राष्ट्रीय घडामोडी

१) टाटांची सीबीआय चौकशी

• कॉर्पोरेट क्षेत्रातील मध्यस्थ नीरा राडिया टेप प्रकरणी ही चौकशी. • रतन टाटा आणि सध्याचे टाटा सन्स चे अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचीही चौकशी होणार आहे.
• ज.नेहरू नागरी पुरुत्थान योजनेंतर्गत तामिळनाडू शासनाला टाटा मोटर्सकडून बस पुरवणे आणि झारखंडमधील लोहखानीचे टाटा स्टीलला झालेले वाटप याप्रकरणी सीबीआय चौकशी चालू आहे.
• आतापर्यंत या चौकशीमध्ये आक्षेपार्ह काहीही आढळून आलेले नाही.
• मात्र याचा उल्लेख राडिया टेपच्या संवादात आहे.


२) सामाजिक विकास निर्देशांक – भारत १०२ वा

• मानवी विकास आणि प्रगतीचे मोजमाप करण्यात आलेल्या सामाजिक प्रगती निर्देशांकामध्ये भारत १०२ व्या स्थानावर आहे.
• या निर्देशांकामध्ये १३२ देशांचा समावेश करण्यात आला होता.
• अमेरिकेतील एका स्वयंसेवी संस्थेने हा निर्देशांक तयार केला आहे.
• हा अहवाल तयार करताना अन्न, निवारा, आरोग्य, संधीची उपलब्धता, शिक्षण, वैयक्तिक स्वातंत्र्य अशा घटकांचे परीक्षण करून हा निर्देशांक तयार करण्यात आला.
• या निर्देशांकात न्यूझीलंड या देशाने प्रथम क्रमांक मिळवला आहे, तर सर्वात शेवटी चाड या देशाचा क्रमांक आहे.
या अहवालातील काही देशांचे स्थान:
1. ब्राझील-४६
2. श्रीलंका-८६
3. मंगोलिया-८९
4. चीन-९०
5. भारत -१०२
6. पाकिस्तान १२४
7. चाड- १३२

आंतरराष्ट्रीय घडामोडी

आंतरराष्ट्रीय

१) जगातील अतिप्राचीन हवामान अंदाज

• ३५०० वर्षापूर्वी इजिप्तमध्ये हवामाचा अंदाज वर्तवला जात होता.
• या देशातील “टेम्पेस्ट स्टेला” कालेसाईट शिळेवर (दगड) ४० ओळीचा मजकूर दिसून आला.
• हवामानाच्या या अंदाजामुळे “ब्रांझ युगाच्या” सुरवातीच्या काळावर अधिक प्रकाश पडणार.

२) आयएमएफ(IMF)च्या कार्यकारी संचालकपदासाठी भारतीय वंशाचे सबरवाल

• अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी सुनील सबरवाल यांची IMF च्या कार्यकारी संचालक पदी निवड केली.
• सबरवाल हे २००६ पासून वेतनासंबंधी क्षेत्रात स्वतंत्र गुंतवणूकदरांचे काम करत होते.
• २०११-१३ या कालावधीत ते बोर्ड ऑफ ओगॅानचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पहिले आहे.

अर्थविषयक घडामोडी

१) सॅमसंगचे अध्यक्ष “ली” यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

• १४ लाख डॉलरच्या फसवणुकीप्रकरणी.
• “सॅमसंगची विद्युत उपकरण निर्मिती कंपनीचे” अध्यक्ष असलेल्या ‘ली’ यांच्यावर जे.सी.ई कन्सल्टन्सी या भारतीय कंपनीने गुन्हा दाखला केला आहे.

२) रिलायन्स- भारत सरकार मध्यस्थाचे नाव वगळले.

• कृष्णा गोदावरी खोऱ्यातील वायू साठ्यावरून केंद्र सरकार आणि रिलायन्स यांच्या वादावर तोडगा करण्यासाठी मध्यस्थ नेमण्यात आला होता.
• हे मध्यस्थ ऑस्ट्रेलियाच्या सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश जेम्स स्पिंग्लमेन होते.
• पण ही निवड रिलायंसने एकतर्फी केल्यामुळे केंद्र सरकारने यावर आक्षेप नोंदवला होता.
• त्यामुळे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने ही निवड रद्द केली आहे.

3) आर.गांधी यांची आर.बी.आय.चे डेप्युटी गव्हर्नर म्हणून निवड

• आर.गांधी यांची पुढील तीन वर्षासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गवर्नर म्हणून निवड करण्यात आली.
• यापूर्वीचे गव्हर्नर आनंद सिन्हा यांची जागा त्यांनी घेतली.
• या पूर्वी गांधी RBI चे कार्यकारी संचालक म्हणून काम पाहत होते.
विशेष लेख वाचण्यासाठी खालील लिंक वर click करा किंवा या पानावरील 'विशेष लेख' या लिंकवर click करा.  • भारतीय औषध क्षेत्राचा दर्जा ........-by sk Core Group
  • 'डेंग्यूविरोधात तू आणि मी' - राष्ट्रीय अभियानास सुरुवात ..........-by BK Core Group New...
  • CPSE-ETF च्या स्थापनेची तयारी पूर्ण ..........-by BK Core Group New...
  • प्रिय मित्रहो, आपणास काही शंका किंवा प्रश्न असतील तर आम्हांस जरूर कळवा. आपल्या चांगल्या आणि वाईट सर्व प्रकारच्या सूचना नेहमीच स्वागतार्ह आहेत. इ-मेल : shivraj@anushri.org किंवा SMS करा 9404703270    कृपया CONTACT US या सदरात जाऊन स्वतःचे REGISTRATION (नोंदणी) करा. मार्च महिन्याचे मासिक केवळ नोंदणी केलेल्या सदस्यांनाच मोफत मिळेल.