राष्ट्रीय बातम्या दिनांक १४/०३/२०१४

1) नंदन निलेकणी यांचा राजीनामा

• नंदन निलेकणी यांनी “आधार” ( आयडेंटीफिकेशन ऑथेरिटी अॅंड इंडिया ) या प्रकल्पाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
• त्यांनी २००७ मध्ये इन्फोसिसमधून बाहेर पडल्यानंतर “आधार” प्रकल्पाची सूत्रे हाती घेतली होती.
• त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला असून बंगळूरू मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.

2) निवडणुकीसाठी IRS अधिकाऱ्याची नेमणूक

• निवडणुकीत काळ्या पैशाचा गैरव्यवहार रोखण्यासाठी ७०० महसूल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे.
• निवडणूक आयोगाने केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ व केंद्रीय उत्पादन व सीमा शुल्क मंडळाला या कामासाठी योग्य अशा अधिकाऱ्यांची नावे सुचवण्यास सांगितले आहे.
• या अधिकाऱ्यांचे पद “ निवडणूक खर्च निरीक्षक” असे राहणार आहे.
• अधिकाऱ्यांची कामे : मतदानात पैशाचा गैरव्यवहार, मतदान केंद्रावर मतदारांना आणण्यासाठी लालूच दाखवणे, असे प्रकार रोखणे.

3) प्लॅस्टिकचे मतदान ओळखपत्र

• प्लॅस्टिकचे मतदान ओळखपत्र देणारे देशातील नागलॅंड आणि आसाम हे पहिले राज्य ठरले आहे.
• या राज्यातील मतदार या मतदान ओळखपत्राचा वापर पहिल्यांदाच येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत करणार आहेत.

आंतरराष्ट्रीय बातम्या

1) व्हिसा गैरवापर प्रकरणी देवयानी खोब्रागडे निर्दोष

• देवयानीला पूर्णपणे राजनैतिक संरक्षण असल्याचा निकाल देऊन व्हिसा गैरवापर केल्याचा आरोप अमेरिकेतील न्यायालयाने फेटाळला आहे.
• संयुक्त राष्ट्रामध्ये भारताच्या विशेष दूत म्हणून जेव्हा अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने मान्यता दिली, त्याचवेळी खोब्रागडे यांना पूणपणे राजनैतिक संरक्षण प्राप्त झाले होते.

2) युरोपियन युनियनने युक्रेनला ११ अब्ज युरोचे कर्ज मंजूर केले.

• रशियाबरोबरच्या वादामुळे युक्रेनच्या अर्थव्यवस्थेची जी घसरण झालेली आहे ती भरून काढण्यासाठी हे कर्ज मंजूर करण्यात आले आहे.
• या मदतीविषयी ब्रुसेल येथे १३ मार्च २०१४ मध्ये होणाऱ्या युरोपियन युनियन बैठकीत चर्चा होणार आहे. त्यानंतर IMF (आंतरराष्ट्रीय नाणेनिधी) व युक्रेन यांच्यामध्ये करार होणार आहे.
• या मदतीमध्ये १.६ अब्ज युरो हे प्रत्यक्ष कर्जाच्या रुपात देण्यात येणार आहे तर १.४ अब्ज युरो हे अनुदानाच्या स्वरुपात देण्याचे ठरले आहे.
• दोन वर्षानंतर ३ अब्ज युरो हे युरोपियन बँकेकडून मिळणार आहेत.त्यातील ५ अब्ज युरो हे युरोपियन बँकेच्या पुनर्बांधणी आणि विकासासाठी वापरले जाणार.
• अमेरिकेने सुध्दा युक्रेनला १ अब्ज डॉलरचे कर्ज देऊ केले आहे.त्याचबरोबर तांत्रिक साह्य करण्याचे सुध्दा आश्वासन दिले आहे.

अर्थविषयक बातम्या

1) भारताची निर्यात फेब्रुवारी २०१४ मध्ये घटली

• भारताची फेब्रुवारीतील निर्यात ३.६७% ने घटली असून ही मागील आठ महिन्यातील झालेली पहिली घट आहे.
• त्याबरोबरच भारतातील आयात सुध्दा १७.०९% नी घटली आहे.
• ह्या वरील दोन्ही बाबींचा विचार केला तर व्यापारी तुट ही ८.१ अब्ज डॉलरवर आली आहे.
• आयतीतील जी घट दिसून येत आहे त्याचे महत्वाचे कारण म्हणजे तेलाच्या आयातीतील ३.१% ची घट व सोन्याच्या आयातीतील घट.
• एप्रिल २०१३ ते फेब्रुवारी २०१४ या काळामध्ये निर्यातीत ४.८% वाढ झाली तर आयातीमध्ये ८.७% नी घट झाली आहे.
• २०१३-१४ या काळातील व्यापारी तूटही कमी झालेली आहे ती १२८०८६.२ दशलक्ष डॉलर आहे. हीच तुट २०१२-१३ मध्ये १७९९२९.६४ दशलक्ष डॉलर होती.

कृपया CONTACT US या सदरात जाऊन स्वतःचे REGISTRATION (नोंदणी) करा. मार्च महिन्याचे मासिक केवळ नोंदणी केलेल्या सदस्यांनाच मोफत मिळेल.