दैनिक बातम्या व विश्लेषण दिनांक २६/०२/२०१४

राष्ट्रीय दैनिक बातम्या व विश्लेषण

1) माहितीच्या आदिकाराबाबत जनजागृती i) चित्रपटगृह आणि आकाशवाणी यांच्या माध्यमातून माहितीविषयक कार्यक्रम सदर करून कायद्याबाबतची जनजागृती मोहीम सरकार हाती घेणार आहे. यासाठी १०५ आकाशवाणी केंद्राची निवड करण्यात आली आहे.
ii) सध्या शालेय शिक्षण, बीपीएल कार्ड, आणि पंचायातीबद्दल माहिती मिळवण्यासाठी माहितीच्या अधिकार कायद्याचा वापर करण्याबाबत आकाशवाणी वाहिन्या छोटे कार्यक्रम सादर करतात, असे कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने स्पष्ट केले.
iii) त्याचप्रमाणे माहितीचा अधिकार कायदा जनजागृती लघुपट सादर करण्याचा आदिकर ४९२ चित्रपटगृहाना देण्यात आले आहेत
iv) मध्य -प्रदेश, छत्तीसगड, राजस्तान, उत्तर-प्रदेश, बिहार अशा हिंदी भाषिक राज्यामध्ये ६२५ आसन क्षमता असलेल्या चित्रपटगृहात हे लघुपट दाखवले जाणार आहेत. हे लघुपट ६० सेकंद ते २ मिनिटापर्यंतच्या कालावधीचे आहेत.

 

2)जेष्ठ चित्रकार प्रोकाश करमाकर यांचे निधन

i)१९५६ मध्ये ज्यांनी रस्त्यावर चित्रप्रदर्शन भरवले व प्रसिद्धी मिळवली असे चित्रकार प्रोकाश करमाकर यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले
ii) त्यांच्या चीत्रशैलीवर पिकासो यांचा प्रभाव होता.
iii) १९६८ मध्ये त्यांना ललित कला अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला .
iv) त्यांच्या चित्रामध्ये आधुनिक भारतातील विस्कळीत होत चाललेले समाजजीवन व एक प्रकारची गोंधळाची स्थिती प्रतिबिंबित झालेली होती.
v) त्यांचे चित्र नॅशनल गॅलरी ऑफ मॅाडर्ण आर्ट, ललित कला अकादमी दिल्ली, अकॅडमी ऑफ फाईन आर्ट्स कोलकाता या संस्थामध्ये प्रसिद्ध झालेले आहेत.
vi)त्यंचे पार्थिव देह अकॅडमी ऑफ फाईन आर्ट्स कोलकाता येथे आणले जाणार आहे.

 

3) गोव्यात टॅक्सी चालकांचा संप

i) "ओला कॅब " या खाजगी कंपनीला टॅक्सी सेवा पुरवण्याचा परवाना दिल्याच्या विरोधात हा संप करण्यात आला.
ii) संपकरयाने पोर्विरीमजवळ राष्ट्रीय महामार्ग अडवल्यामुळे पोलिसांनी त्यांना मारहाण केली त्यामुळे संप वाढवण्यात आला.,/p>

4) विंडोज एक्स पी चे संकट

i) "विंडोज एक्स पी" ८ एप्रिल नंतर पुरवणारे सर्व तांत्रिक साहाय्य बंद करणार आहे. त्यामुळे भारतीय कंपन्यांना वर्षाला १९९० कोटी रुपयांचा भार सोसावा लागणार आहे. सध्या भारतात अनेक बॅंका, संस्था, कंपन्या हीच "एक्स पी" प्रणाली वापरतात.
ii)"आय डी सी " या संशोधन संस्थेच्या अहवालानुसार एक्स पी वर संगणक कार्यरत ठेवण्याचा खर्च ७५ ते १०० डॉलर तो यानंतर ३०० डॉलर पर्यंत जाईल.
iii) मायक्रोसॅाफ्टच्या अहवालानुसार एक्स पी वर कार्यरत असलेल्या १६% संगणकापैकी ३५% संगणक सरकारी कंपन्याचे आहेत.

 

5) आता "नमोचा फिश"

चेन्नईतील भाजप नेत्यांनी फिश दुकान उभारले आहेत. चेन्नईतील मरीना समुद्रकिनाऱ्यावर या दुकानाचे उद्घाटन करण्यात आले आहे.
गलोगल्ली मासे विकून भाजपचा प्रचार करण्याचा मानस आहे.

