Click To Download Magazine[April 2014] मासिक Download करण्यासाठी क्लिक करा

दैनिक बातम्या व विश्लेषण : दिनांक – २४ एप्रिल २०१४

राष्ट्रीय

दिल्लीतील जामा मशिदीत गोळीबार का केला?

गोळीबार करणारा यासीन भटकळ म्हणतो – “या पवित्र मशिदीत परदेशी महिला अल्प वस्त्र परिधान करून जात. इस्लामनुसार हे पाप आहे. म्हणूनच हा गोळीबार केला.”
यासीन हा इंडिअन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहे.
सप्टेंबर २०१० मधील हल्ला.
इंडिअन मुजाहिदीनने पुण्यातील जर्मन बेकरीवर बॉम्बहल्ला केला होता. तसेच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांतही (२०१०, दिल्ली) हल्ला करण्याचा बेत होता.

खाण उत्खननाच्या आंतरराष्ट्रीय Racket मध्ये भारतीय खासदार सामील

आंध्रप्रदेशमधील टायटेनियम या खनिजाच्या उत्खननाला परवानगी मिळावी म्हणून विविध देशांतील व्यक्तींनी लाच दिली होती. ही लाच भारतातील राज्य आणि केंद्र अधिकाऱ्यांना दिली गेली होती. अशी लाच द्यावी म्हणून आंध्रप्रदेशमधील एका राज्यसभा खासदाराने प्रवृत्त केले होते. त्याचे नाव - के. व्ही. पी. रामचंद्र राव
पक्ष? ....... अर्थात कॉंग्रेस
अमेरिकेच्या ‘नॅशनल क्राइम ब्यूरो’ तर्फे इंटरपोलच्या मदतीने भारताच्या केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) या संदर्भातील पत्र पाठविण्यात आले आहे आणि रावांना अटक करावी अशी मागणीही केली आहे.
लाच किती? = १ कोटी ८५ लाख $

रेल्वे प्रवाशांनो आता तुमच्या सेवेसाठी ‘रेल्वेचे मोबाईल App’

हे नवीन app रेल्वे गाड्यांच्याबाबतची सर्व माहिती पुरवेल.
उदा. गाडी किती वाजता येणार जाणार, कुठे थांबणार, किती वेळ थांबणार, cancel झालेल्या आणि लेट झालेल्या गाड्या इ. इ.
आतापर्यंत आपल्याला खालील स्त्रोतांपासून माहिती मिळत होती :-
१३९ हा हेल्पलाइन क्रमांक, रेल्वेचे संकेतस्थळ www.trainenquiry.com, रेल्वे स्थानकांवरील फलक, विचारपूस केंद्र इ.आंतरराष्ट्रीय

what’s app देणार मोफत कॉल सुविधा

मोफत संदेश पाठवण्याची सुविधा असणारे whats app आता मोफत कॉल सुद्धा पुरवणार आहे.
काही दिवसांपूर्वीच फेसबुकने याला विकत घेतले आहे.
CEO - जॅन कोम
जगभरातील वापरकर्ते – ५० कोटी
भारतातील वापरकर्ते – ४.८ कोटी
फेसबुकचा CEO – मार्क झुकरबर्ग

दक्षिण कोरिया जहाज दुर्घटनेतील मृतांची संख्या १५०

हे जहाज प्रामुख्याने शालेय मुलांना (३२३)घेऊन चालले होते.

भारत, चीन, पाकिस्तान यांच्या एकत्रित नौदल कसरती

चिनी नौदलाच्या ६५ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधत भारत, चीन आणि पाकिस्तान या तीनही देशांच्या नौदलांनी एकत्रित सामरिक कसरती केल्या
या तीन देशांव्यतिरिक्त बांगलादेश, सिंगापूर, मलेशिया, इंडोनेशिया आणि ब्रुनेई या देशांच्या नौदलांनीही या कसरतींमध्ये भाग घेतला होता.
. ‘मेरिटाइम कोऑपरेशन २०१४’ या सांकेतिक नावाने या कसरती पार पडल्या.
भारतातर्फे आयएनएस शिवालिक ही युद्धनौका पाठवण्यात आली होती. कसरतींचे नेतृत्व ‘हर्बीन’ या चीनी नौकेने केले.

