दैनिक बातम्या व विश्लेषण : दिनांक – २६ मार्च २०१४

राष्ट्रीय

१) Gas (नैसर्गिक वायू) दरवाढ करा पण निवडणूक झाल्यावर – निवडणूक आयोग

• पेट्रोलियम मंत्री वीरप्पा मोईली यांनी १ एप्रिल २०१४ पासून gas च्या किंमती दुप्पट करण्याचा निर्णय घेतला होता
• केंद्रीय कॅबिनेट मंत्रिमंडळानेसुद्धा याला मान्यता दिली होती.
• याचा प्रचंड फायदा केवळ रिलायंस कंपनीला होईल असा आरोप करत अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या भ्रष्टाचार विरोधी शाखेमार्फत मोईली आणि मुकेश अंबानी यांच्यावर FIR दाखल केले होते.
• आता निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू असल्याने ही दरवाढ आचारसंहिता संपल्यानंतर लागू करण्यास सांगितलीय.
• दुसरीकडे गुरुदास दासगुप्ता (भारतीय कम्युनिस्ट पक्ष) आणि एक NGO (Non-Govenrment Orgnisation) यांनी Gas दरवाढीविरोधात सर्वोच्च न्यायालयात (SC) जनहित याचिका दाखल केलीय.आंतरराष्ट्रीय

१) मलेशियन विमान गूढ : अखेर MH-३७० ला जलसमाधी मिळाल्याची मलेशियन सरकारची घोषणा

• ब्रिटीश कंपनी इमनर-sat च्या उपग्रहाने पुरवलेल्या माहितीवरून मलेशियाच्या अध्यक्षांनी (नजीब रझाक) ही घोषणा केली.
• मात्र चीनने हे मानण्यास नकार दिलाय.
• कारण १५३ चिनी नागरिक MH-३७० मध्ये होते.

@ दुसरीकडे अमेरिकीने त्यांचे प्रयत्न सोडलेले नाहीत.
• ब्लुफिन-२१ हे स्वयंचलित मानवरहित यान (robotic underwater vehicle) अमरिकेने हिंदी महासागरात पाठवलेय.
• हे यान अमेरिकेच्या लष्कराने तयार केलेय.
• या यानाला दोन उपकरणे जोडलेली आहेत. १. black बॉक्स लोकेटर आणि २. पिंगर लोकेटर
• ही दोन्ही उपकरणे ब्लुफीन-२१ ला जिथे विमानाचे अवशेष आहेत (हिंदी महासागराच्या तळाशी) तिथे जाण्यास दिशा दाखवतील.
• black बॉक्स = विमानात एक काळा बॉक्स असतो. त्याला black बॉक्स म्हणतात. त्यात विमानाच्या कॉकपिट मध्ये जे काही संभाषण होते, ते रेकॉर्ड केले जाते. मात्र त्याची capacity शेवटचे २ तास रेकॉर्ड करायचीच असते.

२) G-८ बनले G-७ : रशियाला केले निलंबित

• रशियाने युक्रेनमधील क्रायमिया हा भाग लष्करी ताकद वापरून हस्तगत केल्याने हे घडले.
• रशियातील सोची येथे होणारी G-८ देशांची परिषद आता ब्रुसेल्स येथे G-७ च्या स्वरुपात होईल.

• रशिया १९९८ साली (१६ वर्षांपूर्वी) G-७ मध्ये सामील झाला होता. त्यावेळी G-८ हा गट बनला होता.
• G-८ = जगातील सर्वात श्रीमंत देशांचा समूह
• अमेरिका, इंग्लंड, फ्रांस, जर्मनी, इटली, जपान, कॅनडा.विज्ञान – तंत्रज्ञान – पर्यावरण