 

6) इच्छामरणाचा प्रश्न घटनापीठाकडे

i) देशात इच्छामरणाला कायदेशीर मान्यता देण्याबाबतचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने पाच न्यायाधीशाच्या घटनापीठाकडे दिला.कारण यापूर्वी दिलेल्या निकालामध्ये वेगवेगळे मत मांडण्यात आले होते.
ii)"कॅामन कॅाज या स्वयंसेवी संस्थेने यासंदर्भात याचिका दाखल केली होती.
iii) व्यक्ती नैसर्गिकरित्या शेवटच्या टप्प्यावर असताना क्रूर वैद्यकीय उपचारापासून दूर राहण्याचा त्यांच्या अधिकारापासून त्यांना दूर ठेवता येणार नाही, असा युक्तिवाद करण्यात आला आहे.

 

7) राजद मधील फुटीरता असफल

i) राजद मधील १३ आमदार फुटून नितीशकुमार यांच्या सरकारला पाठींबा देण्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यतील ९ आमदारांनी स्वगृही परतण्याचे घुमजाव केले.
ii) या ९ आमदारांनी विधिमंडळाच्या प्रांगणात ' परेड' केली व आपला पक्ष फुटला नसल्याचे पत्र विधिमंडळ सचिवांना दिले.
iii) भाजपने काढून घेतलेला पाठींबा यामुळे नितीशकुमार यांचे सरकार अल्पमतात गेले होते.

 

8) IIT दिल्ली सर्वोत्तम

i) विविध विषयानुसार तयार केलेल्या "QS" या जागतिक विद्यापिठासाठीच्या पहिल्या ५० संस्थांच्या क्रमवारीत दिल्ली, मुंबई, मद्रास, या तीन IIT नी स्थान पटकावले
ii) हावर्डने ३० पैकी ११ विषयांमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करत प्रथम स्थान मिळवले. द्वितीय क्रमांक नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर याला मिळाला.

 

8) रुईया महाविद्यालय ठरले देशातील सर्वोत्तम महाविद्यालय

माटुंगा येथील रुईया महाविद्यालयाला विध्यापीठ अनुदान आयोगातर्फे " कॉलेज ऑफ एक्सलंस " हा बहुमान देण्यात आला.

आंतररराष्ट्रीय दैनिक बातम्या व विश्लेषण

1) चीनची सदोष खेळणी बाजारातून माघारी

i) नऊ देशातील चीनी खेळणी सुरक्षा कारणास्तव बाजारपेठेतून काढून घेतली. त्यात स्ट्रोलर्स, मुलांची ट्राय सायकल, बिल्डिंग ब्लॉक यांचा समावेश यामध्ये आहे.
ii) निरीक्षण प्रतिबंधक विभागाने हि बंदी लादली व खरेदीदारांना जर काही खेळण्यामध्ये दोष आढळून आल्यास स्थानिक दर्जा निरीक्षण संस्थेकडे तक्रार करावी असे सांगितले आहे.
iii) त्याचबरोबर चीनमधील टेंगझाहयू लेनबाव स्ट्रोलर कं. ली., शान्गडोंग क्विऊ चिल्ड्रेन ट्राय सायकल कंपनी ली., शांघाय अस्तिया इंडस्ट्रीज कं. ली. या उत्पादकांना आपली उत्पादने माघारी घेण्यास सांगण्यास आले आहे.
iv) चीनमधील बाहुल्यामध्ये शिसे या धातूचे प्रमाण प्रमाणापेक्षा जास्त असल्यामुळे मुलांना उलट्या, डोकेदुखी, डायरिया यासांरखी आजाराची लक्षणे जडली होती. त्यामुळे ती माघारी घ्यावी असे सांगण्यात आले. यापूर्वीही अशी नामुष्की चीनवर आली होती.

 

2) व्हिएतनाम अणुकराराला ओबामाचा होकार

i) या अणुकरारामुळे व्हिएतनाममध्ये असणाऱ्या वीजटंचाईचे संकट दूर होणार आहे व हा देश अनुभाटयाची खरेदी करू शकणार आहे.
ii) या करारानुसार व्हिएतनाम आण्विक शस्त्रस्त्रासाठी किरणोत्सर्गी घटकांचे उत्पादन करणार नाही, व अमेरिकेच्या अणुकराराचे पालन करेल.
iii) व्हियएतनाम या देशाने युरेनिमचा वापर न करण्याचे मान्य केले असून, ब्रुनेईत होणाऱ्या पूर्व आशिया शिखर परिषदेत स्वाक्षऱ्या करणार आहे.
iv) अनुभाटयासाठी लागणारे इंधानाबाबतचे घटक खुल्या आंतररराष्ट्रीय बाजारातून उपलब्ध करून घेण्याचेही मान्य केले आहे
v) या देशामध्ये विजेची मोठी टंचाई असून पहिला अणुउर्जा प्रकल्प २०२० मध्ये पूर्ण होणार असून त्या देशाचे वीज संकट दूर होणार आहे

