राष्ट्रीय

१) भारत- चीन युद्धाचा अहवाल

• भारत-चीन युद्धाचा अहवाल हा भारताकडून प्रसिध्द न करता तो गोपनीय ठेवण्यात आला होता.
• त्या अहवालाचा काही भाग आॅस्ट्रेलियन पत्रकार नेव्हिल मॅक्सवेल यांनी ऑनलाईन प्रसिद्ध केला आहे.
• १९६२ च्या काळात भारताची संरक्षण क्षमता याविषयीचा हा अहवाल आहे.
• लेफ्टनंट जनरल हेंडरसन ब्रूक्स व भारतीय लष्करी अकादमीचे कमांडंट ब्रिगेडीअर पी. एस. भगत यांनी हा युद्धविषयक अहवाल लिहिला होता.
• एप्रिल २०१० मध्ये संरक्षण मंत्री ए. के. अॅंटनी यांनी संसदेत असे म्हटले होते की, या अहवालात संवेदनशील माहिती असून त्यामुळे तो अहवाल गोपनीय ठेवणे आवश्यक आहे.
• या अहवालात नेहरुच्या धोरणाचे विश्लेषण करण्यात आले आहे. त्यानुसार नेहरुचे युद्धविषयक धोरण हे चुकीचे असून त्यामुळेच या युद्धात भारताचा पराभव झालेला आहे.
• अर्थात त्यांच्यावर वैयक्तिक ठपका ठेवण्यात आला आहे.

२) स्पॅम ई-मेलच्या बाबतीत भारताचा ४था क्रमांक

• मायक्रोसॅाफ्ट कंपनीच्या अहवालानुसार भारत हा स्पॅम ई-मेल पाठवण्याच्या बाबतीत चौथ्या क्रमांकावर असल्याचे स्पष्ट झाले आहे.
• मायक्रोसॅाफ्टने आपला अहवाल २८ फेब्रुवारी २०१४ रोजी प्रसिध्द केला आला आहे. भारतात या स्पॅम ई-मेल मध्ये फार्मा उत्पादने, लैंगिक सामग्री जाहिरात, याविषयी माहिती देण्याचे प्रमाण जास्त आहे.
• हा अहवाल जानेवारी२०१३- जुन २०१३ या कालावधीतील सर्वेक्षणावर आधारित आहे.
• स्पॅम ई-मेलच्या बाबतीत अमेरिका पहिल्या क्रमांकावर असून अमेरिकेत बॅाट्नेट स्पॅम ई-मेल पाठवण्याचे प्रमाण जास्त प्रमाणावर आहे.
• दुसऱ्या क्रमांकावर चीन आहे तर तिसरा क्रमांक यु.के. चा लागतो.

३) महिला संरक्षणविषयक दिल्लीतील सर्व्हे

• एका नवीन अभ्यासाद्वारे असे दिसून आले आहे की, सुरक्षेच्या कारणास्तव दिल्लीतील ४३% महिलांनी दिल्ली सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
• “उद्योग आणि व्यापारी PHD” चेंबर यांच्या वतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात कामगार स्त्रिया, विद्यार्थी, व नोकरदार स्त्रियांचा समावेश होता.
• ८०% स्त्रियांनी फक्त दिवसा काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तर फक्त ४% स्त्रियांनीच रात्र-पाळीत काम करण्याची सहमती दर्शवली आहे.
• जवळपास ६४% महिलांनी असे स्पष्ट केले आहे की, महिलाविषयक गुन्ह्यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत असतो.
• बऱ्याच प्रमाणावर महिलांनी फास्ट ट्रॅक न्यायालयाची इच्छा व्यक्त केली असून त्यामुळे अशा गुन्ह्यांना आळा बसेल.


आंतरराष्ट्रीय

१) दुसऱ्या शीतयुद्धाची नांदी

• दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपचा नकाशा बदलणार आहे.
• जी-८ समूहातून रशियाला निलंबित करण्यात आले आहे. यापूर्वी जी-७ गटाचे रुपांतर झाले होते.
• युरोपीय महासंघानंतर जपाननेही रशियावर आर्थिक निर्बंध लादले आहेत.
• अर्थात हे निर्बंध शीतयुद्ध काळापेक्षाही जास्तच कडक आहेत.
• त्यामुळेच या घडामोडीवरून असे दिसून येते की, दुसरे शीतयुद्ध
रशिया व युरोपियन राष्ट्रे यांच्यात होऊ शकते.


