दैनिक बातम्या व विश्लेषण

 

राष्ट्रीय

 

1) भारतीय नौदल

 

- भारताच्या नौदलात ४१ युद्धनौका असून त्यापैकी १७ युद्धानौकांचे आयुमान संपलेल्या अवस्थेत आहे.यातील केवळ दोन पाणबुड्या नवीन आहेत.
- INS विरत हि विमानवाहू युद्धनौका पन्नास वर्ष वापरात असणारी जगातील एकमेव युद्धनौका आहे.
: भारतीय नौदलात असणाऱ्या पाणबुड्या :
- शिशुमार वर्गातील : शिशुमार, शान्कुश, शल्की, शंकुल
- राजपूत वर्गातील : रजपूत, रणजित, रणवीर, रणविजय.
- कॅार्व्हेटस् या प्रकारातील युध्दनौकामध्ये कुकरी वर्गातील : कृपाण, कुठार, खंजर, आणि कुकरी.
वीर वर्गातील – वीर, निर्भिक, निपात, निशंक, निर्घट इ.

 

 

2) निवडणूक खर्चाची मर्यादा वाढली

 

- लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी कमाल ७० लाख तर किमान ५४ लाख रुपये खर्च करण्याची परवानगी देणारा निवडणूक आयोगाचा प्रस्ताव केंद्र सरकारने मंजूर केला .
- विधान सभा निवडणुकीसाठी २८ लाख तर ईशान्येकडील राज्यासाठी किमान २० लाखापर्यंत हि वाढ करण्यात आली .
- महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, व कर्नाटक या राज्यात लोकसभा निवडणुकीला ४० लाखाऐवजी ७० लाख रुपये खर्च करण्यास परवानगी देण्यात आली, तर गोव्यासारख्या लहान राज्यात २२ लाखावरून ५४ लाख खर्च करण्याची परवानगी देण्यात आली.

 

3) मुलपेशींचा वापर सध्या संशोधनासाठीच

 

- सध्या मुलपेशीच्या आधाराने रोग बरा करण्याचा नावाखाली होणाऱ्या दुकानदारीला आळा घालण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्वे “ इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) आणि “डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी (DOB)” यांनी जाहीर केली.
- यापुढे एखाद्या रुग्णावरील (स्टेम सेल )मुलपेशीचा वापर हा केवळ संशोधन म्हणून करता येणार आहे, स्टेम सेलचा वापर हा केवळ मान्यताप्राप्त केंद्रामध्येच केला जाणार आहे.
- (ICMR) व (DOB) यांच्या समितीने स्टेम सेल उपचार शब्द वगळण्याची आग्रही भूमिका मंडळी होती
- कारण स्टेम सेल हे सध्या संशोधनाच्या अवस्थेत असल्यामुळे व त्याची खात्री होणे आवश्यक असल्यामुळे त्याचा वापर लगेच उपचारामध्ये करून चालणार नाही असे समितीकडून सांगण्यात आले आहे.

 

 

4) आंध्रप्रदेश मध्ये राष्ट्रपती राजवट

 

- आंध्र-प्रदेशचे विभाजन करून स्वतंत्र तेलंगण राज्याची निर्मितीच्या विरोधात मुख्यमंत्री एन. किरणकुमार रेड्डी यांनी राजीनामा दिला होता.
- त्याकारणाने या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली .
- राष्ट्रपती राजवटीमध्ये या राज्याचा कारभार राष्ट्रपतीमार्फत इ. एस. एल. नरसिम्हा हे कारभार पाहतील.
- तेलंगण हे देशातील २९ राज्य आहे .
- 2014 मध्ये राष्ट्रपती राजवट लागू होणारे आंध्र प्रदेश हे दुसरे राज्य होय. या आधी दिल्ली या देशाच्या राजधानीच्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.