मलेशियाचे विमान शोधण्यासाठी पुढील स्तरावरील उपाय - शक्तीशाली ‘सोनार’ यंत्रणा

याच यंत्रणेने अनेक जहाजांचा शोध लावलाय :
२९ वर्षांपूर्वी १९८५ मध्ये टायटॅनिक बोट अॅटलांटिक महासागरात ३८०० मीटर खोलीवर सापडली होती, ही बोट १५ एप्रिल १९१२ रोजी बुडाली होती.
एचएमएएस सिडनी या ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या महायुद्धात बुडालेल्या जहाजाचा शोधही याच प्रणालीने घेतला होता, ते जहाज २००८ मध्ये सापडले होते.
मलेशियाचे हे विमान शोधण्याकामी ४ देश प्रयत्न करत आहेत – चीन, अमेरिका, मलेशिया, ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी अबॉट
अमेरिकेच्या ब्लूफिन २१ या नौदलाच्या सोनार यंत्र असलेल्या छोटय़ा पाणबुडीने शोध घेतला मात्र यश मिळाले नाही.

पाकिस्तानी पत्रकाराची बंदूकधाऱ्यांकडून हत्या

सामा टीव्हीचे पत्रकार शहजाद इक्बाल
एका महिलेवरून शत्रुत्वराज्य

मतदान कळण्यासाठी ‘रेंज बाहेरच्या’ १३ गावांना स्वतंत्र दूत

निवडणूक आयोगाने ही सोय केली आहे. त्यामुळे आता तेथील मतदान आणि इतर काही अनुचित प्रकारांची माहिती समजेल.

वेकोलिच्या निकृष्ट कोळशामुळे महानिर्मितीला ६५० कोटींचा भुर्दंड

वेकोलि - वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड
वेकोलि आणि महावितरणमध्ये कोळसा पुरवठा करण्याबाबत करार झाला आहे.
करार – वेकोलि महावितरणला १००% कोळसा पुरवेल.
मात्र केवळ ६० ते ७०% च पुरवठा होतो. वेकोलि उर्वरित कोळसा इतर राज्यांना विकते.
कोळशाचा दर्जा निकृष्ट असतो. त्याची तपासणी करण्याचे अधिकार महावितरणला देण्यास वेकोलि तयार नाही. राज्य शासनाची बघ्याची भूमिका.
परिणाम = ६५० कोटीचा तोटा
(चला, मा. उर्जा मंत्र्यांचे आभार मानूया!)

काळाच्या प्रवाहात लोप पावलेल्या नदीचे पात्र पुन्हा जिवंत करण्याचा महाराष्ट्रातील पहिलाच महत्त्वाकांक्षी प्रयोग लातुरात

नदी – तावरजा
सहभाग : आर्ट ऑफ लिविंग (श्री श्री रविशंकर) = ५०% खर्च आणि गावकरी = ५०%
काय करणार? = गाळ उपसणार
परिणाम = भूजल पातळी वाढून पाण्याची समस्या काही अंशी सुटणार. नदी पुन्हा वाहू लागणार.

‘शब्द’ मराठी विश्व साहित्य संमेलन बँकॉक येथे

आयोजक - महाराष्ट्र वृत्तपत्र लेखक संघटना, शब्द साहित्य मंडळ, सद्गुरू शिक्षण आणि बहुउद्देशीय संस्था, शब्द मराठी कविता समूह फेसबुक
कालावधी – २ ते ७ मे
अध्यक्ष - अभिनेते व कवी किशोर कदम ऊर्फ सौमित्र
यापूर्वीची संमेलने - वर्धा, पुणे, नागपूर आणि अलिबाग

अर्थव्यवस्था

विमानातही आता मोबाईल व इतर उपकरणे वापरता येणार; मात्र ‘फ्लाईट मोड’ वर

मागील वर्षी अमेरिका तसेच इतर पाश्चिमात्य देशांनी अशी परवानगी दिली होती.
भारतात अशी परवानगी DGCA (नागरी हवाई महासंचालनालयाने) देते.

