राष्ट्रीय घडामोडी

१) भारताचा दिशादर्शक उपग्रह प्रक्षेपित

• IRNASS 1 B (इर्नास) या दिशादर्शनासाठी उपयोगी असलेल्या उपग्रहाचे PSLV C-24 या प्रक्षेपकाच्या साह्याने प्रक्षेपण करण्यात आले.
• PSLV - C हा ध्रुवीय उपग्रह असून सतीश धवन अवकाश केंद्रावरून याचे प्रक्षेपण करण्यात आले.
• PSLV- C चे हे लागोपाठ २५वे यशस्वी उड्डाण आहे.
• हा उपग्रह भारतीय प्रादेशिक दिशादर्शक उपग्रह प्रणालीचा भाग आहे.
• IRNASS हे अमेरिकेच्या GPS सारखे काम करणार.
• यासारखे चार उपग्रह सोडल्यानंतर स्थाननिश्चिती सेवा सुरु होणार.
• ही सेवा १५०० किमीच्या क्षेत्रात वापरता येईल.
• प्राथमिक सेवा क्षेत्रात २० मीटर इतक्या अचूकतेने स्थाननिश्चिती करण्याची याची क्षमता असणार आहे.
जगातील इतर देशाच्या स्थाननिश्चिती सेवा
a) अमेरिका- जी.पी.एस (ग्लोबल पोझीस्निंग सिस्टीम)
b) रशिया – ग्लोनास
c) युरोप – गॅलिलिओ
d) चीन – बेइडू
e) जपान – रक्वासी

२) निवृत्तीवेतन धारकाच्या तक्रारी वेळेत निकाली काढाव्यात

• निवृत्तीवेतन धारकाच्या निवृत्तीवेतनासंबंधीच्या तक्रारी दोन महिन्याच्या आत निकाली काढाव्यात, अशी सूचना केंद्र सरकारने दिली आहे.
• निवृत्तीवेतन धारकाच्या तक्रारीसाठी संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे, पण त्या तक्रारी प्रलंबित असून त्यांचे निवारण वेळेत होत नाही.

अर्थविषयक घडामोडी

१) सार्वजनिक कंपन्यांचा ‘ETF’

• सार्वजनिक क्षेत्रातील १० कंपन्यांचा CPS-ETFने पदार्पणातच ११% ची उसळी घेतली आहे.
• सरकारच्या निर्गुंतवणुकीच्या या योजनेमध्ये लोकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.
• त्यामुळे भविष्यातील निर्गुंतवणूकीसाठी सरकार याच योजनेचा वापर करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

क्रीडा घडामोडी

१) सचिन तेंडुलकर यांचा सत्कार

• बहारीन येथे होणाऱ्या ग्रां. प्री.फॅार्मुला-१ शर्यतीदरम्यान हा सत्कार होणार आहे.

ज्ञान-विज्ञान

१) शनीच्या चंद्रावर पाण्याची शक्यता

• “एनक्लेडस” हा शनीचा चंद्र असून त्याच्या पृष्ठभागाखाली पाणी असण्याची शक्यता आहे.
• अमेरिकेच्या नासा या संस्थेने कॅसिनो अवकाशात सोडले होते.
• त्याने शनीच्या उपग्रहाच्या दक्षिण धृवाचे निरीक्षण केले.
• येथे पृथ्वीवरील दुसऱ्या क्रमांकाचे ‘लेक सरोवरा’ इतके पाण्याचे तळे आहे, त्याचा तळ खडकाळ असून सूक्ष्मजीवांच्या वाढीसाठी आवश्यक असणारी पोषक स्थिती आढळून आली.
• कॅसिनो यान नासाने इटालियन अवकाश संस्था व युरोपीय अवकाश संस्था यांच्या सहकार्याने २००४ मध्ये अवकाशात सोडले होते.
• शनीला एकूण ५३ चंद्र असून हे हंगामी आहेत.(कारण याची निश्चिती झालेली नाही त्यामुळे हंगामी हा शब्द वापरला आहे.)
विशेष लेख वाचण्यासाठी खालील लिंक वर click करा किंवा या पानावरील 'विशेष लेख' या लिंकवर click करा.  • भारतीय औषध क्षेत्राचा दर्जा ........-by sk Core Group
  • 'डेंग्यूविरोधात तू आणि मी' - राष्ट्रीय अभियानास सुरुवात ..........-by BK Core Group New...
  • CPSE-ETF च्या स्थापनेची तयारी पूर्ण ..........-by BK Core Group New...
  • प्रिय मित्रहो, आपणास काही शंका किंवा प्रश्न असतील तर आम्हांस जरूर कळवा. आपल्या चांगल्या आणि वाईट सर्व प्रकारच्या सूचना नेहमीच स्वागतार्ह आहेत. इ-मेल : shivraj@anushri.org किंवा SMS करा 9404703270    कृपया CONTACT US या सदरात जाऊन स्वतःचे REGISTRATION (नोंदणी) करा. मार्च महिन्याचे मासिक केवळ नोंदणी केलेल्या सदस्यांनाच मोफत मिळेल.