दैनिक बातम्या व विश्लेषण दिनांक २७/०२/२०१४

राष्ट्रीय दैनिक बातम्या व विश्लेषण

1) INS सिंधुरक्षक अपघातप्रकरणी नौदलप्रमुख डी.के.जोशी यांचा राजीनामा

- अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारत त्यांनी राजीनामा दिला, व तो संरक्षण मंत्रालयाकडून स्वीकारण्यात आला . - यापूर्वीही स्वातंत्र्यदिनाच्या पूर्व संध्येला INS सिंधुरक्षक या पाणबुडीला अपघात झालेला होता.
- INS सिंधुरत्न हि रशियन बनावटीची “किलो” वर्गातील पाणबुडी होती.
- 2013 च्या डिसेंबर महिन्यात INS सिंधुरत्न ची दुरुस्ती आणि डागडुजी पूर्ण झाली व तिच्या कार्यक्षमतेच्या दोन चाचण्या पूर्ण झाल्या .
- सध्या तिच्या सागरी चाचण्या सुरु होत्या ते पाहण्यासाठी सुमारे वीस निरीक्षकाचे एक गट या पाणबुडीवर कार्यरत होता.

 

 

2) आरोग्याच्या तक्रारीमुळे दहशतवादी भूल्लरवर सध्या कार्यवाही नाही.

- भूल्लरच्या आरोग्याचा अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आला, कारण स.न्यायालयाने त्याच्या न्यायात होणाऱ्या विलंबामुळे त्याच्या मानसिक स्थितीवर परिणाम होतो या कारणामुळे १ फेब्रुवारी रोजी त्याच्या फाशीच्या शिक्षेवर स्थगिती आणली होती.

 

 

3) कंदहार विमान अपहरण प्रकरण : दोन आरोपींची सुटका होणार

- पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाने हत्येच्या कटाचा आरोप सिद्ध होऊ न शकल्याने दोघांना ( युसूफ नेपाळी व दलीप कुमार ) या दोघांना मुक्त केले.
- आर्म्स कायद्यांतर्गत मिळणारी तीन वर्षाची शिक्षा त्यांनी आधीच भोगली असल्याने त्यांची सुटका करण्यात येणार आहे.

 

 

4) सुब्रोतो रॅाय यांच्या अटकेचे आदेश

- सुब्रोतो रॅाय यांनी लोकांनी गुंतवलेले २० हजार कोटी थकवल्याच्या कारणामुळे त्याला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते.
- पण रॅाय हे सतत न्यायालयात गैर हजर राहत होते, शेवटी न्यायालयाने त्याच्यावर अजामीनपात्र वारंट लागू केले.
- सहारा समूहातील “सहारा इंडिया रिअल इस्टेट कार्पोरेशन लि. “ व “सहारा हौसिंग इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लि.”या दोन कंपन्यांनी सुमारे तीन हजार गुंतवणूकदारांचे २० हजार कोटी रुपये थकवले आहेत.
- हि रक्कम गुंतवणूकदारांना परत करण्यासाठी सुब्रोतो रॅाय यांना न्यायालयाने वारंवार बजावले होते, प्रत्येक वेळी रॉय यांनी दुर्लक्ष केले होते. त्यामुळेच न्यायालयाने हे पाऊल उचलले.

 

आंतररराष्ट्रीय दैनिक बातम्या व विश्लेषण

 

अफगानिस्तानातून सैन्य माघारी घेण्याचा अमेरिकेचा इशारा

- द्विपक्षीय सुरक्षा करारावर स्वाक्षरी करण्याच्या मुद्द्यावरून अमेरिका व अफगाणिस्तान यांच्यामध्ये तिढा वाढला होता.
- अफगाणिस्तानने जर सुरक्षा करारावर स्वाक्षरी केली नाही तर अमेरिका अफगाणिस्तानातील सैन्य माघारी घेईल असा इशारा अमेरीकेने दिला आहे.

 

राज्य दैनिक बातम्या व विश्लेषण

 

1) रक्तदानात महाराष्ट्र प्रथम

- ऐच्छिक रक्तदानामध्ये महाराष्ट्राने अव्वल कामगिरी केली असून २०१३ मध्ये १४.७६ लाख रक्ताच्या पिशव्या जमा करण्यात आले आहेत, त्यामुळे देशातील इतर राज्याच्या बाबतीत महाराष्ट्र हा प्रथम क्रमांकावर आहे.
- महाराष्ट्राने गरजू रुग्णांना हवे तेथे रक्त उपलब्ध व्हावे यासाठी “ ब्लड ऑन कॉल” हि नवीन योजना सुरु केली असून, त्यासाठी ‘१०४’ या टोल फ्री क्रमांकावर फोन केल्यास हवे त्या ठिकाणी रक्त एका तासभरात मिळू शकते.

 

 

2) २००० सालापर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण

- मुंबईसह राज्यातील २००० सालापर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण देण्याचे राज्यातील सरकारने स्पष्ट केले.
- पण या निर्णयाची अंमलबजावणी सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीशिवाय अंमलात येणे अशक्य आहे . त्यामुळे या ठिकाणी स. न्यायालयाचा निर्णय महत्वाचा आहे.

 

 

3) राज्य शासनाचे ‘श्री. पु. भागवत उत्कृष्ट प्रकाशक आणि विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर

- श्री. पु. भागवत उत्कृष्ट प्रकाशक हा पुरस्कार राजहंस प्रकाशन यांना देण्यात आला.
- तर विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार वसंत आबाजी डहाके यांना जाहीर करण्यात आला.
- श्री. पु. भागवत पुरस्काराचे स्वरूप – ३ लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र
- विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप – ५ लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र
- जागतिक मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमात अजित पवार आणि मराठी भाषा विभागाचे राज्यमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरित होणार आहे.

 

अर्थविषयक दैनिक बातम्या व विश्लेषण

 

1) मलेशियाच्या पेट्रोनास LNG प्रकल्पात इंडियन ऑईलची हिस्सेदारी

इंडियन ऑईल कार्पोरेशनने मलेशियन सरकारच्या पेट्रोनास या कंपनीच्या ब्रिटीश कोलम्बियामधील शेल गॅस व द्रवरूप नैसर्गिक वायू उत्खनन प्रकल्पातील १०% ची भागीदार मिळवली आहे.

 

 

2) “कोल इंडिया” वरील दंडाला स्थगिती

- नियमबाह्य व्यापार प्रथांचा अवलंब केल्याबद्दल सार्वजनिक क्षेत्रातील कोळसा कंपनी “कोल इंडिया लि.” ला भारतीय स्पर्धा आयोगाने (CCI) ने केलेल्या दंडाला स्पर्धा अपील लवादाने (कोंपॅट) बुधवारी स्थगिती दिली.