‘फ्लाइट मोड’ म्हणजे काय रे भाऊ?
मोबाइल किंवा लॅपटॉप ‘फ्लाइट मोड’मध्ये असल्यावरही प्रवासी त्याच्यावर काम करू शकतात. व्हिडीओ गेम खेळणे, डाऊनलोड केलेले चित्रपट पाहणे, गाणी ऐकणे, डाऊनलोड केलेली पुस्तके वाचणे आदी कामे करू शकतात. मात्र मोबाइलवर संवाद साधणे, एसएमएस किंवा ई-मेल आदी पाठविणे, इंटरनेट यांचा वापर प्रवासी करू शकणार नाहीत.
थोडक्यात फ्लाईट मोड वर मोबाईल टाकल्यास ‘रेंज’ जाते बाकी इतर सर्व कामे ते उपकरण करू शकते.

कार्डाचा ‘ऑनलाइन’ वापर अवघा १० टक्केच!

भारतातील बँक ग्राहकांकडे ३७ कोटी कार्ड आहेत. पैकी ३५ कोटी डेबिट (ATM) कार्ड आणि इतर २ कोटी क्रेडीट कार्ड आहेत.
मात्र या ३७ कोटींपैकी फक्त ३-४ कोटी कार्डचाच वापर online बँकिंग साठी केला जात आहे.

ऑनलाइन बँकिंग घोटाळ्यांनी रिझर्व्ह बँक चिंतित

यासाठी RBI ने खालील उपाय सुचवला आहे.
PKI ‘पब्लिक की इन्फास्ट्रक्चर’ = हे एक सुरक्षा मानक आहे. जसा पासवर्ड असतो त्याच प्रकारे.
PKI सध्या आरटीजीएस, एनईएफटी, सीबीएलओ, फॉरेक्स क्लीअरिंग, सरकारी रोख्यांचे क्लीअरिंग आदी व्यवहारांत वापरला जात आहे.

मोबाईल बँकिंगचा अजूनही म्हणावा तेवढा वापर नाही

मोबाईल बँकिंगची परवानगी सध्या ८७ बँकांना मिळालेली आहे. (RBI कडून)
या बँकांचे एकूण ४५ कोटी खातेदार आहेत. मात्र केवळ २.२ कोटी खातेदारच मोबाईल बँकिंगची सुविधा वापरत आहेत.

मल्ल्यांच्या मँगलोर केमिकल्सवर अखेर दीपक फर्टिलायजर्सचे वर्चस्व!

कर्नाटकातील मँगलोर येथे रसायन निर्मिती प्रकल्प असलेल्या व २,८०० कोटी रुपयाचा महसूल नोंदविणाऱ्या मँगलोर केमिकल्सवर ताबा घेण्यासाठी दीपक फर्टिलायजर्स व झुआरी फर्टिलायजर्समध्ये तीव्र स्पर्धा होती. मात्र बाजी मारली दिपकने!
मल्ल्या यांच्या यूबी समूहाचा सर्वाधिक हिस्सा याच कंपनीत होता.
मल्ल्या सध्या कर्जात बुडालेले आहेत आणि आपल्या UB समूहातील कंपन्या विकून उदरनिर्वाह करत आहेत.

‘केमटेक’चे जागतिक प्रदर्शन मुंबईत!

