राष्ट्रीय

१) ओडीसा जोगिणी बलात्कार प्रकरण – ३ दोषी तर ६ निर्दोष

> ओडीसात २००८ साली जातीय दंगल उसळली होती.
> विहिंप (विश्व हिंदू परिषद) चे नेते लक्ष्मनानन्द सरस्वती यांची हत्या झाल्याने ही दंगल उसळली होती.
> त्यावेळी कंधमाल जिल्ह्यातील एका जोगीनीवर सामुहिक बलात्कार करून तिची अर्धनग्न धिंड काढली गेली.
> त्या केसचा निकाल जिल्हा सत्र न्यायालयाने आज ६ वर्षांनी दिलाय. त्यातील एकास ११ वर्षांची शिक्षा तर दोघांना केवळ २ वर्षे २ महिने शिक्षा झालीय. (किती ही वेगवान न्यायप्रणाली!! वाह!!)
> निर्भया केस चा निकाल किती दिवसात लागला, जरा पहा बर!
> जोगीनीची ही केस अजून उच्च न्यायालय व नंतर सर्वोच्च न्यायालयात चालेल. मगच खरा न्याय (?) मिळेल त्या देवभक्त जोगीनीला!!

२) ‘बहु दिलाओ, व्होट पाओ’

> हरियानातील युवक मत मागायला येणाऱ्या लोकसभा उमेदवारांसमोर वरील मागणी करत आहेत.
> हरियानात स्त्री पुरुष प्रमाण खूपच कमी आहे. म्हणून बरेच युवक अविवाहित राहिलेत.
> स्त्री – पुरुष प्रमाण = ८७७ स्त्रिया १००० पुरुषांमागे
> कारण – स्त्री भृणहत्या
> (विशेष म्हणजे साईना नेहवाल इथलीच आहे. मात्र तरीही लोकांना मुलींच्या जन्माच स्वागत कारावस वाटत नाही.)

आंतरराष्ट्रीय

१) मुशर्रफ यांच्या नावे अजामीनपात्र warrant

> पाकिस्तानातील विशेष न्यायालयात मुशर्रफ यांच्या विरुद्ध देशद्रोहाचा खटला चालू आहे. त्या खटल्यात मुशर्रफ हे न्यायालयात हजर राहण्यास टाळाटाळ करताहेत. आपल्या जीवाला धोका आहे, हे सुरक्षेचे कारण सांगताहेत.
> त्यावर चिडून न्यायालयाने हे अटक warrant जारी केलेय.

राज्य

१) गृह विभागाच्या पदोन्नतीच्या धोरणाला CAT ची चपराक

> राज्याचा गृह विभाग अधिकाऱ्यांना पदोन्नती देताना ज्येष्ठत्व आणि कामगिरी यांचा विचारच करत नसल्याने अनेक पोलीस अधिकारी नोकरी सोडून स्वेच्छानिवृत्ती घेत आहेत, असे केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण (CAT) ने म्हटले आहे.
> ज्येष्ठ IPS अधिकारी संजय पांडे यांचा दाखला CAT ने याबाबत दिलाय.
> १५ जानेवारी १९९९ ला जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार IPS अधिकाऱ्यांच्या बढत्या करण्याचे अधिकार राज्य शासनाला देण्यात आले आहेत.

२) वीजजोडणी झाली online – महावितरणचा स्तुत्य निर्णय

> नवीन वीज जोडणी घेण्यासाठी एजंटला चिरीमिरी द्यायची किंवा कार्यालयात हेलपाटे घालायचे दिवस बहुधा संपतील असे वाटतेय. कारण महावितरणने वीजजोडणी online करण्याचा निर्णय घेतलाय.

अर्थव्यवस्था

१) हापूसला युरोपची दारे बंद

> जगभरातून कोकणातील हापूसला प्रचंड मागणी असते.
> मात्र मागील वर्षी युरोपमधील काही हापूस आंब्यांमध्ये कीटक आढळले होते. त्यामुळे आरोग्याबाबत जागरूक असणाऱ्या युरोपने हापूसच्या आयातीवर काही चाचण्यांचे बंधन लादले आहे.

# चाचण्या (या प्रक्रिया करूनच हापूसला युरोपमध्ये उतरता येईल.) =
१. उष्ण जल उपचार (hot water treatment)
२. अतिउष्ण तापमान (Vapour heat treatment)
३. किरणोत्सर्ग (radiation)

> ‘अपेडा’ने याबाबत सर्व निर्यातदारांना कळवले आहे. > अपेडा = कृषी व प्रक्रिया अन्नपदार्थ उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण

२) गर्भवती व ४५ वर्षे वयाच्या पुढील स्त्रियांना रेल्वेने लोअर बर्थ म्हणजेच खालचे सीट आरक्षित केले आहे.

