राष्ट्रीय

1) लोकपालाबाबत सरकार तोंडघशी

- सध्याच्या लोकपाल तरतुदीनुसार लोकपलाची निवड करण्याचे स्वातंत्र्य निवड समितीला नाही. त्यामुळे लोकपाल निवड समितीचे अध्यक्षपद आपण स्वीकारणार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश के. टी. थॅामस यांनी सांगितले.
- सध्याच्या कायद्यानुसार केवळ सरकारच्या कार्मिक आणि प्रशिक्षण मंत्रालयाने शिफारस केलेल्या उमेद्वारातूनच ही निवड करावी लागणार आहे.

2) रोल्स रॉइस विमान इंजिन खरेदीप्रकरणी CBI चौकशीचे आदेश

- ही खरेदी रोल्स रॉइस आणि हिंदुस्तान एरोनॅाटीक्स लि. यांच्यात झाली. या खरेदीप्रकरणी CBI चौकशी करण्याचे आदेश संरक्षण मंत्रालयाकडून देण्यात आले आहेत
- रोल्स रॉइस इंग्लंडमधील कंपनी असून त्या खरेदीत अनियमितता दिसून येत आहे.त्याचबरोबर कंपनीच्या आशियातील विक्री प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याचे आणि गैरव्यवहाराच्या आरोपाखाली इंग्लंड मधील शस्त्रास्त्राचे व्यापारी सुधीर चौधरी व त्याचा मुलाला अटक झालेली असल्याने ह्या खरेदीच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत .
- भारतीय हवाई दल आणि नौदलासाठी हिंदुस्तान एरोनॉटीक्स लिमिटेड कडून “हॉक अडव्हॅान्स - जेत ट्रेनर प्रोग्राम” राबविला जातो, त्यासाठी रोल्स रॉइस कडून विमान इंजिनाची खरेदी करण्यात आली होती.

3) यूपीए सरकारच्या जाहिरातीविरोधी याचिका फेटाळली

- मागील दहा वर्षाचा आढावा घेताना UPA सरकारने जाहिरातीचा सपाटा लावला आहे, त्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे.
- केंद्र सरकारने स्वतःच्या कामगिरीच्या प्रसिद्धीसाठी सुरु केलेल्या जाहिरातीसाठी न्यायालयाने नियमावली आखून द्यावी यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती, ती सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.

4) एड्सबाधित बालकाबरोबर होणारा भेदभाव थांबवा – सर्वोच्च न्यायालय

- एड्सबाधित बालकांचा शिक्षणाच्या अधिनियम अधिकारांतर्गत वंचित विभागात समावेश करून कोणत्याही भेदभावाशिवाय त्यांना शिक्षणाचा अधिकार असावा या संबंधीच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी देताना केंद्र सरकार आणि सर्व राज्य सरकारांना एड्सबाधित बालकासोबत कोणताही भेदभाव केला जाणार नाही याची काळजी घेण्यासंदर्भात नोटीस पाठवली आहे.

5) आरक्षण धोरणाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली.

- जाती –धर्म या ऐवजी आर्थिक निकषावर आरक्षण देण्याच्या मुद्द्यावर याचिका दाखल करण्यात आली होती.
- सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळतांना आरक्षणाच्या धोरणात थेट हस्तक्षेप करणार नसल्याचे स्पष्ट केले.

6) राष्ट्रपतीची तेलंगना बिलाला मंजुरी

- १ मार्च २०१४ ला राष्ट्रपतींनी तेलंगना बिलाला मंजुरी दिली. संसदेने ही बिल राष्ट्रपतीकडे मंजुरीसाठी २० फेब्रुवारी २०१४ रोजी पाठवले होते. त्यामुळे तेलंगण हे भारतातील २९ वे राज्य बनले आहे.
- आंध्रप्रदेशमध्ये आता १३ जिल्हे राहणार असून तेलंगणमध्ये १० जिल्ह्यांचा समावेस होणार आहे.
- केंद्र सरकारने अगोदरच तेलंगणला विशेष राज्याचा दर्जा दिला असून, सहा मुद्द्याचे विकास पॅकेज यानुसार या राज्याचा विकास केला जाणार आहे.

या बिलातील महत्वाच्या बाबी

१: हैद्राबाद ही दोन्ही राज्याची धा वर्षापर्यंत राजधानी राहणार आहे. आंध्र प्रदेशचे राज्यपाल हे दोन्ही राज्याचा राज्यपाल म्हणून काम पाहणार आहेत.
२: केंद्र शासनाने नेमलेली तज्ज्ञ समिती येणाऱ्या ४५ दिवसामध्ये आंध्र प्रदेशासाठी राजधानी ठरवणार आहे. त्याचबरोबर गोदावरी- कृष्णा यांच्या पाणीवाटपाबाबत प्रश्न सोडवण्यासाठी उच्च सदस्य मंडळ नेमण्यात येणार आहे .
3: केंद्राने लोकसभेसाठी आंध्रप्रदेश मधून २५ मतदारसंघ तर तेलंगण मधून १७ मतदारसंघांना मंजुरी देण्यात आली आहे, तर विधानसभेसाठी आंध्रप्रदेश मधून १७५ मतदारसंघ तर तेलंगण मधून ११९ मतदारसंघ असणार आहेत
४: सध्या असणारे आरक्षण कोटा १० वर्षापर्यंत असाच चालू राहणार आहे.त्या आरक्षणात वैद्यकीय शिक्षण, तांत्रिक शिक्षण याचा समावेश असणार आहे.

