राष्ट्रीय घडामोडी

१) चित्रपट छायालेखक व्ही.के.मूर्ती यांचे निधन

• मूर्ती हे दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात आलेले पहिले चित्रपट तंत्रज्ञ होते.
• त्यांनी ‘गुरुदत्तचा प्यासा’ व ‘साहिब बीबी गुलाम’ या चित्रपटात उत्कृष्ट छायाचित्रणाचे काम केले होते.

2) विंडोज XP आजपासून असुरक्षित

• मायाक्रोसॅाफ्टने विंडोज XP ला आजपासून सपोर्ट करण्याचे बंद केले आहे.
• यानंतर मायाक्रोसॅाफ्टने विंडोज -३ चा सपोर्ट काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे.
• मात्र या विंडोज XP चा वापर पूर्णपणे थांबलेला नाही. ज्यांच्या घरी जुने डेस्कटॅाप आहेत त्यांच्याकडे हीच OS प्रणाली आहे.
मायाक्रोसॅाफ्टने सपोर्ट काढून घेतल्यामुळे होणारे परिणाम
• मायाक्रोसॅाफ्ट विंडोज XPला कोणतीही सुरक्षा मिळणार नाही व तांत्रिक साह्य देखील मिळणार नाही.
• त्यामुळे विंडोज XP वापरणाऱ्या OS वर सहजपणे सायबर हल्ले होतील.
विंडोज XP मध्ये नव्याने येणारे ब्राउजर्स, सॅाफ्टवेअर, विविध टूल्स वापरता येणार नाहीत.
• PC मध्ये येणारे व्हायरस रोखण्यासाठी कंपनी वेळोवेळी नवीन अपडेट्स देत असते, मात्र यापुढे असे
अपडेट्स मिळत नसल्यामुळे विंडोज XP मध्ये व्हायरस येऊन तो PC निकामी होऊ.शकतो.
विंडोज XPचा सपोर्ट काढून घेण्याचे कारण • सध्या मायाक्रोसॅाफ्टने बाजारात विंडोज- ८ व विंडोज- ८.१ ही OS बाजारात आणली आहे. या OS चा वापर वाढवा.
• विंडोज ८ व विंडोज ८.१ वापरून संगणक आणि मोबाईल एकमेकांशी थेट जोडून काम करण्याचा कंपनीचा मानस आहे.

आंतरराष्ट्रीय घडामोडी

१) मुशर्रफ यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

• बलुचिस्तानचे नेते अकबर बुगती हत्येप्रकरणी पाकिस्तानचे माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश.

२) पिंग संदेश मिळाल्याचा ऑस्ट्रेलियाचा दावा

• बेपत्ता झालेल्या विमानातील ब्लॅक बॉक्स मधून पिंग संदेश मिळाल्याचा दावा ऑस्ट्रेलियाने केला आहे.
• ऑस्ट्रेलियाच्या ओशन फिल्ड या जहाजाला दोन वेळा पिंग संदेश मिळाले असून ते विश्वासार्ह असल्याचे सांगण्यात आले.
• विमानाचा सांगाडा शोधण्यासाठी ब्ल्यू फिन २१ हे स्वयंचलित वाहन पाठवण्यात येणार आहे.
• या अपघातग्रस्त विमानाची ब्लॅक बॉक्समधील बॅटरी तीस दिवस चालू शकते त्यामुळे या बॅटरीचे आयुष्य संपत चालले आहे.

३) अमेरिकेतील अभिनेते मिकी रुनी यांचे निधन

• बालकलाकार असताना सेलिब्रिटी बनलेले असे हे कलाकार होते.
• रूनी यांचे वयाच्या ९३ वर्षी निधन झाले.

राज्य घडामोडी

१) जेष्ठ स्वातंत्र्यसेनानी दत्ताजी ताम्हणे यांचे निधन

• स्वातंत्र्य चळवळीचे एक साक्षीदार जेष्ठ समाजवादी नेते दत्ताजी ताम्हणे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
• ते १०१ वर्षाचे होते.

ज्ञान- विज्ञान

१ ) आकाश गंगेच्या टोकाला नवीन ताऱ्याचा जन्म

• दुसऱ्या एका दिर्घिकेतील उष्ण वायू आपल्या आकाशगंगेवर आदळत असून त्यामुळे नवीन ताऱ्याचा जन्म होत आहे.
• आपल्या आकाशगंगेच्या शेजारी मॅगलानिक ढग आहेत.
• अशा या मॅगलानिक ढगामध्ये क्रियाशील तारा निर्माण होत असतो.

निवड

• भारतीय पोलीस सेवेचे अधिकारी देवेंद्रकुमार पाठक यांची BSF (सीमा सुरक्षा दल) चे महानिदेशक म्हणून निवड करण्यात आली आहे.
विशेष लेख वाचण्यासाठी खालील लिंक वर click करा किंवा या पानावरील 'विशेष लेख' या लिंकवर click करा.  • भारतीय औषध क्षेत्राचा दर्जा ........-by sk Core Group
  • 'डेंग्यूविरोधात तू आणि मी' - राष्ट्रीय अभियानास सुरुवात ..........-by BK Core Group New...
  • CPSE-ETF च्या स्थापनेची तयारी पूर्ण ..........-by BK Core Group New...
  • प्रिय मित्रहो, आपणास काही शंका किंवा प्रश्न असतील तर आम्हांस जरूर कळवा. आपल्या चांगल्या आणि वाईट सर्व प्रकारच्या सूचना नेहमीच स्वागतार्ह आहेत. इ-मेल : shivraj@anushri.org किंवा SMS करा 9404703270    कृपया CONTACT US या सदरात जाऊन स्वतःचे REGISTRATION (नोंदणी) करा. मार्च महिन्याचे मासिक केवळ नोंदणी केलेल्या सदस्यांनाच मोफत मिळेल.