राष्ट्रीय

१) निर्भया खटला -(दिल्ली बलात्कार केस): चौघा नराधमांची फाशी उच्च न्यायालयाकडून कायम

१६ डिसेंबर २०१२ रोजी दिल्ली येथे धावत्या बसमध्ये घडलेल्या सामुहिक बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींना जलदगती न्यायालयाने दिलेली फाशीची शिक्षा आज उच्च न्यायालयानेही कायम ठेवली.
एकूण ६ आरोपींपैकी एक अल्पवयीन असून तो बालसुधारगृहात आहे तर एकाने आत्महत्या केलीय.

२) व्हिसा गैरवापर प्रकरणी देवयानी खोब्रागडे दोषमुक्त

अमेरिकेच्या न्यायालयाने हा निकाल दिला.
देवयानी यांना संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताच्या विशेष म्हणून अमेरिकी सरकारने मान्यता दिली त्याच वेळी त्यांना पूर्णपणे राजनैतिक संरक्षण प्राप्त झाले होते. म्हणून त्यांना आता दोषमुक्त करत आहोत असे न्यायालयाने नमूद केले.
मात्र अटर्नी भरारा यांना वाटल्यास ते पुन्हा देवयानी वर नव्याने गुन्हा दाखल करू शकतात, अशी मुभाही दिलीय.

३) नक्षलवाद्यांकडून माझ्या जीवाला धोका - बाबुलाल मरांडी

झारखंड विकास मोर्चा (प्रजातांत्रिक) पक्षाचे अध्यक्ष व झारखंडचे माजी मुख्यमंत्री बाबुलाल मरांडी यांनी नक्षलवाद्यांकडून जीवाला धोका असून पोलीस पुरेसे संरक्षण पुरवत नसल्याचे म्हटले आहे.
त्यावरून राजकीय क्षेत्रात खळबळ माजलीय.
२००७ साली मरांडी यांच्या मुलाची नक्षलवाद्यांनी हत्या केली होती.

४) छत्तीसगडमधील नक्षलवादी हल्ल्याचा बदला घेऊ - गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे

गेल्या १२ वर्षात जोर पकडलेल्या नक्षलवाद्यांनी १२ हजार नागरिक व सुरक्षारक्षकांची हत्या केलीय.
६ राज्यात नक्षलवाद फोफावलाय = महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड, बिहार, झारखंड, ओरिसा, पश्चिम बंगाल.

आंतरराष्ट्रीय

१) तालिबान्यांशी पुन्हा एकदा चर्चेस पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी तयारी दर्शवलीय.

चर्चित व्यक्ति

१) नंदन निलेकनी

‘आधार’ प्रमुख नंदन निलेकणी यांचा राजीनामा
२००७ ला इन्फोसिस सोडून आधार (Identification Authority of India) प्रकल्पाची सूत्रे सांभाळली होती.
आता ते कॉंग्रेसतर्फे बंगळूरुमधून लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत.
आधार- प्रत्येक भारतीयाला स्वतंत्र ओळख मिळवून देणारी योजना.

२) गुल पनाग

गुल पनाग ची ‘आप’ मध्ये एन्ट्री
Bollywood अभिनेत्री व माजी ‘मिस इंडिया’ गुल पनाग आपतर्फे चंदिगढमधून लोकसभेची निवडणूक लढवणार आहे.

अर्थव्यवस्था

१) जानेवारीतील आर्थिक आकडेवारी

किरकोळ किंमत आधारित महागाई दर = ८.१% (२५ महिन्यांतील नीचांक)
सध्या रेपो दर ८% आहे. तो तसाच कायम राहण्याची शक्यता पतमानांकन संस्था व्यक्त करताहेत.
RBI चे गव्हर्नर - रघुराम राजन (माजी मुख्य आर्थिक सल्लागार) - यांनी पदभार सांभाळल्यापासून ३ वेळा रेपो रेट वाढवलाय. जोपर्यंत महागाई नियंत्रणात येत नाही तो पर्यंत रेपो रेट वाढवण्याचा त्यांचा कल आहे.
RBI पतधोरण निश्चितीसाठी किरकोळ महागाई दर हा निकष सर्वात प्रमुख मानते. (या दराकडे पाहूनच पतधोरण म्हणजेच रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट SLR ई बाबी RBI ठरवते.)