रसायन तंत्रज्ञान विषयाला वाहिलेले जागतिक प्रदर्शन जानेवारी २०१५ मध्ये मुंबईत होणार आहे. ‘केमटेक’ या नावाचे हे २७ वे प्रदर्शन २८ ते ३१ जानेवारी दरम्यान गोरेगाव (पूर्व) येथील ‘बॉम्बे एक्झिबिशन सेंटरच्या मैदानावर होईल.
आयोजक - ‘केमटेक फाऊंडेशन’ (५० वर्षे पूर्ण)

‘जीएसके’वर नोवार्टिसचा ताबा

लंडनमधील ग्लॅक्सोस्मिथक्लाइनच्या (जीएसके) कर्करोग औषधांचा व्यवसाय स्वित्झर्लन्डच्या नोवार्टिसने खरेदी केला आहे. तर नोवार्टिसने आपला लस उद्योग जीएसकेकडे हस्तांतरित केला आहे.
नुकताच रॅनबॅक्झीवर सन फार्माने ताबा घेतला होता.

टीसीएस जागतिक स्तरावर टॉप १० मध्ये!

TCS (टाटा कन्सल्टन्सी सव्र्हिसेस) - देशातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर सेवा कंपनीने जगातील पहिल्या १० आयटी कंपन्यांमध्ये स्थान पटकावले आहे.
IBM – १ (अमेरिका)
इन्फोसिस – १८
विप्रो – २०
HCL tech – २७कला

जागतिक नृत्यदिनानिमित्त मंगळवारी ‘नृत्योत्सवा’चे आयोजन

जागतिक नृत्यदिन - २९ एप्रिल
‘नृत्योत्सवा’चे आयोजक - अखिल भारतीय सांस्कृतिक संघ, नृत्यार्थी कलाक्षेत्रम आणि युनेस्को प्रणीत जागतिक नृत्य परिषद
उद्देश - भारतीय शास्त्रीय नृत्यकलेची रसिकांना ओळख व्हावी आणि नवोदित कलाकारांना त्यांची कला सादर करण्यास हक्काचे व्यासपीठ मिळावे.क्रीडा

श्रीलंकेच्या ट्वेन्टी-२० कर्णधारपदी मलिंगा

वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाने यंदाच्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात श्रीलंकेला जेतेपद पटकावून दिले आणि या मेहनतीचे फळ त्याला मिळाले आहे.

मुद्गल यांच्याकडेच चौकशीची सूत्रे?

इंडियन प्रीमियर लीगमधील स्पॉट-फिक्सिंग आणि सट्टेबाजीप्रकरणी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सुचवलेल्या त्रिसदस्यीय चौकशी समितीकडे सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दुर्लक्ष केले आहे. एन. श्रीनिवासन व काही महत्त्वाच्या क्रिकेटपटूंसहित एकंदर १३ जणांवर ठपका ठेवण्यात आलेल्या या चौकशीची सूत्रे माजी न्यायमूर्ती मुकुल मुद्गल समितीकडे सोपवली जाण्याची शक्यता आहे

विशेष लेख वाचण्यासाठी खालील लिंक वर click करा किंवा या पानावरील 'विशेष लेख' या लिंकवर click करा.

  • 'डेंग्यूविरोधात तू आणि मी' - राष्ट्रीय अभियानास सुरुवात ..........-by BK Core Group New...
  • CPSE-ETF च्या स्थापनेची तयारी पूर्ण ..........-by BK Core Group New...

  • प्रिय मित्रहो, आपणास काही शंका किंवा प्रश्न असतील तर आम्हांस जरूर कळवा. आपल्या चांगल्या आणि वाईट सर्व प्रकारच्या सूचना नेहमीच स्वागतार्ह आहेत. इ-मेल : bhushan@anushri.org
    किंवा SMS करा या नंबरवर 7588068356 (फक्त SMS )    कृपया CONTACT US या सदरात जाऊन स्वतःचे REGISTRATION (नोंदणी) करा. मासिक केवळ नोंदणी केलेल्या सदस्यांनाच मोफत मिळेल.