राष्ट्रीय

१) केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाची मोहीम

• शिल्लक राहिलेल्या ५० हजार कोटीचा कर गोळा करण्यासाठी हि मोहीम राबवण्यात येत आहे.
• मोहिमेचा एक भाग म्हणून बोर्डाने सर्व कर्मचाऱ्यांना रजा न देण्याचा निर्णय घेतला आहे.
• करवसुलीसाठी सर्व प्राप्तीकर कार्यालये २९, ३० व ३१ तारखेला रात्रंदिवस सुरु ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
• देशभरातील प्राप्तीकर विभागाचे अधिकारी कर चुकवणाऱ्यांचा शोध घेऊन त्याविरोधात कडक पावले उचलली आहेत.

२) देशात केवळ २% च स्वयंसेवी संस्था नोंदणीकृत

• देशात असणाऱ्या एकूण स्वयंसेवी संस्थांपैकी केवळ २% संस्थानी सरकारकडे नोंदणी केली आहे.
• या स्वयंसेवी संस्थांना परदेशातून मोठ्या प्रमाणावर निधी प्राप्त होत असतो.
• मात्र या संस्था शासकीय नियम पाळत नाहीत, त्याचप्रमाणे संस्थेचा आर्थिक हिशेब सरकारला दाखवत नाहीत.
• या स्वयंसेवी संस्थांना अमेरिका, इंग्लंड, नेदरलंड, इटली, जर्मनी या देशातून निधी मिळत असतो.

आंतरराष्ट्रीय

१) चीनमधील संकेतस्थळात लक्षणीय वाढ

• चीनमधील संकेतस्थळात लक्षणीयरित्या वाढ झाली असून गेल्या वर्षी चीनमध्ये ३५ लाख संकेतस्थळे होती.
• यातील ७०% संकेतस्थळे संस्थांच्या मालकीची आहेत तर ३०% खाजगी मालकीची आहेत.
• हि माहिती ‘इंटरनेट सोसायटी ऑफ चायना’ या संस्थेने प्रसिध्द केली आहे.
• शिक्षण, वैद्यकीय क्षेत्र, बातम्या इ. विषयासंबंधी १६ हजार संकेतस्थळे माहिती पुरवत असतात.
• चीनचे पहिले संकेतस्थळ जागतिक जाळ्याशी १९९४ मध्ये जोडण्यात आले.

२) २००८ मधील भारतीय दूतावासावरील हल्ला ISI च्या संमतीनेच

• काबूलमधील भारतीय दूतावासावरील हल्ला पाकिस्तानी गुप्तचर संघटना आय.एस.आय. च्या संमतीने झाल्याचे कॅरोलोटा गॅाल यांच्या “द राँग एनिमी-अमेरिका इन अफगाणिस्तान २००१-२०१४” पुस्तकात स्पष्ट करण्यात आले.

3) इस्रायली दुतांचा संप

• इस्रालयच्या अर्थ विभागाने मंजूर केलेल्या नव्या नियमानुसार परराष्ट्र विभागातील कर्मचाऱ्यांचे पगार कमी करण्यात आले आहेत.
• हा कर्मचाऱ्यावर झालेला अन्याय आहे, असे म्हणत दूतावासातील कर्मचाऱ्याने संप केला आहे.
• इस्रायलची जगभरात १०३ उच्चायुक्तालये असून ती सर्व बंद ठेवण्यात आले आहेत.
• या संपामुळे इस्रायलची वाणिज्य विषयक, पासपोर्ट, व्हिसा यासंदर्भातील सर्व कामे रखडली आहेत.
• हा संप दिनांक २३/०३/२०१४ - रविवारी करण्यात आला, यावर तोडगा निघाला नाही तर हा संप सोमवारी पुढे सुरु ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे.

४) ब्रिटनच्या निवडणुकीत “ब्ल्यू स्टार मुद्दा”

• शीख महासंघाचे अध्यक्ष भाई अमरीक सिंग यांनी “भारतात झालेले ऑपरेशन ब्ल्यू स्टार” या मोहिमेत ब्रिटीशांचा सहभाग किती होता, यासाठी स्वतंत्र चौकशी आयोग स्थापन करावा अशी मागणी केली आहे.
• जर चौकशी आयोग नेमला नाही तर या निवडणुकीत शिखांची ब्रिटिशांना मते मिळणार नाहीत, अशी धमकी देण्यात आली आहे.
• २०११ च्या जनगणनेनुसार ब्रिटनमध्ये ४.३ शीख राहतात, आणि हा समुदाय राजकीयदृष्ट्या सक्रीय आहे. त्यामुळे हि मागणी मान्य केली जाणार आहे.

५) अनिवासी केरळी मतदारांसाठी दुबईहून विमान

• हि सेवा दुबईतील मुस्लीम कल्चरल सेंटरने सुरु केली आहे.
• जे दुबईत असणारे केरळी मतदार भारतात मतदानासाठी जाऊ इच्छितात त्यांच्यासाठी खास चार्टर्ड विमानाची सोय करण्यात आली आहे.

