Goto Back  (मागील पानावर)

दैनिक बातम्या व विश्लेषण

राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय

१.स्थलांतरित हिंदूंना मतदानाचा अधिकार हवा – मोदी

फाळणीनंतर व इतर घटनांनंतर भारतात आलेल्या स्थलांतरित हिंदूंना मतदानाचा हक्क मिळायला हवा, असे नरेंद्र मोदि म्हणाले.

२. लामा – ओबामा भेटीचा चीनने केला निषेध
मात्र लष्करी सहकार्यावर भर

-अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि तिबेटी धार्मिक गुरु दलाई लामा यांच्या भेटीवर चीनने निषेध व्यक्त करणारा खलिता अमेरिकेच्या चार्ज द अफेअर्स च्या हवाली केला.
-चीनचे म्हणणे- “ हि भेट म्हणजे = १.आमच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप.
२.अमेरिकेने तिबेटला पाठींबा न देण्याचे आश्वासन मोडले.
३. चीन-अमेरिका संबंधांवर परिणाम.
-दुसरीकडे चीनने अमेरिकेशी ‘लष्करी चर्चा’ करण्याची तयारी चालवलीय. त्यात सामरिक सहकार्य, तंत्रज्ञानाची देवाणघेवाण, दूरगामी व्यूहरचना इ मुद्दे असतील.

३.यानुकोविच अखेर पदावरून दूर झाले.

- रशियाशी जवळीक असल्याचा आरोप असलेले युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष विक्टर याकुनोवीच यांना विरोधकांनी अखेर पदच्युत केले आहे.
-लवकरच नव्याने निवडणुका होण्याची चिन्हे आहेत.

४.म्याटेओ रेन्झीचा शपथ-सोहळा संपन्न

-इटलीतील तसेच युरोपियन युनियनमधील (EU) सर्वात तरुण (३९)पंतप्रधान होण्याचा मान म्याटेओ रेन्झी यांनी पटकावला आहे.
- मंत्रिमंडळाचे सरासरी वय – ४७.८ वर्षे

राज्य

१.राज्यातील आदिवासी विकास योजनांचे होणार मूल्यमापन

- आदिवासींच्या कल्याणासाठी राज्य सरकारतर्फे दरवर्षी अर्थसंकल्पाच्या ९.४% निधी राखून ठेवला जातो. ७१ योजना सध्या कार्यरत आहेत.
- मात्र तरीही आदिवासींचा विकास का झालेला नाही, योजना त्यांच्यापर्यंत पोहोचतात का हे तपासण्यासाठी आणि आदिवासी योजना व धोरणात अमुलाग्र बदल घडवण्यासाठी माजी उपलोकायुक्त सुरेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली गेली आहे.

२.’निर्माण’ – अमृत बंग यांचा उपक्रम

- डॉ अभय बंग यांचा मुलगा अमृत बंग.
- अमृतने २००६ साली ‘निर्माण’ संस्थची स्थापना केली.
- उद्देश- उच्चविद्याविभूषित वैद्यकीय शिक्षण घेतलेल्यांना सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून दुर्गम भागात काम करण्यास तयार करणे.
-आज अनेक डॉक्टर्स गडचिरोलीत फिरत्या वैद्यकीय दवाखान्यांच्या मार्फत सेवा पुरवत आहेत.

३. सनदी अधिकारी स्वीकारताहेत राजकारणाचा मार्ग

उदा. राज्याचे प्रधान सचिव (गृह) प्रेमकिशन जैन , मुंबईचे माजी पोलीस आयुक्त डॉ सत्यपाल जैन, T. K. Chaudhary, Y.C. Pawar इ

४. कोकनला मिळणार वर्षभर पुरणारे पिण्याचे पाणी

-तिलारी आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्प दोडामार्ग तालुक्यात आहे.
-या प्रकल्पाचे पाणी पिण्यासाठी समुद्रकिनारयावरील भागात नेण्याची योजना आहे. (२५० कोटी खर्च)

५. विनोद घोसाळकरने केले, उपविभागप्रमुखाने भोगले

-मागठाण्याचा शिवसेनेचा विभागप्रमुख विनोद घोसाळकर याने तिघींना त्रास दिला होता-

१)शिवसेना नगरसेविका शितल म्हात्रे (यांचा मोबाईल नंबर सार्वजनिक शौचालयात लिहिला.)
२)माजी महापौर शुभा राउळ
३)भाजप नगरसेविका मनीषा चौधरी
-हे प्रकरण घडून महिना झालाय व आता उद्धव ठाकरे यांनी घोसाळकर वर कारवाई न करता उपविभागप्रमुखाला पदावरून दूर केलेय.