 

3) आंतराळातून अवघ्या जगाला वाय-फाय

i) अंतराळातून उपग्रहाच्या माध्यमातून जगाला मोफत वायफाय देण्याचा प्रयत्न अमेरीका करणार आहे.
ii) न्यूयार्कमधील "मिडिया डेव्हलपमेंट इन्व्हेस्टमेंट फंड" (MDIF) या संस्थेने माहिती दिली. शेकडो क्यूब सॅटेलाईट (उपग्रह) तयार करण्यात येत असून त्याचे लवकरच प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

 

राज्य दैनिक बातम्या व विश्लेषण

1) जादूटोणा विरोधी कायदा - महिलांना वरदान

हा कायदा लागू झाल्यापासून तक्रारीचे अर्धशतक पूर्ण झाले. या जादुटोण्याच्या गुन्ह्यामध्ये महिला कचाट्यात सापडल्याचे मोठ्या प्रमाणावर दिसून येते . त्यामुळे हा कायदा महिलांना वरदान ठरण्याची शक्यता आहे .

 

अर्थविषयक दैनिक बातम्या व विश्लेषण

1) बिमल जालान समितीचा अहवाल सादर

i) नवीन खाजगी बँकांना परवाना देण्यासाठी हि समिती स्थापन करण्यात आली होती. समितीने आपला अहवाल रिझर्व बँक ऑफ इंडियाला सादर केला
ii) हि चार सद्स्याची समिती होती. या समितीकडे खाजगी बँका स्थापण्यासाठी २५ अर्ज आले होते.
iii) आर बी आय ने फेब्रुवारी २०१३ मध्ये नवीन बँका परवाने वितरीत करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे तयार केली होती.

 

2) आरोग्यविषयक प्रदर्शन

i) आरोग्य क्षेत्रातील सर्वात जुने व मोठे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन " मेडिकल फेअर इंडिया २०१४ " येत्या १४ मार्च ते १६ मार्च दरम्यान मुंबईत होणार आहे .
ii) हे प्रदर्शन जर्मनीतील " मेडीका" च्या धर्तीवर प्रदर्शित होत असते. हे २०वे प्रदर्शन आहे.

 

3) लोहारा जंगलातील कोळसा खाण रद्द

i) ताडोबा व्याघ्र प्रकल्पाजवळील लोहारा जंगलातील दोन खाणी केंद्र सरकारने रद्द करण्याचा निर्णय घेतला
ii) ताडोबाला लागून कोळसा खाणी नको अशी देशभरातील पर्यावरणवाद्यांनी भूमिका घेतली होती. व विदर्भातील लोकांनी मोठे आंदोलन केले होते,
iii) आदाणी समूहाला दिलेल्या खाणीविषयक फेरआढावा घेण्यासाठी मंत्रिगटाची स्थापना करण्यात आली होती. त्यांनी या खाणी रद्द करण्याचे ठरवले.

 

4) डाळीच्या दरडोई वापरामध्ये घट

i) भारतात दरडोई डाळींचा वापर सहा किलोने घटल्यामुळे कुपोषणाचे प्रमाण वाढले आहे.
ii) शासनाने हे कुपोषणाचे प्रमाण प्रमाण कमी करण्यासाठी डाळीचे प्रमाण वाढवणे आवश्यक आहे. यासाठी शासनाने प्रयत्न करावेत असे इंडियन पल्सेस अन्ड ग्रेन असोसियेशन गोवा येथे झालेल्या परिषदेत मंजूर करण्यात आला.
iii) कॅनडाचे कृषिमंत्री लाईल स्तिवर्ड यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन करण्यात आले.
iv) अन्न सुरक्षामध्ये डाळीचाही समावेश करावा अशी मागणी असोशिएशन करणार आहे.
v) असोशिएशन मते शासनाने दिलेल्या हमिभावानेच डाळीची खरेदी करणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना विश्वास वाटून ते डाळीचे उत्पन्न घेतील.

 

क्रीडा दैनिक बातम्या व विश्लेषण

1) क्रीडा क्षेत्राला उद्योग क्षेत्राचा दर्जा द्यावा

i) क्रीडा विकासाला गती देण्यासाठी त्याला उद्योग क्षेत्राचा दर्जा द्यावा अशी मागणी भारतीय उद्योग महासंघाने केली आहे.
ii) देशात क्रीडा क्षेत्रासाठी अनुकूल वातावरण तयार होण्यासाठी व ओलंम्पिक विजेते खेळाडू घडवण्यासाठी असा दर्जा देण्याची आवशकता आहे असे या अहवालात स्पष्ट करण्यात आले.आहे.