दैनिक बातम्या व विश्लेषण

राष्ट्रीय दैनिक बातम्या व विश्लेषण

१)डॉ.जयंत नारळीकर यांना मायुदम्मा स्मृती पुरस्कार जाहीर.

तेनाली जिल्हा गुंटूर (आंध्र प्रदेश ) येथील नायुदम्मा मेमोरियल ट्रस्टच्या वतीने दिला जाणारा हा पुरस्कार असून २०१३ सालचा पुरस्कार डॉ.जयंत नारळीकर यांना जाहीर झाला .
हा पुरस्कार खगोलशास्त्रीय लाम्गीरीसाठी दिला जातो.१९८६ पासून या ट्रस्टने पुरस्कार सुरु केला. नायुदम्मा यांच्या नावे हा पुरस्कार दिला जातो, ते त्वचाविकार तज्ञ होते.
डॉ. जयंत नारळीकर यांचे कार्य.
चार वर्षाहून अधिक काळ जयंत नारळीकर यांचे अंतरिक्ष विज्ञान या क्षेत्रात कार्य सुरु आहे.सर हॉईल आणि जयंत नारळीकर यांनी खगोल शास्त्रात एकत्र संशोधन केले आहे. गुरुत्वाकर्षानावर त्या दोघांनी मिळून संशोधन करून जो सिद्धांत मांडला, तो हॉईल -नारळीकर सिद्धांत या नावाने खगोलशास्त्रात प्रसिद्ध आहे.<.p>

2) कॅनडाचे गव्हर्नर जनरल यांचा भारत दौरा

कॅनडाचे गव्हर्नर जनरल डेविड जॉन्सन हे नऊ दिवसीय भारताच्या दौऱ्यावर आलेले आहेत .१९९८ नंतर आलेले हे पहिलेच कॅनडाचे गव्हर्नर जनरल आहेत.
या भेटीदरम्यान ते राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान यांच्यासोबत चर्चा करणार आहेत. त्याचबरोबर भारताचे पराराष्ट्र मंत्री यांची सुद्धा भेट घेण्याची शक्यता आहे. या होणाऱ्या चर्चेमध्ये राजकारण, व्यापार व शिक्षण हे विषय असतील.
डेविड जॉन्सन हे २०१० पासून कॅनडाचे गव्हर्नर जनरल आहेत.तर कॅनडाचे पंतप्रधान स्टेफन हर्फर हे आहेत

आंतरराष्ट्रीय दैनिक बातम्या व विश्लेषण

१) इटलीचे सर्वात तरून पंतप्रधान

मेत्ताओ रेन्झी यांची इटलीचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून निवड झाली .त्यांना राष्ट्रपती जॉर्जिओ नापोलीताने आपल्या पदाच्या गोपनीयतेची शपथ दिली.

२) अमेरिका - चीन यांच्यामध्ये सामरिक चर्चा होणार

अमेरिका-चीन यांच्यामध्ये युद्धविषयक साहित्याची देवाण घेवाण, तंत्रज्ञानाची देवाणघेवाण त्याचबरोबर दुरगामी व्युव्हरचना याविषयी चर्चा करण्याची तयारी चीनने सुरु केली आहे.
दुसऱ्या बाजूला ओबामा-लामा यांच्या भेटीवर चीनने कडाडून टीका केली आहे . त्याचबरोबर या भेटीमुळे चीन- अमेरिका द्विपक्षीय संबंधावर परिणाम होतील अशी चीनने धमकी दिली आहे.
या दृष्टीने हि चर्चा महत्त्वाची ठरणार आहे.

३) पुण्यातील कंपनीच्या विड्यांवर अमेरिकेत बंदी :

अमेरिकेतील अन्न व औषध प्रशासनाने देशातील निकषाचे पालन करण्यासाठी हा निर्णय घेतला. कारण पुण्यातील जॉस इंटरनेशनल यांची उत्पादिते असलेली सूत्र विडी रेड, सूत्र विडीज मेंथोल, सूत्र विडीज रेडकोन व सूत्र विडीज मंथोल कोन हि उत्पादने व्यावसायिक तंबाखूजन्य उत्पादनाइतकी योग्य आढळली नाहीत.
२००९ च्या कौटुंबिक धुम्रपान प्रतिबंध व तंबाखू नियंत्रण कायद्यानुसार हि कारवाई करण्यात आली.
अमेरिकेकडून आयात करण्यात आलेल्या विद्या सुद्धा वापरात येणार नाहीत . या पूर्वी अशी नियंत्रण करणारी कोणतीही यंत्रणा नव्हती .पण आता तंबाखू नियंत्रण कायद्यामुळे कोणती नवीन तंबाखूजन्य उत्पादने येत आहेत व ती लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने कितपत योग्य आहेत याचाही विचार आता अन्न व औषध प्रशाशानाकडून केला जातो.

४) युक्रेन संसदेकडून राष्ट्राध्यक्ष पदच्युत:

युक्रेन मधील आंदोलकाने अध्यक्ष यानुकोव्हीच यांना पदावरून दूर केले आहे, आंदोलकांनी युक्रेनची राजधानी किव्हे ताब्यात घेऊन राजवाडा ताब्यात घेतला आहे.
युक्रेन या देशामध्ये सध्या दोन विचार प्रवाह आहेत. एक म्हणजे एका विभागातील नागरिक युरोपमध्ये सहभागी होण्याची मागणी करत आहेत,तर दुसरा विभागातील नागरिक रशियाच्या बाजूने आहेत.

दैनिक बातम्या व विश्लेषण