आंतरराष्ट्रीय

1) रशियाच्या फौजा युक्रेनमध्ये घुसल्या

- शीतयुद्धाच्या कालखंडानंतर रशिया आणि पाश्चिमात्य देश यांच्यात सर्वात भीषण असा युद्धप्रसंग युक्रेन प्रकरणामुळे उद्भवला आहे.
- युरोपीय महासंघासह सर्वच राष्ट्रांनी रशियावर टीकास्त्र सोडले आहे. तर जर्मनीच्या चान्सलर अन्जेला मर्केल यांनी रशियासमोर संपर्क गट स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.
- क्रीमियामध्ये सैन्य घुसवण्याचे कारण म्हणजे – क्रिमीया हा काळ्या समुद्रातील महत्वाचा भाग आहे, तेथे मोठ्या संख्येने रशियन लोक राहतात. हा भाग तेलाच्या व्यापाराच्या दृष्टीने संवेद्नशील असून युरोपच्या ऊर्जा आणि तेलविषयक गरजा रशियाशी जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे येथील “राष्ट्रविघातक शक्तीपासून रशियाच्या संरक्षणाचे कारण पुढे करत पुतीन यांनी या भागात सैन्य घुसवले आहे.

2) ऑस्कर पुरस्कार सोहळा

- अंतराळ थरार घडवणाऱ्या “ ग्रॅव्हीटी” या चित्रपटाने बाजी मारली आहे.
- सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सन्मान गुलामगिरीची कहाणी मांडणाऱ्या “ट्वेल्ह इयर्स अ स्लेव्ह” या चित्रपटाला मिळाला.
- सर्वोत्कृष्ट अभिनयाची दोन्ही पारितोषिके डलास बायर्स क्लब या चित्रपटाला मिळाले.
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार “केट ब्लॅंचेट” हिला ब्ल्यू जस्मीन या चित्रपटासाठी मिळाला
- पटकथेचा पुरस्कार – हर या चित्रपटासाठी स्पाईक जोन्स यांना मिळाला.
- वेशभूषा, रचना पुरस्कार : ग्रेट गॅटसबे या चित्रपटाला मिळाला.
- दिग्दर्शनाचा पुरस्कार – ग्राव्हिटीला या चित्रपटाला .
-कृष्णवर्णीय दिग्दर्शकाने ऑस्कर पटकावण्याचा मान पहिल्यांदाच स्टीव्ह मॅकक्वीन यांना मिळाला.
- अॅनिमेशनपट म्हणून –“फ्रोझन” हा चित्रपट सर्वोत्कृष्ट
- सर्वोत्कृष्ट पारिभाषिक चित्रपट –“द ग्रेट ब्युटी”

3) युक्रेनच्या प्रश्नावर संपर्क गटाची स्थापना

- रशियाने संपर्क गट स्थापन करून निर्माण झालेल्या प्रश्नावर राजकीय तोडगा काढावा हे अन्जेला मर्केल यांचा प्रस्ताव वाल्दीमीर पुतीन उन्नी मान्य केला आहे.त्याचबरोबर सत्याशोधन पथकही पाठवण्याचे मान्य करण्यात आले आहे.
- अन्जेला मर्केल यांनी म्हटले कि, ‘ क्रीमियातील लष्करी हस्तक्षेपामुळे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन झाले आहे, १९९४ च्या “बुडापेस्ट” करारानुसार आपला देश युक्रेनच्या सर्वाभौमत्वाचा तसेच सीमांचा मान राखण्यास बांधील आहे .

4) दहशदवादाच्या मुद्द्यावर सर्वांना एकत्र येणे आवश्यक: पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग

- देशांना जो दहशतवादाचा प्रश्न भेडसावत आहे,त्यावर आशियाई राष्ट्रांनी एकत्र येऊन परस्परांना सहकार्य करण्याची गरज पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी व्यक्त केली.
- तिसऱ्या “बिमस्टेक” ( बे बेंगाल इनीशीएटीव्ह फॉर मल्टी टेक्निकल अन्ड इकोनोमिक को-ऑपरेशन ) ही सात राष्ट्राचा समावेश असलेली संघटना आहे .

आर्थिक

1) औद्योगिक कोरीडोरचा महाराष्ट्रातून शुभारंभ

- दोन प्रमुख राजधान्यांना जोडणारा बहुप्रतीक्षित ओद्योगिक कोरीडोर दिनांक ०३/०३/२०१४ रोजी राष्ट्राला अर्पण करण्यात आला.
. एकूण चार कोरीडोर असून पहिल्या कोरीडोरचा मार्ग मोकळा झाला आहे.

2) टाटांची जेष्ठ नागरिकासाठी घरे

• टाटा कंपनी जेष्ठ नागरिकासाठी घरे पुरवण्यासाठी ३ प्रकल्प साकार करणार आहे. या कंपनीने बंगळुरूत “रीवी रेसिडेन्सी” हा पहिला प्रकल्प साकारला असून आठ शहरामध्ये कार्य करण्याचे निश्चित केले आहे.

क्रीडा

1) ग्रॅमी स्मिथची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

- ही निवृत्ती तडका-फडकी झाली असली तरी, स्मिथने गेल्या वर्षीच्या पायाच्या दुखापतीमुळे ही निवृत्ती जाहीर केल्याचे स्पष्ट केले आहे.

2) हॉकी इंडीयाच !

- क्रीडा मंत्रालयाने हॉकी इंडियाला राष्ट्रीय क्रीडा संघटनेचा दर्जा दिला आहे. त्यामुळे हॉकी इंडिया हीच आता देशातील हॉकीची राष्ट्रीय संघटना म्हणून ओळखली जाणार आहे.
- या ठरावामुळे हॉकी महासंघाला (IHF) ला झटका बसला आहे.

<

कृपया CONTACT US या सदरात जाऊन स्वतःचे REGISTRATION ( नोंदणी ) करा. मार्च महिन्याचे मासिक केवळ नोंदणी केलेल्या सदस्यांनाच मोफत मिळेल.