राष्ट्रीय

१) २००५ पूर्वीच्या नोटा काढून घेण्यासाठी सर्व बँकांना परवानगी

• RBIच्या निर्देशानुसार २००५ पूर्वीच्या चलनी नोटा बदलण्यासाठीची परवानगी सर्व बँकांना मिळणार आहे.
• २००५ सालापूर्वी वापरात असणाऱ्या ५०० आणि १००० रुपयांच्या भारतीय चलनी नोटा बदलण्यासाठी अवधीही वाढून देण्यात आला आहे.
• तो ३० जून २०१४ वरून १ जानेवारी २०१५ करण्यात आला आहे.
• त्याचबरोबर ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी संबंधित व्यक्तीचे ओळखपत्र लागत असे, ही अट काही प्रमाणात शिथिल करण्यात आली आहे.
• २००५ पूर्वीच्या नोटा कशा ओळखायच्या – या कोणत्याही नोटांवर सन (वर्ष) घालण्यात आले नाही त्यामुळे, सन नसणाऱ्या नोटा ह्या २००५ पूर्वीच्या असणार आहेत.

२) राजस्थानात आण्विक इंधन संकुल

• राजस्थानात कोटा येथील रावतभाटा अणु ऊर्जा प्रकल्पाजवळ आण्विक इंधनावर पुन:प्रक्रिया करण्यासाठी संकुलाची स्थापना करण्यात येणार आहे.
• यापूर्वी हैद्राबाद येथे पहिले आण्विक इंधन संकुल उभारलेले होते, पण ते कार्यक्षमतेने कार्य करत नसल्यामुळे रावतभाटा येथे देशातील दुसरे संकुल उभारण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.
आण्विक इंधन संकुलाचा उपयोग:
अणुभट्टीमध्ये इंधन वापरण्यापूर्वी त्यावर प्रक्रिया करावी लागते, यासाठी अशा संकुलाची आवश्यकता असते.

३) बँक कर्मचाऱ्याची पाच दिवसाचा आठवडा करण्याची मागणी


• युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) ने बँकेच्या कामाचा आठवडा पाच दिवसाचा करण्याची मागणी केली आहे.
• दररोज कामाचे तास ठरवण्यासंबंधी मागणी करण्यात आली आहे.
• मुंबईत ‘भारतीय बँक असोसिएशन (IBA)’ने या विषयावर चर्चा केली आहे.
• UFBU ने असे स्पष्ट केले की, बँक कर्मचारी दररोज ४५ मिनिटे जास्त काम करतील.

आंतरराष्ट्रीय

१) क्रीमियात सार्वमत

• रशियात विलीन व्हायचे की, युक्रेनमध्ये राहायचे या प्रश्नावर क्रीमियामध्ये सार्वमत घेण्यात आले.
• या मतदानातील मतपत्रिकेमध्ये पुढील प्रश्नांचा समावेश होता.
१.क्रीमियाने रशियामध्ये सामील व्हावे का?
२. १९९२ च्या घटनेनुसार युक्रेनला त्याचा पुर्विचाच दर्जा दिला जावा का?
३.युक्रेनला अधिक स्वायततेची गरज आहे का?
• रशियाने संयुक्त राष्ट्राच्या ठरावाविरोधात आपल्या नकाराधिकाराचा वापर केला आहे. अमेरिका व ब्रिटनने मात्र या सार्वमतास विरोध केला आहे. चीनने याप्रकरणी तटस्थ भूमिका घेतली आहे.

राज्य बातम्या

१) श्रीलंका क्रिकेट संघाच्या कराराचा वाद


• श्रीलंका क्रिकेट मंडळाने दिलेल्या करारावर खेळाडूंनी सह्या करण्यास नकार दिला आहे.
• हा प्रस्ताव प्रोत्साहनपर रक्कम देण्यासंबंधी आहे.
• आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल ICC कडून मिळणाऱ्या रक्कमेत खेळाडूंना वाटा हवा आहे.
• यापूर्वी एकूण मिळणाऱ्या रक्कमेतून २०% वाटा मिळावा अशी खेळाडूची मागणी होती पण आता खेळाडू १२% वर तयार झालेले आहेत.
• मात्र श्रीलंकन क्रिकेट मंडळाला हे मान्य नाही.
विशेष लेख हे सदर सुरु झाले आहे. विशेष लेख वाचण्यासाठी खालील लिंक वर click करा किंवा या पानावरील 'विशेष लेख' या लिंकवर click करा.  • 'डेंग्यूविरोधात तू आणि मी' - राष्ट्रीय अभियानास सुरुवात ..........-by BK Core Group New...
  • CPSE-ETF च्या स्थापनेची तयारी पूर्ण ..........-by BK Core Group New...
  • प्रिय मित्रहो, आपणास काही शंका किंवा प्रश्न असतील तर आम्हांस जरूर कळवा. आपल्या चांगल्या आणि वाईट सर्व प्रकारच्या सूचना नेहमीच स्वागतार्ह आहेत. इ-मेल : shivraj@anushri.org    कृपया CONTACT US या सदरात जाऊन स्वतःचे REGISTRATION (नोंदणी) करा. मार्च महिन्याचे मासिक केवळ नोंदणी केलेल्या सदस्यांनाच मोफत मिळेल.