राष्ट्रीय

१) बीजेपी चे महिलांसाठी “अॅप”

• निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन महिला मतदारांना खुश करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने महिलांच्या सुरक्षेसाठी एक मोबाईल अॅप तयार केले आहे.
• या मोबाईल अॅप चे नाव “रक्षा” असे असून, हे अॅप संकटाच्या वेळी महिलांना विशिष्ट आवाज करून सावध करणार आहे.
• अॅपची संकल्पना ‘मीनाक्षी लेखी’ यांची असून त्या बीजेपीच्या प्रवक्त्या आहेत.
• ह्या अॅपचे नियंत्रण एक विश्वासू गट करणार असून, दिशादर्शक नकाशाच्या साह्याने संकटाच्या वेळी अॅप धोक्याची घंटा वाजवणार आहे.
• जर रक्षा अॅप बंद झाल्यास फक्त मोबाईलच्या आवाजाचे बटन (volume key) तीन सेकंद दाबून धरल्यास ज्या वेळेला धोका निर्माण होईल तेव्हा त्या स्त्रीने जो क्रमांक निवडलेला असेल त्या क्रमांकावर ती सूचना जाणार आहे.

२) मोदी वाराणसीतून निवडणूक लढवणार

• नरेंद्र मोदी वाराणसीतून निवडणूक लढवणार असून भाजपचे अध्यक्ष राजनाथ सिंह हे लखनौमधून निवडणूक लढवणार आहेत.
• मुरली मनोहर जोशी यांनी मोदीसाठी परंपरागत वाराणसी मतदारसंघ सोडला असून जोशी कानपुरमधून निवडणूक लढवणार आहेत.

३) देवयानी खोब्रागडे यांच्या अटकेचे वॉरन्ट

• व्हिसा गैरव्यवहार व सत्य माहिती लपवणे याप्रकरणी मॅनहॅटन येथील न्यायालयाने नव्याने आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
• न्यायालयाने आरोपपत्र दाखल करून घेऊन अटक वॉरन्ट जरी केले आहे.

४) १४ नक्षलवाद्यांना अटक

• छत्तीसगड पोलीस व नक्षलवादी यांच्यात सुरगुजा भागातील बलरामपूर जिल्ह्यातील जंगली भागात मोठी चकमक झाली.
• त्यानंतर लाहसपथ भागातील जंगलात धरपकड करण्यात येऊन चार महिला नक्षलवाद्यांसह १४ नक्षलवाद्यांना अटक करण्यात आले.

५) निर्भया प्रकरणी दोघांच्या फाशीला स्थगिती

• दिल्ली- निर्भया बलात्कार प्रकरणी दिलेल्या फाशीच्या शिक्षेला दिल्ली उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. यापूर्वीच्या सुनावणीमध्ये ही फाशी कायम करण्यात आली होती.
• खंडपीठाने तातडीने घेतलेल्या या सुनावणीत हा निर्णय घेण्यात आला.
• हे प्रकरण पुन्हा खंडपीठाकडे येण्यासाठी संबंधीत आरोपी सरन्यायाधीशांकडे अर्ज करू शकतात.

आंतरराष्ट्रीय

१) लादेनला शोधण्यात मदत करणाऱ्या डॉक्टरच्या शिक्षेत कपात

• FATA लवादाने डॉ. शकील आफ्रिदी यांना ३३ वर्ष व ३ लाख रुपये दंडाची शिक्षा २०१२ मध्ये दिली होती.
• CFR आयुक्तांनी जुन्या आदेशाचे समर्थन करत डॉ. आफ्रिदीच्या शिक्षेमध्ये दहा वर्षाची कपात केली.
• हा निर्णय अनपेक्षित असल्यामुळे आफ्रिदीचे वकील याविरुध्द याचिका दाखल करणार आहेत.
• डॉ. आफ्रिदी यांना लष्कर-ए-इस्लामशी संबंध ठेऊन देशद्रोहाचा गुन्हा केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले होते.