२) जुने वाहन खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य करणार ‘श्रीराम ट्रांसपोर्ट फायनान्स’

‘श्रीराम ट्रांसपोर्ट फायनान्स’= वाणिज्य वाहनांच्या खरेदीला अर्थसहाय्य पुरवणारी देशातील सर्वात मोठी फायनान्स कंपनी (म्हणजे तुम्हाला एखादे न्वाहन खरेदी करायचे असेल व पैसा नसेल तर ही कंपनी तुम्हाला त्यासाठी पैसा पुरवेल. अर्थातच व्याजाने!!)
‘श्रीराम ऑटो मॉल’ = ‘श्रीराम ट्रांसपोर्ट फायनान्स’ ची उपकंपनी. हीच कंपनी आता जुन्या वाहन खरेदीसाठी पैसा पुरवणार आहे.
ऑटो मॉल = ही आपल्या देशातील एक अभिनव संकल्पना आहे. या मॉलमध्ये जुनी वाहने आपण विकूही शकतो तसेच खरेदीसुद्धा करू शकतो. तसेच त्यासाठी आपल्याला कर्जही येथेच ‘श्रीराम ट्रांसपोर्ट फायनान्स’ कडून मिळेल.
सद्ध्या ‘श्रीराम ट्रांसपोर्ट फायनान्स’ चे असे ३१ मॉल्स भारतात आहेत.

३) व्हाईट लेबल ATM

व्हाईट लेबल ATM = बँकांव्यतिरिक्त इतर संस्थांनी उभारलेले ATM
उद्देश = सध्या सार्वजनिक व खाजगी बँकांची ATM देशाच्या गरजा भागवण्यात कमी पडताहेत. तसेच ग्रामीण व दुर्गम भागात बँकिंगची सेवा पोहोचलेली नाही. म्हणून RBI ने या व्हाईट लेबल ATM ला परवानगी दिलीय.
जुलै २०१२ मध्ये याबाबत भारतीय रिझर्व बँकेने याबाबतची मार्गदर्शक तत्वे जाहीर केली.
त्यानुसार टाटा समूहाने पहिल्यांदा परवाना मिळवला.
नंतर मुथूट फायनान्स व प्रिझम पेमेन्टस यांनीही परवाने मिळवले. सध्या हे परवाने मिळालेल्या या ३ कंपन्या आहेत.
भारतातील पहिले व्हाईट लेबल ATM टाटा समूहाने जून २०१३ मध्ये महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील चंद्रपाडा या दुर्गम भागात उभारले.
‘इंडीकॅश’ = या नावाने टाटा ही ATM उभारत आहेत.
सर्वाधिक ATM असणारी बँक = SBI (स्टेट बँक ऑफ इंडिया)
सर्वाधिक व्हाईट लेबल ATM = ‘इंडीकॅश’ चेविशेष लेख हे सादर सुरु झाले आहे. विशेष लेख वाचण्यासाठी खालील लिंक वर click करा किंवा या पानावरील 'विशेष लेख' या लिंकवर click करा.  • 'डेंग्यूविरोधात तू आणि मी' - राष्ट्रीय अभियानास सुरुवात ..........-by BK Core Group New...
  • CPSE-ETF च्या स्थापनेची तयारी पूर्ण ..........-by BK Core Group New...
  • प्रिय मित्रहो, आपणास काही शंका किंवा प्रश्न असतील तर आम्हांस जरूर कळवा. आपल्या चांगल्या आणि वाईट सर्व प्रकारच्या सूचना नेहमीच स्वागतार्ह आहेत. इ-मेल : bhushankale2010@gmail.com    कृपया CONTACT US या सदरात जाऊन स्वतःचे REGISTRATION (नोंदणी) करा. मार्च महिन्याचे मासिक केवळ नोंदणी केलेल्या सदस्यांनाच मोफत मिळेल.