दैनिक बातम्या व विश्लेषण दिनांक २४/०२/२०१४

राष्ट्रीय दैनिक बातम्या व विश्लेषण

१) इटलीच्या त्या दोन नौसैनिकावर चाचेगीरीचे आरोप नाहीत : भारत सरकार : केरळच्या किनारपट्टीवर ठार मारण्याच्या आरोपाखाली अटक केलेले दोन इटलीचे नौसैनिक यांच्यावर चाचेगीरीचे आरोप ठेवण्यात आलेले नाहीत असे सर्वोच्च न्यायालयाला सांगण्यात आलेले आहे. व हे आरोप कायदे मंत्रालयाच्या मतानुसार घेण्यात आलेले आहेत. त्यामुळे या नौसैनिकांना फाशी देण्यात येणार नाही.
इटलीच्या म्हणण्यानुसार हि घटना आंतरराष्ट्रीय सागरी हद्दीत घडली असल्यामुळे भारतात हा खटला चालवता येणार नाही.

 

२) ओडीसाला विशेष दर्जा देण्यासाठी आंदोलन :

भुवनेश्वर येथे राजभवानाजवळ 'बिजू जनता दलाच्या' वतीने धरणे आंदोलन करण्यात आले आहे. रघुराम राजन समितीच्या अहवालानुसार ओडीसाला विशेष राज्याचा दर्जा देता येणार नाही.

 

३) महिला बँकेने न्यू इंडिया इन्स्यूरन्स सोबत तीन प्रकारचे विमा करार केले आहेत :

हा करार २१ फेब्रुवारी २०१४ रोजी करण्यात आला. हा करार करण्यामागे महिला खातेधारकांना सर्वसमावेशक आरोग्य विमा संरक्षण लाभावे हा उद्देश आहे.

 

या विम्यामध्ये १.बीएमबी : सखी २.बिएमबी : निर्भया अनि ३.बीएमबी : सुरक्षा हे तीन प्रकार आहेत.

 

विम्या विषयी :

१.बीएमबी : सखी

या विम्याचा उद्देश ज्या महिला ग्रामीण असंघटीत क्षेत्रात कार्य करतात त्यांच्यासाठी ५०००० रुपये पर्यंत आरोग्य विमा संरक्षण देणे.

2.बिएमबी : निर्भया

निर्भया हि योजना कामगार स्त्रियांसाठी आहे. या योजनेनुसार महिलांना ५ लाख पर्यंत विमा संरक्षण मिळेल.

३.बीएमबी : सुरक्षा

 

बीएमबी परिवार सुरक्षा योजनेचे प्रमुख लक्ष हे आहे कि, खातेधारक महिलेच्या परिवाराला विमा सुरक्षा मिळणे.

 

४) साठ वर्षात पाच पट मतदार वाढले :

पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांपासून ते आत्तापर्यंत पाचपट मतदार वाढल्याचे निवडणूक आयोगाने आकडेवारीनुसार स्पष्ट केले आहे.

 

५)जगातील सर्वात मोठे वाय-फाय पाटणा येथे : :

जवळपास २० किमी च्या परीसरामध्ये वाय-फाय मोफत वापरता येणार आहे. माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रात प्रगती करण्यासाठी बिहार सरकारने कंपन्यांना आमंत्रण दिले आहे.
"ई-बिहार " शिखर परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्री नितीशकुमार यांने केले .
जगातील सर्वात मोठा वाय-फाय विभाग चीन मध्ये होता. त्याचे क्षेत्र ३.५ किमी होते.

 

६) आम्ही कोणावरही युद्ध लादलेले नाही. : चीनची प्रतिक्रिया :

नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात अरुणाचल प्रदेशच्या संदर्भात बोलतांना चीनच्या विस्तारवादी मनोवृत्तीच्या मुद्द्यावर टीका केली. याला प्रत्त्युतर देतांना चीनने असे म्हटले कि, आजपर्यंत भूभाग बळकावण्यासाठी आम्ही कोणावरही युद्ध लादलेले नाही . त्यामुळेच आजपर्यंत चीनच्या शेजारील राष्ट्रामध्ये आणीबाणी लागू केली नाही.

 

राज्य दैनिक बातम्या व विश्लेषण

१) महाराष्ट्रच अग्रेसर : राज्यापालाचे मत : अधिवेशनाच्या अभिभाषणामध्ये राज्यापालाने राज्य सरकारचे कौतुक केले.
राज्यपालाच्या मते : देशातील थेट परकीय गुंतवणूकीच्या प्रस्तावामध्ये महाराष्ट्राचा वाटा हा १८% असून, ते इतर राज्याच्या तुलनेत सर्वात जास्त आहे. राज्यामध्ये हवामानावर आधारित पिक योजना हि इतर पिके व फळे पिकांनाही लागू आहे.त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्य गृहनिर्माण नियामक प्राधिकरण स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे.

२) पी. बी. पाटील यांचे निधन :

नवेगाव आंदोलकाचे प्रवर्तक, विद्यार्थी दशेपासून ज्यांचा सेवादालामध्ये समावेश होता असे नेते पी. बी. पाटील यांचे निधन २३ फेब्रुवारी २०१४ रोजी झाले.
विनोबा भावे व महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील ग्रामस्वराज्याची कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी नवेगाव चळवळ सुरु केली.

रविंद्रनाथ टागोर यांच्या शान्तिनिकेनतांच्या धर्तीवर १९५८ मध्ये त्यांनी "नवभारत शिक्षण मंडळाची " स्थापना सांगली या जिल्ह्यात केली.

अर्थविषयक दैनिक बातम्या व विश्लेषण

१) रिलायन्स बरोबरचा करार रद्द करणे अशक्य : विरप्पा मोईली मोईली यांनी पंतप्रधान यांना पत्र लिहून १ एप्रिल पासून नैसर्गिक वायूच्या किमती वाढीच्या टप्प्यासंदर्भात स्पष्टीकरण केले.
त्याचबरोबर कृष्णा- गोदावरी खोऱ्यामध्ये कराराप्रमाणे वायू चे उत्पन्न होत नसले तरी हा करार रद्द करता येणार नाही असे स्पष्ट केले. कारण अपेक्षित उत्पन्नाचे प्रमाण न गाठल्याचा मुद्दा लवादाकडे प्रलंबित आहे.

दैनिक बातम्या व विश्लेषण