राष्ट्रीय घडामोडी

१) खुशवंत सिंग यांच्या नावे पुरस्कार

• कसौली येथे ‘खुशवंत सिंग लिटरेचर फेस्टिवल’ भरवण्यात येणार आहे.
• या फेस्टिवलमध्ये यावर्षापासून दरवर्षी ‘खुशवंत सिंग मेमोरियल बुक प्राईज’ हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
• हा पुरस्कार पदार्पणातील कादंबरी लेखनाला दिला जाणार आहे.
• लेखक राहुल सुहेल यांनी हा पुरस्कार पुरस्कृत केलेला असून त्यासाठी ऑक्सफोर्ड बुक स्टोअरने सहकार्य देण्याचे ठरवले आहे.
• या पुरस्काराचे वैशिष्ट्य म्हणजे या विजेत्या लेखकाला पुरस्काराच्या रक्कमेबरोबरच देशभरातील ऑक्सफोर्ड बुक स्टोअर्सच्या दुकानांना भेटी देता येणार आहेत.
• या पुरस्कारासाठी लेखकाची निवड करताना ‘पहिली इंग्रजी काल्पनिक कादंबरी’ हा निकष लावला जाणार आहे.
• या पुरस्कारासाठी २.५ लाख रुपये असे मानधनाचे स्वरूप असणार आहे.

२) पद्मनाभ मंदिरातील सोन्याला गळती

• पद्मनाभ मंदिरातील तळघरात सापडलेल्या सोन्याची चोरी होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
• त्याचबरोबर मंदिर आणि संपत्तीच्या व्यवस्थापनातही त्रुटी आढळून आलेल्या आहेत.
• या मंदिराच्या व्यावस्थापनाचे सदस्य असणाऱ्या त्रावणकोरच्या राजघराण्याला मंदिराच्या दैनंदिन कामकाजात ढवळाढवळ करण्यास प्रतिबंध करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.

३) माधव दांडेकर यांचे निधन

• पूर्वीचे कॅम्लीन लि. आताचे बदलले नाव कोकुयो कॅम्लीनचे माजी व्यवस्थापकीय संचालक माधव दांडेकर यांचे निधन झाले.

आंतरराष्ट्रीय घडामोडी

१) हमीद मीर यांच्या हल्लेखोरांना पकडण्यासाठी एक कोटीचे बक्षीस

• हमीद मीर यांच्यावर हल्ला करणाऱ्याची माहिती देणाऱ्यास एक कोटी रुपयांचा इनाम देण्याची घोषणा पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी केली.
• त्याबरोबरच या हल्ल्याची चौकशी करण्यासाठी त्रि-सदस्यीय समितीही स्थापन करण्यात येणार आहे.

२) जपान –चीन तणाव

• ओकिनावाच्या दक्षिणेकडे जपानने लष्करी टेहळणी वाढवली आहे, त्याचे महत्वाचे कारण म्हणजे चीनच्या लष्कराची संशयास्पद हालचाल.
• त्यामुळे जपानने या बेटावर आपले दिन इ-२ सी ही विमाने पाठवली आहेत.
• विशेष- जपानने नाहा बेटावर जपानचे संरक्षण मंत्री इत्सूनोरी ओनोडेरो यांनी एक उद्घाटन कार्यक्रम केला.
• ‘नाहा’ या बेटावर जपानने देशांच्या संरक्षणासाठी ‘स्क्वार्डन’ या चार विमानाचा संच ठेवण्यात आला आहे.
• त्याबरोबरच जपानने ‘१३ ए २ सी’ ही लढाऊ विमाने उत्तरेकडे ‘मिसावा’ या बेटावर तयार ठेवली आहेत. ‘योनागुनी’ येथे रडार टेहळणी व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
• चीनची जहाजे या वादग्रस्त बेटाकडे कायम फिरकत असतात त्यामुळे हे पाऊल उचलण्यात आले.