> त्यांना वरील सीटवर बसताना होणाऱ्या त्रासाचा उशिराने का होईना रेल्वेने विचार केलाय.
> त्यानुसार आता आरक्षण अर्जांत बदल केला जाणार आहे.चर्चित व्यक्ती

१) टोनी बेन : निधन (८८)

> इंग्लंडमधील मजूर पक्षाचे ज्येष्ठ नेते.
> कॅबिनेट मंत्री होते.
> भारताबद्दल विशेष प्रेम बाळगणारे नेते.

२) C B भावे

> सेबीचे माजी अध्यक्ष.
> यांच्या कार्यकाळात MCX – Stock Exchange ला परवानगी देण्यात आली.
> ही परवानगी नियमबाह्य पद्धतीने दिली गेल्याचा ठपका ठेवत CBI ने भावे तसेच सेबीचे माजी सदस्य K M अब्राहम यांच्यावर FIR दाखल केलाय.
> CBI च्या या कृतीचा अनेक माजी राजनैतिक अधिकाऱ्यांनी निषेध केलाय.
> MCX – Stock Exchange ची स्थापना करणाऱ्या जिग्नेश शहा याच्या विरुद्धही गुन्हा दाखल केला गेलाय.

३) ‘ज्ञानदीप’कार आकाशानंद यांचे निधन (८१)

> आनंद बाळाजी देशपांडे
> मुंबई दूरदर्शनचे माजी उपकेंद्र संचालक आणि ज्येष्ठ निर्माते
> त्यांनी निर्मिलेला ‘ज्ञानदीप’ हा दूरदर्शनवरील कार्यक्रम खूप लोकप्रिय झाला होता.
> महाराष्ट्रात ‘ज्ञानदीप’ च्या प्रेरणेने १५० च्या वर ‘ज्ञानदीप मंडळे’ स्थापन झाली होती.

क्रीडा

१) प्रो-कबड्डी

> IPL च्या धर्तीवर मशाल स्पोर्ट्स तर्फे हा प्रयोग करण्यात येणार आहे.
> ८ शहरांचे संघ
> १०० खेळाडू – पैकी ७२ भारतीय.
> अनेक देशांतील खेळाडू भाग घेणार.

# यापूर्वी कबड्डी प्रीमिअर लीगचा (KPL) प्रयोग ‘भारतीय हौशी कबड्डी महासंघाने‘ हैदराबाद येथे करून पहिला होता. मात्र तो अपयशी ठरला होता.
# कबड्डी – या खेळात भारताने नेहमीच आघाडी घेतलेली आहे.
> बिहारची राजधानी पाटण्यात पहिली महिलांची जागतिक कबड्डी स्पर्धा पार पडली होती. त्यात भारतीय संघाने विजय मिळवला होता. त्या संघात महाराष्ट्राच्या ३ मुली होत्या.

२) ESPN – CRICK INFO चा पुरस्कार सचिनला

> पुरस्काराचे नाव – मागील २ दशकांतील पिढीतील सर्वोत्तम खेळाडू
> कसोटी = सर्वोत्तम फलंदाज – शिखर धवन
> एकदिवसीय = सर्वोत्तम फलंदाज – रोहित शर्मा
> पदार्पणवीर – मोहम्मद शमी (भारताचा मध्यमगती गोलंदाज)पुस्तक

१) ‘दुर्गदुर्गेश्वर रायगड’

> लेखक – प्रा. प्र. के. घाणेकर
> विषय – रायगडाचा सर्वंकष अभ्यास (इतिहास व पर्यटनाच्या दृष्टीने)
विशेष लेख हे सदर सुरु झाले आहे. विशेष लेख वाचण्यासाठी खालील लिंक वर click करा किंवा या पानावरील 'विशेष लेख' या लिंकवर click करा.  • 'डेंग्यूविरोधात तू आणि मी' - राष्ट्रीय अभियानास सुरुवात ..........-by BK Core Group New...
  • CPSE-ETF च्या स्थापनेची तयारी पूर्ण ..........-by BK Core Group New...
  • प्रिय मित्रहो, आपणास काही शंका किंवा प्रश्न असतील तर आम्हांस जरूर कळवा. आपल्या चांगल्या आणि वाईट सर्व प्रकारच्या सूचना नेहमीच स्वागतार्ह आहेत. इ-मेल : bhushankale2010@gmail.com    कृपया CONTACT US या सदरात जाऊन स्वतःचे REGISTRATION (नोंदणी) करा. मार्च महिन्याचे मासिक केवळ नोंदणी केलेल्या सदस्यांनाच मोफत मिळेल.