Click To Download Magazine[April/May/June/July 2014] मासिक Download करण्यासाठी क्लिक करा

६८ व्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा .... HAPPY INDEPENDENCE DAY


दैनिक बातम्या व विश्लेषण : दिनांक – १५ ऑगस्ट २०१४

व्यय व्यवस्थापन आयोग स्थापन

केंद्र सरकारने अन्न, तेल आणि खतांवरील अनुदाने कमी करण्यासाठी हा आयोग स्थापन केला आहे. हा आयोग वरील गोष्टींवरील अनुदान कमी करून वित्तीय तुट आटोक्यात कशी आणता येईल, याबाबत सरकारला शिफारसी करेल. सध्या वित्तीय तुट चिंताजनक पातळीपर्यंत पोहोचली आहे.
अध्यक्ष – डॉ. बिमल जालान (RBI चे माजी गव्हर्नर)
सदस्य – सुमित बोस (माजी वित्त सचिव) & सुबीर गोकर्ण (ख्यातनाम अर्थतज्ञ)
हा आयोग २०१५ च्या बजेटपूर्वी आपला अंतरिम अहवाल सादर करेल. अंतिम अहवाल २०१६ च्या बजेटपूर्वी सादर केला जाईल.


‘न्यायिक नियुक्ती आयोग विधेयक’ संसदेत संमत

संसदेने आज न्यायव्यवस्थेत अमुलाग्र बदल घडवून आणणारे विधेयक - न्यायिक नियुक्ती आयोग विधेयक – एकमताने सम्मत केले. त्यानुसार आता सर्वोच्च आणि उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नियुक्त्या करण्यासाठी एक आयोग - न्यायिक नियुक्ती आयोग – स्थापन केला जाईल.
• या न्यायिक नियुक्ती आयोगामध्ये कोण कोण असेल?
सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश + सर्वोच्च न्यायालयातील २ न्यायाधीश + कायदा मंत्री + कायदा क्षेत्रातील २ ख्यातनाम व्यक्ती
यापूर्वी १९९३ साली स. न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार ‘कॉलेजीअम’ म्हणजेच ‘निवड मंडळा’मार्फत ह्या नियुक्त्या होत असत. या कॉलेजीअम मध्ये केवळ न्यायाधीशांचाच समावेश असे. मात्र या पद्धतीत अनेक दोष निर्माण झाले आहेत. (अपारदर्शकता, एकांगीपणा, भ्रष्टाचार, इ.)
कायदा मंत्री – रवी शंकर प्रसाद


CAPART ला पुनरुज्जीवित केले जाणार

CAPART = Council for Advancement of People’s Action and Rural Technology
= जन कृती आणि ग्रामीण तंत्रज्ञान विकास परिषद
केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाने CAPART ला पुनरुज्जीवित करण्याचे ठरवले आहे. CAPART सध्या ग्रामीण भागातील १२ हजार स्वयंसेवी संस्थांना सहाय्य करत आहे. त्यामुळे ग्रामीण विकासातील तो एक महत्वाचा घटक ठरला आहे.
त्यासाठी ग्रामविकास मंत्री नितीन गडकरी यांनी CAPART ला खालील प्रकारची मदत करण्याचे ठरवले आहे :
• आर्थिक मदत
• CAPART मध्ये पारदर्शकता येण्यासाठी – इ-गव्हर्नन्स


सिगारेट आणि बिडीवर बंदी घालण्यासंदर्भात SC ची केंद्र आणि राज्यांना नोटीस

एका जनहित याचिकेसंदर्भात स. न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारांकडून सिगारेट आणि बिडी बंदीबाबत मत मांडण्याचे निर्देश दिले आहेत.
• देशात २००८ पासून सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यास मनाई आहे.
• जगात दरवर्षी तंबाखू सेवनाने ६० लाख लोक मरतात.


संसदेचे अधिवेशन संपले

संसदेच्या या अधिवेशनास निरोप देताना लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन आणि राज्यसभेचे सभापती मोहम्मद हमीद अन्सारी यांनी निरोपपर भाषणे केली. त्यात त्यांनी एकूण झालेल्या कामकाजाचा लेखाजोखा मांडला.
या अधिवेशनात खालील महत्वपूर्ण बाबींवर चर्चा झाली :
• बजेट (जनरल & रेल्वे)
• न्यायिक नियुक्ती आयोग विधेयक संमत
• ‘विमा क्षेत्रात ४९% परकीय गुंतवणूक विधेयक’ पास झाले नाही. ते अधिक अभ्यासासाठी राज्यसभेच्या select कमिटीकडे रवाना. पुढील अधिवेशनात मांडले जाणार.
• चलन फुगवटा, महागाई, पूर आणि दुष्काळ, UPSC-CSAT, लोकसभा अध्यक्षांचा कथित पक्षपातीपणा, महिला आणि बालकांवरील अत्याचार, जातीय आणि धार्मिक हिंसाचार इ.
(संसदीय कार्य मंत्री – वेंकय्या नायडू)


विमा कायदे (दुरुस्ती) विधेयक २००८ ची रवानगी select समितीकडे

या संसदीय अधिवेशनात विमा कायदे (दुरुस्ती) विधेयक २००८ सम्मत होऊ शकले नाही. त्यामुळे सरकारने त्यास select समितीकडे पाठवले आहे. ही समिती यावर विचार करून आपला अहवाल पुढील अधिवेशनात संसदेसमोर मांडेल.
या विधेयकानुसार विमा क्षेत्रात थेट परकीय गुंतवणूक आताच्या २६% वरून ४९% करण्याचे प्रस्तावित आहे.


