राष्ट्रीय

१) आमदार व खासदारांशी संबंधित खटले १ वर्षात निकाली काढा – SC

लोकप्रतिनिधी विरोधातील खटले वर्षानुवर्षे चालूच आहेत. मात्र तरीही हे आरोप असणारे लोकप्रतिनिधी संसद व विधानमंडळात बिनदिक्कत वावरतात.
सर्वोच्च न्यायालयाचा (SC) आदेश = एका वर्षात ट्रायल कोर्टांनी हे खटले निकाली काढावेत. यासाठी गरज पडल्यास दररोज सुनावणी घ्यावी.
एका वर्षात निकाल न लागल्यास काय?
= त्याची कारणे संबंधित उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना सादर करावीत. तेच पुढील निर्णय घेतील.

२) स्त्री शक्ती पुरस्कार

भारत सरकार दरवर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिनी (८ मार्च) हे पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करते.
हे ५ पुरस्कार आहेत=
१) माता जिजाबाई
२) राणी लक्ष्मीबाई
३) देवी अहिल्याबाई होळकर
४) कन्नगी
५) राणी गेन्देलाऊ झेलीआंग
कोणत्या क्षेत्रातील कार्यांसाठी?
महिला व बालके, शिक्षण व प्रशिक्षण, तंत्रज्ञान, पर्यावरण संरक्षण, आरोग्य व पोषण, इ .

३) शीला दीक्षितांनी घेतली केरळच्या राज्यपाल पदाची शपथ

ठिकाण – केरळची राजधानी – तिरुवअनंतपुरम
संबंधित राज्याच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश राज्यपाल पदाची शपथ देत असतात.
त्यानुसार केरळ उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश डॉ. मंजुळा चेल्लूर यांनी शीला यांना शपथ दिली.आंतरराष्ट्रीय

१) व्हिएतनाममध्ये चालू आहे ‘भारतीय महोत्सव’

भारतीय दूतावास, सांस्कृतिक मंत्रालय (भारत सरकार) आणि संस्कृती, क्रीडा व पर्यटन मंत्रालय (व्हिएतनाम सरकार) यांच्या संयुक्त विद्यमाने हा १० दिवसांचा महोत्सव चालू आहे.
व्हिएतनाममधील ३ शहरात तो चालू आहे = हनोई, हो-ची=मिन्ह, दानंग.

२) मलेशियन विमानाचे गूढ

विमान प्रकार – बोईंग ७७७-२०० ER
या प्रकारच्या विमानाचा हा दुसरा मोठा अपघात आहे. यापूर्वी जुलै २०१३ ला आशियाना airlines चे हे विमान San-fransisco येथे crash land झाले होते.

३) सौदी अरेबियाने मुस्लीम ब्रदरहूड सहित इतर काही संघटनांना दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले

प्रतिबंधित संघटना = मुस्लीम ब्रदरहूड, अल-नुस्रा फ्रंट, हिझबुल्ला, इस्लामिक स्टेट ऑफ इराक and सिरीया (ISIS)
परिणाम : कुठल्याही सौदी अरेबियाच्या नागरिकाला या दहशतवादी संघटनेशी संबंध ठेवता येणार नाहीत. ठेवल्यास २० वर्षे शिक्षा!चर्चित व्यक्ती

१) मिशेल Bachlet – चिलीच्या नवीन राष्ट्राध्यक्षा

दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षा बनल्यात. यापूर्वी (२००६ – २०१०)
सेबेस्तीअन पेनेरा यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्वीकारली.
पिनेरा हुजूर पक्षाच्या तर मिशेल या समाजवादी पक्षाच्या होत.
चिली हा दक्षिण अमेरिका खंडातील श्रीमंत देशांपैकी एक होय.
चिलीच्या राज्यघटनेनुसार सलग दोनदा राष्ट्राध्यक्ष बनता येत नाही.

२) प्रियदर्शी मोहपात्रा – अव्हायाचे नवीन MD

भारत व दक्षिण आशियासाठी व्यवस्थापन संचालक (MANAGING DIRICTOR= MD) म्हणून नेमणूक.
अव्हाया – उद्योगांमध्ये समन्वय घडवून आणणारी कंपनी.

३) निधन: Frank Joab – ‘Tomy John’ शस्त्रक्रियेचा जनक

‘Tomy John’ शस्त्रक्रिया = क्रीडा अपघातातील एक प्रकारची शस्त्रक्रिया. यात कोपरातील तुटलेला स्नायुबंध मनगटातील स्नायुबंधाने जोडला जातो.
‘हॉल ऑफ फेम’ मध्ये समावेश.

४) निधन : मार्शल मोहम्मद कासीम फहीम (५६)

अफगाणिस्तानचे उपराष्ट्राध्यक्ष
आजारपणामुळे निधन झाले.
‘ताजिक’ या अफगाणिस्तानमधील अल्पसंख्यांक वंशाचे ते प्रतिनिधित्व करत होते.
माजी गुप्तचर अधिकारी
२००२ ला संरक्षणमंत्री व लगेच उपराष्ट्राध्यक्ष बनले.
२००९ ला ज्येष्ठ उपराष्ट्राध्यक्ष बनले.अर्थव्यवस्था

१) तेला व्यतिरिक्त इतर बाबींत होणाऱ्या व्यापारात भारत दुबईचा सर्वात मोठा भागीदार बनलाय.पर्यावरण

१) The Parafoil Plane – चीनचे धुरके दूर करणारे मानवरहित यान (UAV)

चीनमध्ये प्रचंड प्रदूषणामुळे वारंवार धुरक्याचा दाट थर साचतो.
त्यामुळे दृश्यमानता शून्य बनते.( जवळची वस्तूही दिसत नाही. सूर्यकिरणे जमिनीवर पोहचत नाहीत. = आण्विक हिवाळा –Nuclear Winter)
यावर उपाय म्हणून हे यान बनवलेय.
विशिष्ट रसायनांची फवारणी केल्यावर वातावरणातील धुरके व इतर प्रदूषके जड बनून स्थायूरुपात जमिनीवर येतात. अशा प्रकारे धुरके नष्ट केले जाते व वातावरण स्वच्छ बनते.विज्ञान – तंत्रज्ञान

१) Airlander बनले जगातील सर्वात लांबलचक विमान

नाव- Airlander किंवा HAV-३०४
निर्मिती – HAV – Hybrid Air Vehicles ltd.
अर्थसहाय्य – ब्रिटीश सरकार व ब्रूस डिकिन्सन (गायक)
लांबी= ३०२ फुट
वैशिष्ट्ये- inert हेलीअम – या विमानात हा वायू असल्याने ते ७०% जास्त पर्यावरणपूरक बनलेय. = कमी प्रदूषण + कमी आवाज.
यापूर्वीचा विक्रम – एअरबस A-३८० आणि बोईंग ७४७-८ या प्रवासी विमानांच्या नावावर होता.
अन्तोनोव An-२२५ या आतापर्यंतच्या सर्वात लांब विमानापेक्षा Airlander ३० फुट जास्त लांब आहे.

कृपया CONTACT US या सदरात जाऊन स्वतःचे REGISTRATION (नोंदणी) करा. मार्च महिन्याचे मासिक केवळ नोंदणी केलेल्या सदस्यांनाच मोफत मिळेल.