राष्ट्रीय

1) UP मध्ये डॉक्टरांचा संप

- UP मध्ये सहकारी डॉक्टरावर हल्ला झाल्याच्या निषेर्धात डॉक्टरांनी संप सुरु केला आहे. त्यामुळे आरोग्यसेवा विस्कळीत झाली आहे.या संपाला भाजप व आप या पक्षाने पाठींबा दिला आहे.

2)भारतीय महिलेचा आंतरराष्ट्रीय सन्मान

- अॅसिड हल्ला करण्यात आलेल्या लक्ष्मी या महिलेने अॅसिड हल्ल्यांच्या प्रकारणात चळवळ सुरु केली असून अमेरिकेने तिची निवड आंतरराष्ट्रीय महिला धैर्य पुरस्कारासाठी केली आहे.
- हा पुरस्कार अमेरिकन प्रथम महिला मिशेल ओबामा यांच्या हस्ते दिला जाणार आहे.
- लक्ष्मी हिने अॅसिड हल्ल्याच्या विरोधात चळवळ सुरु केली असून या समस्येवर सर्वोच्च न्यायालयाने कठोर उपाययोजना कराव्यात यासाठी २७ हजार लोकांच्या सह्यांची याचिका तयार करून ती सादर केली.

3) काळा पैसा परत आणण्यासाठी देशाचे प्रयत्न

- परदेशातील करचुकवेगिरी करून दडवलेला पैसा बाहेर काढण्यासाठी भारतीय महसूल सेवेतील सात अधिकारी नेमण्यात आले आहेत. सध्या सायप्रस ह्या देशाचा यामध्ये समावेश नाही.
- भारताने जर्मनी, इंग्लंड, फ्रान्स, जपान, नेदरलंड, संयुक्त अरब अमिरात व अमेरिका या सात देशात नवीन प्राप्तीकर कार्यालय सुरु केली आहेत.
- सायप्रसमध्ये असे कार्यालय सुरु करण्यात आले असले तरी त्याचे कामकाज अजून सुरु झालेले नाही. कराच्या प्रकरणात असहकार्याच्या प्रश्नावर भारत व सायप्रस यांच्यात चर्चा चालू आहे .
- सरकारने इन्कम टॅक्स ओव्हरसीज युनिट्स (IOTC ) सुरु करण्यास मान्यता दिली असून, त्यामुळे भारतात गुंतवणुकीचा ओघ वाढेल अशी आशा ठेवली आहे.

4) रोल्स रॉयस करार लाचप्रकरण : CBI चौकशीचे आदेश

- हिंदुस्थान एरोनॅाटीक्स लि. या कंपनीबरोबर १० हजार कोटी रुपयांचे संरक्षण मंत्रालयाचे कंत्राट पदरात पाडून घेण्यासाठी रोल्स रॉयस या ब्रिटनच्या कंपनीने ६०० कोटी रुपयांची लाच दिल्या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश संरक्षण मंत्रालयाने CBI ला दिले आहेत.
- कंपनीने एजेटी हॉक, जॅग्वार, अॅव्हरो, किरण एके-२, सी हॅरिअर व सी किंग हेलिकॉप्टर या सहा प्रकारच्या विमानासाठी रोल्स रॉयसने इंजिनाचा पुरवठा केला आहे.

5) राष्ट्रपती भवनाजवळ उंच इमारत

- राष्ट्रपती भवनाजवळच्या परिसरात DLF कंपनीला अलिशान सदनिका असलेल्या गगनचुंबी इमारतीचे संकुल उभारण्यास दिलेल्या परवानगीमध्ये अनियमितता नसल्याचा निर्वाळा CBI ने दिला.
- डेअरीसाठी दिलेल्या जागेवर निवासी संकुल उभे केल्याचा आरोप करण्यात आला होता, पण यामध्ये कोणतेही तथ्य आढळून आले नाही.

6) सोशल मिडियावरही निवडणूक आयोगाचे लक्ष

- राजकीय पक्ष मीडियावर किती खर्च करणार यावर आता निवडणूक आयोग लक्ष ठेवणार आहे.

