दैनिक बातम्या व विश्लेषण : दिनांक – १६ मार्च २०१४

राष्ट्रीय

१) अमेरिकेचा माज उतरेना – देवयानी खोब्रागडेंवर पुन्हा आरोपपत्र दाखल

Manhatten मधील अटर्नी प्रीत भरारा यांनी आज त्यांच्यावर पुन्हा एकदा आरोपपत्र दाखल केलेय.
यापूर्वीचे देवायानिवरील आरोप – व्हिसा गैरव्यवहार, मोलकरणीचा छळ करणे (निर्धारित वेतनापेक्षा कमी वेतन दिले मात्र काम जास्त करवून घेतले), सत्य माहिती दडवून ठेवणे.

आंतरराष्ट्रीय

१) युक्रेन तिढा : आज होतेय क्रीमियात सार्वमत

• रशियात सामील व्हायचे की नाही याबाबत आज क्रिमीया या युक्रेनमधील प्रांतात सार्वमत घेतले जाणार आहे.
• दरम्यान संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस बान-की-मून यांनी रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांच्याशी चर्चा करून शांततेच्या मार्गाने जाण्यास सुचवले. एखाद्या प्रदेशाच्या अधिग्रहनाने शांती भंग होण्याशिवाय हाती काहीच लागत नाही, हेच कदाचित त्यांना सुचवायचे होते.
## युक्रेनमधील घटनाक्रम उलगडवून दाखवणारी दिनदर्शिका वाचण्यासाठी खालील लिंकवर click करा.
 • दिनदर्शिका - युक्रेन : आत्तापर्यंतच्या घडामोडी ....-by Bhushan New...
 • २) डॉ. शकील आफ्रिदी –शिक्षेत कपात.

  • ओसामा बिन लादेनचा ठावठिकाणा CIA ला सांगितल्यानेच ओसामा ला ओबामा ठार करू शकले होते.
  • मात्र त्यांनतर लष्कर-ए-इस्लाम या संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपाखाली पाकिस्तानने त्यांना पकडले व ३३ वर्षे शिक्षा सुनावली.
  • त्यावर वरील लवादात त्यांनी अपील केले.
  • या लवादाने त्यांची शिक्षा १० वर्षांनी कमी केलीय.
  • ओसामा बिन लादेन = अल-कायदा प्रमुख. अमेरिकेवरील ९/११ च्या हल्ल्याचा सूत्रधार (मास्तरमाइंड)
  • CIA = अमेरिकी गुप्तचर संस्था. (Central Intelligence Agency)

  अर्थव्यवस्था

  १) MCX-STOCK EXCHANGE : अध्यक्ष जी के पिल्लई यांचा राजीनामा

  • CBI ने आरोपपत्रात म्हटले होते की, या EXCHANGE मध्ये विवध पदांवर पात्र नसलेल्या व्यक्ती भरल्या गेल्या आहेत.
  • त्यावर MCX-STOCK EXCHANGE चे अध्यक्ष जी के पिल्लई यांनी राजीनामा दिलाय.
  • जी के पिल्लई = माजी केंद्रीय गृह सचिव
  • नवे अध्यक्ष = THOMAS MATHEW ( माजी LIC अध्यक्ष)
  • कालच सेबीचे माजी अध्यक्ष सी बी भावे व इतर अधिकारी यांच्यावर MCX – STOCK EXCHANGE ला नियमबाह्य मान्यता दिल्याबद्दल गुन्हा दाखल केला गेलाय.

  २) दुसऱ्या बँकेच्या ATM वापरावर किमान महानगरात तरी शुल्क आकारू द्या – भारतीय बँक संघटनेची RBI कड़े मागणी

  • सध्या दुसऱ्या बँकेचे ATM महिन्यातून ५ वेळा मोफत वापरता येते. मात्र सम्बंधित बँकेला यासाठी १५ रु खर्च येतो.
  • ATM सम्बंधित वाढत्या हल्यांच्या घटनांमुळे RBI ने ATM ला अत्याधुनिक साधनांद्वारे सुसज्ज बनवायला सांगितलेय. त्याचा खर्च प्रचंड होणार आहे.
  • त्यामुळे मोफत ५ व्यवहारांची सेवा ग्रामीण भागात कायम ठेवून महानगरात मात्र त्यावर चार्ज आकारावा अशी मागणी संघटनेने केलीय.

  ३) घाऊक महागाई दर घसरला

  • फेब्रुवारी महिन्यात घाऊक महागाई दरात कपात झालीय. ४.६८%
  • किरकोळ महागाई दरही २५ महिन्यांच्या नीचांकी स्तरावर पोहोचलाय. ८.१०%
  • याचा चांगला परिणाम म्हणजे RBI येत्या वित्तीय धोरणात व्याजदर कपात करू शकते. ( व्याजदर कपात = लोकांना कमी व्याजदरात कर्ज मिळतील. = वस्तू खरेदी करण्याची त्यांची क्षमता वाढेल. = अर्थव्यवस्था मजबूत बनेल. म्हणजेच GDP वाढेल. )

  संक्षिप्त

  • मीर रंजन नेगी – आंतरराष्ट्रीय हॉकीपटू

  ‘चक दे इंडिया’ हा हॉकीवर आधारित चित्रपट तयार करण्यात महत्वाची भूमिका पार पडली होती.

  • २०२२ चा फुटबॉल विश्वचषक कतार या देशात होणार आहे.  विशेष लेख हे सदर सुरु झाले आहे. विशेष लेख वाचण्यासाठी खालील लिंक वर click करा किंवा या पानावरील 'विशेष लेख' या लिंकवर click करा. • 'डेंग्यूविरोधात तू आणि मी' - राष्ट्रीय अभियानास सुरुवात ..........-by BK Core Group New...
 • CPSE-ETF च्या स्थापनेची तयारी पूर्ण ..........-by BK Core Group New...
 • प्रिय मित्रहो, आपणास काही शंका किंवा प्रश्न असतील तर आम्हांस जरूर कळवा. आपल्या चांगल्या आणि वाईट सर्व प्रकारच्या सूचना नेहमीच स्वागतार्ह आहेत. इ-मेल : bhushan@anushri.org
  किंवा SMS करा या नंबरवर 9404640322 (फक्त SMS )  ...... आणि हो आपणास ही वेबसाईट कशी वाटतेय, कोणत्या बाबी अजून add कराव्या, कोणत्या गोष्टींमध्ये बदल करावासा वाटतोय या बद्दलची आपली मत जरूर कळवा.

  कृपया CONTACT US या सदरात जाऊन स्वतःचे REGISTRATION (नोंदणी) करा. मार्च महिन्याचे मासिक केवळ नोंदणी केलेल्या सदस्यांनाच मोफत मिळेल.