पर्यावरण विशेष

१) सागरी पाण्याची घनता व क्षारामध्ये वाढ झाल्याचा निष्कर्ष

• हवामान बदलामुळे सागरी प्रवाहात बदल झाले आहेत. त्यामुळे पृथ्वीच्या भवितव्यावर त्याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
• महासागरात जे खोल प्रवाह असतात ते उष्णता, कार्बन, ऑक्सिजन आणि पोषके वाहून नेण्याचे काम करत असतात.
• वातावरणामुळे हे वाहक पट्टे मंदावत असून, त्यामुळे भविष्यात पृथ्वीच्या वातावरणाला धोका निर्माण होऊ शकतो.
• समुद्रातील खोलवरच्या भागात वहन पट्ट्याची निर्मिती कमी प्रमाणात होत असून अंटार्टिकाजवळ त्याचा परिणाम जास्त प्रमाणावर दिसून येत आहे.
• अंटार्टिका किनाऱ्यापासून विषुववृत्ताकडे जाणारा २००० मीटर अंतरावरील थंड व खारट पाण्याचा प्रवाह अरुंद होत चालला आहे.
त्यामुळे या सागरी प्रवाहाने उष्णता व कार्बन-डाय-ऑक्साइड धरून ठेवले आहेत.
• त्याचा परिणाम पृथ्वीवरील हवामानावर होत असतो.
• पृथ्वीवरील हवामानाच्या दृष्टीने दक्षिण महासागर महत्वाचा आहे. कारण हा महासागर पृथ्वीवर निर्माण झालेली ४० ते ५०% उष्णता व ५०% कार्बन-डाय-ऑक्साईड शोषून घेत असतो.

तंत्रज्ञान

१) गुगलचे इमेल होणार सुरक्षित.

• गुगल हे जगातील सर्वात लोकप्रिय सर्च इंजिन आहे.
• गुगलचे इमेल अकाऊंट सुरक्षित नसल्याची लोकांची भावना निर्माण झाली होती.
• त्याला अनुसरून गुगलने इमेलला सुरक्षा कवच पुरवले आहे.
• यापुढे इमेलची माहिती युजर आणि इमेलच्या सर्व्हरलाच असणार आहे.

आरोग्य

१) क्षयरोगाची चाचणी आता माफक दरात

• क्षयरोगासंबंधी “लिक्विड कल्चर” हि चाचणी करण्यात येते. हि चाचणी जागतिक आरोग्य संघटनेला मान्य आहे.
• ती चाचणी माफक दरात करण्यासाठी देशातील ६० प्रयोगशाळा पुढे आलेल्या आहेत.
• इतर प्रयोगशाळांमध्ये हि चाचणी ११०० ते २००० रु.ना केली जाते. आता ती ९०० रु.मध्ये होणार आहे.
• लोक पैसा वाचवण्यासाठी आणि आजार लपवून ठेवण्यासाठी फॅमेली डॉक्टर कडून उपचार करून घेत असतात.
त्यामुळे “इनिशिएटीव फॉर प्रमोटिंग अफोर्डेबल, क्वालिटी टीबी टेस्ट” अंतर्गत खाजगी प्रयोगशाळांनी एकत्र येऊन आरोग्य
संघटनेला मान्य असलेली चाचणी माफक दरात करून देण्याचा निर्णय घेण्यात आला.
• क्षयरोगाबाबतीत खाजगी प्रयोगशाळांनी घेतलेल्या या निर्णयामुळे आणि आधीच चालू असलेली सरकारी प्रयत्न यामुळे क्षयारोगाला काही प्रमाणात आळा बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
विशेष लेख वाचण्यासाठी खालील लिंक वर click करा किंवा या पानावरील 'विशेष लेख' या लिंकवर click करा.  • भारतीय औषध क्षेत्राचा दर्जा ........-by sk Core Group New...
  • 'डेंग्यूविरोधात तू आणि मी' - राष्ट्रीय अभियानास सुरुवात ..........-by BK Core Group New...
  • CPSE-ETF च्या स्थापनेची तयारी पूर्ण ..........-by BK Core Group New...
  • प्रिय मित्रहो, आपणास काही शंका किंवा प्रश्न असतील तर आम्हांस जरूर कळवा. आपल्या चांगल्या आणि वाईट सर्व प्रकारच्या सूचना नेहमीच स्वागतार्ह आहेत. इ-मेल : shivraj@anushri.org किंवा SMS करा 9404703270    कृपया CONTACT US या सदरात जाऊन स्वतःचे REGISTRATION (नोंदणी) करा. मार्च महिन्याचे मासिक केवळ नोंदणी केलेल्या सदस्यांनाच मोफत मिळेल.