६. वाहनांची नंबर प्लेट व डुप्लिकेट चावी बनवताना पेंटर व चावी तयार करणाऱ्यास वाहनाच्या मालकीची कागदपत्रे दाखवावी लागणार.

अर्थव्यवस्था

१. रखडलेल्या ‘मिहानला’ ‘इन्फोसिस’ देणार चालना-

-पुण्यात दोन प्रकल्प सुरु केल्यानंतर इन्फोसिसने नागपुरात तिसरा प्रकल्प सुरु केलाय.
-इन्फोसिस प्रमुख नारायण मूर्ती यांच्या मते या प्रकल्पातून १५००० रोजगार निर्मिती होईल.
नागपूरचे देशातील मध्यवर्ती ठिकाण, दळणवळणाच्या सोयी, भौगोलिक परिस्थिती, मुबलक जमीन, मुबलक मनुष्यबळ, पाणी अशा उद्योग सुरु करण्यास उपयुक्त बाबी नागपुरात असल्याने मिहान येथे सुरु झाला.
-मात्र जागतिक मंदी, भूसंपादन, पुनर्वसनाचा तिढा इ मुळे हा प्रकल्प रेंगाळलाय.

२.टाटाची वीज महागली

-टाटांचा मुंन्द्रा वीज प्रकल्प इंडोनेशियातून कोळसा आयात करतो.
-मागील वर्षी या कोळसा व्यवहारांवरील शुल्कात वाढ झाली.
-परिणामी केंद्रीय वीज नियामक आयोगाने या वाढीव खर्चाची भरपाई म्हणून टाटाला वीजदरवाढ करण्यास मागील वर्षी तात्विक परवानगी दिली. तसेच अंतिम निर्णय घेण्यासाठी समिती नेमली.
-आता समितीचा अहवाल आलाय. त्यानुसारच ५८ पैशांची वाढ केली गेलीय.
-टाटा महाराष्ट्रातही वीज पुरवतात.

3. पुणेरी विडी कंपनीवर अमेरिकेत बंदी

- अमेरिकी सरकारच्या अन्न व औषध प्रशासनाने (FDA) पुण्याच्या JASH INTERNATIONAL या विडी निर्मात्या कंपनीवर बंदी आणली आहे. - JASH ची उत्पादने आरोग्यास अती प्रमाणात हानिकारक आहेत तसेच उत्पादनांवर वापरलेल्या घटकांची व त्यांच्या गुणधर्मांची माहिती देण्यात आलेली नाही; असा FDA चा आक्षेप आहे. - कायदा – कौटुंबिक धुम्रपान प्रतिबंध व तंबाखू नियंत्रण कायदा- २००९ नुसार FDA ने ही कारवाई केली आहे.

विज्ञान – तंत्रज्ञान

१. Whats App वर आता privacy जपता येणार

- facebook ने whats app चा ताबा घेतल्यानंतर आता whats app चे वापरकर्ते (users) आपल्या तीन बाबी इतरांपासून खाजगी ठेवू शकतात.
१.last seen 2. Profile photo 3. Status

२. नारळीकरांना मिळणार नायुदम्मा पुरस्कार

-खगोलशास्त्र मधील कामगिरीसाठी दिला जाणारा नायुदाम्मा पुरस्कार (२०१३) डॉ जयंत नारळीकरांना दिला जाणार आहे.
-नायुदाम्मा - डॉ. येल्वार्थी नायुदाम्मा -(तेनाली येथील त्वचाविकार तज्ञ)
-नायुदाम्मा पुरस्कार - डॉ नायुदाम्मा मेमोरिअल ट्रस्टच्या वतीने १९८६ पासून दिला जातो.
- डॉ जयंत नारळीकर - जागतिक कीर्तीचे विश्वरचना वैज्ञानिक