 

 

5) केंद्रशासनाचे विविध निर्णय

 

- पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रीमंडळाच्या आर्थिक समितीची बैठक दिनांक २८/०२/२०१४ रोजी पार पडली .
- या बैठकीचे निर्णय :
- i)केंद्रीय कर्मचाऱ्याच्या महागाईभत्त्यात १० % वाढ करण्यात आली, या वाढीबरोबर कर्मचाऱ्याचा महागाई भत्ता हा १००% झाला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी १ जानेवारी २०१४ पासून होणार आहे.
- ii) अंध-अपंगाना विशेष मोबाईल, लॅपटॅापसह विविध सोई इ. या सोई सुविधा केंद्रीय अपंग कल्याण खात्याने प्रस्तावित केलेल्या होत्या. <.br> - अपंगाना लागणाऱ्या विविध सामग्रीसाठी आर्थिक सवलत मिळणार आहे, यासाठी आर्थिक निकषाची पात्रता रद्द करण्यात आली आहे. तसेच १० वीच्या पुढे शिकणाऱ्या अंध विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी “ब्रेल” लिपी जाणणारा शिक्षक त्यांच्या मदतीसाठी दिला जाणार आहे
- मोटार असलेली तिचाकी व व्हीलचेअर साठी ६ हजार ऐवजी २५ हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे.
- मस्कुलर डायस्ट्रोफी, लकवा, सेरेब्रल पाल्सी, हेमिप्लेगीया, या अजाताने ग्रस्त असलेले आणि तीन किंवा चार अवयव नसलेल्या अपंगाना याचा लाभ मिळेल.
- Iii) EPS अंतर्गत किमान पेन्शन :
कर्मचारी निवृत्ती वेतन योजना-९५ अंतर्गत खाजगी कंपन्यातील किमान पेन्शन १ हजार करण्यात आले आहे.
- Iv) सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन टेलिफोन इंडस्ट्रीजच्या कर्मचाऱ्याचे वेतन देण्यासाठी २०० कोटी रुपयांचे कर्ज देण्याची घोषणा सरकारने केली.
- V) रोहयो अंतर्गत आदिवासींना मिळणार १५० दिवस काम :
- यापूर्वी १०० दिवस काम मिळत होते ते १५० दिवस देण्यात येणार आहे. या योजनेची अंमलबजावणी १ एप्रिल २०१४ पासून होणार आहे.
- वन हक्क कायदा २००६ अंतर्गत अतिरिक्त ५० दिवसांचे काम आदिवासींना मिळणार आहे. तसेच रोहयो कामगारांना विविध रंगाचे जॉबकार्ड दिले जाणार आहेत.
- Vi) आकाशवाणी दूरदर्शनला ३५०० कोटी रुपये :
- प्रसार भारतीच्या पायाभूत सुविधा व नेटवर्कमध्ये सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारने आकाशवाणी, दूरदर्शनला ३५०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. दूरदर्शनच्या DTHचा विस्तार करणे आणि आकाशवाणीच्या पायाभूत सुविधामध्ये वाढ करण्यात येणार आहे. हाय डेफिनेशन टेलीव्हीजनचे स्टुडीओ चेन्नई व कोलकात्यात उघडण्यात येणार आहे

 

 

आंतरराष्ट्रीय

 

 

1)अमेरिका सैन्य कपात करणार

- मेरीकेला जे महासत्ता म्हणून जे स्थान मिळाले आहे त्याचे कारण म्हणजे त्यांच्याकडे असणारी सैन्याची ताकद
- पण आता काटकसरीच्या धोरणामुळे सैन्य कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे.
- दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी अमेरिकेकडे जेवढे सैन्य होते तेवढीच सैन्याची संख्या ठेवण्याचा निर्णय अमेरिकी सरकारने घेतला आहे.
- तसेच “A-10” हि लढाऊ विमाने हवाई दलातून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हि विमाने युरोपातील रणगाडे उध्वस्त करण्यासाठी तयार करण्यात आले होते.

 

2) इग्लंडच्या २०० वर्षाच्या संसदीय भाषेचा अभ्यास होणार

- जगातील अनेक देश इग्लंडच्या संसदीय कामकाजाचे अनुकरण करत असतात, त्यामुळे इग्लंड मधील भाषातज्ञ अभ्यास करणार आहेत.
- हे तज्ञ २.३ अब्ज शब्दाचे विश्लेषण करून संसदीय भाषेत झालेले बदल टे नोंदवणार आहेत.
- ग्लासगो विद्यापीठात शिकणाऱ्या संशोधाकांनी हा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला.

 

 

कृपया CONTACT US या सदरात जाऊन स्वतःचे REGISTRATION ( नोंदणी ) करा. फेब्रुवारी महिन्याचे मासिक केवळ नोंदणी केलेल्या सदस्यांनाच मोफत मिळेल.