'पीएसएलव्ही सी-२३' ने ५ परदेशी उपग्रह अवकाशात धाडले

फेब्रुवारी २०१३ साली इस्रोने पीएसएलव्ही सी-२० च्या माध्यमातून यशस्वीरित्या सहा परदेशी कमी वजनाचे उपग्रह अवकाशात पाठवल्यानंतर आता भारताच्या इस्त्रोने अजून एक विक्रम केला आहे.
'पीएसएलव्ही सी-२३'च्या माध्यामातून इस्त्रोने आणखी पाच परदेशी उपग्रहांचे यशस्वीरित्या प्रक्षेपण केले आहे.

पाच परदेशी उपग्रह असलेल्या भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो)च्या पीएसएलव्ही सी २३ या प्रक्षेपकाने सोमवारी सकाळी यशस्वीपणे ३० जून २०१४ मध्ये उड्डाण केले. हा उड्डाण कार्यक्रम बघण्यासाठी नरेंद्र मोदी स्वतः हजर होते.
स्थळ – सतीश धवन अंतराळ केंद्र, श्रीहरीकोटा
'पीएसएलव्ही सी-२३' ने खालील ५ उपग्रह प्रक्षेपित केले :-
१. फ्रान्सचा पृथ्वी निरीक्षण उपग्रह स्पॉट ७ (वजन ७१४ किलो)
२. जर्मनीचा आयसॅट (१४ किलो),
३.४. कॅनडाचे १५ किलो वजनाचे दोन उपग्रह आणि
५. सिंगापूरचा व्हेलॉक्स-१ (वजन ७ किलो)

कॅनडाचे एनएलएस ७.१ व एनएलएस ७.२ हे उपग्रह टोरांटो विद्यापीठाने तयार केले आहेत.
व्हेलॉक्स हा सिंगापूरच्या न्यानयांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीने तयार केलेला उपग्रह आहे.

हे उड्डाण करण्यास या प्रक्षेपकाला केवळ १०० कोटी रू. खर्च आला.

'पीएसएलव्ही' आत्तापर्यंत तब्बल ३५ परदेशी उपग्रह अवकाशात यशस्वीरित्या पाठविले आहेत.

'पीएसएलव्ही सी-२३' :-
वजन – २२९ टन
उंची – ४४.५ मीटर
व्यास – २.८ मीटर


दहीहंडीत २० फुटांच्या वर थर रचले जाणार आणि १२ वर्षांपुढील मुले भाग घेऊ शकणार – SC चा निर्णय

मुंबई उच्च न्यायालयाने २० फुटांच्या वर दहीहंडी रचण्यास बंदी घातली होती. तसेच १८ वर्षांखालील मुलांना यात सहभागी होण्यास मज्जाव केला होता. मात्र आज स. न्यायालयाने ह्या निकालास स्थगिती दिली आहे.
आता १२ वर्षांपुढील मुले दहीहंडीत भाग घेऊ शकतील. मात्र त्यासाठी महाराष्ट्र शासनाला ‘महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगा’ने घालून दिलेली मानके पाळावी लागतील.
काय आहेत ‘महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगा’ची मानके ?
• गोविंदांच्या डोक्यात हेल्मेट
• खाली गादी, इ.


शेर सिंग राणाला जन्मठेप

राणाने २००१ साली फुलन देवीची हत्या केली होती. फुलन देवी ही तेंव्हा समाजवादी पक्षाची खासदार (मिर्झापूर) होती. तिच्या मर्डरमधील अन्य १० जनांना दिल्लीच्या एका न्यायालयाने निर्दोष सोडले आहे.


शिकाऊ उमेदवारांच्या छात्रवृत्तीत ४०% वाढ

मनुष्यबळ विकास मंत्रालयाने शिकाऊ उमेदवारांच्या छात्रवृत्तीत (Apprentice stippend) ४०% वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. दरवर्षी सुमारे १ लाख विद्यार्थी शिकाऊ म्हणून विविध कंपन्यांत जॉईन होतात. यापूर्वी २००१ मध्ये वाढ करण्यात आली होती.
Apprentice Act – १९६१

......................YOU MAY ALSO LIKE.......................


दैनिक बातम्या व विश्लेषण - RECENT POSTS

  • १३ ऑगस्ट २०१४ - दैनिक बातम्या व विश्लेषण New...

  • विशेष लेख

  • 'डेंग्यूविरोधात तू आणि मी' - राष्ट्रीय अभियानास सुरुवात ..........-by BK Core Group New...
  • CPSE-ETF च्या स्थापनेची तयारी पूर्ण ..........-by BK Core Group New...

  • इ-मेल : bhushankale2010@gmail.com
    SMS - 7588068356

    कृपया CONTACT US या सदरात जाऊन स्वतःचे REGISTRATION (नोंदणी) करा. मासिक आणि इतर सुविधा केवळ नोंदणी केलेल्या सदस्यांनाच मोफत मिळतील.