२) युक्रेनप्रकरणी पुतीन - मून चर्चा

• संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस बान की मून यांनी रशियाचे अध्यक्ष वाल्दीमीर पुतीन यांच्याबरोबर युक्रेनसंबंधी चर्चा केली.
• क्रीमियावर नियंत्रण प्रस्थापित करण्याचे रुपांतर मोठ्या तंट्यात होऊन जागतिक शांतता धोक्यात येण्याची शक्यता त्यांनी पुतीन यांच्याजवळ व्यक्त केली.
• मास्कोमध्ये आंदोलन करण्यात आले, यात रशियाच्या कृतीबद्दल निषेध व्यक्त करण्यात आला.
• यात “रशियाने आपले सैन्य माघारी घेऊन शीतयुध्द संघर्ष समाप्त करावे” अशी आंदोलकांची मागणी आहे.

३) आता बाजरीपासून कपडे

• इटलीची राजधानी रोममधील ‘फूड अॅन्ड अॅग्रीकल्चर ऑर्गनायझेशन’ने बाजरीपासून कापड बनवण्याचे ठरवले आहे.
• त्यासाठी राजस्थानच्या जोबनेरमधील श्री कर्ण नरेंद्र कृषी विद्यापीठही मदत करणार आहे.
• बाजरी हे असे एकमेव पिक आहे की, ज्यामध्ये फूड, फोडर, फर्टिलायझर, फ्युअल आणि फायबर असे पाचही घटक त्यामध्ये असतात.

४) फ्रान्सची प्रदूषण विरोधी मोहीम

• फ्रान्सच्या उत्तरेकडील प्रदेशामध्ये हवेची गुणवत्ता ढासळली असून त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी फ्रान्स सरकारने पाऊल उचलले आहे.
• त्या अंतर्गत आठवड्याच्या शेवटी सरकारतर्फे “मोफत प्रवास” ही योजना राबवण्यात येणार आहे.
• विशेषतः ही योजना पॅरिस व त्याच्या आजूबाजूच्या परिसरात राबवण्यात येणार आहे.
• कारण वाढत्या प्रदूषणामुळे शहरातील तापमानामध्ये वाढ होत असून त्याच्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.
• शहरातील या प्रदुषणामध्ये वाहनातून निघणारा धूर, कारखान्यातून निघणारा धूर हा जबाबदार आहे.
• शहरातील खाजगी वाहनांची संख्या वरचेवर वाढत असल्यामुळे प्रदूषणाची घनता दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे सरकारी पातळीवर हे पाऊल उचलण्यात आले आहे.
• पॅरीसमध्ये लोकांना सायकल, इलेक्ट्रॅानिक कार वापरण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे.
• त्याचबरोबर काही मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आलेल्या आहेत.
i) प्रकाशासाठी घराबाहेर शेकोट्या पेटवू नयेत
ii) वाहने कमी वेगाने चालवावीत.
iii) शाररिक त्रास टाळण्यासाठी ६ वर्षाखालील लहान मुलांना घराबाहेर काढू नये.

राज्य बातम्या

१) असे हे इमारत सल्लागार

• मुंबईमध्ये पुनर्विकासाची मलई खाण्यासाठी इमारत धोकादायक असल्याबाबत सल्लागारांकडून खोटा अहवाल देण्यात येतो.
• सध्या सल्लागाराने ठरवलेल्या १५ इमारतीची पाहणी मुंबई पालीकेने केली असून त्यातील अनेक इमारती उत्तम असल्याचे दिसून आले आहे.
विशेष लेख हे सदर सुरु झाले आहे. विशेष लेख वाचण्यासाठी खालील लिंक वर click करा किंवा या पानावरील 'विशेष लेख' या लिंकवर click करा.  • 'डेंग्यूविरोधात तू आणि मी' - राष्ट्रीय अभियानास सुरुवात ..........-by BK Core Group New...
  • CPSE-ETF च्या स्थापनेची तयारी पूर्ण ..........-by BK Core Group New...
  • प्रिय मित्रहो, आपणास काही शंका किंवा प्रश्न असतील तर आम्हांस जरूर कळवा. आपल्या चांगल्या आणि वाईट सर्व प्रकारच्या सूचना नेहमीच स्वागतार्ह आहेत. इ-मेल : shrikar98@gmail.com    कृपया CONTACT US या सदरात जाऊन स्वतःचे REGISTRATION (नोंदणी) करा. मार्च महिन्याचे मासिक केवळ नोंदणी केलेल्या सदस्यांनाच मोफत मिळेल.