२) गुलामीमुक्त जगाचा संकल्प


• २०२० पर्यंत सक्तीचे मानवी हस्तांतरण, सक्तीचे देहविक्रय आणि बालमजुरी जगातून हद्दपार करण्यासाठी ख्रिस्ती व मुस्लीम धर्मातील प्रमुखांनी संकल्प केला आहे.
• हे सर्वजण “द ग्लोबल फ्रीडम नेटवर्क” या संस्थेच्या माध्यमातून एकत्र आले होते.
• या संस्थेचा पाया ऑस्ट्रेलियातील Andrew Forest यांनी घातला.
• या मोहिमेसाठी व्हॅटीकन सिटी, अंग्लीकन काम्युनियन आणि कैरोतील इस्लामी अल- अजहर विद्यापीठ यांचा प्रमुख सहभाग आहे.
• या संस्थेमार्फत जगातील अन्य धर्मश्रध्दांच्या प्रतिनिधींनाही आमंत्रित केले जाणार आहे.
• जगातील गुलामांची संख्या २०१३ मध्ये २ कोटी ९८ लाख होती.
• या गुलामगिरीत पश्चिम आफ्रिकी देश मॅार्टानियान हा पहिल्या क्रमांकावर आहे, दुसरा हैती तर तिसऱ्या क्रमांकावर पाकिस्तान आहे.

३) थायलंडमधील आणीबाणी संपणार

• थायलंडमधील बॅंकांक आणि आजूबाजूच्या प्रदेशात दोन महिन्यापासून आणीबाणी लागू झालेली होती.
• ही आणीबाणी “द इंटरनल सिक्युरिटी अॅक्ट” या कायद्यानुसार ३० एप्रिल २०१४ मध्ये संपुष्टात येणार आहे.

अर्थविषयक बातम्या

१) सरकारची ETF योजना

• निवडक सार्वजनिक उपक्रमातून ETF ( exchange traded fund ) च्या माध्यमातून ३००० कोटी उभारण्याची केंद्र सरकारची योजना आहे.
• त्यामुळे देशातील छोट्या उद्योजकांना कमी मूल्यांमध्ये सरकारी कंपन्यामध्ये गुंतवणूक करता येणार आहे.
• सरकारने अशा दहा कंपन्या गुंतवणूकीसाठी खुल्या केलेल्या आहेत.
• गुंतवणुकीसाठी CPSE-ETF हा एक चांगला व लोकप्रिय प्रकार आहे.


क्रीडा बातम्या

१) कर्नाटकने विजय हजारे चषकावर नाव कोरले


• विजय हजारे चषकातील शेवटचा सामना कर्नाटक व रेल्वे यांच्यामध्ये झाला.
• तो कोलकाता येथील ईडन गार्डन या मैदानावर खेळला गेला.
• कर्नाटकने हजारे चषक पहिल्यांदाच जिंकला आहे.
• २०१४ मध्ये कर्नाटकने रणजी ट्रॉफी, इराणी चषक ह्या स्पर्धा जिंकल्या आहेत.
विजय हजारे चषक
- या चषकाची सुरवात २००२-२००३ पासून झाली आहे.
- ही रणजी ट्रॉफीची एकदिवसीय आवृत्ती आहे.
- आजपर्यंत तामिळनाडूने ४ वेळा ही ट्रॉफी जिंकली आहे.
- तर दिल्लीने २०१२-१३ ही ट्रॉफी जिंकली आहे.
विशेष लेख हे सदर सुरु झाले आहे. विशेष लेख वाचण्यासाठी खालील लिंक वर click करा किंवा या पानावरील 'विशेष लेख' या लिंकवर click करा.  • 'डेंग्यूविरोधात तू आणि मी' - राष्ट्रीय अभियानास सुरुवात ..........-by BK Core Group New...
  • CPSE-ETF च्या स्थापनेची तयारी पूर्ण ..........-by BK Core Group New...
  • प्रिय मित्रहो, आपणास काही शंका किंवा प्रश्न असतील तर आम्हांस जरूर कळवा. आपल्या चांगल्या आणि वाईट सर्व प्रकारच्या सूचना नेहमीच स्वागतार्ह आहेत. इ-मेल : shivraj@anushri.org किंवा SMS करा 9404703270    कृपया CONTACT US या सदरात जाऊन स्वतःचे REGISTRATION (नोंदणी) करा. मार्च महिन्याचे मासिक केवळ नोंदणी केलेल्या सदस्यांनाच मोफत मिळेल.