राज्य घडामोडी

१) कोल्हापुरातील टोल वसुलीला न्यायालयाकडून स्थगिती

• कोल्हापुरातील टोल वसुली तात्पुरती स्थगिती ठेवण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.
• कोल्हापुरातील टोल विरोधी कृती समितीने विरोध टोलला विरोध केला होता.
• या निकालाविरोधात IRB ने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र स. न्यायालयाने हा निर्णय कायम ठेवत याचिका फेटाळली.
• कोल्हापुरातील ४९ किमीचे रस्ते तयार करण्यासाठी ४०० कोटींचा खर्च आल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.
• मात्र हा खर्च अवाढव्य व रस्ते काम निकृष्ट असल्याचे कारण देत न्यायालयाने टोलला स्थगिती दिली.

२) मुंबईतील फेरीवाल्यांची नोंदणी

• सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वानुसार शहरातील फेरीवाल्यांची नोंदणी करणे आवश्यक आहे.
• ही नोंदणी चार महिन्यात करण्याची मुदत महानगर पालिकेला देण्यात आली होती.
• मात्र निवडणुकीच्या कामामुळे ह्या कामाला विलंब झाल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे.
• ही फेरीवाल्यांची नोंदणी व्हिडीओ चित्रीकरणाच्या साह्याने केली जाणार आहे.
• या नोंदणीसाठी आवश्यक असलेली फेरीवाला संघटना व पालिका अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे.

अर्थविषयक घडामोडी

१) भारताच्या परकीय चलनात वाढ

• भारताच्या परकीय चलन साठ्यात सलग दुसऱ्या महिन्यात वाढ नोंदवली गेली आहे.
• या पूर्वी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया घसरल्यामुळे आयात करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर परकीय गंगाजळी खर्च होत होती.
• मात्र चालू वर्षात भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत वधारल्यामुळे या साठ्यामध्ये वाढ झाल्याची दिसून येते.

क्रीडा घडामोडी

१) स्पॉट फिक्सिंग- BCCIकडून त्रि-सदस्यीय समिती

• भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने स. न्यायालयाला चौकशीसाठी तीन सदस्यांची नावे सुचवली आहेत.
• स. न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चांगल्या व्यक्तींचा समावेश असलेली समिती स्थापन करण्याची सूचना न्यायालयाला दिली होती.
• या तीन व्यक्तीमध्ये भारताचे माजी खेळाडू रवी शास्त्री, उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्या. जे.एन. पटेल आणि CBIचे माजी संचालक आर.के.राघवन यांचा समावेश आहे.

२) जोश्ना अजिंक्य

• अमेरिकेतील रिचमंड खुल्या स्क्वॅाश स्पर्धेत भारताच्या जोश्ना चीनप्पाने भारताचे नाव कोरले आहे.
• तिने ऑस्ट्रेलियाच्या रचेल ग्रिनहम वर मात केली.

३)चीन ग्रा.प्री. फॅार्मुला वन शर्यत

• या स्पर्धेतही मर्सिडीज या संघाने अधिराज्य गाजवले.
• मर्सिडीझचा ड्रायव्हर लुईस हमिल्टनने या स्पर्धेत जेतेपद पटकावले.
• या वर्षातल्या मोसामातली मर्सिडीझचा सलग तिसरा विजय आहे.
• मर्सिडीझचाच त्याचा सहकारी निको रोसबर्ग याने दुसरे स्थान पटकावले.
विशेष लेख वाचण्यासाठी खालील लिंक वर click करा किंवा या पानावरील 'विशेष लेख' या लिंकवर click करा.  • भारतीय औषध क्षेत्राचा दर्जा ........-by sk Core Group
  • 'डेंग्यूविरोधात तू आणि मी' - राष्ट्रीय अभियानास सुरुवात ..........-by BK Core Group New...
  • CPSE-ETF च्या स्थापनेची तयारी पूर्ण ..........-by BK Core Group New...
  • प्रिय मित्रहो, आपणास काही शंका किंवा प्रश्न असतील तर आम्हांस जरूर कळवा. आपल्या चांगल्या आणि वाईट सर्व प्रकारच्या सूचना नेहमीच स्वागतार्ह आहेत. इ-मेल : shivraj@anushri.org किंवा SMS करा 9404703270    कृपया CONTACT US या सदरात जाऊन स्वतःचे REGISTRATION (नोंदणी) करा. मासिक केवळ नोंदणी केलेल्या सदस्यांनाच मोफत मिळेल.