राष्ट्रीय घडामोडी

१) इंडिया टीव्हीच्या संपादकीय संचालकाचा राजीनामा

• इंडिया टीव्हीचे संपादकीय संचालक कमर वहिद नकवी यांनी राजीनामा दिला.
• भाजप नेते नरेंद्र मोदी यांची मुलाखत अगोदरच फिक्स केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.

२) एक्झिट पोलला बंदी

• ही बंदी भारतीय निवडणूक आयोगाने लावली आहे.
• या बंदीचा कालावधी ७ एप्रिल ते १२ मे २०१४ असा असणार आहे.
• ही बंदी देशातील लोकसभा निवडणुकीबरोबर आंध्र प्रदेश, ओडिशा, सिक्कीम, आणि अरुणाचल प्रदेश या राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठीही लागू असणार आहे.

३) रिलायन्सला सवलत द्या

• रिलायन्सच्या KG-D6 या नैसर्गिक वायू उत्पादन क्षेत्र असलेल्या भागामधून वायू उत्पादन करण्याची अंतिम मुदत उलटून गेली आहे.
• त्यामुळे या कंपनीला नियमात सवलत देऊन वायू उत्पादन करू द्यावे असा प्रस्ताव केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने मंत्रिमंडळासमोर ठेवला आहे.
• या भागात नैसर्गिक वायूची तीन क्षेत्र आहेत.
• त्याची किंमत १.४५ अब्ज डॉलर्स इतकी आहे.
• या संदर्भात नियमन संस्था असलेल्या हायड्रोकार्बन संचालनालयाने रिलायन्स कंपनी चाचणी करू न शकल्याने व कंपनी आपली व्यावसायिकता सिद्ध करू न शकल्याने हे क्षेत्र कंपनीकडून काढून घेण्याची शिफारस केली होती.
• या क्षेत्रामध्ये एकूण ३४५ अब्ज क्युबिक घनफूट इतका नैसर्गिक वायुसाठा असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

४) तृतीय पंथीयांना OBCचा दर्जा

• सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला तृतीय पंथीयांना सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांचा (OBC)दर्जा देण्याचे निर्देश दिले आहेत.
• स्त्री व पुरुषाप्रमाणे हेदेखील एक स्वतंत्र लिंग (जेन्डर) असल्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे.

• त्याचबरोबर शिक्षण व नोकरीमध्येपण प्रवेश व रोजगार मिळवण्याचा अधिकार असल्याचे मत न्यालयाने व्यक्त केले आहे.

आंतरराष्ट्रीय घडामोडी

१) शिकारीमुळे गेंड्यांच्या संख्येत घट

• वन्य गेंड्यांची शिकार थांबली नाही तर, त्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
• सध्या जगात २५००० गेंडे शिल्लक आहेत. यापैकी २० हजार पांढरे तर ५ हजार काळे गेंडे शिल्लक आहेत.
• काळ्या व पांढऱ्या गेंड्यांच्या शिकारीचे प्रमाण गेल्या दहा वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.
• या विषयावर चर्चा करण्यासाठी आफ्रिकेत प्रिटोरिया येथे वन्यजीव गुन्हेगारी शिखर परिषद भरली होती.
• या परिषदेत एकूण १४० सदस्य तज्ञ सहभागी झालेले होते.
• ही परिषदा दक्षिण आफ्रिका सरकारने गेंड्यांच्या शिंगाची शिकार कायदेशीर करण्यासाठी बोलावली होती.

२) बेपत्ता विमानाच्या शोधासाठी आता ‘रोबोटिक’ पाणबुडी

• ही यंत्रमानावासारखी पाणबुडी( रोबोटिक अंडरवॅाटर ड्रोन) आहे.
• एखाद्या विमानाच्या शोधासाठी वापरली जाणारे हे पहिलेच रोबोटिक यंत्र आहे.

क्रीडा घडामोडी

१) भारतीय ज्युदोकांनी जिंकली दहा सुवर्ण

• काठमांडू येथे सातव्या आशियाई ज्युदो स्पर्धा सुरु आहेत.
• या स्पर्धेत भारतीय स्पर्धकांनी बाजी मारली असून एकूण दहा सुवर्ण, एक रौप्य आणि एक कास्य पदकांची कमाई केली आहे.

२) शाळा- महाविद्यालयांना थेट राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेता येणार

• हा निर्णय भारतीय अॅथलेटीक्स महासंघाने हा निर्णय घेतला आहे.
• राष्ट्रीय शालेय क्रीडा महासंघ व विद्यापिठांच्या स्पर्धावर अवलंबून न राहता भारतासाठी स्वतंत्रपणे अॅथलेटीक्स गुणवत्ता शोधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
• त्यामुळे यापुढे अॅथलेटीक्स स्पर्धांसाठी शाळा अथवा महाविद्यालयांना थेट संघ पाठवता येणार आहे.
• अशी स्पर्धा पुढील वर्षापासून होणार आहे.
• भारतीय अॅथलेटीक्सचा प्रचार करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
• अशी पद्धत अमेरिकेत अगोदरच सुरु आहे. त्याच धर्तीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
विशेष लेख वाचण्यासाठी खालील लिंक वर click करा किंवा या पानावरील 'विशेष लेख' या लिंकवर click करा.  • भारतीय औषध क्षेत्राचा दर्जा ........-by sk Core Group
  • 'डेंग्यूविरोधात तू आणि मी' - राष्ट्रीय अभियानास सुरुवात ..........-by BK Core Group New...
  • CPSE-ETF च्या स्थापनेची तयारी पूर्ण ..........-by BK Core Group New...
  • प्रिय मित्रहो, आपणास काही शंका किंवा प्रश्न असतील तर आम्हांस जरूर कळवा. आपल्या चांगल्या आणि वाईट सर्व प्रकारच्या सूचना नेहमीच स्वागतार्ह आहेत. इ-मेल : shivraj@anushri.org किंवा SMS करा 9404703270    कृपया CONTACT US या सदरात जाऊन स्वतःचे REGISTRATION (नोंदणी) करा. मार्च महिन्याचे मासिक केवळ नोंदणी केलेल्या सदस्यांनाच मोफत मिळेल.