाजारपेठेत स्थान काय?
नोकिया आणि मायक्रोसॉफ्ट यांच्यात झालेल्या व्यवहाराची किंमत आहे सुमारे – $४०० कोटी
आणि मोबाईलची जागतिक बाजारपेठ आहे $३००० कोटींची

तोटय़ातील भागीदारीतून जपानच्या ‘डोकोमो’चा काढता पाय

भारतातील टाटा टेलिसर्वीसेस आणि जपानच्या डोकोमो यांच्यात २००९ साली करार झाला होता.
‘टाटा डोकोमो’ या नावाने कंपनीने अनेक नवनवीन product बाजाराला दिले – त्यांपैकीच एक म्हणजे ‘प्रती सेकंद कॉल दर’
मात्र गेल्या काही वर्षात दूरसंचार क्षेत्राला आलेली मरगळ आणि २G स्पेक्ट्रम घोटाळा यांमुळे कंपनीला नवीन सेवांचा (उदा. ३G) विस्तार करता आला नाही आणि म्हाणावा तेवढा नफाही प्राप्त झाला नाही.
याच कारणाने कंपनीने आज हे पाऊल उचलले.
सध्या टाटा डोकोमो ७ व्या क्रमांकावर आहे.

पुस्तक

‘दि अनटोल्ड स्टोरी’ - तमल बंधोपाध्याय

पुस्तकाचा विषय – सहारा ग्रुपचे प्रमुख सुब्रतो रॉय यांनी आपले साम्राज्य उभारण्यासाठी जे अनेक मार्ग वापरले (नियमबाह्य आणि गुन्हेगारी स्वरूपाचे सुद्धा?) त्याबाबत विस्तृत विवेचन.
लेखकाविषयी – तमल हे अर्थविषयक बातम्यांचे पत्रकार आहेत. ‘मिन्ट’ या दैनिकाचे उपव्यवस्थापकीय संपादक म्हणून ते सध्या काम पाहत आहेत.
सध्या चर्चेत येण्याचे कारण – हे पुस्तक आपल्याविषयी अपप्रचार करत आहे अशी याचिका सहारा प्रमुख सुब्रतो रॉय यांनी न्यायालयात दाखल केली होती. मात्र नंतर ती मागे घेतली. परिणाम – पुस्तकास प्रसिद्धी मिळाली. (आणि आपल्यासारख्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्यांना लक्षात ठेवण्यासाठी अजून एक बाब! :-):-))
तमल यांची यापूर्वीची पुस्तके :-
‘अ बँक फॉर दि बक’ – HDFC समूहावर आधारित हे पुस्तक होते.

राज्य

राघोबादादांच्या वाडय़ाचा जीर्णोद्धार

मराठेशाहीचा झेंडा अटकेपार फडकवणारे श्रीमंत रघुनाथराव तथा राघोबादादा पेशव्यांच्या कोपरगाव येथील ऐतिहासिक वाडय़ाच्या जीर्णोद्धारास पुरातत्त्व विभागाने पुन्हा सुरुवात केली आहे. आता त्यासाठी सुमारे १ कोटी २५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असली तरी ती अपुरीच आहे.

तमाशासम्राट बाळू उर्फ अंकुश खाडे यांचे निधन (८३)

काळू-बाळू नावाने तमाशात धमाल उडवून देणाऱ्या आणि तमाशाला महत्व प्राप्त करून देणाऱ्या जोडीतील बाळू (अंकुश खाडे) याचे आजारपणात निधन झाले.
३ वर्षांपूर्वीच काळू (लहू खाडे) यांचे निधन झाले होते.
गाजलेली वगनाट्य :- सत्त्वशील राजा हरिश्चंद्र, मित्रप्रेम, प्रेमाची फाशी, रक्तात न्हाली अब्रू, जिवंत हाडाचा सतान, भिल्लांची टोळी, रक्तात रंगली दिवाळी, इश्क पाखरू
पुरस्कार :- कलागौरव प्रतिष्ठान, विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार. दिल्ली येथील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये वगनाटय़ सादर करण्याची संधी देण्यात आली होती.
दुखःद अखेर :- शासनाने या कलावंतांना अखेरपर्यंत फक्त मदतीची खोटी आश्वासनेच दिली. जीवनाच्या शेवटी हे कलावंत हाल – अपेष्टा सहन करतच जगाचा निरोप घेते बनले.

शिक्षण मंडळातील खरेदी प्रकरण; सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस अडचणीत

आरोप यांच्यावर - शिक्षणप्रमुख तुकाराम सुपे आणि मंडळाचे अध्यक्ष, राष्ट्रवादीचे रवि चौधरी
आरोप काय? – यांनी १०० रुपये किंमतीची कुंडी १००० रुपयांना शिक्षण मंडळासाठी खरेदी केली.
(कुंडी घोटाळा!!!)

