राष्ट्रीय बातम्या

1) अर्थमंत्री संरक्षण मंत्रालयावर नाराज

• कोंग्रेस विद्यार्थी संघटनेच्या कार्यक्रमात बोलतांना त्यांनी नाराजी व्यक्त केली.संरक्षण मंत्रालय दिलेल्या निधीचा योग्य वापर करत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
• INS सिन्धुरत्न पानबुडिच्या दुर्घटनेत शहीद झालेले लेफ्ट. कमांडर कपिश मुवाल याची बहिण नेशनल स्टुडंटस यूनियन ऑफ़ इंडिया (NSUI ) च्या कार्यक्रमात सहभागी झली होती त्यावेळी तिने निधि विषयी विचारणा केली.
• यंदा संरक्षण मंत्रलयासाठी २.२५ लाख रुपयांचा निधि देण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले.

2) राहुल गांधीनी निवडले १४ प्राथमिक मतदारसंघ

• अमेरिकेच्या धर्तीवर राहुल गांधी याने १४ प्राथमिक मतदार संघाची निवाद केली आहे.
• राहुल यांनी निवडलेल्या प्राथमिक मतदारसंघामधे स्थानिक पदाधिकारी मतदानाद्वारे उमेदवार निवडतील.
• त्यातून निवडून आलेल्या उमेद्वाराला लोकसभेसाठी निवडणुक लढवता येणार आहे.
• पण ही पद्धत वेळखाऊ पणाची व स्तानिक मतभेद वाढवणारी आहे.
• महाराष्ट्रात लातूर या मतदारसंघाचा समावेश प्राथमिक मतदारसंघात करण्यात आला आहे.

3) फेसबुक वरील एक लाईक तिन ते १०० रुपया पर्यंत

• सोशल मिडियात आपल्या नेत्यांना किती लाईक्स मिळतात त्यावरून तय नेत्याचे सोशल स्टेट्स ठरत असते.
• त्यामुळे आपल्या नेत्याच्या पेजला अधिक लाईक्स मिळवण्यासाठी कंपन्यासोबत व्यवहार केले जात आहेत. त्याचबरोबर जो कोणी जास्त लाईक आणेल त्याला जास्त रक्कम दिली जात आहे.

4) किर्लोस्कर ब्रदर्स आंतरराष्ट्रीय परिषदेत पुरस्कृत

• जागतिक पातळीवरील अग्रगण्य द्रव व्यवस्थापन कंपनी असलेल्या किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड (KBL) ला त्यांच्या कोइम्बतुर येथील प्रकल्पाकरिता मोरिशसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या तिसरया आफ्रिका- इंडिया लीडरशिप अवार्डमध्ये “बेस्ट ओर्गानायझेशन फॉर विमेन टलेंट डेव्हलपमेंट” या पुरस्काराने पुरस्कृत करण्यात आले .
• या पुरस्काराचे आयोजन आफ्रिका- इंडिया पार्टनरशिप समिटद्वारे करण्यात आले होते.
• परिषदेचा उद्देश: विविध खाजगी अणि सार्वजनिक क्षेत्रामधे स्त्रियांनी केलेल्या कामगिरीला अणि त्यांच्या नेत्रत्वगुणाला सन्मानित करणे हे या पुरस्काराचे उद्दिष्टे आहे.

आंतरराष्ट्रीय बातम्या

1) अल कायदा अद्यापही पाकिस्तानात सक्रिय

• पाकिस्तानच्या आदिवासी पट्ट्यात अल कायदा अद्याप सक्रीय आहे, असा दावा अमेरिकेच्या सेन्ट्रल कमांडचे कमांडर असलेले जनरल लोईड जे.ओस्तीन यांने अमेरिकन प्रतिनिधी ग्रहाच्या सशस्त्र दल समितीसमोर केला.
• “ढासळलेली अर्थव्यवस्था आणि दिशाहीन युवाशक्ती हे पाकिस्तानसमोरचे मोठे आव्हान आहे.त्यामुळे पाकिस्तानात धर्मांधता वाढत आहे. त्यामुळे पाकिस्तानात दहशतवादी संघटनांना पाठबळ मिळत आहे,” असे मत लोईड जे.ओस्तीन याने व्यक्त केले.

2) स्वातमधील रेशमी कापड व्यवसाय अतिरेक्याकडून उद्ध्वस्त

• स्वात खोरे हे पाकिस्तानातील अतिशय निसर्गरम्य ठिकाण आहे. त्याची ओळख पाकिस्तानातील “स्वित्झर्लंड” अशीही केली जाते.
• अशा भागातील रेशीम उद्योगावरच तालिबानी दहशतवाद्यांनी हल्ला केल्यामुळे लोक बेरोजगार झाले आहेत. त्यामुळे ते स्वातचा त्याग करत आहेत.

3) तिबेटमधील चीनच्या रेल्वेजाळयाचा सिक्किमजवळ विस्तार

• चीनने आपल्या रेल्वेजाळ्याचा विस्तार कायम ठेवत त्यांनी तिबेटमधील झिगेझजवळ रेल्वे मार्ग विस्तारित केला आहे.
• हिमालयाच्या दुर्गम भागात सैन्याची ने आण तसेच शस्त्रास्त्राचे वहन सहजपणे करण्यासाठीच हि व्युव्हरचना असल्याचे सांगण्यात येत आहे.
• जगातील सर्वाधिक उंचीवरील “क्विनघई- तिबेट” हा रेल्वेमार्ग तिबेटमधील झिगेझ येथे पंचेन लामा यांच्या निवासस्थानाजवळ पोहचेल.

4) क्रीमियात संसदेने युक्रेनमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला

• क्रीमियामध्ये रशियन लोक बहुसंख्येने आहेत. त युक्रेंनपासून वेगळे होऊन रशियामध्ये विलीन होण्याचा ठराव तेथील संसदेने केला आहे.
• ब्रुसेल्स येथे अमेरिकेसह सहा प्रमुख राष्ट्राच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या विशेष बैठकीत रशियाविरोधात आक्रमक कारवाई करण्यास अनेकांनी विरोध केला आहे.

राज्य बातम्या

1) २५% आरक्षण मुद्दा

• बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षण हक्क कायद्यानुसार (RTE) वंचित व दुर्बल घटकांतील मुलांना पूर्व प्राथमिक व पहिलीसाठी २५ % आरक्षण लागू करण्यात आले आहे.
• पण याची अंमलबजावणी व्यवस्थित होत नसल्याचे चित्र समोर आले आहे.

आर्थिक

1) शेअर बाजारात उधान

• गुंतवणूकदारांनी केलेल्या मोठ्या खरेदीमुळे शेअर बाजार वधारला. सेन्सेक्स २३७.०१अंशानी वधारून २१५१३.८७ या उच्चांकावर बंद झाला.तर निफ्टीने ७२.५० अंशाची कमाई करत ६४०१.१५ या उच्चांकावर झेप घेतली.
• कारण निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक तारखा

कृपया CONTACT US या सदरात जाऊन स्वतःचे REGISTRATION (नोंदणी) करा. मार्च महिन्याचे मासिक केवळ नोंदणी केलेल्या सदस्यांनाच मोफत मिळेल.