राष्ट्रीय बातम्या

1) भूल्लरच्या दया याचीकेवर केंद्र सरकारने लवकर निर्णय घ्यावा – सर्वोच्च न्यायालय

• खलिस्तानी अतिरेकी देवेन्द्रपाल भुल्लर याने दाखल केलेल्या याचिकेवर केंद्राने लवकर निर्णय घ्यावा नाहीतर त्याच्या मानसिक स्थितीच्या आधारे त्याची फाशी कमी करून जन्मठेपेवर आणली जाईल असा इशारा सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिला आहे.
• केंद्र सरकारकडून भूल्लरच्या दया याचिकेवर विचार चालू असल्यामुळे पि. सतशिवम यांनी त्या खटल्याचे कामकाज थांबवले आहे.

2) केरळच्या राज्यपालपदी शीला दीक्षित

• दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मंजुळा छेल्लूर यांनी शीला दीक्षित यांना राज्यपाल पदाची शपथ दिली

3) व्होडाफोन पुरवते ब्रिटीश हेरांना माहिती

• हा आरोप केंद्रीय गृहमंत्रालयाने केला आहे. गृहमंत्रालयाच्या अंतर्गत सुरक्षा विभागाच्या अहवालानुसार व्होडाफोनने ब्रिटनच्या ‘गव्हर्नमेंट कमुनिकेशन हेडक्वार्टर्स (GCHQ)’ या गुप्तचर व संरक्षण संघटनेला सहाय्य केले.
• ब्रिटनच्या समुद्रकिनाऱ्यावर आंतरखंडीय केबल्सच्या माध्यमातून गुप्तचर संघटना मोबाईलवरील संभाषण ऐकत असल्याचे स्पष्ट केले आहे.
• व्होडाफोनच्या बरोबरीने अमेरिकेतील व्हेरीझोन ही कंपनीही GCHQ ला मदत करत असल्याचे स्पष्ट केले आहे.

4) ट्विटरवरील साहित्य प्रदर्शन

• ट्विटरवर कादंबरी लिहिण्याची संधी १२ मार्चला देण्यात येणार अर्थात “ट्विटर कादंबरी महोत्सव’ साजरा करण्यात येणार आहे.
• या महोत्सवाचे आयोजन "असोसिएशन ऑफ अमेरिकन पब्लिशर्स" व "पेग्वीन रॅंडम हाउस" यांनी केले आहे.
• २०१२ मध्ये पहिल्यांदा ट्विटरवर असा महोत्सव घेणेत आला होता.
• ही या महोत्सवाची दुसरी आवृत्ती आहे.
• या महोत्सवात विजेत्या व जास्त खप असलेल्या लेखकांना पारितोषिक दिले जाते. यामध्ये एकूण २५ विजेते निवडले जाणार आहेत.
# अंकुर ठाकूरचा चित्रपट
वेगवेगळ्या बॉलीवूड चित्रपटातील शॅाट्स वापरून चित्रपट तयार करणार. टो चित्रपट ट्विटरवरच प्रदर्शित करण्यार येणार आहे.
# मेघना पंत १०० ट्विटमध्ये महाभारताची कथा मांडणार... पंत ह्या रॅडम हाउस इंडिया कंपनीच्या लेखिका आहेत.त्यांनी आतापर्यंत “हॅपी बर्थडे अन्ड अदर स्टोरीज’ आणि ‘वन अन्ड हाफ वाईफ’ ही पुस्तके लिहिली आहेत.
या महोत्सवात त्या १०० ट्विटमध्ये महाभारताची कथा सांगणार आहेत. त्यामुळे १४००० शब्दात महाभारताची कथा तयार होणार आहे.

आंतरराष्ट्रीय बातम्या

1) मलेशियन विमान अपघात गुढ उलगेना

• या विमानाचा शोध घेण्यासाठी चीनचे १० शक्तिशाली उपग्रह तैनात केली आहेत.
• हे विमान पुन्हा कौलालंपूरच्या दिशेने वळले असावे असे संकेत रडारवरून मिळत आहेत.

राज्य बातम्या

1) ताडोबात VIP कोट्याचा गैरवापर

• दररोजच्या VIP कोट्यातून मंत्री, आमदार, खासदार व अधिकारी आपल्या गणागोतांना व्याघ्र दर्शन घडवून आणतात.
• ताडोबाचे आरक्षण ऑनलाइन झाल्यामुळे सर्वसामान्याची हिरमोड होत आहे. कारण VIP कोट्याअंतर्गत दररोज १५ प्रवेशिका राखून ठेवल्या जातात.

2) विधानसभा मतदारसंघात तीन भरारीपथके

• आर्थिक व इतर अवैध प्रकार रोखण्यासाठी ही भरारीपथके नेमली जाणार आहेत.
• निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे गुन्हे घडत असतात. त्या गुन्ह्याची दाखल घेण्यासाठी या भरारी पथकांची स्थापना केली जाणार आहे.