१) इंटरनेट अधिक सुरक्षित बनवण्यासाठी आईन्स्टाईनची ‘स्पुकी थिअरी’ कामी येऊ शकते

• आईनस्टाईनने १९३५ साली ‘स्पुकी थिअरी’ मांडली होती.
• स्पुकी थिअरी = विश्वातील कोणत्याही दोन वस्तू या गूढ शक्तीने एकमेकींशी बांधलेल्या असतात.
• ही थिअरी वापरून आपण ‘क्वांटम इंटरनेट’ (पुंज इंटरनेट) निर्माण करू शकतो.
• क्वांटम इंटरनेटद्वारे एकमेकांना सुरक्षित मेसेज (इ-मेल) पाठवता येतील. त्यांची इतरांना चोरी करता येणार नाही. = इंटरनेट अधिक सुरक्षित

२) जगात २०१२ मध्ये हवा प्रदुषणाचे ७० लाख बळी – WHO अहवाल

• प्रत्येक ८ मृत्यूंपैकी १ हवेच्या प्रदूषणामुळे
• सर्वात जास्त फटका आशियातील देशांना = भारत, इंडोनेशिया, फिलिपिन्स, चीन, जपान, दक्षिण कोरिया
• जगात मृत्यू- ७० लाख & वरील देशांत- ५९ लाख

@ घरातील प्रदूषण X बाहेरील प्रदूषण
• घरातील प्रदुषणामुळे सर्वात जास्त मूत्यू झालेत. (चूल, लाकडे, कोळसा, शेणाच्या गौऱ्या इ)
• घराबाहेरील प्रदूषण (कोळसा व डीझेल इंजिन)पुस्तक

१) शिवरायांवर एक अनोखा चित्ररूप ग्रंथ

• या ग्रंथाचे प्रकाशन ब्रिटनच्या संसदेत १ मे रोजी केले जाईल.
• यातील सर्व १०० चित्रे ब्रिजेश मोगरे (वनवासी चित्रकार, पालघर) यांनी काढली आहेत.चर्चित व्यक्ती

१) बेबी नंदा (निधन – ७५)

• बालपणापासून चित्रपटात काम केलेली गुणी अभिनेत्री.
• पहिला चित्रपट- मंदिर (१९४८, बालकलाकार)
• पहिला गाजलेला चित्रपट – तुफान और दिया (१९५६)
• शेवटचा चित्रपट – प्रेमरोग (१९८३)

• family = वडील - मास्टर विनायक (कर्नाटकी विनायक, दिग्दर्शक)
• मावसकाका – V. शांताराम (निर्माते, दिग्दर्शक)

• बेबी नंदा यांनी ५० हिंदी चित्रपटात तर काही मराठी चित्रपटांतसुद्धा काम केले होते.
विशेष लेख वाचण्यासाठी खालील लिंक वर click करा किंवा या पानावरील 'विशेष लेख' या लिंकवर click करा.  • 'डेंग्यूविरोधात तू आणि मी' - राष्ट्रीय अभियानास सुरुवात ..........-by BK Core Group New...
  • CPSE-ETF च्या स्थापनेची तयारी पूर्ण ..........-by BK Core Group New...
  • प्रिय मित्रहो, आपणास काही शंका किंवा प्रश्न असतील तर आम्हांस जरूर कळवा. आपल्या चांगल्या आणि वाईट सर्व प्रकारच्या सूचना नेहमीच स्वागतार्ह आहेत. इ-मेल : bhushan@anushri.org
    किंवा SMS करा या नंबरवर 9404640322 (फक्त SMS )    ...... आणि हो आपणास ही वेबसाईट कशी वाटतेय, कोणत्या बाबी अजून add कराव्या, कोणत्या गोष्टींमध्ये बदल करावासा वाटतोय या बद्दलची आपली मत जरूर कळवा.

    कृपया CONTACT US या सदरात जाऊन स्वतःचे REGISTRATION (नोंदणी) करा. मार्च महिन्याचे मासिक केवळ नोंदणी केलेल्या सदस्यांनाच मोफत मिळेल.