‘सारस’च्या संवर्धनासाठी तज्ज्ञांची समिती

महाराष्ट्रात केवळ गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा याठिकाणी सारसाची नोंद आहे.
bad news - त्यापैकी गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात सारस पक्षी शिकार आणि छायाचित्रणाचे बळी ठरले.
good news- मात्र गोंदिया व भंडारा जिल्ह्यांत तेथील सारसप्रेमींनी लोकसहभागातून हाती घेतलेल्या प्रकल्पामुळे सारसाची संख्या वाढली.
महाराष्ट्राबरोबरच मध्यप्रदेशातही सारसांची संख्या चांगली आहे. मात्र ती घटण्याचा धोका आहे.
त्यासाठीच ही समिती बनवण्यात आली आहे.
कृतीकार्यक्रम :-
या दोन्ही जिल्ह्यांमध्ये (गोंदिया व भंडारा) प्रत्येकी दोन तलाव सारसाच्या संवर्धन आणि जैवविविधतेसाठी निवडण्यात आले आहेत. त्याचवेळी सारसांचे वास्तव्य असणाऱ्या १२ स्थळांची निवड करण्यात आली असून, जनजागृती कार्यक्रमाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. शेतातील सारसाच्या घरटय़ांमुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागते, त्यामुळे शेतकरी सारसाची घरटी उद्ध्वस्त करतात. या समितीला मिळालेल्या तीन लाख रुपयांच्या निधीतून ज्या शेतकऱ्यांच्या शेतात सारसाची घरटी आहेत, त्यांना नुकसान भरपाई देण्यात येईल. तसेच ज्या गावाजवळ सारस दिसतात, त्या ठिकाणी सारसप्रेमींचा ओघ असतो. त्याला आता पर्यटनाचे रूप देण्यात येणार असून, सारस बघायला येणाऱ्या पर्यटकांकडून ५० रुपये आकारण्यात येईल. त्यामुळे सारसाच्या संवर्धनासाठी निधीही उपलब्ध होईल आणि गावकरीसुद्धा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सारस संवर्धनासाठी तयार होतील.

विदर्भ राज्य आंदोलन समिती १ मे रोजी ‘काळादिवस’ पाळणार

विदर्भवासियांचे म्हणणे काय? – आम्हाला जाणून बुजून विविध लाभांपासून वंचित ठेवले गेले. आमचा विकास होण्यासाठी वेगळे विदर्भ राज्य व्हायला हवे. विकासाचा अनुशेष शासनाने कधी भरून काढला नाही आणि भविष्यातही अस काही होण्याची सुतराम शक्यता नाही.
‘१ मे’च का? – याच दिवशी अखंड महाराष्ट्राची निर्मिती झाली होती. विदर्भाला योग्य स्थान देऊ असे आश्वासन देत विदर्भाला महाराष्ट्रात सामावून घेतले तो हा दिवस!

क्रीडा

आशियाई अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धा - सिंधू, ज्वाला-अश्विनीला कांस्यपदक

ठिकाण – दक्षिण कोरिया (उत्तर कोरियात कधीही कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धा होत नाहीत. कारण- हुकुमशाही)
एकेरी – PV सिंधू
दुहेरी – ज्वाला गुत्ता आणि अश्विनी पोनप्पा

आशियाई बुद्धिबळ स्पर्धा :– अधिबनला रौप्यपदक + जागतिक स्पर्धेचे तिकीट

भारताचा ग्रँडमास्टर बी. अधिबनने आशियाई बुद्धिबळ स्पर्धेत रौप्यपदक मिळवत पुढील वर्षी बाकु (अझरबैजान) येथे होणाऱ्या जागतिक चषक स्पर्धेतील प्रवेश निश्चित केला.
एस. पी. सेतुरामन व परिमार्जन नेगी या भारतीय खेळाडूंना अनुक्रमे नववे व दहावे स्थान मिळाले.
ईशा करवडेला आठवे स्थान व तानिया सचदेवला दहावे स्थान मिळाले.

इंडियन सुपर लीगचा (ISL) जोरदार गाजावाजा

IPL च्या धर्तीवर फुटबॉल मध्ये ISL ची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
कारण- बॉलीवूड अभिनेते, क्रिकेटपटू आणि व्यावसायिकांनी फुटबॉलच्या मैदानात उडी घेतल्यामुळे आता भारतीय फुटबॉलला ‘चार चाँद’ लागणार आहेत.
यापूर्वी आय-लीग नावाने अशीच स्पर्धा भरवण्याचा प्रयत्न असफल झाला होता.

BCCI तर्फे आर. अश्विनची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस

यापूर्वी - बीसीसीआयने २०१२-१३ वर्षांसाठी अश्विनला पॉली उम्रीगर पुरस्काराने गौरवले होते.

विशेष लेख वाचण्यासाठी खालील लिंक वर click करा किंवा या पानावरील 'विशेष लेख' या लिंकवर click करा.

  • 'डेंग्यूविरोधात तू आणि मी' - राष्ट्रीय अभियानास सुरुवात ..........-by BK Core Group New...
  • CPSE-ETF च्या स्थापनेची तयारी पूर्ण ..........-by BK Core Group New...

  • प्रिय मित्रहो, आपणास काही शंका किंवा प्रश्न असतील तर आम्हांस जरूर कळवा. आपल्या चांगल्या आणि वाईट सर्व प्रकारच्या सूचना नेहमीच स्वागतार्ह आहेत. इ-मेल : bhushan@anushri.org
    किंवा SMS करा या नंबरवर 7588068356 (फक्त SMS )    कृपया CONTACT US या सदरात जाऊन स्वतःचे REGISTRATION (नोंदणी) करा. मासिक केवळ नोंदणी केलेल्या सदस्यांनाच मोफत मिळेल.