अर्थविषयक बातम्या

डॉ.ऊर्जित पटेल समिती

• RBI ने डेप्युटी गव्हर्नर डॉ.ऊर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखाली नऊ अर्थतज्ञांची समिती नेमली होती
• या समितीकडे प्रामुख्याने पतधोरण पद्धतीचा आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
• या समितीने आपला अहवाल डॉ.रघुराम राजन यांच्याकडे जानेवारी २०१४ मध्ये दिला होता.
# समितीच्या सूचना :
1. RBI गव्हर्नरच्या अध्यक्षतेखाली सहा जणाचे नियंत्रण मंडळ स्थापन करावे. महागाईचे नियंत्रण करण्याची जबाबदारी यांच्याकडे देण्यात यावी.
2. महागाईचा दर किरकोळ किंमतीच्या आधारे ठरवणाऱ्या निर्देशांकावर आधारित असावा. जानेवारी २०१५ पर्यंत हा दर ८% तर जानेवारी २०१६ पर्यंत ६% त्यानंतर ४% इतका खाली आणावा
• अशा या तरतुदी असल्यामुळे सरकारला त्या राबवणे जड जाणार आहे त्यामुळे डॉ. ऊर्जित पटेल समितीचा अहवाल फेटाळण्याची शक्यता दाट झाली आहे.

2) व्होडाफोनकडून मोफत वाय-फाय

• देशातील महत्वाची ठिकाणे मोफत वाय-फाय ने जोडण्याचा निश्चय व्होडाफोनने केला आहे. व्होडाफोन धारकांना फक्त यासाठी नोंदणी करावी लागणार आहे.
• यापूर्वी टाटा टेलीसर्विसेसनेही नऊ शहरामध्ये ४००० वाय-फाय केंद्राची घोषणा केली आहे.
• इतर कंपन्यांबरोबर ( BHARTI AIRTEL) इंटरनेट सेवा याबाबत सामना करावा लागत असल्यामुळे ही योजना लागू करण्याचे ठरवले आहे.

ज्ञान विज्ञान

1) ओझोनच्या थराचा ऱ्हास करणारे वायू सापडले

• ओझोनच्या थराचा ऱ्हास करणाऱ्या चार वायूंचा शोध लागला आहे. हे चार वायू ५० वर्षातील मानवी कृतीमुळे वातावरणात गेले आहेत .
• बंदी घालण्यात आलेल्या संयुगाच्या वापरामुळे हे वायू वातावरणात गेले आहेत त्यामुळेच वातावरणाचा ऱ्हास होत आहे.
• 1990 च्या दरम्यान पृथ्वीच्या STRATOSPHERE मध्ये हे वायू सोडण्यात आले होते पण त्याचा शोध आता लागला आहे.
• युरोप व ऑस्ट्रेलियाच्या पथकाने याबाबत संशोधन करून ते नेचर जीओसायन्स या नियतकालिकात प्रसिध्द केले आहे.
• यातील तीन वायू हे क्लोरोफ्लूरोकार्बन गटातील आहेत तर, चौथा हायड्रोकार्बन गटातील आहे.
• क्लोरोफ्लूरोकार्बन हे वातानुकुलीत(ac), शीतकरण(friz), स्प्रे कॅन यामध्ये वापरले जातात.

2) पृथ्वीवरील ऑक्सिजन प्राण्यांकडून निर्माण

• पृथ्वीवरील ऑक्सिजनची निर्मिती ६० कोटी वर्षापूर्वी प्राण्यांकडून झाली असे ब्रिटनच्या डेक्स्टर विद्यापीठाच्या संशोधनात स्पष्ट झाले आहे.
• यावरून पृथ्वीवरील ऑक्सिजन वाढल्यामुळे पृथ्वीवर गुंतागुंतीची जीवन साखळी निर्माण झाल्याचा समज आता खोटा ठरणार आहे.
• पृथ्वीवर पहिल्या प्राण्याची उत्क्रांती झाली त्यावेळी त्यांनी खोल महासागरात ऑक्सिजनचे प्रमाण वाढवले व त्यामुळे आजची जीवसृष्टी निर्माण झाली.
• स्पंज हे प्राणी त्यांच्या शरीरात पाणी घेत व काही सेंद्रिय घटक बाहेर टाकीत असत, त्यामुळे महासागरात जगण्यासाठी ऑक्सिजनची निर्मिती होत असे.
• कायटोप्लॅक्टन या वनस्पती महासागरात असतात, त्या अतिशय लहान असतात, त्या मेल्यामुळे त्यांची ऑक्सिजनची मागणी कमी होते.
• त्याचबरोबर काही प्राण्यांनी फॅास्फरस हा महासागरातील आवश्यक घटक कमी केल्याने महासागराच्या परीसंस्थेची पुनरुत्पादकता कमी झाली. त्यामुळे ऑक्सिजनची मागणी कमी झाली व खोल महासागरात ऑक्सिजनचे प्रमाण वाढले .
• ऑक्सिजनने परिपूर्ण असलेल्या महासागरात जास्त हालचाली असलेले प्राणी विकसित झाले कारण त्यांना ऑक्सिजनची गरज होती. त्यामुळे सागरी जीवावरण तयार झाले.

कृपया CONTACT US या सदरात जाऊन स्वतःचे REGISTRATION (नोंदणी) करा. मार्च महिन्याचे मासिक केवळ नोंदणी केलेल्या सदस्यांनाच मोफत मिळेल.