राष्ट्रीय

१) रतन टाटा यांना डॉक्टरेट

• भारताचे अग्रगण्य उद्योगपती रतन टाटा यांना सिंगापूर विद्यापीठाने “डॉक्टर ऑफ बिझिनेस” ही मानद पदवी दिली.
• टाटांची दूरदृष्टी, समाजाबद्दल असलेले उत्तरदायित्व आणि उद्योजकतेस चालना देणारी वृत्ती यामुळे त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
• यापूर्वी २००७ मध्ये सिंगापूर सरकारने टाटा यांना “सन्माननीय नागरिक” या पुरस्काराने सन्मानित केले होते.

२) पश्चिम घाट पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील

• केंद्र सरकारने पश्चिम घाटास पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील घोषित केले आहे.
• गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या सहा राज्यातील ५६८२५ चौ.किमी भाग हा संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आला आहे.
• या सर्व भागामध्ये खाणकाम, अणुऊर्जा प्रकल्प आणि पर्यावरण खात्याच्या ‘रेड’ यादीमध्ये समाविष्ट असलेल्या उद्योगांना या भागात बंदी असणार आहे.
• अर्थात त्यामुळे महाराष्ट्रातील प्रस्तावित जैतापूर अणुउर्जा प्रकल्प यामुळे रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
• या संवेदनशील भागात महाराष्ट्रातील १७३४० चौ.किमी भूभाग असणार आहे.

आंतरराष्ट्रीय

१) रशियामध्ये सामील होण्यास क्रिमीया तयार

• क्रीमियातील लोकांनी दिलेल्या कौलानुसार रशियामध्ये सामील होण्यास क्रिमियन लोक तयार आहेत. या निर्णयामुळे अमेरिका व मित्रराष्ट्र नाराज झाले असून अमेरिकेने रशियावर आर्थिक निर्बंध लादण्याची घोषणा केली आहे.
• या निर्णयाचे पडसाद आंतरराष्ट्रीय बाजारात उमटले असून क्रूड तेलाच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे.
• रशिया व अमेरिका यांच्या शीतयुद्धाबरोबरच आशियावरही तेलसंकट येण्याची शक्यात निर्माण झाली आहे.
• युरोपातील बहुतेक देशांना रशियाकडून तेल व नैसर्गिक वायूचा पुरवठा केला जातो. त्यातील ७०% पुरवठा युक्रेनच्या माध्यमातून होतो, त्यामुळे तेलाच्या किंमती भडकून शीतयुध्द होण्याची शक्यता आहे.
• रशियाचे अध्यक्ष वाल्दिमीर पुतीन यांचे १३ सहकारी व त्यांना साह्य करणारे युक्रेनमधील ८ अधिकारी असे २१ जणांना अमेरिकेने लक्ष्य केले आहे. हे सर्वजण ही परिस्थिती निर्माण करण्यासाठी कारणीभूत असल्याचा अमेरीकेचा दावा आहे.
• या सर्वांची विदेशातील बँक खाती गोठवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांच्यावर जागतिक प्रवास बंधनही घालण्यात आले आहे.
क्रीमियातील लोकप्रतिनिधींनी पुढील घोषणा केलेल्या होत्या.

1. युक्रेनमधून बाहेर पडून स्वतंत्र राज्य म्हणून जाहीर आणि रशियात सामील होण्यासाठी प्रयत्नशील.
2. येत्या महिनाभरात रशियाचे रुबल हे चलन क्रीमियाचे अधिकृत चलन म्हणून जाहीर.
3. येत्या ३० मार्चपासून क्रीमियातील स्थानिक वेळ मॅास्कोप्रमाणे, अर्थात ग्रीनीच प्रमाण वेळेपेक्षा ४ तास पुढे.
4. क्रीमियाच्या सरकारी सैनिकांना रशियाच्या सैन्यात रुजू होण्याची संधी.

अर्थविषयक बातम्या

१) SBI ची NPA कर्जाची वसुली

• ५००० कोटी रुपयांची अनुत्पादक मालमत्ता विकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
• भारतीय स्टेट बँकेने डिसेंबर २०१३ अखेर संपलेल्या तिमाहीत ५.७३% बुडीत कर्जाची नोंद केली आहे.
• बँकेचा कर्ज विक्रीचा व्यवहार हा ३१ मार्च २०१४ पूर्वी होणार आहे.
• देशामध्ये मालमत्ता पुनर्बांधणी कंपनीची संख्या १४ आहेत.
या कंपन्या अशा कर्जाची तारण विकत घेऊन त्याची विल्हेवाट लावत असतात.
विशेष लेख हे सदर सुरु झाले आहे. विशेष लेख वाचण्यासाठी खालील लिंक वर click करा किंवा या पानावरील 'विशेष लेख' या लिंकवर click करा.  • 'डेंग्यूविरोधात तू आणि मी' - राष्ट्रीय अभियानास सुरुवात ..........-by BK Core Group New...
  • CPSE-ETF च्या स्थापनेची तयारी पूर्ण ..........-by BK Core Group New...
  • प्रिय मित्रहो, आपणास काही शंका किंवा प्रश्न असतील तर आम्हांस जरूर कळवा. आपल्या चांगल्या आणि वाईट सर्व प्रकारच्या सूचना नेहमीच स्वागतार्ह आहेत. इ-मेल : shivraj@anushri.org किंवा SMS करा 9404703270    कृपया CONTACT US या सदरात जाऊन स्वतःचे REGISTRATION (नोंदणी) करा. मार्च महिन्याचे मासिक केवळ नोंदणी केलेल्या सदस्यांनाच मोफत मिळेल.