7) बलात्काराच्या वैद्यकीय तपासणीसाठी नवी मार्गदर्शक तत्वे

- केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही नवी वैद्यकीय तपासणीसाठी मार्गदर्शक तत्वे तयार केली आहेत.
- या बदलामुळे “टू फिंगर” ही वादग्रस्त चाचणी व अपमानास्पद पद्धत बंद होणार आहे.
- नव्या तत्वानुसार प्रत्येक रुग्णालयाला बलात्कार पिडीत महिलेच्या न्यायवैद्यक आणि वैद्यकीय तपासणीसाठी विशेष कक्ष उभारण्याच्या सूचना दिल्या आहेत.
- आरोग्य विज्ञान विभाग, भारतीय वैद्यकीय संशोधन संस्था व देशातील वैद्यकीय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ही मार्गदर्शक तत्वे ठरवण्यात आली आहेत.

8) भारत जगातील तिसरा असुरक्षित देश

- केंद्र सरकारच्या “नॅशनल बॉम्ब डाटा सेंटर (NBDC) या संस्थेच्या माहितीनुसार अफगाणिस्तान आणि सिरीया या देशापेक्षा भारतात अधिक बॉम्बस्फोट झाले.
- NBDC च्या अहवालानुसार २०१३ मध्ये भारतात २१२ बॉम्बस्फोट झाले.जगातील ७५% बॉम्बस्फोट हे इराक, पाकिस्तान, व भारत या देशात होतात.

9)तिस्ता करार अशक्य : पंतप्रधान मनमोहन सिंग

- हा करार बांगलादेश व भारत यांच्यातील पाणीवाटपासंदर्भात आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आक्षेप घेतल्यावर तिस्ता करार प्रलंबित ठेवण्यात आला आहे.
- या करारांतर्गत बांगलादेशाला दिल्या जाणाऱ्या पाण्याच्या प्रमाणाबाबत बॅनर्जी यांचा आक्षेप होता. त्यामुळे त्यांनी सप्टेबर २०११ मध्ये पंतप्रधानांच्या ढाका दौऱ्यातून माघार घेतली होती.

राज्य बातम्या

१) राज्यात दुग्धउत्पादनासाठी प्रयोगशाळा

-राज्यातील शेतकऱ्यांच्या गायी व म्हशीचे दुग्धोपादन वाढवण्यासाठी उच्च वंशावळीच्या वळूचे गोठीत विर्यमात्रा पुरवण्यासाठी अद्ययावत गोठीत रेतमात्रा प्रयोगशाळेची स्थापना राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात होणार आहे.
- नवी दिल्ली येथील राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाबरोबर याबाबत विद्यापीठाचा सामंजस्य करार नुकताच झाला.

2) कोल्हापुरात पोलंडवाशीयांची देशबांधवांना आदरांजली

- दुसऱ्या महायुद्धाच्या काळात सोवियत संघावर जर्मनीने हल्ला चढविला होता.त्या वेळी सुमारे चार लाख लोकांना देश सोडून पाळावे लागले होते. यातील पाच हजार लोकांनी तत्कालीन राजा दिग्विजयसिंग यांनी पोलंडवाशीयांना कोल्हापुरजवळील वळीवडे या गावात राहण्यासाठी जागा दिली होती व निवासाची अत्यावश्यक सुविधाही पुरवली होती.
- त्या मदतीची जाणीव कायम ठेऊन पोलंडच्या नागरिकांनी महावीर उद्यानात कृतज्ञता व्यक्त केली.

क्रीडा

‘अरविंद भट’ ने रचला इतिहास

- 34 व्या जर्मन ग्रां. प्री. गोल्ड स्पर्धेत जेतेपद पटकावताना ‘अरविंद भट’ने इतिहास रचला . तो भारताबाहेर ग्रां. प्री. गोल्ड स्पर्धा जिंकणारा दुसरा भारतीय आहे.

<

कृपया CONTACT US या सदरात जाऊन स्वतःचे REGISTRATION ( नोंदणी ) करा. मार्च महिन्याचे मासिक केवळ नोंदणी केलेल्या सदस्यांनाच मोफत मिळेल.